पोस्ट्स

मावळत्या नामला अर्ध्य जोडुनी दोन्ही करा

इमेज
                                              आपल्या मराठीमध्ये "मावळत्या दिनकरा  अर्ध्य  जोडुनी दोन्ही करा " अशी इंदोरचे  राजकवी भा. रा. तांबे याची एक अजरामर कविता आहे  ज्यात मनुष्याच्या पडत्या काळात जग अश्या माणसाला सोडून जाते .त्याचे सखे  सोयरे देखील त्याला विसरतात . जग नेहमी विजेत्याबरोबर असते अशा संदेश दिला आहे  . हे सर्व  लिहीण्याचे कारण म्हणजे ज्या  आंतराष्ट्रीय संघटनेला भारताने जन्म दिला त्या नामकडे सध्या भारताने केलेले दुर्लक्ष . नामची १८वी  परिषद  आशिया आणि युरोप खंडाच्या सीमेवर असणाऱ्या अझरबेकिस्तान या देशाच्या राजधानीत अर्थात बाकु या शहरात  २५ आणि २६  ऑक्टोबर रोजी  झाली . मात्र त्याची म्हणावी अशी चर्चा भारतीय माध्यमामध्ये  झाली नाही .  भारतातर्फे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी यास उपस्थिती लावली . नामच्या सलग दुसऱ्या परिषदेत भारतातर्फे उपराष्ट्रपती यांनी हजेरी लावल...

अन्य देत नाही, मग आपण का देयचे ?

इमेज
                                                                नुकतेच मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीला भेटलो , सुरवातीचे क्षेमकुशल झाल्यावर विषय निघाला तो आपल्या लाडक्या एसटीचा . बोलण्याचा ओघात सदर व्यक्तीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या भारतात सर्वाधिक सवलती देते असे सांगितले . तेव्हापासून मला प्रश्न पडला आहे की, एकीकडे महामंडळ तोट्यात असताना अनावश्यक सवलती कश्यासाठी दिल्या जात आहेत . माझ्यामते या सर्व भाडे सवलतीच्या आढावा घेऊन त्यांची संख्या किमान पातळीवर आणावी . महामंडळाचे काम माझ्या मते ज्या लोंकाकडे स्वतःच्या मालकीचे वाहन नाही त्यांना प्रवाशी सेवा पुरवणे आहे  , न की अनावश्यक भाडे कपातीच्या सेवा पुरवणे . एकीकडे महामंडळाच्या वाहक आणि चालकांना महामंडळाच्या तोट्याचे कारण पुढे करत ,  इतर राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत हास्यास्पद वाटावे , असे मानधन देयचे,  आणि दुसरी...

इयूच्या गळ्यात अडकलेले हाड ब्रेक्सिट (भाग ४ )

इमेज
                                 या दिवाळीच्या दिवसात समस्त महाराष्ट्र पाऊस कधी जाणार? , महाराष्ट्राचा  मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ कधी घेतो , याकडे डोळे लावून बसलेली असताना , भारताच्या सर्वाधिक आंतराष्ट्रीय व्यापार ज्या युरोपीय युनियनशी होतो , त्या युरोपीय युनियन मध्ये वेगळीच चिंता घोर लावत आहे , ती म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे ब्रेक्सिट कधी होणार ? बेक्सिट विषयीचा या ब्लॉगवर हा  चवथा लेख लिहीत असताना ( या आधीच्या तिन्ही लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे. )  युरोपीय युनियनने ब्रेक्सिटसाठी युनाटेड किंग्डमच्या संसदेला ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे . आता ब्रेक्सिटसाठी  ३१ जानेवारी २०२०ही मुदत असेल . त्याच्या अगोदर युनाटेड किंग्डम मध्ये १२ डिसेंबर त्यांच्या संसदेसाठी निवडणुका होतील, असे हा लेख लिहण्यापर्यंत पंतप्रधान असलेले बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले आहे . मात्र या निवडणूक याच्या आधी हव्यात अशी तेथील विरोधी पक्षाची भूमिका आहे . अर्थात या...

या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज

इमेज
                             नुकताच मी  काही कामनिमित्य भिवंडी येथे गेलो होतो.  तेथील एसटी स्टॅण्डवर मी गुजरात राज्य परिवहनाची एक बस बघितली . मला उच्छूकता वाटल्याने मी बसेसबाबत आधी चौकशी केली असता , मला समजले की . ती सुरत ते मुंबई सेंट्रल या दरम्यान भिवंडीमार्गे  धावणारी  बस होती . आपण जर नकाश्यात सुरत ते मुबई सेंट्रल या दरम्यानच्या रस्ता बघितला तर त्यात कुठेही भिवंडी येत नाही . मग ही बस भिवंडीवर आली कुठे ? तर जो सुरत ते मुंबई दरम्यान असणाऱ्या मुंबई ते दिल्ली महामार्गावरून   मुंबईपासून  हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चीकानेर येथून हि बस वाडामार्गे भिवंडी येथे जाते तिथून ठाणे मार्गे मुंबईत येते , आहे कि नाही, गंमत .                                              याचा आधी मी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर गुजरात राज्य परिवहनाची अहमदाबाद ते कोल्हापूर अशी स्लीपर व्होलो...

जरा अन्यांचा आदर्श घ्यावा

इमेज
                      आताच टीव्हीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरात दिवाळीनिमित्य वाढ करण्यात आल्याची बातमी बघितली,  आणि मला २०१६ साली  याच दिवाळीच्या कालावधीत तेलंगणा राज्य परिवहनाच्या  बसने  आरक्षण करून पुणे ते सोलापूर या  दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली , मी त्याआधीही आरक्षण करून सदर मार्गावर प्रवास केला होता  , जो कमी गर्दीच्या कालावधीत केला होता . आणि दुसऱ्यांदा करत असलेला प्रवास हा गर्दीच्या कालावधीत केलेला होता . या दोन्ही प्रवसांदरम्यान मला आढळलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचे लेखन करत आहे . या दोन्ही प्रवासनादरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रवास दरम्यान पुणे सोलापूर या दरम्यानचे भाडे सारखेच होते . जे त्या वेळच्या महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाच्या त्याच दर्जाच्या बसेसच्या  कमीत कमी भाड्यापेक्षा तब्बल ४० रुपये कमी होते .  मात्र दोन्ही वेळेस मला आकारण्यात येणाऱ्या आरक्षण शुल्कात तब्बल ६६ टक्क्यांचा फरक होता . कमी  ...

ग्रॅण्डमास्टरांची पासष्टी

इमेज
                                                              गेल्या आठवड्यात आपण सर्व जण विधानसभेच्या निवडणुकीच्या बातम्यांच्या  गदारोळात हरवून गेलो असताना,  भारतीय क्रीडा विश्वात एका नव्या ताऱ्याचा जन्म होत होता ,  आणि हा तारा महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला येत  होता हे विशेष . जगातील नवव्या  क्रमांकाच्या सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टरच्या रूपात हा तारा उदयास येत होता . रौनक साधुवाणी हे त्या ताऱ्याचे नाव . रौनक भारताचा ६५ वा ग्रँड मास्टर आहे . १३ वर्ष ९ महिने आणि २६ दिवसाचे असताना त्याने हा पराक्रम केला आहे . भारतीय युद्धकलेच्या पाश्वभूमीवर आधारलेला, भारतीय लोकांनी शोधलेल्या या खेळावर आता आता पर्यंत रशियन खेळाडूंचे वर्चस्व होते . ते मोडीत काढत आता अनेक भारतीय खेळाडू मोठ्या जोमाने पुढे येत आहेत . रौनक साधुवाणी हा त्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो . रौनक नागपूरच्या सेंट्रल पॉईंट या शाळेत शिकतो...

कसे होणार बेक्झिट ( बेक्झिट मालिकेतील तिसरा भाग )

इमेज
                     आपल्या भारतात दोन राज्यातील निवडणुका अणि अयोध्या  येथील धार्मिक वास्तुवरुन राजकरण तंग झाले असताना जगात काय  चालू आहे,   याचा आढावा घेतला असता,  आपणास सहज लक्षात येते की , गेल्या तीन वर्षांपासून साऱ्या  जगाच्या   युरोपच्या आणि युनाटेड किंग्डम या देशाच्या राजकारणातील कळीचा मुद्दा असलेल्या बेक्झिट या मुद्यावरून सध्या जगाचा श्वास रोखून धरला आहे . आपण सध्या वाचत असलेला हा लेख माझा   ब्रेक्झिट या विषयावरील तिसरा लेख आहे . या आधीच्या दोन्ही लेखाच्या लिंक या ब्लॉग पोस्ट च्या खाली दिलेल्या आहेत . तुम्ही त्यावर क्लिक करून तो वाचू शकता .          सदर लेखन करताना ब्रेक्झिट हे युरोपीय युनियन बरोबर युनाटेड किंग्डम यांचा करार करून होणार असल्याचे आतापर्यंतचे पंतप्रधान  बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले असून . या साठी आता मुदतवाढ घेतली जाणार नसून ठरल्याप्रमाणे ३१ ऑक्टोबर २०१९ लाच हे होणार असल्याचे  ही त्यांनी जाहीर केले आहे . त्यांनी जाहीर केलेल्य...