पोस्ट्स

पंडित नेहरूंच्या जयंतीच्या निमित्याने

इमेज
                              भारताच्या स्वातंत्र्याला आज रोजी 72 वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहे . या ७२ वर्षात त्याच्या प्रगतीसाठी विविध लोकांनी प्रयत्न केले . त्यामध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे आजच्या काळात त्यांचा काळातील एकही राजकारणी जिवंत नाही . .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . त्या अनुषंगाने आजच्या चष्म्यातून  नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही    1)नियोजन आयोग ते नीती आयोग 2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण 3)नामची स्थापना, चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर 4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश 5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर,   मंगळावर जाणारा देश 6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश     ...

आदरांजली एक मराठमोळ्या विज्ञान वेड्याला

इमेज
                                मला आज सकाळी खगोलशास्त्राची रुची असलेल्या एका मित्राचा फोन आला, त्याने सांगितले अरे मोहन आपटे सर गेले . मी सुन्नच झालो . मोहन आपटे सर म्हणजे मराठीत विज्ञानविषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तींपकी  एक  मह्त्वाचे नाव .  सध्याच्या काळातील  हाताच्या बोटावर मोजता येईल , अश्या मराठीतून  विज्ञान विषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तीपैकी एक .  माझा आणि त्यांचा संपर्क प्रत्यक्ष जरी नसला  तरी त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत , त्या अर्थाने एक वाचक आणि लेखन म्हणून आमचा खूप चांगला संबंध होता .                          संस्कृतप्रचुर समजण्यास कठीण  अश्या मराठीतील विज्ञान लेखनास त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने आकृतिबद्ध केले . त्यांच्या विज्ञानाच्या विविध शाखेतील  शास्त्राची माहिती देणारी मला उत्तर हवंय , ही  पुस्तकमाला खूप गाजली . किंबहुना ...

गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची

इमेज
                                                                सध्या फक्त आपल्या भारतातातच नव्हे तर , समस्त जगभरात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत . ऑस्ट्रोलियाच्या पूर्व भागात  लागलेला वणवा असो , अथवा ब्राझीलच्या -लुला या माजी राष्ट्राध्यक्षाची कारागृहातून झालेली सुटका असो . अथवा २५ सप्टेंबरपासून सुरु झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या  महाभियोगाचे नाट्य ही  त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे . माझ्या मते यातील  या सर्व घडामोडीतील  सर्वात महत्तवाची घडामोड म्हणजे . डोनाल्ड ट्रूम्प यांच्यावर चालवण्यात येणार महाभियोग . जगातील सर्वात प्रबळ अश्या राष्ट्राचा प्रमुखांवर ते प्रमुखपद काढण्यासाठी चालवण्यात येणार खटला म्हणजे हा महाभियोग होय .                                                   ...

नोटबंदी नंतरची ३ वर्षे

इमेज
                                                                                    आज ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अश्या विमुद्रिकरणाला (नोटबंदी )३ वर्षे पूर्ण झाली . या ३ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठी उचलेले हे एक धाडसी पाऊल होते . हे पाऊल कितपत  यशस्वी झाले ? यावर मतमतांतरे असून शकतात . मात्र हा एक धाडसी निर्णय होता , याबाबत मात्र दुमत नसावे . भारताच्या आर्थिक इतिहासात डोकावले असता आपणास असे लक्षात येते की , इंदिरा गांधींनी घेतलेल्या बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय असो , अथवा  नरसिहराव पंतप्रधान असताना घेललेला  भारतीय अर्थव्यवस्था परकीय लोकांसाठी खुली करण्याचा निर्णय असो . अश्या काही महत्तवाच्या निर्णयांमध्ये याचा समावेश करता येईल .           ...

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे (भाग तिसरा )

इमेज
                                           आपणास  महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत विविध बातम्या पारंपरिक  प्रसार माध्यमातून समजत असताना  भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या बाबतीत नाट्यमय घडामोडी घडत आहे . या घडामोडी सध्याचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या  डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आणि पुढील राष्ट्राध्यक्षांबाबत देखील घडत आहे . मी या लेखमालेच्या पहिल्या भागातच सांगितल्याप्रमाणे मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काहीही भाष्य करणार नाही . माझ्या आधीच्या लेखांच्या लिंक या लेखाच्या खाली आपणास मिळतील           या लेखमालेच्या दुसऱ्या भागात युनाटेड स्टेट्स ऑफ  अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चार टप्यापैकी पहिल्या दोन टप्यात काय काय घडते याची माहिती घेतली आता या  भागात तिसऱ्या आणि चोथ्या टप्यात काय घडते याची माहिती घेउया        ...

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतीचे (भाग २ )

इमेज
                                   हॅलो मित्रांनो  सध्या आपल्या  महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची खमंग चर्चा रंगली असताना , आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात  सुद्धा त्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सूर झाली आहे . ही निवडणूक कधी आहे , त्यासाठी कोण मतदान करू शकतो  आणि हे मतदान कसे  होते याची ओळख आपण माझ्या या  विषयाचा पहिल्या भागात करून घेतली आहे . आता हि माहिती सविस्तर बघूया . ज्यांना माझा पहिला भाग वाचायचा असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकला भेट द्यावी .                                                                              तर ज्याची वयाची ३५ वर्षे पूर्ण आहेत आणि जो किमान १४ वर्षे युनाटेड स्टेस्टस ऑ...

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्राचे लक्ष आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे लागले असताना जगातील एक प्रबळ सत्ता असलेल्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत सध्या दोन मुद्यांनी  भल्या भल्या लोकांची अक्षरशः झोप उडवली आहे . त्यातील एक मुद्दा म्हणजे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार का ? हा असून दुसरा मुद्दा म्हणजे ३ नोव्हेंबर २०२० ला अमेरिकेच्या ४६ वे  राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी फारसे बोलणार नाही . मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते ३ नोव्हेंबर २०२० ला Elector  कोणाच्या गळ्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची माळ घालतात . अर्थात २० जानेवारी २०२१ ला होणाऱ्या  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्याकडे    दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे . ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे .  आता आपण या ची माहिती घेउया  हि निवडणूक कधी होते  ही निवडणूक कधी होणा...