पोस्ट्स

या लोंढ्याना आवरायला हवे (भाग २ )

इमेज
                                                                         मित्रानो गेल्या  काही कालावधीत मी दोनदा नाशिक ते सुरत या दरम्यान प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला आपली महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्याची एसटी या दरम्यान काही फरक आढळले . ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखमालेतील हा दुसरा भाग , तुम्ही पहिला भाग या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता .                                        मला आढळलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येण्याचे  अति प्रचंडप्रमाण आणि त्या तुलनेत आपल्या एसटी बसेस अन्य राज्यात जाण्याचे नगण्य प्रमाण . आपण रात्री पुण्याच्या स्वारगेटवर  बघा पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या आपल...

दूरसंचार क्षेत्रातील अस्वस्थता

इमेज
                सध्या आपल्या महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? या बाबत पारंपरिक प्रसारमाध्यमे आपल्याला माहिती देत असताना,  आज एक इंग्रजी वृत्तवाहिनी बघताना समोर आलेल्या दूरसंचार क्षेत्रातील बातमीने माझी अक्षरशः झोप उडाली आहे . ती बातमी आहे , भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या खासगी कंपनीच्या तोट्याची . एअरटेल आयडिया - व्होडाफोन या दोन कंपन्यांना सुमारे ७० हजार कोटी रुपयाचा तोटा झाला आहे मित्रानो केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मनरेगा या येजनेसाठी सरकार ६१ हजार कोटी रुपये खर्च करते हे आपण या तोट्याकडे बघताना लक्षात घेतले पाहिजे . एकीकडे सरकारी दूरसंचार कंपन्या असणाऱ्या  बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्या तोट्यामुळे चर्चेत आल्या असतानाच ही  बातमी येणे भारतातील एकूणच दूरसंचार क्षेत्राची स्थिती कशी आहे ? हे पुरेसे स्पष्ट करणारे आहे . यात शंकाच नाही .                                            ...

अजून किती अपघात बळी ?

इमेज
                           आज  दुपारी सहज व्हॉट्सअप बघता असताना एका गृपवर एक बातमी बघितली, आणि  काही क्षण काहीच सुचेना . नाशिकच्या सुप्रसिधद गायिकेच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यूची ती बातमी होती . रस्त्यावरील एका कुत्र्याला वाचवण्याच्या नादात त्याची कार  रस्त्यावर थांबलेल्या एका टँकरवर आदळून सदर अपघात झाला होता . काही वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नासाठी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या एका पत्रकाराचा अश्याच एका ट्रकमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची त्यामुळे मला चटकन आठवण झाली . मी स्वतः  नाशिक ते पुणे अनेकदा  प्रवास करतो .त्या दरम्यान मी सुद्धा अनेकदा  बघतो की  , ऊस हंगाम सुरु झाल्यावर अनेक ट्रक अत्यंत  धोकादायक स्थितीत चालवले जातात . मात्र त्यावर वाहतूक खाते काहीच कार्यवाही करत नाही . अवजड माल वाहतूक धोकादायक परिस्थितीत करायलाच पाहिजे, अशा नियम आपल्या भारतात असावा  का ? असे मला यातून वाटते .                ...

पंडित नेहरूंच्या जयंतीच्या निमित्याने

इमेज
                              भारताच्या स्वातंत्र्याला आज रोजी 72 वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहे . या ७२ वर्षात त्याच्या प्रगतीसाठी विविध लोकांनी प्रयत्न केले . त्यामध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे आजच्या काळात त्यांचा काळातील एकही राजकारणी जिवंत नाही . .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . त्या अनुषंगाने आजच्या चष्म्यातून  नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही    1)नियोजन आयोग ते नीती आयोग 2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण 3)नामची स्थापना, चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर 4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश 5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर,   मंगळावर जाणारा देश 6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश     ...

आदरांजली एक मराठमोळ्या विज्ञान वेड्याला

इमेज
                                मला आज सकाळी खगोलशास्त्राची रुची असलेल्या एका मित्राचा फोन आला, त्याने सांगितले अरे मोहन आपटे सर गेले . मी सुन्नच झालो . मोहन आपटे सर म्हणजे मराठीत विज्ञानविषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तींपकी  एक  मह्त्वाचे नाव .  सध्याच्या काळातील  हाताच्या बोटावर मोजता येईल , अश्या मराठीतून  विज्ञान विषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तीपैकी एक .  माझा आणि त्यांचा संपर्क प्रत्यक्ष जरी नसला  तरी त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत , त्या अर्थाने एक वाचक आणि लेखन म्हणून आमचा खूप चांगला संबंध होता .                          संस्कृतप्रचुर समजण्यास कठीण  अश्या मराठीतील विज्ञान लेखनास त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने आकृतिबद्ध केले . त्यांच्या विज्ञानाच्या विविध शाखेतील  शास्त्राची माहिती देणारी मला उत्तर हवंय , ही  पुस्तकमाला खूप गाजली . किंबहुना ...

गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची

इमेज
                                                                सध्या फक्त आपल्या भारतातातच नव्हे तर , समस्त जगभरात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत . ऑस्ट्रोलियाच्या पूर्व भागात  लागलेला वणवा असो , अथवा ब्राझीलच्या -लुला या माजी राष्ट्राध्यक्षाची कारागृहातून झालेली सुटका असो . अथवा २५ सप्टेंबरपासून सुरु झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या  महाभियोगाचे नाट्य ही  त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे . माझ्या मते यातील  या सर्व घडामोडीतील  सर्वात महत्तवाची घडामोड म्हणजे . डोनाल्ड ट्रूम्प यांच्यावर चालवण्यात येणार महाभियोग . जगातील सर्वात प्रबळ अश्या राष्ट्राचा प्रमुखांवर ते प्रमुखपद काढण्यासाठी चालवण्यात येणार खटला म्हणजे हा महाभियोग होय .                                                   ...

नोटबंदी नंतरची ३ वर्षे

इमेज
                                                                                    आज ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अश्या विमुद्रिकरणाला (नोटबंदी )३ वर्षे पूर्ण झाली . या ३ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठी उचलेले हे एक धाडसी पाऊल होते . हे पाऊल कितपत  यशस्वी झाले ? यावर मतमतांतरे असून शकतात . मात्र हा एक धाडसी निर्णय होता , याबाबत मात्र दुमत नसावे . भारताच्या आर्थिक इतिहासात डोकावले असता आपणास असे लक्षात येते की , इंदिरा गांधींनी घेतलेल्या बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय असो , अथवा  नरसिहराव पंतप्रधान असताना घेललेला  भारतीय अर्थव्यवस्था परकीय लोकांसाठी खुली करण्याचा निर्णय असो . अश्या काही महत्तवाच्या निर्णयांमध्ये याचा समावेश करता येईल .           ...