पोस्ट्स

मला भावलेले सुरत . (भाग 1)

इमेज
                  केल्याने देशांतर  शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात. . याच उक्तीला जागत  मी नुकताच  नाशिक- सुरत -भिवंडी आणि परत नाशिक  प्रवास केला त्याची ही कहाणी .                               माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने[ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .  मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या  सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले. असो जे होते ते चांगल्यासाठीच                                                        सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा ...

मग हटवा कांदा जीवनावश्यकच्या यादीतून

इमेज
                     सध्या सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीने उच्छाद मांडला आहे . कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे लोकांच्या जेवणातून कांदा बाजूला पडला आहे .  संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली . त्यावेळेस उत्तर देताना एका महत्वाच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मी कांदा लसूण खात नाही . त्याच्यामुळे त्याचा वाढलेल्या किमतीमुळे माझ्यावर काहीच परिणाम होत नाही . माझ्यासारखे अनेक लोक या देशात आहेत . कांदा हा जीवनावश्यक वस्तू नाही " असे उद्गार काढले . जर संबंधित मंत्र्यांचे विधान खरे मानले  तर काही प्रश्न निर्माण होतात . त्याचा उहापोह करण्यासाठी आजचे लेखन .                जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर केंद्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा यादीत कांद्याचा समावेश का करण्यात आला आहे ? कोणत्याही निवडणुकीपूर्वी कांद्यावर निर्यातबंदी का लादण्यात येते ? जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर त्याची निर्यात करण्यावर शेतकऱ्यांवर विविध बंधने का हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे . मित्रांन...

ड्रॅगनच्या लष्करी सामर्थ्यावर नाटोत व्यक्त केली चिंता

इमेज
                         मित्रानो, सध्या विविध घटनांची भारताचे विश्व ढवळून निघत असताना , जागतिक परिस्थितीचा विचार करताना सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडत असल्याचे आपणास अनुभवयाला येत आहे . नुकतीच लंडन येथे झालेली दोनदिवसीय 70 वी नाटोची  परिषद ही त्यापैकीच एक . दुसऱ्या महायुद्धानंतर युनाइटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशाच्या  नेतृत्वाखाली स्थापन झालेली लष्करी संघटना म्हणजे नाटो . ज्यामध्ये सध्या 29 सदस्य आहेत . या 29मध्ये बहुतांशी युरोपीय देश आहेत . नाटोच्या या परिषदेत अनेक विषयावर चर्चा झाली .त्यातील अत्यंत महत्तवाचा विषय ज्याचा आपल्या भारताशी सुद्धा संबंध आहे , तो म्हणजे चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य . चीन यूएसए यांच्या व्यापार युद्धाच्या पाश्वभूमीवर चीनच्या लष्करी सामर्थ्यावर चर्चा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे .                       स्वामी विवेकांनद यांनी त्यांच्या  पहिल्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेच्या दौऱ्याच्यावेळी चीनची ताकद ओळखली हो...

खाजगी रेल्वे विरुद्ध तोट्यातील सरकारी रेल्वे (भाग 1)

इमेज
                         गेल्या काही दिवसांपासून दोन बातम्यांनी भारतीय रेल्वेविश्व अक्षरशः ढवळून निघाले . त्यापैकी एका बातमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली . दुसऱ्या बातमीवर हा लेख लिहीत असताना तरी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आल्याचे  वृत्त नाही . पहिली बातमी म्हणजे  150 खाजगी रेल्वे चालवण्याचा निर्णय होय ज्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि दुसरी म्हणजे गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त तोटा रेल्वेला होण्याची बातमी . मित्रानो या  दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित बाबी आहेत . आणि त्यांची बातमी पाठोपाठ येणे हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे .  मित्रानो ,  भारतीय रेल्वे जगातील सर्वात  मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम आहे . त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायलाच हवे .                          मित्रानो भारतीय रेल्वेमध्ये भारतीय तीन प्रकारे भरती होऊ...

पाउले चालती हिंदू ग्रोथ रेटकडे

इमेज
                    अमेरीकेतील एका चर्चेमध्ये राजशेखर नावाच्या अर्थतज्ञाने सन 1981मध्ये  भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक  कल्पना मांडली होती . जी कालांतराने हिंदू ग्रोथ रेट या नावाने प्रचलीत झाली होती . त्याकाळी भारतीय अर्थव्यवस्था सर्वसाधरण साडेतीन टक्याचा गतीने वाढत असे . त्यालाच काहिसा हस्यास्पद रितीने सांगण्यासठी त्यांनी ही संकल्पना वापरली होती . ज्यामध्ये ज्या प्रकारे धर्म बदल सहजतेने स्विकारत नाही ,  त्याच प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था बदल स्विकारत नसल्याने ती खुप कमी गतीने वाढत असल्याचे सांगितले होते .पुढे  सन 1991च्या जूलै महिन्यात आर्थिक पातळीवर विलक्षण धक्का मिळाल्यावर यामध्ये झपाट्याने बदल झाले , आणि भारतीय अर्थव्यवस्था हिंदू ग्रोथ रेटच्या टप्यातून बाहेर येउन भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक दोनची सर्वात वेगाने वढणारी अर्थव्यवस्था बनली                               .हा सर्व इतिहास येथे सांगण्याचा हेतू हा आहे की गेल्या काही दिवसापासू...

चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास (भाग 1)

इमेज
                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, आपला भारत जागतिक राजकारणात मोठ्या दौडाने आपला  अश्व पुढे  नेत आहे . याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत जपान मैत्रीसंदर्भात घडली . ती म्हणजे भारत आणि जपान यांच्या मध्ये झालेली  2+2 बैठक होय . दोन्ही देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये ही बैठक पार  पडली . या बैठकीमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली , कोणत्या मुद्यावर करार आणि Memorandum Of Understanding (MOU ) झाले . याची माहिती आपणास पारंपरिक माध्यमांतून आपणास मिळेलच.  . मला आपणाचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते भारताचा   इथपर्यंत प्रवास कसा  झाला ? तर सुरवात करूया सविस्तर विवेचनला .                  मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच...

ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या निवडणुका (भाग 5)

इमेज
               सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, जगाला धडकी भरेल  अश्या घडामोडी जगात घडत आहे .  ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या युनाटेड किंग्डम या देशात 12 डिसेंबर2019 ला होणाऱ्या निवडणुका  या त्यापैकीच एक . (या ब्लॉगवरील ब्रेक्सिट विषयाची ही पाचवी पोस्ट . या आधीच्या पोस्ट  तुम्ही या ब्लॉग पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . ) युनाटेड  किंग्डम या देशातील महत्त्वाची वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसी ने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या  निवडणूकपूर्व मतदानकाल चाचणीनुसार (pre   election exit poll ) ब्रेक्सिटच्या विरोधी भूमिका असलेल्या सोशल डेमोक्रेटिक या पक्षाला लोकांचा कल मिळत आहे . मात्र लेबर   (मजूर  पक्ष ) पक्षामार्फत विभागवार प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो .लेबर   (मजूर पक्ष ) पक्षामार्फत दिनांक 29 नोव्हेंबरला 2...