पोस्ट्स

ब्रेक्सिटचा तिढा अंतिम टप्यावर ?? (ब्रेक्सिट भाग 6 )

इमेज
                मित्रांनो , गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून समस्त युरोप खंडातील कळीचा मुद्दा बनलेल्या ब्रेक्सिटचा तिढा आता नव्या वळणावर आलेला आहे . सदर लेख लिहीत असताना युनाटेड किंग्डममध्ये   (भारतीयप्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबर 2019 रात्रौ साडेअकरा   )हा तिढा  कोणत्या प्रकारे सुटणार,  हे ठरणाऱ्या केंद्रीय विधिमंडळाच्या  निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे . ते  जागतिक प्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबरला रात्री 10  ( भारतीय प्रमाणवेळेनुसार 13डिसेंबरला रात्री साडेतीन )  पर्यंत चालेल. {या प्रकरणाची इथपर्यंत वाटचाल मी  याआधी पाच ब्लॉग पोस्ट मार्फत घेतली आहेच .ज्यांना  ती वाटचाल वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे ..} या निवडणुकीचा निकाल युनाटेड किंगडम या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे . गेल्या पाच वर्षातील ही तिसरी निवडणूक आहे .  या सर्व निवडणुका बेक्सिट या विषयाभोवतीच प्रामुख्याने रंगल्या आहेत . या निवडणुकीचा निकाल भारतीय प्रमाणवे...

तोट्यास कारण की ........

इमेज
                   आपल्याकडे सर्वसाधारणपणे हा मथळा पत्रास कारण की असा असतो . मात्र तो इथे तोट्यास कारण की  ......... असा आहे . याला कारण आहे नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बाबतीत आलेली एक नकारात्मक स्वरूपाची बातमी . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन देण्यात आले असून जे काही वेतन त्यांना देण्यात आले तेही दर महिन्याला त्यांना ज्या दिनांकाला वेतन मिळते त्यापेक्षा दोन दिवस उशिरा देण्यात आल्याची ती बातमी होती . त्याला महामंडळाला झालेल्या तोट्याचे कारण देण्यात आले होते .  मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . माझा हा प्रवास वीक डे आणि शनिवार आणि रविवारी सुद्धा झालेला आहे . त्या दरम्यान मला आढळलेल्या काही बाबींच्या आधारे आपण या तोट्यामागच्या कारणांचा मागोवा घेतला असता समोर आलेले चित्र तुमच्यासमोर मांडण्यासाठी हे लेखन .                          मी शक्यतो रात्री नऊ ते मध्यरात्री  ...

काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ 25 (COP25 )च्या निमित्याने भारतीय जगत

इमेज
                                                            गेल्या आठवड्यापासून युरोप खंडातील स्पेन या देशाच्या राजधानीत अर्थात  मैड्रिड   मध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात हवामान बदल या विषयावर होणारी काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ(जीCOP या नावाने प्रसिद्ध आहे )  ही परिषद चालू आहे . यंदा या परिषदेचे  25 वे अधिवेशन चालू आहे सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत आणि समस्त मानवी जातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय . आपण भारतीयही बेमोसमी पाऊसाच्या ( 1जून ते 30सप्टेंबर हा कालावधी सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला शास्त्रीय भाषेत बेमोसमी आणि माध्यमांच्या भाषेत  अवकाळी म्हणतात )रूपाने  त्याचा अनुभव घेत आहोत . मात्र जगातील 193 देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा  , जगातील क्षेत्रफळाच्या तुलनेत सातव्या क्रमांकाचा , अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 10 व्या क्रमांकाचा , जगातील पहिल्या पहिल्या क्रमांकाचा...

घुसळणी इतिहासाची

इमेज
                             लोकसभेमध्ये 9 डिसेंबर 2019 रोजी एका महत्त्वाच्या विधेयकावरील चर्चेत महत्त्वाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याने भारताच्या फाळणी संदर्भात काँग्रेस या राजकीय पक्षाला जबाबदार धरले आणि यावरून विविध चर्चेला उधाण फुटले . या चर्चेतील काही गोष्टी या वास्तव्याला धरून नव्हत्या . मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यास करत असताना याच्या अभ्यास केला होता . त्या अभ्यासानुसार भारताच्या फाळणीसाठी  काँग्रेसच्या  दुरान्वयेही संबंध नव्हता .तर अन्य पक्ष जवाबदार होता . चोर सोडून संन्याशाला फाशी अशाच प्रकार यावेळी घडला   त्यामुळे या मागची  पार्श्वभुमी जनतेसमोर येण्यासाठी आजचे लेखन .                                              भारताच्या फाळणीची कथा मार्च 1940 च्या लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनापासून सुरु होते . माझ्या मते भारताच्य...

मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना ?

इमेज
     सध्या आपल्या भारतामध्ये अनेक जीवनावश्यक प्रश्न सोडवणे अत्यंत  तातडीचे झाले असताना , विविध लोकांकडून सध्याच्या परिस्थितीसी अत्यंत विसंगत मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे . या मुद्द्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचे नामविस्तार करण्याचे , तसेच अन्य देशातील काही समाजघटकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे विधेयक या मुद्यांचा समावेश करावा लागेल . विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याच्या ऐवजी ते विद्यापीठ जागतिक पातळीवर  गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल कसे होईल ? याबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते . अन्य देशातील अत्याचार सहन करणाऱ्या समाज घटकांविषयी माझी सहानभूती आहेच,  मात्र देशातील अनेक घटक हलाखीचे जीवन जगत असताना  त्यांचे जीवन सुधारणे हे प्रथम कर्तव्य असायला हवे .                                सध्या भारताची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत आहे . त्याविषयी उचलण्यात येणारी पाऊले पुरेशी नाहीत . अधिक पाऊले उचलण्यात येण्याची गरज आहे . भारतातील शिक्षणव्यवस्था ...

मला भावलेले सुरत (भाग 2)

इमेज
                                    मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या  बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक  आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा  त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड  हा  मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता नि...

मला भावलेले सुरत . (भाग 1)

इमेज
                  केल्याने देशांतर  शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात. . याच उक्तीला जागत  मी नुकताच  नाशिक- सुरत -भिवंडी आणि परत नाशिक  प्रवास केला त्याची ही कहाणी .                               माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने[ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .  मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या  सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले. असो जे होते ते चांगल्यासाठीच                                                        सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा ...