पोस्ट्स

सृष्टीचा विलोभनीय चमत्कार सूर्यग्रहण

इमेज
         मित्रानो , येत्या गुरुवारी अर्थात 26 डिसेंबर 2019 ला आपल्या भारतात सृष्टीचा विलोभनीय चमत्कार  अर्थात सूर्यग्रहण होणार आहे .  हे ग्रहण कोणत्या प्रदेशात दिसणार आहे . हे आपण बाजूच्या नकाश्यात बघू शकता . मित्रानो हे  ग्रहण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे . तर केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती दिसणार आहे त्यामुळे पूर्ण सूर्यग्रहणात दिसते , त्या प्रकारचे नाट्य या वेळी दिसणार नसले तरी हा सृष्टीचा चमत्कार  आपण बघायलाच हवा . मात्र चंद्रग्रहण आपण ज्या प्रकारे उघड्या डोळ्याने बघू शकतो . तसे ना होता , योग्य ती काळजी घेऊन अर्थात विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरून हे नाट्य बघायला हवे . जर उघड्या डोळ्याने बघितल्यास डोळ्याला जबर हानी होऊ शकते                                            हे नाट्य सुरु होईल, भारतीय   प्रमाणवेळेनुसार सकाळी 8वाजून 4 मिनिटांनी,  तर ...

टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण ? सायरस मिस्त्री की अन्य कोणी ?

इमेज
                           सध्या देशाचा पूर्व भाग नागरिकत्वाचा विधेयकावरून आणि गुजरात राज्य,  गुजरात लोकसेवा आयोगाचा कार्यप्रणालीमुळे धुमसत असतान,   भारतालीच नव्हे तर जगातील एक मोठा उद्योगसमूह असणारा टाटा उद्योगसमूहाच्या उत्तराधिकाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या एका बातमीने भारताच्या आर्थिक विश्वात नव्याने वादळाला प्रारंभ केला . ही बातमी होती टाटा उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नेमणूक करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अँप्लिकेन्ट ट्रिब्यूनन  ने दिलेला निर्णय . यामुळे   टाटा उद्योगसमूहातील  सन 2016पासून सुरु असलेल्या   वादाने नवीन वळण घेतले आहे .                                                                         मित्रानो मिठापासून ते  सोने, ...

स्पर्धापरीक्षा घोटाळा माध्यमात न आलेला

इमेज
                                   सध्या समस्त भारत त्यातही भारताच्या पूर्व भाग नागरिकत्वाच्या विधयेयकामुळे आगीत होरपळून जात असताना , भारताचा पश्चिम भागही वेगळ्या एका कारणांमुळे तरुणाईचा रोषाला बळी पडत आहे . पश्चिम भागातील तरुणाईचा रोषाला कारणीभूत आहे , एका राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या एका परीक्षेत झालेला अभूतपूर्व गोंधळ, ज्यामुळे ती परीक्षाच अखेर रद्द करण्याची वेळ त्या राज्य लोकसेवा आयोगावर आलेली आहे . या निमित्याने सर्वच राज्य लोकसेवा आयोगाचा  कार्यपद्धतीचा एकंदरीत आढावा घेतला असता येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असे खेदाने म्हणावे लागेल .                    मित्रानो , भारतीय संविधानाच्या कलम 317 मध्ये या राज्य लोकसेवा आयोग प्रणालीचा  स्पष्ट उल्लेख करण्यात आला असताना , त्यांची दुर्दशा होणे वाईट आहे . वेळेवर परीक्षा न होणे , परीक्षेचा निकाल वेळेवर न लागणे , लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सरकारकडून नि...

जेव्हा एका घटनादुरुस्तीमुळे दुसरी घटना दुरुस्ती झोकोळली जाते तेव्हा ........

इमेज
                           सध्या समस्त भारत नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसमुळून जात असताना संसदेमध्ये इतर अनेक विधेयके सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत . जी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे . मात्र त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये फारशी  चर्चा झालेली नाही . माझे आजचे लेखन त्या घटनादुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे . मला  ज्या घटनादुरुस्तीकडे आपणाचे लक्ष वेधायचे आहे . त्यामुळे लोकसभेतील आणि काही राज्याच्या विधानसभेतील  सदस्य संख्येत बदल झाला आहे .  तर समस्त भारत CAA  वरील चर्चेत दंग असताना आपल्या संसदेत 126 व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली . ज्या अन्वये भारतीय संविधानाच्या कलम 331,  333 आणि कलम  362 च्या उपकलम 2  या कलामामध्ये बदल करण्यात आले.  कलम 331नुसार लोकसभेमध्ये अँग्लोइंडियन समाजाला 2 सदस्यांचे  प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती.  तर कलम 333नुसार राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन  समाजाला 1सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे . या दोन्ही ठि...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वरून भारतात उठलेलल्या वादळाच्या निमित्याने .(भाग 1)

इमेज
        भारतीय संविधान जगातील एक चांगल्या संविधांपैकी एक आहे . यामध्ये अनेक बाबी सखोलपणे मांडण्यात आल्या आहेत.    भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात अर्थात भारतीय संविधानाच्या कलम 5 ते 11 दरम्यान सांगितलेल्या नागरिकत्वाच्या तरतुदी , त्या बदलण्यासाठीच्या करावयाच्या तरतुदी या त्यापॆकीच एक .  . याच संविधानाच्या कलम 11 नुसार सन 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरिकत्वाच्या कायद्यातील तरतुदीतील   बदल खूपच चर्चेत आहे . सध्या समस्त भारतात चर्चित विषय असलेले  नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या पाय म्हणून याकडे बघावे लागेल .              मित्रानो , 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या या नागरिकता कायद्यातील सध्या चर्चेत असणारा बदल   पाचवा  बदल आहे . याआधी सन  1986, 1992, 2003, 2015 यावर्षी या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या . या बदलांर्गत मूळ कायद्यानंर्गत काय बदल करण्यात आले हे सांगण्यासाठी आजचे लेखन आहे . सन  1955च्या कायद्यात कोणाला नागरिकत्व मिळू शकते आणि कोणत्या प्रकारे ...

गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची (भाग दुसरा )

इमेज
             जसजशी सन 2019ची अखेर जवळजवळ येत आहे ,तसतस्यां अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत . दिनांक 12डिसेंबरला झालेली युनाटेड किंग्डम येथील ऐतिहासिक ठरावी अशी निवडणूक त्यापैकीच एक . मात्र त्याहून वरचढ ठरावी अशी घडामोड 13 डिसेंबरला सायंकाळी टीव्ही बघताना ऐकायला मिळाली . ती होती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियायोगाविषयीच्या महत्त्वाच्या  घडामोडीविषयी . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग का चालवण्यात येत आहे ? महाभियोग खटल्याची सुरवात कशी झाली ? याची माहिती आपण  या  ब्लॉग पोस्टच्या पहिल्या भागातून   घेतली आहे . ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे            मित्रानो डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकिदी संपायला अजून एक वर्ष , अर्थात जवळजवळ 25% कालावधी  शिल्लक आहे . त्याआधीच त्यांची खुर्ची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे . 13डिसेंबरच्या घटनेने याची शक्यता खूपच वाढली आहे . काय झाले 13...

ब्रेक्सिटचा तिढा अंतिम टप्यावर ?? (ब्रेक्सिट भाग 6 )

इमेज
                मित्रांनो , गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून समस्त युरोप खंडातील कळीचा मुद्दा बनलेल्या ब्रेक्सिटचा तिढा आता नव्या वळणावर आलेला आहे . सदर लेख लिहीत असताना युनाटेड किंग्डममध्ये   (भारतीयप्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबर 2019 रात्रौ साडेअकरा   )हा तिढा  कोणत्या प्रकारे सुटणार,  हे ठरणाऱ्या केंद्रीय विधिमंडळाच्या  निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे . ते  जागतिक प्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबरला रात्री 10  ( भारतीय प्रमाणवेळेनुसार 13डिसेंबरला रात्री साडेतीन )  पर्यंत चालेल. {या प्रकरणाची इथपर्यंत वाटचाल मी  याआधी पाच ब्लॉग पोस्ट मार्फत घेतली आहेच .ज्यांना  ती वाटचाल वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे ..} या निवडणुकीचा निकाल युनाटेड किंगडम या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे . गेल्या पाच वर्षातील ही तिसरी निवडणूक आहे .  या सर्व निवडणुका बेक्सिट या विषयाभोवतीच प्रामुख्याने रंगल्या आहेत . या निवडणुकीचा निकाल भारतीय प्रमाणवे...