पोस्ट्स

93व्या साहित्य संमेलनामुळे मनात उमटलेले भावतरंग

इमेज
                  दिनांक 10 जानेवारी 2020ला उस्मानाबाद येथे  93व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले . मला कळायला लागल्यापासूनचे हे 15/16संमेलन . मी नाशिकला वनप्रेमी असणारे ज्येष्ठ साहित्यिक  मारुती चितमपल्ली हे  संमेलाध्यक्ष असणारे साहित्य संमेलन आणि पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेले साहित्य संमेलन  ही दोन संमेलने अगदी जवळून त्यातील कार्यक्रमांच्या आस्वाद घेत अनुभवली . बाकीच्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या प्रसार माध्यमांनी केलेल्या  बातम्यांच्या स्वरूपात अनुभवली . माझ्या मते या सर्व साहित्य संमेलनांमध्ये  होणारे वाद , (ज्यामध्ये साहित्य क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणारे आणि साहित्य क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असणारे दोन्ही वाद मला अपेक्षित आहेत ) त्यावर विविध लोकांची मते , या संमेलनाच्या आयोजनावरून  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सारख्या व्यक्तीची मते,  . यासाठी सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान , त्यावरून उठणारे वादंग , या सर्व स...

या लोंढ्याना आवरणे काळाची गरज (भाग 3 )

इमेज
            काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे , जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यात तणाव निर्मण झाल्याने दोन्ही राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद होती . त्या वेळेस  एक महाराष्ट्र एसटी प्रेमी म्हणून मी महाराष्ट्र एसटीचे किती नुकसान झाले असेल? असा विचार आल्याने  म्हणून जेव्हा माहिती गोळा करण्यास सुरवात केली तेव्हा छातीत धस्स व्हावे अशी आकडेवारी माझ्यासमोर आली . महाराष्ट्राच्या एसटीला धोका म्हणून खाजगी बससेवांकडे बोट दाखवले जाते मात्र ते अयोग्य असून महाराष्ट्र एसटीला खरा धोका अन्य राज्यांच्या परिवहन सेवांकडून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ती आकडेवारी होती . मला समस्त कर्नाटकची आकडेवारी मिळाली नाही फक्त बेळगाव या शहराची आकडेवारी मिळाली , मात्र शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने समस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तोच न्याय लावायला हरकत नसावी . तर मित्रानो , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या 16 मार्गावरून बसेस बेळगावला जातात . तर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस बेळगावहून 31मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करतात . या सर्व मार्गां...

अमेरिकी इराण संघर्ष (भाग 1)

इमेज
                   सध्या समस्त जगाचा केंद्रबिंदू बनलेल्या इराण या देशाच्या सध्याच्या घडामोडीकडे बघताना आपणास आजपासून 40 वर्षांपूर्वी झालेल्या इराणी क्रांतीकडे दुर्लक्षून चालणार नाही . आपणास सध्याच्या अमेरिका आणि इराण या देशांच्या तणावाची पायांमुळे सन 1979 साली झालेल्या इराणी क्रांतीत सहजतेने सापडतात . तेव्हापासून सुरु असलेल्या अमेरिकाविरोधी कारवाईचा  आता वटवृक्ष झाला आहे . ज्याची फळे आपणस इंधन दरवाढीचा स्वरूपात सहन करावी लागू शकतात . त्यामुळे हा प्रश्न मुळात समजून घेणे अत्यावश्यक आहे . माझे आजचे लेखन त्यासाठीच .              इराण आणि सभोवतालचा प्रदेश नैसर्गिक इंधनाच्या साठ्याने समृद्ध आहे . या साठ्यावर नियंत्रण मिळावे , यासाठी मुख्यतः अमेरिका आणि तिचे मित्र  देश विविध क्लृप्त्या लढवत असतात . देशातील शासक कितीही लोकोपयोगी कामे करत असला तरी त्याला सत्तेतून उठवणे , देशातील शासक लोकांवर कितीही अन्याय करत असला तरी त्यास मदत करणे , ही त्याची या सर्व प्रदेशासाठी नीती आहे . अफगाणिस्तानमध...

विश्व पुस्तक मेळा आणि मराठी पुस्तक विश्व

इमेज
                            आज 5 जानेवारीला  हा लेख लिहीत असताना नवी दिल्लीला प्रगती मैदान येथे पुस्तकप्रेमींचा कुंभमेळा म्हणून ज्यास सहजतेने संबोधता येईल,  असा  विश्व पुस्तक मेळा  मोठ्या दिमाखात सुरु आहे . 4 जानेवारीला सूरु  झालेला हा वाचकांचा कुंभमेळा 12जानेवारी पर्यंत चालू असेल .  मात्र जगातील 17व्या क्रमांकाची मातृभाषा असणाऱ्या मराठीचे या विश्व पुस्तक मेळ्यात स्थान काय आहे ? याचा आढावा घेतला असता समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही . कोणत्याही मराठी वृत्तवाहिन्यांवर याची एक मिनिटाची देखील बातमी मी बघितली नाही . मराठी साहित्यविश्वात साहित्य संमेलनाचे जे अनन्य साधारण महत्व आहे , तेच किंबहुना त्याहून कणभर अधिक असे महत्व जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार करता या विश्व साहित्य मेळाचे आहे . मात्र त्या ठिकाणी मराठीचे तुरळक अस्तिव आहे . मराठीतील साहित्याचा अवीट गोडवा जगासमोर येण्याची एक उत्तम संधी यामुळे मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . भारताचा विचार करता मराठ...

स्पर्धा परीक्षेतील घोटाळा माध्यमात आलेला ( भाग 2)

इमेज
              सध्या आपल्या भारतात पारंपरिक माध्यमे नववर्षाच्या बातम्या देण्यात मग्न असताना,   मात्र राजस्थानातील हजारो युवक युवतींचा जीव टांगणीला लागलाय, आणि याला कारणीभूत ठरलाय,  तो राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणा  . ज्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत मे 2018ला संपते . त्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडतो तो तब्ब्ल दीड वर्षाने अर्थात 30 डिसेंबर 2019ला . बर पहिला टप्पा तरी शांततेत पार पडतो का ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते . परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटते . परिणामी ती परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राजस्थान लोकसेवा आयोगावर येते .परीक्षा नंतर घेण्यात येईल असे मोघम उत्तर प्रशासनकडून देण्यात येते . मात्र पुनर्परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येत नाही .काय म्हणावे यास ? मागे 'गुजरात लोकसेवा आयोगाच्या' "बिन सचिवालय" या परीक्षेत सुद्धा अशाच प्रकार  घडला होता . (त्यावेळी  लिहलेल्ल्या ब्लॉगची लिंक या ब्लॉग पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे . ) मात्र  प...

तीन बातम्या एक रेल्वे .......

इमेज
                     गेल्या आठवड्याभरात आपली भारतीय रेल्वे 3 वेळा चर्चेत आली . त्यातील दोन वेळा प्रवाश्यांशी संबंधित मुद्यांवरून चर्चेत आली . तर एकदा रेल्वेचा नियोजनाच्या बाबतीत करावयाच्या कृतीमुळे चर्चेत  आली . प्रवाश्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यातील एक बातमी प्रवाश्याना खाजगी रेल्वेची सुविधा व्यापक प्रमाणात मिळणार .अशी होती  सध्या भारतात  बनारस ते नवी दिल्ली अशी एक खाजगी रेल्वे चालवली जात आहे . आगामी काळात अजून 20खाजगी रेल्वे चालवण्याचे सरकारचे नियोजन आहे . तर दुसरी बातमी प्रवासाच्या खिश्याला कात्री लावण्याची होती . अर्थात रेल्वेत बऱ्याच मोठ्या कलावधीनंतर भाडेवाढ झाली आहे .यासाठी रेल्वेने आपल्या सेवांचे विविध प्रकारात विभाजन केले असून  ही भाडेवाढ प्रकारांप्रमाणे  1जानेवारी 2020पासून लागू करण्यात आली आहे .   नियोजनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी रेल्वेच्या आठ विभागाचे एकत्रीकरण करण्याच्या संदर्भात ती बातमी होती . या आठ विभागापैकी 3 विभागात अधि...

व्यथा एका दुर्लक्षित भारतीय जगजेत्तीची

इमेज
              सध्या  समस्त पारंपरिक भारतीय माध्यमे जसे वृत्तवाहिन्या , वृत्तपत्रे , रेडिओ ,  नववर्षाच्या आनंदांच्या बातम्या देत असताना या आनंदात दुधात साखर म्हणावी अशी  एक बातमी त्यांच्याकडून निसटून गेली आहे . ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी ,आणि त्यांचा आनदं व्दिगुणित  व्हावा   म्हणून या समाज  माध्यमाचा मार्फत मी आपणासी हा संवाद साधत आहे . आणि ती बातमी आहे .भारताची आघाडीची बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर असणारी कोनेरू हंपी यांनी महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद मिळवण्याची . मित्रांनो , पुरुष गटात  विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्रमांक लागलाय तो 40 . यावरून तुम्ही या स्पर्धेची काठिण्य पातळी काय असेल याचा अंदाज घेऊ शकता . हा विजय आणखी एका कारणाने मह्त्वाचा आहे ते म्हणजे आई झाल्यावर सन 2016ते 2018 हे दोन वर्ष त्या स्पर्धात्मक बुद्धिबळापासून पूर्णतः अलिप्त होत्या . जे कोणत्याही खेळ अथवा कलेशी निगडित व्यक्ती आहेत .अश...