पोस्ट्स

आठवणी चीनच्या दडपशाही च्या

इमेज
                     सध्या समस्त जगत करोनामुळे चीन विरोधात एकवटले आहे. करोनाबरोबर आपल्या भारताच्या सिमेवरील तणावामुळे आपल्या भारतात चीन विरोधाची धार अधिकच तीव्र आहे ,आणि तेही जून महिन्यात . मित्रांनो तूम्हाला वाटेल मी जून महिन्याचा उल्लेख का केला ?तर याच जून महिन्यात चीनने आजपासून बरोबर तीस वर्षापूर्वी आपल्याच नागरीकांना रणगाड्याखाली चिरडले होते . सन 1989ला तीन जूनच्या रात्री, चार जूनच्या पहाटे चीनच्या राजधानीत बिजींगमध्ये हे हत्याकांड घडले होते . यावेळी चीनने आपल्याच किती नागरीकांना मारले याबाबत हजारो ,ते लाखोपर्यत विविध दावे केले जातात. याचा अधिकृत आकडा अद्याप कोणालाच माहिती नाही. याला तिआनमेन स्केअर हत्याकांड म्हणून ओळखले जात  सध्या चीनच्याच हाँगकाँंगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर  याची आठवण होणे स्वाभाविक आहे.                   मित्रांनो हे हत्याकांड झाले होते, चीनमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी,यासाठी लढणाऱ्या आंदोलकाचे. 15एप्रिल 1989पासून सुरु असलेल...

महाराष्ट्राची एसटी @73

इमेज
                            1जून 1948 रोजी आपल्या महराष्ट्रात पहिल्यांदा एसटी धावली.   येत्या सोमवारी या घटनेला 72  वर्षे  पूर्ण होणार आहे . त्यानिमित्याने समस्त एसटी कर्मचारी , हितचिंतक , प्रवाशी यांनां  मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपल्या भारतातील पहिल्या राज्य परिवहन महामंडळाकडून अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून  रस्ता  तिथे एसटी ,  प्रवाशाच्या सेवेसाठी  ब्रिदवाक्याला जागत  आपली एसटी महाराष्टाच्या कानाकोपऱ्यासह , आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात , कर्नाटक , मध्यप्रदेश , तेलंगणा आणि गोवा या राज्यात  देखील आपली सेवा विविध प्रकारच्या बसेसमार्फत पुरवते , ज्यामध्ये परिवर्तन, हिरकणी (एशियाड ) शीतल , यशवंती , साधी शिवशाही , स्लीपर शिवशाही , अश्वमेध , शिवनेरी तसेच  स्लीपर आणि बैठक व्यवस्था एकत्रित असणारी बससेवा  हे प्रमुख प्रकार आहेत . सुमारे 350 आगारांमार्फत विविध प्रकारची सेवा पुरवणारी एसटी आपल्या भारतातील  सार्वजनिक क्षे...

अबतक 531

इमेज
         आज 28 मे 2020 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 531वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 531 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .             अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी  निवडणुकीत वचन द्यावे असे शहर .. आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरादरम्यान धावली त्यापैकी एक शहर . जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांनाबाजारपेठेत येण्यासाठी . ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर ....

भारताची खेळी आणि चीनची कोंडी

इमेज
           सध्या आपल्या भारताच्या शेजारील  असलेले सबंध एका महत्तवाच्या वळणावर आहेत . चीन या देशाबाबत तर अनेक घडामोडी घडत आहे .त्यातील मोजक्या घडामोडीबाबत मराठी प्रसारमध्यमांमध्ये भाष्य करण्यात आले . ज्या घडामोडीबाबत माध्यमांमध्ये सांगण्यात आले त्यामध्ये नेपाळची घुसखोरी, चीन आणि भारतीय लष्कर यामध्ये झालेली झडप आदी मुद्यांचा समावेश करता येतो.मात्र याखेरीज एका महत्तवाच्या मुद्याबाबत मराठी माध्यमांमध्ये काहीही सांगण्यात आलेले मला दिसले नाही, तो म्हणजे तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला लोकसभेच्या  दोन खासदारांनी लावलेली उपस्थिती .दिल्ली येथून भाजपाच्या खासदार असणाऱ्या मिनाश्री लेखी.आणि राजस्थानतील चुरू येथून  भाजपाचे खासदार असणारे राहुल  कास्वा . ते दोन खासदार.                                               मित्रांनो, आपण ज्याला चीन म्हणतो  ज्याचे अधिकृत नाव आहे ,पिपल्स रिपबल्कीक आँफ चायना (PRC)या देशाचे ...

भारत मालदीव संबंध नव्या वळणावर

इमेज
                       सध्या आपल्या भारताचे  शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व  मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या  मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली .  सध्या समस्त  मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी  बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने  सुटली . जर सध्या करोना  नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे  ही बातमी गाजली नाही . तरी समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाब...

वादाला पुन्हा सुरवात

इमेज
        सध्या समस्त जग  करोनासी  झुंजत असताना गेल्या कित्येक महिन्यापासून  थंडावलेला असा  हाँगकाँगचा चीनबरोबर असणारा  वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मागील वर्षी अर्थात सन 2019मध्ये या वादाने जगाचे लक्ष  वेधून घेतले होते . दर शनिवार आणि रविवारी हॉंगकॉंग मध्ये स्थानिक जनता आणि प्रशासन या मध्ये वादाची ठिणगी पडत असे असे . सुमारे सहा सात महिने या संघर्षाच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या . कालांतराने चीनने या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची  का होईना  शांतता निर्माण केल्याने याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये येणे  बंद झाले . मात्र ही  औटघटकेची शांतता सध्या भंग  होण्याचा मार्गावर आहे .            बीबीसी या वृत्तवाहिनीने दिलेल्या  वृत्तानुसार चीन हॉंगकॉंगच्या स्वायत्तेवर घाला घालणारे एक बिल त्यांच्या  लवकरच होऊ घातलेल्या  नॅशनल कॅव्हेशनमध्ये आणणार आहे . या प्रस्तावित बिलाद्वारे चीन हॉंगकॉंगमधील नागरिकांना  देशद्रोह , राष्ट्रीय सुरक्षेल...

पश्चिम बंगालच्या संकटाने निर्माण केलेले काही अनुत्तरित प्रश्न

इमेज
                          दिनांक 21मे 2020रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात आलेल्या आम्फाम या अतितीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळाने 72 निष्पाप अभागी जणांचा मृत्यू झाला आहे . या मृत्यूने  अनेक प्रश्नांंना जन्म दिला आहे  त्यातील अनेक प्रश्न बदलत्या हवामानाशी संबंधित आहेत . .आपण जगभरातली  गेल्या काही वर्षांतील हवामानाचा एक आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अतितीव्र बनत चाललेले दिसते . मागील 2019पर्यतचा हवामानाचा विचार करता सन 2000पासून पुढची सर्व वर्षे मागच्या पेक्षा अधिक उष्ण होती , तसेच गेल्या काही वर्षाचा विचार करता ऊत्तर अमेरिका खंडातील अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळे असो (ज्याला हरिकेन म्हणतात ) अथवा मे महिन्यात होणारी बंगालच्या उपसागरात तयार चक्रीवादळे असो अथवा या प्रकारची सर्वच चक्रीवादळे असो , त्यांची तीव्रता वाढलेलीच आपणास दिसते .           पश्चिम बंगालच्या चक्रीवादळाने निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रमुख प्रश्न आहे की , या...