पोस्ट्स

भारतीय रेल्वेची पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल

इमेज
            गेल्या पंधरवाड्यात भारतीय रेल्वेने दोन मोठ्या गोष्टी केल्या, त्यातील एक गोष्ट ही  कमी खर्चात अधिक मालवाहतूक क्षमता  विकसीत करण्याबाबत केलेली चाचणी होती . ज्यामध्ये तब्ब्ल अडीच किलोमीटर लांबीची रेल्वे भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येऊन एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला  तर दुसरी गोष्ट सध्याचा सर्वात ज्वलंत विषय असणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण या बाबतीत उचललेले सकारात्मक पाऊल होते .                सध्या रेल्वेकडून   वर्तमानातील  समस्त मानवापुढील अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या पर्यावरणाचे  रक्षण या प्रश्नांबाबत जागरूक होत  पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरित वायूचें वातावरणातील   प्रमाण कमी करण्याचा हेतूने  आपला डिझेल वापर कमीत कमी करण्याचा मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत  . त्याच मालिकेतील समाविष्ट होऊ शकणारी गोष्ट म्हणजेच ही सकारात्मक  गोष्ट होती .  या गोष्टींमध्ये दोन बाबी अंर्तभूत होत्या . पहिली बाब म्हणजे रेल्वेच्या जबलप...

मंगळ मानवाच्या कक्षेत ?

इमेज
             सध्या समस्त मराठी  वृत्तवाहिन्या जगभरातील करोनाच्या बातम्या आपल्या बातमीपत्रात सांगत असताना , जगात फक्त करोनाविषयक घडामोडी घडत आहे असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो . मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये . करोनाबरोबर खगोल विज्ञानाचा क्षेत्रात सुद्धा अनेक विषयक घडामोडीं आपणास ज्ञात होण्यासाठी आजचा लेखन          तर मित्रानो , येत्या महिन्याभरात जगातील तीन अवकाश संशोधन संस्था , ज्याची लग्नाचा बाजारात प्रचंड दहशत आहे , किंवा प्राचीन ग्रीक देवतेमध्ये ज्याची युद्धाची गणना होते , अश्या मंगळ  ग्रहावर तीन मोहीमा राबवणार आहेत .युनाटेड अरब  अमिरात देशाची   स्पेस एजन्सी, चीनची अंतराळ संशोधन संस्था, नासा या त्या तीन  अवकाश संशोधन संस्था आहेत . युनाटेड अरब अमिरात मार्फत  14 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे . तर चीन या देशाची स्पेस एजन्सी मार्फ़त 23 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे आणि नासा या अवकाश संस्थेमार्फत जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यांत किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मोहिमेला सुरवात होणार आ...

अजून एक पाउल रेल्वेचा खासगीकरणाकडे

इमेज
             आपण सर्व मराठी भाषिक अध्यत्माचा रंगात न्हाउन जात असताना किंवा  करोना विषयक बातम्या माहिती करुन घेत असताना 1जूलै 2020 रोजी भारतीय रेल्वेने एक परीपत्रक प्रसिद्ध केले . ज्या विषयी मराठी भाषिक माध्यमांमध्ये फारच कमी माहिती प्रसारीत करण्यात आली .द हिंदू या भारतातील महत्त्वाच्या इंग्रजी दैनिकात मात्र याविषयी सविस्तर छापून आले आहे .                 या परीपत्रकाद्वारे भारतीय रेल्वेचे खासगीकरणाचा दृष्टीने पाउल पुढे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे .या परीपत्रकाद्वारे रेल्वेने 109 रेल्वेस्थानकादरम्यान खासगी रेल्वे चालवण्यासाठी खासगी रेल्वे चालकांना त्यांची तयारी सिद्व करण्याचे आदेश दिले आहेत . या 109रेल्वे स्थानकांची 12 विभागात विभागणी केली आहे . या रेल्वे चालवतांना रेल्वेचेच कर्मचारी वापरण्यात येणार असल्याचे, आणि यामुळे भारतीय रेल्वे प्रगतशील होण्यात हातभार लागणार असल्याचे रेल्वेचा प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. मात्र ही सर्व रेल्वेचे खासगीकरण करण्याची पद्धत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .     ...

कथा तेलाच्या दराची

इमेज
                 सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कळीचा मुदा कोणता ? याचा धांडोळा घेतल्यास इंधनाचे सातत्याने वाढणारे दर या मुद्याच्या अग्रक्रम लागेल यात शंका नाही .  दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी  शब्दशः पळवले आहे . आधीच करोना या महामारीमुळे घटलेले उत्पन त्यात दररोज वाढणाऱ्या दरांमुळे त्याबाबत असंतोषतात भरच पडली आहे . या भाववाढीमागे  मागे केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या करांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाटा आहे , हे सर्वश्रुत आहेच . या करांमध्ये केंद्राकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचा वाटा किती ? राज्यांचा वाटा किती ?  त्याच प्रमाणे महाराष्ट्रात वसूल करणाऱ्या करांचे प्रमाण किती ? अन्य राज्यात वसूल केला जाणारा कर किती ? याबाबत विविध दावे  प्रतिदावे मी समाज माध्यमांमध्ये  बघितल्याने या बाबतची वस्तुस्थिती नक्की काय आहे ? हे मांडण्यासाठी आजचे लेखन                 विविध सरकारकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचे प्रमाण दोन प्...

रौप्य महोत्सव पृथ्वीवर न आलेल्या संकटाचा

इमेज
            आपल्यापैकी अनेकांना आकाशदर्शनाची इच्छा असते. .अथांग विश्वातील विविध दिर्घीका, आपल्या आकाशगंगेतील विविध तारे, आपल्या सौरमालेतील ग्रह, त्यांचे उपग्रह, ग्रहांएव्हढे मोठे नसणारे मात्र स्वतंत्र्य अस्तिव असणारे लघुग्रह, बटूग्रह आणि सुर्यमालेला काही विशिष्ट कालावधीनंतर भेट देणारे आपल्या सुर्यमालिकेतील पाहुणे अर्थात धुमकेतू आदींचे निरीक्षण करताना खगोलप्रेमींची रात्र कशी सरुन जाते,हे त्यांचे त्यांनाही समजत नाही . या अथांंग पसरलेल्या विश्वातील सर्वात रहस्यमय गोष्ट कोणती असेल तर ती आहे, धुमकेतू .हे धुमकेतू कुठुन येतात, याचा बऱ्यापैकी अंदाज आता आपल्याला येत असला, तरी त्यामुळे आपल्या पृथ्वीला काहीही धोका नाही,असे मात्र खगोल शास्त्रज्ञ अजूनही सांगू शकलेले नाहीत.याला बरीच कारणे असली, तरी एक प्रमुख कारणे म्हणजे धुमकेतूचे पृथ्वीला धडकण्याची शक्यता             येत्या जूलै महिन्यात अस्याच एका धडकेला 25वर्षे पुर्ण होत आहेत. शुमेकर आणि लेव्ही या दोन खगोलशास्त्रज्ञांंनी मार्च 1992मध्ये  एकत्रीतरीत्या  शोधलेल्या शुमेकर लेव्ही...

स्पर्धा परीक्षा

इमेज
            दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . एका मराठी वृत्तवाहिनीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालाचा अनुषंगाने एक चर्चात्मक कार्यक्रम प्रक्षेपित झाला . कार्यक्रमाचा सर्वसाधारण सूर यात स्पर्धा परीक्षांमध्ये किती विद्यार्थी प्रविष्ट होतात ? आणि अंतिम यादीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असते?  या संख्यात्मक तफावतीवर भाष्य करणारा होता . यामध्ये जी आकडेवारी सांगण्यात आली होती . ती फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा लोकप्रिय  या सदराखाली गणल्या जाऊ शकतील अश्या नागरी सेवा परीक्षेचा आढावा घेऊन सांगण्यात आली होती.जी खरोखरीच मन हेलावून टाकणारी होती .  ज्याद्वारे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणे म्हणजे गैर असा  गैरसमज होण्याची दाट  शक्यता आहे . जे काही अंशी खरेही आहे . मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या न्यायाने  याची दुसरी बाजू मांडण्यासाठी सदरचे लेखन .                 महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध...

रेल्वेची विनाशकारी वाटचाल

इमेज
             सध्याचा अनलाँक 1च्या काळात रेल्वेबाबत दोन दुरगामी परीणाम करणारे बदल झाले . करोना आणि चीनविषयक बातम्यांचा गदारोळात याकडे काहीसे दुर्लक्ष झाले . मात्र येणाऱ्या भावी पिढीवर यामुळे मुलग्रामी परीणाम होणार असल्याने याबाबत मंथन होणे अत्यावश्यक आहे हा लेखनप्रपंच त्यासाठीच .             त्यातील एक बदल समस्त रेल्वेत एकाच वेळी लागू करण्यात आला आहे, तर दुसरा बदल रेल्वेचा पुर्व विभागापुरता मर्यादित असल्याचे सध्या सांगण्यात आले असले तरी कालांतराने तो बदल सगळ्या रेल्वेत लागू होणार हे सर्वश्रुत आहे . सर्वप्रथम पुर्व विभागातील बातमी बघू . पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व भारतात लागू होणारा निर्णय यापेक्षा भयानक आहे . ...