पोस्ट्स

46व्या अमेरिकी अध्यक्षांचे बिगुल (भाग 4 )

इमेज
            सध्या समस्त जगत  करोनाच्या भीतीत जगत असताना जगात अनेक घडामोडी घडत आहेत . नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार ठरला जाणे , हि त्या यापैकीच एक होय . जगातील सर्वात बलाढ्य अश्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या या देशाच्या 46 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते. ,याकडे समस्त अमेरिकेचे लक्ष लागलेले आहे . गेल्या वर्षभरापासून सुरु असणारी ही प्रक्रिया आता अंतिम  टप्यात आली आहे . ही प्रक्रिया कशी असते ? याबाबत मी याच ब्लॉग मध्ये आधीच्या तीन पोस्ट मध्ये सांगितली आहे . ज्यांना ती बघायची असेल त्यांनी या पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे .            तर मित्रानो , डेमोक्रेटिक पक्षातर्फे नुकतीच JOE  BIDEN  याना उमेदवारी जाहीर झाली आहे . रिपब्लिक पक्षातर्फे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानाच  उमेदवारी देण्यात येणार आहे . डेमोक्रेटिक पक्षातर्फ़े अनेक महिला उमेदवार अध्यक्षपदासासाठी उत्सुक होत्या , त्यामुळे जगातील सर्वात बल...

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते

इमेज
                       गेल्या पंधरवड्यात समस्त नाशिककरांची मान  गर्वांचे ताठ व्हावी अशी घटना घडली, दुर्दैवाने समस्त मराठी माध्यमे करोना विषयक माहिती देण्यात व्यस्त असल्याने या घटनेकडे म्हणावे इतके लक्ष देण्यात आले नाही . त्यामुळे  मराठीभाषिक , लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच          तर मित्रानो, दर 2 वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळाच्या ऑलींपियाडच्या पुढील महिन्यात होणाऱ्या सोहळ्यासाठी भारताकडून पुरुष आणि महिला संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली . या संघाचे नेर्तृत्व नाशिकची शान असलेले भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे  (जागतिक क्रमवारीत 23) बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी करणार आहे . विदित यांच्या नेर्तृत्वाखाली 4 वेळा बुद्धिबळाचे विश्वविजेते असणारे विश्वनाथन आंनद यांच्यासह  महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विश्वविजेत्या असणाऱ्या कोनेरू हंपी खेळणार आहेत . सध्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाराष्ट्र आणि नाशिकचे बुद्धिबळाचे क्रीडाविश्व हेलकावे खात असताना नाशिकच्या एक...

भारतीय रेल्वेची पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल

इमेज
            गेल्या पंधरवाड्यात भारतीय रेल्वेने दोन मोठ्या गोष्टी केल्या, त्यातील एक गोष्ट ही  कमी खर्चात अधिक मालवाहतूक क्षमता  विकसीत करण्याबाबत केलेली चाचणी होती . ज्यामध्ये तब्ब्ल अडीच किलोमीटर लांबीची रेल्वे भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येऊन एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला  तर दुसरी गोष्ट सध्याचा सर्वात ज्वलंत विषय असणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण या बाबतीत उचललेले सकारात्मक पाऊल होते .                सध्या रेल्वेकडून   वर्तमानातील  समस्त मानवापुढील अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या पर्यावरणाचे  रक्षण या प्रश्नांबाबत जागरूक होत  पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरित वायूचें वातावरणातील   प्रमाण कमी करण्याचा हेतूने  आपला डिझेल वापर कमीत कमी करण्याचा मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत  . त्याच मालिकेतील समाविष्ट होऊ शकणारी गोष्ट म्हणजेच ही सकारात्मक  गोष्ट होती .  या गोष्टींमध्ये दोन बाबी अंर्तभूत होत्या . पहिली बाब म्हणजे रेल्वेच्या जबलप...

मंगळ मानवाच्या कक्षेत ?

इमेज
             सध्या समस्त मराठी  वृत्तवाहिन्या जगभरातील करोनाच्या बातम्या आपल्या बातमीपत्रात सांगत असताना , जगात फक्त करोनाविषयक घडामोडी घडत आहे असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो . मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये . करोनाबरोबर खगोल विज्ञानाचा क्षेत्रात सुद्धा अनेक विषयक घडामोडीं आपणास ज्ञात होण्यासाठी आजचा लेखन          तर मित्रानो , येत्या महिन्याभरात जगातील तीन अवकाश संशोधन संस्था , ज्याची लग्नाचा बाजारात प्रचंड दहशत आहे , किंवा प्राचीन ग्रीक देवतेमध्ये ज्याची युद्धाची गणना होते , अश्या मंगळ  ग्रहावर तीन मोहीमा राबवणार आहेत .युनाटेड अरब  अमिरात देशाची   स्पेस एजन्सी, चीनची अंतराळ संशोधन संस्था, नासा या त्या तीन  अवकाश संशोधन संस्था आहेत . युनाटेड अरब अमिरात मार्फत  14 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे . तर चीन या देशाची स्पेस एजन्सी मार्फ़त 23 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे आणि नासा या अवकाश संस्थेमार्फत जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यांत किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मोहिमेला सुरवात होणार आ...

अजून एक पाउल रेल्वेचा खासगीकरणाकडे

इमेज
             आपण सर्व मराठी भाषिक अध्यत्माचा रंगात न्हाउन जात असताना किंवा  करोना विषयक बातम्या माहिती करुन घेत असताना 1जूलै 2020 रोजी भारतीय रेल्वेने एक परीपत्रक प्रसिद्ध केले . ज्या विषयी मराठी भाषिक माध्यमांमध्ये फारच कमी माहिती प्रसारीत करण्यात आली .द हिंदू या भारतातील महत्त्वाच्या इंग्रजी दैनिकात मात्र याविषयी सविस्तर छापून आले आहे .                 या परीपत्रकाद्वारे भारतीय रेल्वेचे खासगीकरणाचा दृष्टीने पाउल पुढे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे .या परीपत्रकाद्वारे रेल्वेने 109 रेल्वेस्थानकादरम्यान खासगी रेल्वे चालवण्यासाठी खासगी रेल्वे चालकांना त्यांची तयारी सिद्व करण्याचे आदेश दिले आहेत . या 109रेल्वे स्थानकांची 12 विभागात विभागणी केली आहे . या रेल्वे चालवतांना रेल्वेचेच कर्मचारी वापरण्यात येणार असल्याचे, आणि यामुळे भारतीय रेल्वे प्रगतशील होण्यात हातभार लागणार असल्याचे रेल्वेचा प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. मात्र ही सर्व रेल्वेचे खासगीकरण करण्याची पद्धत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .     ...

कथा तेलाच्या दराची

इमेज
                 सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कळीचा मुदा कोणता ? याचा धांडोळा घेतल्यास इंधनाचे सातत्याने वाढणारे दर या मुद्याच्या अग्रक्रम लागेल यात शंका नाही .  दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी  शब्दशः पळवले आहे . आधीच करोना या महामारीमुळे घटलेले उत्पन त्यात दररोज वाढणाऱ्या दरांमुळे त्याबाबत असंतोषतात भरच पडली आहे . या भाववाढीमागे  मागे केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या करांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाटा आहे , हे सर्वश्रुत आहेच . या करांमध्ये केंद्राकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचा वाटा किती ? राज्यांचा वाटा किती ?  त्याच प्रमाणे महाराष्ट्रात वसूल करणाऱ्या करांचे प्रमाण किती ? अन्य राज्यात वसूल केला जाणारा कर किती ? याबाबत विविध दावे  प्रतिदावे मी समाज माध्यमांमध्ये  बघितल्याने या बाबतची वस्तुस्थिती नक्की काय आहे ? हे मांडण्यासाठी आजचे लेखन                 विविध सरकारकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचे प्रमाण दोन प्...

रौप्य महोत्सव पृथ्वीवर न आलेल्या संकटाचा

इमेज
            आपल्यापैकी अनेकांना आकाशदर्शनाची इच्छा असते. .अथांग विश्वातील विविध दिर्घीका, आपल्या आकाशगंगेतील विविध तारे, आपल्या सौरमालेतील ग्रह, त्यांचे उपग्रह, ग्रहांएव्हढे मोठे नसणारे मात्र स्वतंत्र्य अस्तिव असणारे लघुग्रह, बटूग्रह आणि सुर्यमालेला काही विशिष्ट कालावधीनंतर भेट देणारे आपल्या सुर्यमालिकेतील पाहुणे अर्थात धुमकेतू आदींचे निरीक्षण करताना खगोलप्रेमींची रात्र कशी सरुन जाते,हे त्यांचे त्यांनाही समजत नाही . या अथांंग पसरलेल्या विश्वातील सर्वात रहस्यमय गोष्ट कोणती असेल तर ती आहे, धुमकेतू .हे धुमकेतू कुठुन येतात, याचा बऱ्यापैकी अंदाज आता आपल्याला येत असला, तरी त्यामुळे आपल्या पृथ्वीला काहीही धोका नाही,असे मात्र खगोल शास्त्रज्ञ अजूनही सांगू शकलेले नाहीत.याला बरीच कारणे असली, तरी एक प्रमुख कारणे म्हणजे धुमकेतूचे पृथ्वीला धडकण्याची शक्यता             येत्या जूलै महिन्यात अस्याच एका धडकेला 25वर्षे पुर्ण होत आहेत. शुमेकर आणि लेव्ही या दोन खगोलशास्त्रज्ञांंनी मार्च 1992मध्ये  एकत्रीतरीत्या  शोधलेल्या शुमेकर लेव्ही...