पोस्ट्स

रेल्वेतील बदलांची एक्सप्रेस सुसाट

इमेज
मित्रांनो, सध्या आपण करोना, सुशांतसिंग राजपुत यांची आत्महत्या अश्या बातम्यांमध्ये गुरफुटुन गेलो असताना रेल्वेमध्ये अनेक दुरगामी परीणाम  करणाऱ्या घटना घडत आहेत .ज्याचा येणाऱ्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात परीणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी त्या विषयी माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन .  मित्रांनो या लेखात मी तूमच्याशी तीन गोष्टींबाबत बोलणार आहे . त्यातील एक गोष्ट प्रत्यक्ष रेल्वेप्रवाश्यांचा बाबत आहे, तर अन्य 2गोष्टी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबधीत आहे. त्यातही कर्मचाऱ्यांशी सबंधीत एक गोष्ट सकारात्मक आहे, तर एका गोष्टीला नकारत्मक छटा आहे .पहिले प्रवाश्यांचा बाबतीत असलेली गोष्ट बघूया. तर करोना नंतरच्या काळात प्रवास करताना कमीत कमी मानवी संपर्क यावा या हेतूने रेल्वे आणि स्टेट बँक आँफ इंडिया या दोघांच्या सहकार्याने एक योजना सुरु करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेचे रुपे कार्ड जर आरक्षणादरम्यान व्यवहार करताना वापरल्यास प्रवाशी भाड्यात 10% सुट देण्यात येणार आहे, आणि यावर आँनलाईन व्यवहारावर आकरण्यात येणारे 1% शुल्क देखील आकरण्यात येणार नाहीये. तसेच हे कार्ड वापर...

मराठीचे त्रांगडे

इमेज
        मला दोन एक दिवसापुर्वी जो मुळात मराठी भाषिक आहे, मात्र जो आता मराठीमध्ये न लिहता इंग्रजी भाषेत विज्ञान, भारताचे परराष्ट्र धोरण आदी विषयावर लेखन करतो,  अशी व्वक्ती भेटली. मला तो ज्या विषयावर लेखन करतो , त्या विषयावर मराठीत फारच कमी लेखन दिसत असल्याने आणि तो मुळात मराठी भाषिक असल्याने मी त्यास मराठीत या विषयावर का लेखन करीत नाहीस ? मराठीत लेखन केल्यास सर्वसामान्य, ग्रामीण जनतेस समजेल असे विचारल्यावर त्याने उपस्थित केलेले मुद्दे आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .त्याने दोन मुद्द्याला स्पर्श केला, पहिला प्रमाण मराठी आणि दुसरा मराठीतील शुद्धलेखनाचा अतिरेक .               त्याचा अनुभवानुसार  मराठी या विषयावर जास्त लेखन  न येण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, एका ठराविक प्रदेशातील काही ठराविक व्यक्ती समुहात बोलल्या जाणाऱ्या भाषेला  प्रमाण भाषा म्हणून दिलेली मान्यता. सगळ्या मराठी भाषिक जनतेचा विचार करता ही संख्या अत्यंत तूटपुंजी आहे .मात्र त्यांची भाषा ही प्रमाणभाषा म्हणून इतरांवर लादण्यात आल्याने मराठी ही ज्ञा...

रेल्वेची घौडदौड सुरुच

इमेज
    सध्या भारतीय रेल्वे विक्रमी गतीने बदलत आहे. गेल्या आठवड्याभरात रेल्वेने तीन गोष्टी केल्या. त्यातील एक गोष्ट विश्वविक्रम करणारी होती,  आणि दुसरी गोष्ट रेल्वेच्या कचऱ्याची स्वस्तात विल्हेवाट लावून वर दानाचे पुण्य देखील पदरात पाडून घेणारी होती , तर तिसरी गोष्ट रेल्वेचे हवेतील प्रदुषण कमी व्हावे ,यासाठी करावयाचा उपक्रमातील महत्तवाचा टप्पा होती .आता या तिन्ही गोष्टी टप्याटप्याने बघूया . सुरवात विश्वविक्रमाने                                            तर मित्रांनो, या करोना काळात देखील रेल्वेमार्फत विविध प्रकारची कामे अव्याहतपणे सुरु आहेत. त्या अंतर्गतच वेस्टन डेडिकेटेड फ्रेड काँरीडर या मार्गाचे काम सुरु असताना हरीयाणा राज्यात मेवाड आणि गुरुग्राम  या दोन जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेमार्गावर अरवली पर्वतरांगेत एक किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला . जर हा बोगदा तयार करण्यात आला नसता, तर सुमारे 40ते55 किमीचा फेरा पडला असता . तूम्हाला कदाचित वाटू शकते एक किलोमीट...

मानवाची शंभरी भरण्याकडे वाटचाल

इमेज
                 सध्या समस्त जग करोनाच्या धास्तीत जगत असताना करोनाचे संकट कस्पटासमान वाटावे, असी घटना मार्चपासून रशियाचा जवळपास 77%भाग असणाऱ्या(जगाचा विचार करता 9%) सैबेरीया या भागात घडत आहे .या घटनेचे परीणाम सध्या दिसत नसल्याने माध्यमांद्वारे या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, मात्र येणाऱ्या पिढीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान यामुळे होणार आहे. तर ती घटना आहे, वर्षातील जवळपास दहा महिने शुन्याचा खाली तापमान असणाऱ्या सैबेरीयात लागलेला वणवा  . त्याचप्रमाणे ज्या भागात वर्षातील दहा महिने शुन्याचा खाली तापमान असते, तर उन्हाळ्याचा दोन महिन्यात ते तापमान सरासरी 20ते 28 सेल्सिअस  असते . त्या भागात नोंंदले गेलेले 38 सेल्सीयस तापमान ही होय .जे मानवाच्या ज्ञात इतिहासातील या भागात नोंदले गेलेले सर्वाधिक तापमान आहे.                     या वणव्याचा विस्तार ही पोस्ट लिहताना ग्रीस या देशाचा एकुण क्षेत्रफळाएव्हढ्या भागात झालेला आहे .ज्या भागात हा वणवा लागलेला आहे, तो भाग वर्षातील बहुसंख्य...

46व्या अमेरिकी अध्यक्षांचे बिगुल (भाग 4 )

इमेज
            सध्या समस्त जगत  करोनाच्या भीतीत जगत असताना जगात अनेक घडामोडी घडत आहेत . नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार ठरला जाणे , हि त्या यापैकीच एक होय . जगातील सर्वात बलाढ्य अश्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या या देशाच्या 46 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते. ,याकडे समस्त अमेरिकेचे लक्ष लागलेले आहे . गेल्या वर्षभरापासून सुरु असणारी ही प्रक्रिया आता अंतिम  टप्यात आली आहे . ही प्रक्रिया कशी असते ? याबाबत मी याच ब्लॉग मध्ये आधीच्या तीन पोस्ट मध्ये सांगितली आहे . ज्यांना ती बघायची असेल त्यांनी या पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे .            तर मित्रानो , डेमोक्रेटिक पक्षातर्फे नुकतीच JOE  BIDEN  याना उमेदवारी जाहीर झाली आहे . रिपब्लिक पक्षातर्फे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानाच  उमेदवारी देण्यात येणार आहे . डेमोक्रेटिक पक्षातर्फ़े अनेक महिला उमेदवार अध्यक्षपदासासाठी उत्सुक होत्या , त्यामुळे जगातील सर्वात बल...

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते

इमेज
                       गेल्या पंधरवड्यात समस्त नाशिककरांची मान  गर्वांचे ताठ व्हावी अशी घटना घडली, दुर्दैवाने समस्त मराठी माध्यमे करोना विषयक माहिती देण्यात व्यस्त असल्याने या घटनेकडे म्हणावे इतके लक्ष देण्यात आले नाही . त्यामुळे  मराठीभाषिक , लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच          तर मित्रानो, दर 2 वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळाच्या ऑलींपियाडच्या पुढील महिन्यात होणाऱ्या सोहळ्यासाठी भारताकडून पुरुष आणि महिला संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली . या संघाचे नेर्तृत्व नाशिकची शान असलेले भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे  (जागतिक क्रमवारीत 23) बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी करणार आहे . विदित यांच्या नेर्तृत्वाखाली 4 वेळा बुद्धिबळाचे विश्वविजेते असणारे विश्वनाथन आंनद यांच्यासह  महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विश्वविजेत्या असणाऱ्या कोनेरू हंपी खेळणार आहेत . सध्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाराष्ट्र आणि नाशिकचे बुद्धिबळाचे क्रीडाविश्व हेलकावे खात असताना नाशिकच्या एक...

भारतीय रेल्वेची पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल

इमेज
            गेल्या पंधरवाड्यात भारतीय रेल्वेने दोन मोठ्या गोष्टी केल्या, त्यातील एक गोष्ट ही  कमी खर्चात अधिक मालवाहतूक क्षमता  विकसीत करण्याबाबत केलेली चाचणी होती . ज्यामध्ये तब्ब्ल अडीच किलोमीटर लांबीची रेल्वे भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येऊन एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला  तर दुसरी गोष्ट सध्याचा सर्वात ज्वलंत विषय असणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण या बाबतीत उचललेले सकारात्मक पाऊल होते .                सध्या रेल्वेकडून   वर्तमानातील  समस्त मानवापुढील अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या पर्यावरणाचे  रक्षण या प्रश्नांबाबत जागरूक होत  पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरित वायूचें वातावरणातील   प्रमाण कमी करण्याचा हेतूने  आपला डिझेल वापर कमीत कमी करण्याचा मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत  . त्याच मालिकेतील समाविष्ट होऊ शकणारी गोष्ट म्हणजेच ही सकारात्मक  गोष्ट होती .  या गोष्टींमध्ये दोन बाबी अंर्तभूत होत्या . पहिली बाब म्हणजे रेल्वेच्या जबलप...