पोस्ट्स

भारतीय अर्थव्यवस्था तळापासून तिसऱ्या स्थानी

इमेज
                                 मित्रांनो, सध्या भारतात जीवनावश्यक नसणाऱ्या अनेक मुद्यांवर गरमागरम चर्चा रंगली असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMG) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे . ज्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात इटली ,स्पेन या देशानंतर जगातील तिसरी अत्यंत वाईट अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. पुढील कालावधीत जगाचा एकुण अर्थव्यवस्थेचा वाढीचा  दर सुमारे 4% टक्के घसरेल मात्र भारताची अर्थव्यवस्था 10.4% टक्याने घसरेल अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे . दोन अंकी घसरण असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत  भारताचा समावेश असेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आणि हे सांगितले आहे आय एम एफ च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या मुळच्या भारतीय वंशाच्या अमेरीकी नागरीक  गीता गोपीनाथ  यांनी                          भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत खडतर अवस्थेमधून जात आहे. अमेरीका आदी पाश्चात्य देशातील नागरीकांचे दरदोई उत्पन, त्यातील...

भारत जपान आणि भारत बांगलादेश मैत्रीचे नवे सेतू

इमेज
    सध्या मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्या काहीश्या नकारात्मक वाटाव्यात अस्या बातम्या सातत्याने देत असताना मन प्रसन्न व्हावे अस्या घडामोडी देखील सभोवताली घडत आहेत. मात्र त्यांना अपेक्षीत असी प्रसिद्धी न मिळाल्याने त्या सांगण्यासाठी आजचे लेखन                             तर मित्रांनो चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारी कमी व्हावी या हेतूने भारत आणि जपानमध्ये.नुकतेच काही करार करण्यात आले .ज्यामुळे भविष्याचे तंत्रज्ञान म्हणून ओळख असणाऱ्या 5जी चे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना साह्य करणार आहेत. 5 जी  तंत्रज्ञानामुळे  सध्या अशक्य वाटणारी अनेक कामे सहजतेने होतील ज्यामध्ये घरचा टीव्ही , रेफ्रिजेटर , आदी उपकरणे लांबवरून नियंत्रित करणे आदी अनेक कामाचा समावेश करता येईल . याबाबत भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जपानच्या परराष्ट्र मंत्री  यांनी करारावर स्वाक्षरी केली .  क्याड या संघटनेच्या जपानमधे आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी    भारताचे परराष्ट...

नोबेल आणि भारतीय

इमेज
            नुकतेच विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहिर झाले . त्यामध्ये अपवाद वगळता जे नेहमी होते, तसेच झाले , भारताची झोळी रिकामीच राहिली .जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही, लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या देशाला हे निश्चितच भुषणावह नाही. तसेच आतापर्यंत जे जे नोबेल पुरस्कार भारताला मिळाले आहेत त्यापैकी सी व्ही रामन यांच्या अपवाद वगळता अन्य सर्व पुरस्कार हे सामाजिक शास्त्रे या प्रकारातील आहेत . नैसर्गिक शास्त्रे म्हणून जी शास्त्रे ओळखली जातात . त्या भौतिकशास्त्र,   रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदी प्रकारातील नोबेल आपणास जेव्हा मिळतील, तेव्हा आणि तेव्हाच आपण महासत्ता म्हणून घेण्यास लायक ठरू असे मला वाटते .        काही जण नोबेल पुरस्कार हे प्रामाणिक नाहीत त्यामुळे भारतीयांना नोबेल पुरस्कार नाही असा दावा करतील . मात्र माझ्या मते हे पूर्णतः अयोग्य आहे .आपल्या मनाची समजूत करण्यासाठी आपणच तयार केलेल्या गोष्टी म्हणूनच याकडे बघावे लागेल.मला भारताचे नागरीकत्व असणारे लोकच यासाठी अपेक्षीत आहेत. थोर भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ सि व्ही रामन य...

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
                    "मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव  आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा  अर्थ आहे . भारतातील सिनेसृष्टीचा  विचार करता  कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण त्यांचे नाव घ्यावेच लागेल  . त्यांचा मृत्यूस सन 2020 ऑक्टोबर 10 रोजी 56 वर्षे पूर्ण होत आहेत ,  त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .                    जागतिक कीर्तीच्या टाइम्स मॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तम अश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता, तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्त यांची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्...

पाकिस्तान 3 नव्या बदलाचा वाटेवर ?

इमेज
      सध्या आपल्या भारतात एका बलात्कार च्या घटनेवरून वातावरण अतिशय तंग झाले असताना आपल्या भारताच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शत्रू राष्ट्रात अर्थात पाकिस्तानमध्ये तीन  वेगवेगळ्या घडामोडींनी अतिशय वेग पकडला आहे . एक घडामोड आहे . पाकिस्तानातील सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी उघडणे ही आहे . दुसरी घटना आहे , पाकिस्तानचे माजी पंप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात नव्या खटल्याचा प्रारंभ करण्याची तयारी करणे आहे तरतिसरी घटना आहे , पाकिस्तानने अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाला स्वतंत्र प्रांताचा(provience ) दर्जा देणे ही आहे .  पाकिस्तानातील  घटना आता सविस्तर बघूया . प्रथम गिलगिट बाल्टिस्तान विषयी बोलूया .               तर मित्रानो, सन 1947 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून काश्मीरच्या पश्चिमेकडील आणि वायव्य दिशेला असणाऱ्या भागावर पाकिस्तानने अनधिकृत कब्जा केल्याचे आपणास माहिती असेलच . या पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या वायव्य भागाला गिलगिट बाल्टिस्तान म...

बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग 6)

इमेज
              गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या 46 व्या अमेरीकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची रणधुमाळी आता आंतिम टप्यात आली आहे .(ज्याची मी गेल्या वर्षभरात पाच पोस्टमधून वेळोवेळी दखल घेतली आहे . ज्यांना त्या वाचायचा असतील, अश्यांसाठी मी या लेखाच्या खाली त्यांचा लिंक पेस्ट केल्या आहेत. जिज्ञांसू त्या बघू शकतात)  सुमारे  एक महिना शिल्लक राहिलेल्या या निवडणूकीच्या रणधुमाळीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या Presidential Debate आता सुरु झाल्या आहेत . निवडणूकीतील उपाध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या व्यक्तींची टिव्ही चर्चा झाल्यावर हा मजकूर लिहित असताना अध्यक्षपदाचे डोमोक्रेक्टीक पक्षाचे उमेदवार असणाऱ्या जाँन बायडन आणि विद्यमान अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात टिव्हीवरील चर्चा आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 30 सप्टेंबरला सकाळी साडेसहा ते आठपर्यत (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार 29सप्टेंबर रात्री 09 .:00ET) झाली . या चर्चेचे सुत्रसंचालन  Fox या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक   यांनी केले . या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 3 तारखेला ...

भारतीय रेल्वेच्या प्रगतीला ब्रेक ?

इमेज
                    सध्या भारतीय रेल्वे प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे हे आपण जाणतातच . मात्र या प्रगतीला खीळ तर बसणार नाही नाही ना ? अशी शंका यावी अशी बातमी नुकतीच समोर आली . तर मित्रानो , त्याचे असे झाले की ,  राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी खर्चाचे लेखापरीक्षण (Audit ) करणाऱ्या  CAG या  आपल्या संविधानात नमूद केलेल्या संस्थेमार्फत आर्थिक वर्ष 2018-2019 साठी लेखापरीक्षण करताना रेल्वेबाबत अत्यंत प्रतिकूल अहवाल तयार करण्यात आला आहे . हा अहवाल दिनांक 2020 सप्टेंबर 23 रोजी संसदेसमोर मांडण्यात आला आहे .               या अहवालात काय आहे ? हे समजण्यासाठी आपणास एक  बाब माहिती असणे आवश्यक आहे . ती म्हणजे ऑपरेशन रेशो . एखाद्या संस्थेला 100 रुपये मिळवण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतात म्हणजेत्या संस्थेचा ऑपरेशन रेशो  जर 85 रुपये खर्च करावे लागले तर त्या संस्थेचा ऑपरेशन रेशो .85 , जर दुसऱ्या संस्थेला 90 रुपये खर्च करावे लागले तर स...