पोस्ट्स

राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले

इमेज
                           "राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले", असे म्हणावे लागेल, असी स्थिती नुकतीच जागतिक राजकारणात निर्माण झाली, आणि त्याला निमित्य ठरले , तो तूर्कस्थानच्या इम्रली या राज्यात आलेला शक्तीशाली भुकंप . या भुकंपामुळे ग्रीस या देशाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान कोस्तास कारामान्लिस यांंनी तूर्कस्थानच्या अध्यक्ष एर्डोगन यांना फोन करुन आपल्या दोन्ही राष्ट्रात राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी या नैसर्गिक संकटाशी आपण एकत्र लढले पाहिजे, असा संदेश दिला . ज्यामुळे जागतिक राजकारणात एक वेगळा संदेश दिला गेला .                           या दोन शत्रू राष्ट्रांना एकत्र येण्यास भाग पडणारा भुकंप (नैसर्गिक) घडला दिनांक 30, आँक्टोबर रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून वीस  मिनीटांनी.  युरोपिय प्लेट,आफ्रिकन प्लेट, आणि अरेबियन प्लेट या क्षेत्रात एकत्रीत येतात . त्यातील अरेबियन प्लेट ईतर...

अमेरिका जगातील एक क्रमांकाची घाण

इमेज
     सध्या जगात काय चालू आहे? याचा आढावा घेतल्यास फ्रान्समधील घडामोडी या प्रमुखतेने लक्षात येतात. फ्रान्समधील घडामोडीवर विविध प्रकारची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रकारात चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार सुरु आहे, हे सहजतेने लक्षात येते. या सर्व घडामोडीमागे अमेरिकेने 1950 ते 1990 या कालावधीत पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात केलेल्या उचापती जवाबदार असल्याचे याकडे तटस्थतेने बघीतल्यास सहजतेने लक्षात येते. अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीची निर्मिती असो, अथवा लोका़ंची काहीही तक्रार नसताना सदाम हुसेन यांची ईराक मधील सत्ता नष्ट करणे, गडाफीला उत्तर आफ्रिकेतील प्रमुख सत्ताधिश म्हणून प्रस्थापित करणे, जगभरात लोकशाहीचा मक्ता घेतल्यासारखे वागणाऱ्या अमेरीकेने सौदी अरेबियाचा राजेशाहीविषयी कठोर भुमिका न घेणे. नैसर्गिक तेलासाठी या देशांना वापरणे मात्र त्याचे मोल म्हणून या देशात सुधारणा करण्यासाठी आपण काही लागतो,याकडे सौइस्कर दुर्लक्ष करणे,ही अमेरीकेची यासाठी लक्षात येणारी काही प्रमुख दुषकृत्ये. मात्र गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात येणाऱ्या बातम...

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँक्टोबर हा आपल्या भारतातील दोन वेगवेगळ्या क्षेत्रात दिग्गज महिलांचा स्मृती दिन .असतो एक महिला म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आँपरेशन ब्लु स्टार, आँपरेशन मुक्तीवाहिनी असे अनेक धाडसी निर्णय घेतले, त्या इंदिरा गांधी होय, आणि दुसऱ्या म्हणजे कवीयत्री अमृता प्रीतम होय .31आँक्टोबर 2005रोजी त्यां...

बिगूल 46व्या अमेरीकी अध्यक्षाचे (भाग 7वा)

इमेज
                         गेले वर्षभर सुरु असलेल्या 46व्या अमेरीकी अध्यक्ष निवडीची प्रक्रीया आता आंतीम टप्यात आली आहे. मी गेली वर्षभर या विविध टप्यांची माहिती वेळोवेळी दिली आहे. ज्यांना ती वाचायची आहे, त्यांचासाठी मी मागील लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत,असो.            येत्या मंगळवारी अर्थात 3 नोव्हेंबर रोजी जरी अमेरीकेत 46 व्या अध्यक्षासाठी प्रत्यक्ष मतदान होणार असले, तरी करोना संसर्गाचा पार्श्वभुमीवर अमेरीकेत प्रत्यक्ष मतदानदिनाच्या आधीच सुरु असलेल्या टपाल मतदानाद्वारे  मतदान करण्यास अधिकाधीक अमेरीकी नागरीक प्राधान्य देत आहेत. Fox Newsने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या 2016 मध्ये आलेल्या टपाल मतदानापेक्षा 60%अधिक मतदान यावेळी टपाल मतदानाने झालेले आहे. या आधी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीनूसार जाँन बायडन पुढे होते . ते आता प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत देखील पुढे आहेत. मात्र त्यांची आघाडी पुर्वीपेक्षा कमी झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा करोना संसर्गामुळे मुळच्या नियोजनानुसार अस...

कहाणी भुगर्भाच्या 2शोधांची

इमेज
                         सध्या समस्त भारतीयांचे लक्ष बिहार निवडणूक, आणि महाराष्ट्राचे लक्ष विविध छोट्यामोठ्या मुद्द्यांकडे लागलेले असताना भारताचा भुगोलाच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यातील एक गोष्ट  सकारात्मक आहे, तर दुसरीला नकारात्मक छटा आहे. या दोन घटना राजस्थान आणि लडाख या क्षेत्रात उघडकीस आल्या आहेत . आपल्या मराठीतील मुख्य धारेच्या माध्यमांनी याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते ते सकलासी सांगावे सकल जना " या वचनानुसार आपणापर्यत सदर माहिती पोहचवण्यासाठी आजचे लेखन                   तर सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरुन ...

हीच ती का मराठी ?

इमेज
            गेल्या आठवड्याभरापुर्वीची गोष्ट आहे एका मित्राने मला फोन केला होता, नेहमीचे क्षेमकुशल झाल्यावर त्याने तूझ्याकडे अरे ते पुस्तक आहे का ?  असा प्रश्न केला.मित्राने विचारलेले पुस्तक मराठीतील एक नामांकित पुस्तक होते. तेव्हापासून एक प्रश्न मला सातत्याने मनात येत आहे, की आपल्या मराठीत अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत, ज्यावर अनेक दिर्घ कालावधीच्या मालिका सहजतेने तयार होवू शकतात, ज्या लहानमुलांसह प्रौढ व्यक्तीही सहजतेने बघू शकतील अस्या असताना अत्यंत कटकारस्थांनी भरलेल्या, विविध प्रकारचे गुन्हे सहजतेने दाखवणाऱ्या मालिका मराठीत का बनत आहेत.                जे मालिकांचे तेच विनोदी कार्यक्रमाचे आपल्या मराठीत चि.वि जोशी, पु.ल. देशपांडे, व. पू. काळे, यांच्या सारखे सकस विनोदी लेखन करणारे साहित्य असताना महिलांचे कपडे पुरूषांनी घालणे, आणि विनोद निर्मिती करणे , यात काय हशील? एकेकाळी वाईटपणाचा शिक्का बसलेल्या तमास्यात या प्रकारचे विनोद असतात.आणि ते सादर करण्यास नाच्या म्हणतात ,जो मानाच्या दृष्टीने अत्यंत कमी असतो. आपल्या...

भारतीय रेल्वेची चित्याचा वेगाने बदलाकडे धाव

इमेज
                  आपली भारतीय रेल्वे सध्या झपाट्याने बदलत आहे, हे आपण जाणतातच. या बदलांचा मालिकेतीलच पुढचा अध्याय म्हणून समजता येतील, असे  प्रवास्यांशी सबंधित  तीन बदल  रेल्वे आपल्या सेवेत  करणार असल्याचे, सुतोवाच नुकतेच रेल्वेमार्फत करण्यात आले. एक बदल काहीसा सकारात्मक आहे, तर एका बदलाला काहीसी नकारात्मक छटा आहे.  तर एक न्युट्रल आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी यावर काहीसे मौन बाळगले असल्याने त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले नकारात्मक बदल बघूया . तर मित्रांनो आपल्या प्रवासात आपली तहानभूक मिटवणारा रेल्वेडब्बा म्हणजे पँट्री कार बंद करणार असल्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. भारतीय रेल्वेच्या तिन्ही कोच फँक्टरीमध्ये (इंट्रीग्रेड कोच फँक्टरी चेन्नई, रेल कोच फँक्टरी रायबरेली, आणि रेल कोच फँक्टरी कपूरथाळा या तिन ठिकाणी भारतीय रेल्वेच्या प्रवाशी डब्याची निर्मिती होते)   या प्रकारचे डब्बे बऱ्याचा काळापासून बनत नसल्याचे दिसून आल्याने ही बाब उघडकीस आली. सध्या प्रवाशी सहजतेने आँनलाईन पद्धतीचा अवलंब करत प्रवाश्य...