पोस्ट्स

चीनचा विस्तारवाद सुरुच

इमेज
                        आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला असता  जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असणाऱ्या चीनचा विस्तारवाद अजूनही सुरु असून  त्यांनी नेपाळच्या 5 जिल्ह्यातील एकत्रीत 150 हेक्टर जमिन स्वतःच्या नियंत्रणात घेतल्याचे नुकतेच स्पष्टपणे निर्दशनास आले आहे.या मुळच्या नेपाळच्या मात्र चीनने अनधिकृतरीत्या घेतलेल्या भुभागावर चीनने काही इमारती आणि लष्करी ठाणी उभारली असल्याची माहिती युनाटेड किंग्डमच्या काही माध्यम़ानी दिली आहे                  नेपाळ आणि चीनची सिमा हिमालयाच्या डोंगराळ भागातून जात असल्याने नदीच्या तिर किंवा एखादा खांब उभारुन ही सीमा निश्चित केली आहे. चीनच्या लष्कराने (ज्याला पिपल्स लिबरेशन आर्मी अथवा संक्षिप्त स्वरुपात पि एल ए म्हणतात) हे खांब उखडून अथवा नदीच्या प्रवाहात बदल करुन ही घुसखोरी केली आहे. नेपाळच्या ज्या भागात चीनने घुसखोरी केली आहे, त्या भागातील नेपाळी नागरीकांचे विविध उत्पादने चीनकडून खरेदी करण्यात ...

महाराष्ट्राची एसटी गाळात ?

इमेज
           सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे बिहार निवडणूक, अर्णब गोस्वामी यांची अटक आदी मुद्याभोंवती घुटमळत असताना, आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीबाबत काहीसे मन विषष्ण दोन बातम्या येवून धडकल्या.करोना संसर्गाच्या भीतीने सक्तीने लादण्यात आलेल्या लाँकडाउनमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या आपल्या एसटीच्या तोट्यात भरच पडली, परीणामी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीचे काही आगार आणि ईतर मालमत्ता  तारण ठेवण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली, हे कमी म्हणून काय एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत पगार देण्यात यावे यासाठी नाशिकच्या कामगार आयुक्तांना निर्देश द्यावे लागले. या त्या दोन बातम्या होत्या सन1948 साली स्थापन झाल्यावर 72वर्षात ईतकी दैनावस्था महामंडळावर या आधी कधीच आली नव्हती. करोना काळात थांबलेल्या प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पनाला पर्याय म्हणून एसटीमार्फत मालवाहतूकचा पर्याय देखील अमंलात आणण्याचा प्रयत्न करुन बघण्यात आला, मात्र मालवाहतूकदारांच्या संघटनेमार्फत याला विरोध झाल्याने एसटी प्रशासनाला हा प्रयत्न थांबवावा लागल...

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
                 सध्या भारताचे आपल्या शेजारी देशांशी असलेले सबंध नव्याने वृद्धिगत होत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आदी देशांशी आपले सबंध  संबध मैत्रीच्या नव्या वळणावर आहेत . त्यातील बांगलादेशाशी असणाऱ्या घनिष्ट संबंधावर मी याआधीच लिहले आहे . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लीक करावे. मी आता बोलणार आहे .म्यानमार विषयी            आपल्या  सारखाच ब्रिटिशांची वसाहत असणारा म्यानमार या देशाच्या कारभार 1935 पर्यंत भारतातूनच चालवला जात असे . 1935साली म्यानमार आणि भारताचा कारभार स्वतंत्र करण्यात आला .1857 च्या उठावानंतर दिल्लीच्या बादशहाला आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना म्यानमारच्या तुरुंगात कैद करून ठेवले होते तर म्यानमारच्या राजाला रत्नागिरीत कैद करून ठेवले होते . हे आपण जाणतातच . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्यानमारचे राष्ट्रपिता ऑग सांग हे युनाटेड किंगडम मध्ये शिकत असताना एकमेकांचे जवळचे मित्र होते ,  आशियांची स्थापना करत...

चीनचा विळखा ?

इमेज
चीन आपल्या भारताचा एक प्रबळ शत्रू, अनेकांना ज्याचे  नाव घेतले तरी  तळपायाची आग मस्तकात  जाते असे राष्ट्र. आपल्या भारताच्या विरोधात विरोधात अनेक जागतिक व्यासपीठावर अधिकृत अथवा छुप्या पध्द्तीने बाजू घेणारे राष्ट्र . या चीनच्या संदर्भात 3 घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. आपल्या पारंपरिक माध्यमांनी या घडामोडीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                            तर मित्रांनो, बांगलादेशाने चीनला त्यांचे बंदर विकसीत करण्यापासुन रोखल्यानंतर चीनने पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर जे त्यांचा सिंध प्रांताची आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे, अस्या कराची जवळील दोन बेटे  विकसीत करण्यासाठी पाकिस्तानबरोबर करार केला आहे. त्यासाठी चीन त्या ठिकाणी त्याचा तळ देखील विकसीत करणार आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी करोनामुळे लॉक डाऊन असताना पाकिस्तानच्या सरकारने एक अध्यादेश काढला आहे कराचीच्या समुद्रापासून मुंबईचा समुद्र किनारा अत्यंत जवळ आहे, हे आपणास ज्ञात आहेच. त्यामुळे...

हवामान बदल जीवघेणे ?

इमेज
                     ब्लँक अँड व्हाइट चित्रपट असतानाच्या काळातील एक सुप्रसिद्ध गाणे आहे . "किसीका दर्द मिले तो लेले उधार, किसिकी मुस्कुराटो पर हो निगाह, जिना इसिका नाम है!" दुसऱ्यांंचा दुःखाला आपले दु्ःख मानावे, दुसऱ्याचा आनंदाला आपला आनंद मानाने, असा संदेश हे राजकपूर यांच्यावर चित्रीत हे गाणे देते. या गाण्यात सांगितलेली स्थिती आपल्या भारतीयांना अनुभवयास मिळावी असी दुर्देवी परिस्थीती फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या देशावर सध्या आली आहे. या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आलेला आहे. गोनी या टायफुनने आतापर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पर्यटन आणि उसाच्या उत्पादनावर आधारीत त्यांची अर्थव्यवस्था या टायफूनमुळे शब्दशः  मोडकळीस आली आहे.या आधी दक्षीण कोरीया आणि जपानला विविध टायफूननी तडाखा दिल्याचे आपणास स्मरत असेलच.  आपल्...

असा बालनायक होणे नाही!

इमेज
                 कालचीच गोष्ट आहे. फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ?अशी विचारणा केली होती. ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे. तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे, बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का?                       सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, असे डोरेमाँन, निंज्जा हातोरी, शिनच्यन, हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल, इतकेच. वासरात लंगडी गाय शहाणी, या तत्वामुळे. मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन, हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी.  फास्टर फेणेची कथा पहिल्यांदा येऊन कैक पिढ्या लोटल्या , तरी त्याची मोहिनी अजून देखील आहे . फास्टर फेणेमध्ये वर्णन...

राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले

इमेज
                           "राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले", असे म्हणावे लागेल, असी स्थिती नुकतीच जागतिक राजकारणात निर्माण झाली, आणि त्याला निमित्य ठरले , तो तूर्कस्थानच्या इम्रली या राज्यात आलेला शक्तीशाली भुकंप . या भुकंपामुळे ग्रीस या देशाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान कोस्तास कारामान्लिस यांंनी तूर्कस्थानच्या अध्यक्ष एर्डोगन यांना फोन करुन आपल्या दोन्ही राष्ट्रात राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी या नैसर्गिक संकटाशी आपण एकत्र लढले पाहिजे, असा संदेश दिला . ज्यामुळे जागतिक राजकारणात एक वेगळा संदेश दिला गेला .                           या दोन शत्रू राष्ट्रांना एकत्र येण्यास भाग पडणारा भुकंप (नैसर्गिक) घडला दिनांक 30, आँक्टोबर रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून वीस  मिनीटांनी.  युरोपिय प्लेट,आफ्रिकन प्लेट, आणि अरेबियन प्लेट या क्षेत्रात एकत्रीत येतात . त्यातील अरेबियन प्लेट ईतर...