पोस्ट्स

असे बनले संविधान (भाग 4)

इमेज
           आपले संविधान जगातील उत्कृष्ट असणाऱ्या काही संविधानापैकी एक आहे. आपले संविधान अमेरीका या देशासारखे अत्यंत ताठर नाही. किंवा युनाटेड किंंग्डमसारखे सहज बदलता येण्यासारखे  नाही. आपल्या संविधानात दुरुस्तीचे तीन प्रकार कलम 368 मध्ये सांगितले आहेच. हे आपणास माहिती असेलच .  हा मजकूर लिहण्यापर्यत संविधानात 104 वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यातील 42वी, 44 वी आणि 73 वी, 74 वी घटनादुरुस्ती ,69वी घटनादुरुस्ती, 97वी, 52वी, 86 वी, 101,आणि 103वी घटनादुरुस्त्या  विशेष  महत्त्वाच्या आहे.  42वी घटनादुरुस्ती ही आणिबाणीच्या काळात झालेली घटनादुरूस्ती आहे, यामध्ये घटनेत झालेले बदल हे काहीसे वादगस्त असून या घटनादुरुस्तीत खुप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्यामुळे ही घटनादूरुस्ती  या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात..  या घटनादुरुस्तीमुळे सविधानाच्या उद्देशपत्रीकेत (प्रियंबल मध्ये) काही शद्बांची भर घालण्यात आली. आज पर्यत हे शद्ब अनेकदा वादगस्त ठरले आहेत, मात्र हे शद्ब काढून टाकण्याची घटनादुरुस्ती झालेली नाही. 44वी घटनादुरूस्ती 42व्या घ...

असे बनले संविधान (भाग 3)

इमेज
      मित्रांनो, आपले भारतीय संविधान जगातील काही मोठ्या संविधानापैकी एक आहे, अमेरीका देशाचे संविधान (देशाचे संविधान त्यातील राज्यांचे नव्हे) फक्त 7 कलमे आहेत .तर  भारतीय संविधानात 395 कलमे आहेत. या संविधान निर्मितीची प्रक्रीया कसी कसी विकसीत झाली ? यामध्ये कोणते टप्पे होते ? याची 1857पर्यतची प्रक्रिया आपण या आधीच्या 2 भागांमध्ये बघीतली, ज्यांना ते वाचायचे असेल अस्यांसाठी त्या भागाच्या लिंक या लेखाच्या  खाली देण्यात आल्या आहेत.असो .                   तर 1857 साली भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय अपयशी ठरले असले तरी भारतीयांचा असंतोषाची जाणीव  ब्रिटीश शासनास झाली, आणि तो दूर करण्यासाठी 1857 आँगस्ट महिन्यात ब्रिटिश संसदेने भारतीयांनासाठी  काही  गोष्टी समंत केल्या, ज्या 1857 नोव्हेंबर मध्ये जाहिर केल्या , त्यास क्विन  अर्थात राणीचा जाहिरनामा म्हणतात. ज्यानुसार पुढील गोष्टी अमंलात आल्या . कंपनीकडून सत्ता पुर्णपणे ब्रिटीश सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली . भारतीयांविषयक कामकाजासाठी ब्रिटीश मंत्...

असे बनले आपले संविधान (भाग 2)

इमेज
मित्रांनो, जगातील उत्कृष्ट संविधानापैकी एक असणाऱ्या आपल्या भारताच्या संविधानाची निर्मितीची प्रक्रिया भारत पारतंत्र्यात गेला, त्या वेळेपासूनच झाली, हे आपण जाणतातच.  त्यातील टप्पे कोणकोणते आहेत? , हे आपण या लेखमालेच्या पहिल्या भागात बघीतले .ज्यांना ते वाचायचे असतील त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.          तर मित्रांनो, 1756च्या बक्सार आणि 1765च्या प्लासीच्या युद्धाने इस्ट इंडीया कंपनीचा ताब्यात बंगाल चा महसुल गोळा करण्याचा अधिकार  हाती आला.(बंगालमध्ये या घडामोडी घडत असताना 1758 मध्ये मराठी भाषिकांनी अटक जिंकले तर 1861मध्ये मराठी भाषिकांचा पानिपतावर दारुण पराभव झाला) आणि कंपनीच्या हातात व्यापाराबरोबरच बंगालच्या महसुलातून मिळणारा नफा आला. मात्र कंपनीच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे, आणि भष्ट्राचारी कर्मचारी वर्गामुळे एकेकाळी ब्रिटीश सरकारला प्रचंड कर देणाऱ्या या कंपनीला ब्रिटीश सरकारकडूनच कर्ज घेण्याची वेळ आली, आणि कंपनीच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ब्रिटिश सरकारला भासू लागली, आणि त्यातून जन्म झाला 1773 च्या रेग्यूलेटींग अँक्टचा . या रेग्युले...

असे बनले आपले संविधान (भाग 1 )

इमेज
                                   मित्रानो, आपले भारतीय संविधान जगातील एक उत्कुष्ट संविधान आहे .  देशातील प्रशासन व्यवस्था कशी असेल ?याचा स्पष्ट उल्लेख असणारे आपले संविधान जगातील अश्या प्रकारचे एकमात्र संविधान म्हणून आपल्या संविधांकडे बघितले जाते . प्रशासन व्यवस्थेसारख्या अनेक गोष्टी आपल्या संविधानात अतिशय विस्तृतपणे सांगितल्या आहेत. आपल्या संविधानाचे हे एक वैशिष्ट्यच आहे . हे संविधान जरी अधिकृतपणे 1946 डिसॅबर 9 रोजी तयार होण्यास सुरवात होऊन 1949 नोव्हेंबर 26 रोजी तयार झालेले असले तरी आपल्या संविधानाची प्रक्रिया या दिवसांतच झाली असे मानणे भाबडेपणाचे ठरेल . सन 1773 च्या रेग्युलेटरी ऍक्ट पासून वेळोवेळी भारतीय प्रशासन व्यवस्थेत विविध बदल करण्यात आले , ज्याचे प्रतिबिब आपणास आपल्या संविधानात दिसते .       आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत1773,च्या रेगुलेटींग ऍक्ट बरोबर  1784च्या पिट्स ऍक्ट ,  1813,चा चार्टड ऍक्ट 1833चा चार्टड ऍक्ट  1833च्या च...

भारत नेपाळ सबंध एक अवलोकन

इमेज
   सध्या भारताच्या शेजारील देशांबरोबर भारताच्या विविध करार अथवा मैत्री वाढवण्याचा अथवा काही प्रमाणात तणाव वाढवण्याचा घटना घडताय   त्यापैकी बांगलादेश , भूतान ,म्यानमार . मालदीव , श्रीलंका  या देशांबरोबरच्या घडामोडी मी आपणास या आधीच सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायाच्या असतील त्यांच्यासाठी त्या लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली देत आहे . त्याठिकाणी जाऊन आपण त्या वाचू शकतात . या वेळेस मी बोलणार आहे . नेपाळविषयी              नेपाळ आपल्या भारताच्या  शेजारील निसर्गाची उधळण असणारा देश आपल्या  भारताच्या उत्तराखंड, उत्तरप्रदेश बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना सीमा लागून असणारा देश . आपल्या  बौलिवूड मधील एके काळची आघाडीची नायिका कोईराला हीच देश म्हणजे नेपाळ . हिंदू धर्मियांची भारतानंतर सर्वाधिक वस्ती असणारा देश म्हणजे नेपाळ . भगवान शंकराचे जागृत देवस्थान असणारे पशुपतिनाथाचे मंदिर ज्या देशाच्या राजधानीत आहे तो देश म्हणजे नेपाळ . भूतान सारखेच ज्या देशातील लोक भारतीय प्रशासन सेवेत येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ. ज्य...

रम्य हे भारत श्रीलंका मैत्रीचे बंध

इमेज
            मित्रांनो, सध्या भारताच्या सभोवतालचे देश आणि भारत यांच्यात अनेक घडामोडी घडत आहे. त्यापैकी, बांगलादेश, भुतान, मालदिव, म्यानमार या देशांविषयी मी या आधीच लिहले आहेत. ज्यांना या विषयी माहिती हवी असेल त्यांना सोईस्कर व्हावे या हेतूने त्या आधीच्या लेखांची लिंक या लेखाच्या खाली देण्यात आली आहे.  मी यावेळेस बोलणार आहे, ते श्रीलंकेविषयी          श्रीलंका, भारताच्या  दक्षिणेला असणारे हिंदी महासागरातील बेट स्वरुप असणारे राष्ट्र. भारताच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा सम्राट असणाऱ्या अशोक यांंनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपली मुलगी संघमित्रा हीस ज्या देशात धर्मप्रसारासाठी पाठवले तो देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशाच्या कँंडी या देशात भगवान बौद्धांचा दात सुरक्षीत ठेवला आहे, तो देश म्हणजे श्रीलंका. इंडो आर्यन गटातील सिंहली ही भाषा, ज्या देशातील प्रमुख भाषा आहे, तो देश म्हणजे श्रीलंका . भारताबरोबर बिमस्टेक, काँमनवेल्थ आणि सार्क या संघटनेतील सदस्य देश म्हणजे श्रीलंका. ज्या देशामध्ये भारतीय वंशाचे तामिळ भाषिक लोक मोठ्या संख्ये...

इंदिरा गांधी : एक कणखर पंतप्रधान

इमेज
                 आपल्या भारतात काही व्यक्तीमत्वे असी आहेत की, समोरच्याला फक्त त्याचे नाव सांगावे, सबंधीत व्यक्ती बाकीचे सर्वकाही समजून जाते. भारताच्या माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी या त्यापैकीच एक .19 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा .             अनेकांना इंदीरा गांधी यांचे नाव घेतल्यावर फक्त आणीबाणीचीच आठवण होते. मात्र खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, सिक्कीमला भारतात पुर्णतः समाविष्ट करुन घेणे.  पाकिस्तानची प्रमुख आर्थिक ताकद असणारा पुर्व पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणणे, आदी अनेक कार्ये त्यांचा कार्यकाळात झाली.                        पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लामाबादच्या निर्मितीसाठी लागलेल्या पैसामध्ये पुर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या कररुपी उत्पनाचा वाटा जवळपास 90 ते95% होता. ज्याला इंदिरा गांधीनी स्वतंत्र देश करुन पाकिस्तानचे आर्थिक कबंरडेच मोडले. एका बाजु...