पोस्ट्स

भारतीय रेल्वे फक्त श्रीमंताचीच ?

इमेज
      आपण भारतीय लोक टीव्हीवर  दिल्ली  येथील शेतकऱ्यांचा आंदोलना विषयक बातम्या बघण्यात  मग्न असताना केंद्र सरकारकडून भारतीय रेल्वेत दोन अत्यंत महत्वाचे बदल करण्यात आले .  हे दोन्ही बदल भारतीय रेल्वे निव्वळ श्रीमंतांचीच का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे होते . पारंपरिक माध्यमांतून या विषयी फारशी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगणारी ही पोस्ट         तर मित्रानो भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागांतर्गत येणारे 11 मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्तावाला भारतीय रेल्वे बोर्डाची मान्यता मिळणे.  आणि भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRCTC ( Indian Railway catering and Tourist Cooperation ) मधील आपला  आतापर्यंत असणारा 87.5%  वाटा हा 75% वर आणणे हे आहेत           भारतीय रेल्वेकडून बंद करण्यात आलेल्या .11 .मार्गांपैकी  9 मार्ग हे मीटरगेज चे आहेत .तर 2 हे ब्रॉड गेज आहेत . या रेल्वमार्गावर प्रचंड तोटा होतो असे   कारण यासाठी रेल्वेतर्फे देण्यात येत आहे . सध्या भ...

कधीपर्यत हे चालणार?

इमेज
      महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजधानी अर्थात पुणे शहरात 9 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत असंस्कृतपणाचे वर्तन घडले. त्याबद्दल या प्रकरणाचा करावा तितका निषेध कमीच आहे.       पुण्यातील असंस्कृत नागरीकांमुळे एका रानगव्याचा दूर्देवी मृत्यू झाला. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवो. मोठ्या प्रमाणावर पुर येवो, अथवा एखादा वन्यजीव चुकून मानवी वस्तीत येवो, अस्या प्रसंगी कसे वागायचे ? याविषयीचा आपल्याकडे असंस्कृतपणा सार्वत्रीक आहे. त्याचेच प्रत्यंतर  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुण्यात घडले. या अस्या असंस्कृत लोकांमुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे येतात. या अति उत्साही लोकांना आवरायचे की , ज्यांना खरोखरीच मदतीची गरज आहे . त्यांचा मदतीसाठी धावायचे?, असा प्रश्न या अतिउत्साही लोकांमूळे  सातत्याने उपस्थित होतो.               एखादा वन्यजीव मानवी वस्तीत आल्यावर सबंधीत वस्तीतील लोकांमध्ये भिती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या लोकांबरोबरच त्याला बघायला इतर लोकही येतात. या गर्दीमुळे आधीच घाबरलेला वन्यजीव  अजूनच घाबरतो, आ...

50 वर्षे अभिमानाची ( भाग 2)

इमेज
          आपल्या भारताच्या लष्कराने बांगल देशाची निर्मिती करण्याचा घटनेला या 2020 वर्षात 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्षे सुरु झाले. या निमित्ताने भारतीय लष्कराचे मनःपुर्वक आभार. तसेच या घटनेत अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरीत्या सहभाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन. या घटनेमुळे अनेक बदल झाले.         ज्यामध्ये पाकिस्तानचा आर्थिक प्रगतीचा दर झपाट्याने कमी होणे. पाकिस्तानच्या इतर असंतुष्ट गटांना त्यामुळे प्रेरणा मिळणे भारताच्या लष्करी आणि कुटनितीच्या ताकदीच्या प्रत्यय सर्व जगाला येणे, या प्रमुख गोष्टी होत्या .असो.        पाकिस्तानची नविन राजधानी इस्लामाबाद उभारताना लागलेल्या पैश्यापैकी जवळपास सर्वच पैसे, हे त्या वेळच्या पुर्व पाकिस्तानातील तागाची इतर देशांना निर्यात करुन मिळवले होते. आपण पाकिस्तानचा आर्थिक वृद्धीचा दराचा विचार करता 1971 चा आधीचा पाकिस्तानचा आर्थिक वृद्धी  दर आशियातील सर्वात जास्त आर्थिक वृद्धी दर असणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये मोडला जात असे.(राजकीय स्थैर्य मात्र नसल्यागतच होते .1947 ते 1959 पर्यंत 7 पंतप्रधान ...

50 वर्ष अभिमानाची

इमेज
                                   या डिसेंबर महिन्यात एका मोठ्या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्प सुरु  होणार आहे. या घटनेने एक विश्वविक्रम केला आहे. ही घटना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटना आहे, भारताने  जगातील एका देशातील 90 हजार सैनिकांना युद्धकैदी बनवण्याची , जो एक जागतिक विक्रम आहे, ज्या देशातील सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले तो देश आहे, पाकिस्तान आणि  ती घटना आहे, पाकिस्तानचा पुर्व भाग पाकिस्तानचा तावडीतून सोडून स्वतंत्र देश  अर्थात बांगलादेशच्या निर्मितीची . येत्या 16 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या 49वा स्वातंत्र्यदिन आहे.हा अतूलनीय भीम पराक्रम करणाऱ्या भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा .                                               बांगलादेश, 1947 साली पाकिस्तानची निर्मिती होत असताना बंगाल प्रांताच्या पुर्वेकडील जो भाग पाकिस्तानात समाविष्...

ब्रेक्झीटचा गुंता सुटता सुटेना (भाग 8 )

इमेज
                   मित्रांनो, आपल्या भारतात विविध मुद्द्यांंवर विनाकारण चर्चा चालू असताना , युरोपात एका घडामोडीने युरोपातील कडाक्याचा थंडित भल्याभल्यांना घाम फोडला आहे. ही घडामोड आहे ,ब्रेक्झीटची . सध्या युरोपीय युनियन आणि युनाटेड किंग्डम यांच्यात यांच्यादरम्यान ब्रेक्झिटच्या संदर्भात ट्रान्झिशन पिरियड सुरु आहे . जो 31 डिसेंबर 2020 रोजी  पूर्ण  पूर्ण होईल .हा ट्रान्झिशन पिरियड  1  जानेवारी 2020 रोजी सुरु झाला   हा ट्रॅन्झिशन पिरियड संपल्यावर युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन यातील संदर्भ संबंध कसे असतील  ? याबाबत सध्या युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियनमध्ये बोलणी सुरु आहेत . युनाटेड किंग्डमचे पंतप्रधान जॉरिस बॉन्सन्स यांच्या मते ही  बोलणी 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असती. मात्र काही गोष्टींवर मतैक्य न झाल्याने त्या गोष्टींबाबत अजूनही बोलणी सुरूच आहेच.          युनाटेड  किंग्डम या चर्चेच्या दरम्यान सातत्याने नव्या  नव्या गोष्टी पुढे करत असल्याने बो...

श्रुष्टीचा विलोभनीय चमत्कार ! गुरु शनी एकत्र

इमेज
           मित्रानो, येत्या 16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत  सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी आकाशात पश्चिमेला एक नाट्य रंगणार आहे. हे नाट्य सुमारे 400 वर्षानंतर घडत आहे , ज्याचा सर्वोच्च बिंदू हा  21 डिसेंबर हा असणार आहे . जर आपण हे नाट्य बघायला विसरलो तर , आपणास हे नाट्य बघायला थेट 2089 ची वाट बघावी , लागेल , अर्थात तो पर्यंत आपण असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने ही संधी चुकवणे आपणस अत्यंत महाग पडू शकते . या नाट्यातील प्रमुख पात्र आहेत गुरु ग्रह आणि शनी ग्रह .        तर मित्रानो ,  16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रह आणि शनी ग्रह यातील  पृथीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे . ज्यामुळे गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे वेगवेगळे न दिसता  एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथीवरून दिसेल . पृथ्वीवर हा  देखावा विषवूत्तवार सर्वात उत्तम दिसणार आहे . याचा परमोच्च क्षण हा 21 डिसेंबर हा असणार आहे ,या  दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर फक...

शेतकरी आंदोलनाचा वेदनादायी इतिहास

इमेज
नुकतीच 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले रोजी पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने महात्मा फुले यांचे साहित्य वाचत असताना, या महात्म्याचे थोरपण नव्याने समजले. महात्मा फुले यांनी फक्त आपल्या समाजातील उतरडीत तळाला असणाऱ्या समाजालाच जागृत केले असे नाही, त्यांनी आपल्या समाजातील पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांचे दुःख देखील सुशिक्षित समाजासमोर मांडले . त्यांनी केवळ प्रश्च मांडले नाहीत, तर त्यावर उपाय देखील सांगितले ज्यावर त्यांचा शेतकऱ्याचा आसूड आणि ब्राम्हणांचे कसब या पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे. मात्र त्यावेळच्या जूलमी ब्रिटीश सत्तेने आणि त्याचीच काँपी म्हणावी , अस्या स्वतंत्र्य भारतातील सरकारने या उपयाकडे सोइस्कर दुर्लक्ष केल्याने काय झाले ? हे आपण आता टिव्हीवर बघतो आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात लागू केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यामुळे सगळा देश पेटला आहे .विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या  आंदोलनाला समर्थन मिळत आहे. कँनडा, युनाटेड किग्डम या देशातील  संसदेच्या  अनेक सदस्यांनी आणि कँनडाच्या पंतप्रधानांनी याबाबत आपली भुमिका सार्वजनिकपणे जाहिर केली आहेच. ...