पोस्ट्स

देशातील अंतर्गत धूसमुस

इमेज
                     आज सध्या आपल्या भारतात कृषी कायद्याविरोधात राळ उठवले असताना, भारतातील मिझोराम आणि त्रिपूरा, तसेच पंजाब आणि हरीयाणा या दोन एकमेकांबरोबर सीमा आणि राजधानी शेअर करणाऱ्या राज्यांत वादाची ठिणगी पडलेल्या आहेत . तसे आपल्या भारताला दोन शेजारच्या राज्यात वाद निर्माण होणे नवे नाही , दोन्ही राज्यातून वाहणाऱ्या नद्या , अथवा सीमाच्या बाबत निश्चित मानांकन न झाल्याने आपल्या भारतात दोन शेजारच्या राज्यात आपल्या भारतात कायमस्वरूपी वाद चालूच असतात . मात्र सध्याचा अशांत अस्थिर  वातावरणात असे वाद उफाळून येणे अधिक धोक्याचे आहे . त्यातही असा वाद जर त्रिपुरा आणि मिझोराम अश्यासारख्या देशाच्या संरक्षणासाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या  महत्वत्त्वाच्या राज्यातील असेल तर परिस्थिती अजूनच बिकट होते , त्याचप्रमाणे पाकिस्तानसारख्या राष्ट्राला लागून असणाऱ्या पंजाब आणि भारताच्या प्रमुख औद्योगिक राज्यात समावेश असणाऱ्या पंजाब आणि हरियाणा या राज्यातील वाद असेल तर मग विचारायलाच नको , अश्या प्रकारचे राज्यांतर्गत असणारे वाद स...

सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग2 )

इमेज
 .             या   2020     वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग, आजच्या लेखात 1जानेवारी ते 30 जून या दरम्यान मध्ये घडणाऱ्या गोष्टीबाबत सांगेल .1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत घडलेल्या घडामोडी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायच्या असतील त्यांच्यासाठी या लेखाची लिंक या लेखाचा खाली देण्यात आली आहे . तर मित्रानो बघूया जानेवारी ते जून या कालावधीतील रेल्वेच्या घडामोडी          पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व  भारतात लागू होणारा निर्णय ...

सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग 1 )

इमेज
       या    2020    वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आजचे लेखन . या वर्षात रेल्वे संदर्भात खूप गोष्टी घडल्याने या आढावा दोन भागात घेतला जाईल . पहिल्या भागात   जुलै ते 31 डिसेंबर  या दिवसाचा आढावा घेण्यात येईल नंतर आधीच्या वर्षाचा आढावा घेण्यात येईल , तर बघूया या वर्षात भारतीय रेल्वेत काय काय बदल झाले  तर मित्रानो , आपली  भारतीय रेल्वे सध्या डायरेक्ट करंट (डिसी) ट्रँक्शन मोटरवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाचे उत्पादन करणे बंद करत आहे. त्याच मालिकेत WAP4 या इंजिनाचे उत्पादन बंद करण्यात आले भारतीय                            रेल्वेची   एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या...

सिंहावलोकन खगोलशास्त्र 2020

इमेज
सन 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी खगोलशास्त्रात अनेक घडामोडी घडल्या . त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .  तर मित्रानो, आपल्या सौरमालेच्या बाहेर पृथ्वीपासून   17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .शास्त्रज्ञांनी या जागेला GW190521 असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्वीय लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत आता आपल्या पर्यंत पोहोचल्या आहेत विश्वाचे वय साधारणतः 17ते  20 अब्ज असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . त्या हिशोबाने विश्व जन्मला आल्यावर लगेच ही घटना घडलेली असावी . विश्वााची निर्मिती नेमकी कोणत्या प्रकारे झाली याची माहिती मिळण्यासाठी याचा उपयोग होवू शकतो. आइस्टाइनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या आधारे हा शोध घेण्यात आला. एकीकडे सौरमालेच्या बाहेर दोन कृष्णविवर एकत्र आलेले आढळून आले असताना आपल्या सौरमालीकेतील सुद्धा अनेक महत्तवाचे शोध 2020 या वर्षी ल...

झुक झुक अगीन गाडी(भाग 2)

इमेज
              मित्रांनो, आपल्या भारताची रेल्वे विद्युतवेगाने कात टाकत असल्याचे आपणास ज्ञात आहेच. देशभरात सुरु असणाऱ्या या बदला अंतर्गत  महाराष्ट्रात देखील झपाट्याने बदल होत आहेत. यातील  रेल्वेमार्गाचे दुपद्रीकरण, तिहेरीकरण, आणि चौपद्रीकरण याविषयी माहिती पहिल्या भागात घेतली. आपण याचा पहिल्या भागात घेतली. (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करावी) या भागाात मी बोलणार आहे ते महाराष्ट्रातील विद्युतीकरणाविषयी.            आपल्या महाराष्ट्रात 5678किलोमीटरचे रेल्वेमार्ग आहेत. त्यातील सुमारे 60% म्हणजेच 3357 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्यूतीकरण झालेले आहे. सध्या रेल्वे झपाट्याने शुन्य कार्बन निर्मिती होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच मालिकेत  भारतातील सर्व रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे कार्य करत आहे. या प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्रातील पुढील मार्गाचे विद्यूतीकरण सुरु आहे. हे मार्ग विद्युतीकरणाच्या कार्यांमध्ये विविध टप्यामध्ये आहेत, म्हणजेच काही मार्गाचे विद्यूतीकरण कर...

झूक झूक अगीन गाडी

इमेज
      आपल्या भारतीय रेल्वेत सध्या देशभर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत, हे आपणास माहिती असेलच.रेल्वेबाबत महाराष्ट्राला कायम सापत्नतेची वागणूक  दिली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते . मात्र हे खोटे असल्याचे महाराष्ट्रात रेल्वेचे सुरु असणारे प्रकल्प बघताना आपणास दिसते. या प्रकल्पाचे आपण दोन प्रमुख प्रकारे विभाजन करु शकतो. ते म्हणजे 1)पुर्णतः नविन मार्गाची निर्मिती 2)जून्या मार्गात सुधारणा . जून्या मार्गात सुधारणा या प्रकारचे सुद्धा दोन प्रकारे विभाजन करता येते 1) नविन रुळ टाकणे 2) मार्गाचे विद्यूतीकरण करणे . पहिल्यांदा जून्या मार्गावर नविन रूळ टाकण्याबाबत बोलूया . मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात अस्तिवात असणाऱ्या काही रेल्वे मार्गाचे नुकतेच दुपदीकरण करण्यात आले अथवा या कार्यासाठी पुरेसी निधीची तरतूद करण्यात आली. म्हणजेच पुर्वी तिथे एकच रेल्वेमार्ग होता, एकाच मार्गावरुन अप आणि डाउन दोन्ही प्रकारच्या गाड्या धावत असे आता मात्र या मार्गावर अप आणि डाउनसाठी वेगवेगळे रुळ असतील अस्या  मार्गात पुढील मार्ग येतात. 1)पुणे- मिरज -लोढा या 462 किमीच्या रेल्वेमार्गासाठी 479...

जरा याद करो उनको

इमेज
     दिनांक 13 डिसेंबर 2001..., स्थळ संसदेची इमारत नवी दिल्ली......., वेळ सकाळी अकराची....., संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने देशातील सर्व खासदार संसदेच्या प्रांगणात हजर.ज्यामध्ये सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी, पि सी चिदबरन् आदी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे खासदारांचा समावेश असतो....... नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असते. आज काही वेगळ घडणार आहे. याची पुसटशी देखील शंका तेथील सुरक्षा रक्षकांना नव्हती. अचानक खासदारांसाठी असलेले स्टिकर लावलेली एक कार संसदेच्या आवारात घूसते. नेहमीच्या ठिकाणी न थांबता सरळ संसदेच्या आवारात घूसते. खासदाराची गाडी आहे. कशाला तपासायचे? असा विचार करुन सुरक्षा रक्षक  त्या गाडीला तसेच पुढे जावू देतात. जी सुरक्षा रक्षकांची चूक असल्याचे नंतर लक्षात येते , कारण ही गाडी संसदेच्या इमारतीला खेटून उभी राहते. त्या कारमधून आलेल्या व्यक्ती गोळीबार करत  संसदेच्या मुख्य सभागृहाच्या दिशेने पळायला सुरवात करतात.  आणि एकच हल्लाबोळ होतो.मग समजते की काश्मीरी दहशतवाद्यांनी भारताच्या सार्वभौम संसदेवर हल्ला केला आहे.  आज 2020...