पोस्ट्स

खगोलशास्त्रातील अदभूत शोधाची कहाणी !

इमेज
           सध्या आपल्या भारतात कृषी कायद्यामुळे, तसेच पेट्रोल दरवाढीमुळे देश ढवळला जात असताना, खगोलशास्त्रज्ञांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. मराठी माध्यमांतून याविषयी फारच कमी माहिती दिली जात असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो खगोलशास्त्रांना आपल्या पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर क्वार्ससचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण क्येसार JO313_1806 असे केले आहे. सन 1950 मध्ये मानवास क्येसार ही संकल्पना माहिती झाल्यापासून  आतापर्यत शोधलेल्या क्येसारमध्ये हा क्येसार सर्वात लांबचा क्येसार आहे. हा क्येसार इतका तेजस्वी आहे की याला 13अब्जाच्या ऐवजी 100 प्रकाशवर्षे दूर ठेवले तर हा क्वार्स सुर्याइतका प्रकाशीत दिसेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या क्येसारची प्रकाशमानता +7.7 इतकी निर्धारीत केली आहे. शास्त्रज्ञांनी या क्येसारची निर्मिती विश्वनिर्मितीनंतर 6लाख 70 हजार  वर्षापुर्वी निर्मिती झाली असावी, असा कयास बांधला आहे. Cerro Telolo Inter American वेधशाळेच्या Bianco 4 या दुर्बिणीमार्फ...

करोना नंतरच्या पहिल्या ग्रँडस्लँमला प्रारंभ

इमेज
                                   गेल्या  2020  वर्षी समस्त वर्ष करोनाच्या धास्तीत गेले आता कुठे सर्वकाही सुरळीत होत आहे . ऑस्ट्रोलीया  आणि न्यूझीलंड येथे विविध खेळाचे सामने आयोजित करण्यात येत आहे . मात्र ते जास्तीत जास्त करून क्रिकेट सारखे सांघिक खेळ आहेत . मात्र वैयक्तिक पातळीवर खेळले जाणारे टेबल टेनिस सारखे खेळ कमी प्रमाणावर खेळले जात आहेत . मात्र या चित्रात येत्या सोमवार पासून अर्थात 8 फेब्रुवारीपासून या चित्रात आमूलाग्र बदल होणार आहे कारण चार ग्रँड स्लॅमपैकी एक अस्नणाऱ्या ऑस्ट्रोलियन ग्रँडस्लॅमची सुरवात 8 फेब्रुवारीपासून होत आहे. सोमवार  8 फेब्रुवारीपासून 21  फेब्रुवारीपर्यंत हा टेनिसचा कुंभमेळा रंगेल . सामान्यतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ऑस्ट्रोलिअन ओपनचे आयोजन यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत आहे . त्यामुळे विविध देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी टेनिस प्रेमींना मिळणार आहे .            ...

शास्त्रीनगरचा आदर्श इतर घेतील का?

इमेज
नूकतेच सोलापूर येथील गेली 17 वर्षे बंद अवस्थेत असलेले शास्त्रीनगर बसस्थानक  पुन्हा सुरु करण्यात आले आहे. ज्यामुळे सोलापूर शहरातील लोकांची मोठी सोय होत असल्याने या बस स्थानकावर प्रवाश्याची मोठी गर्दी होत असल्याचे एसटी प्रशासनाकडून  जाहीर करण्यात आले आहे , त्यामुळे एक जूनाच मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे तो म्हणजे एसटी कडे असणाऱ्या आणि सध्या वापराविना पडून असलेल्या जागांचा व्यापारी स्तरावर पुनर्वापर करण्याचा ,  मित्रानो पळसाला पाने तीनच , घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे  सोलापूर शहरासारखे अनेक बसस्थानके सध्या वापराविना पडून आहेत . थोडीसी डागडुजी केल्यावर ही  स्थानके सहज वापरता येऊ शकतात . ज्यामुळे प्रवाश्यांचा सेवेसाठी हे एसटीचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल . तसेच या बस स्थानकाभोवती हॉटेल सारखी व्यवस्था उभारल्यास सध्याचा बेरोजगारीच्या प्रश्नावर अल्पसा का होईना उतारा देखील मिळेल . आमच्या नाशिक शहरात गंजमाळ सारखी  शहरातील अत्यंत मोक्याची जागा जासी एसटी प्रशासनाकडून सुटली तशी पण सुटणार नाही . आणि लोकांना पण आपल्या जवळच एसटी स्था...

हे पण घडतयं जगात

इमेज
    आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन रणकंदन पेटलेले असताना काही क्रिडा स्पर्धा देखील झाल्या. दुर्देवाने त्याचे वार्तांकन आपल्या माध्यमातून  फारच कमी केले गेले .असीच एक स्पर्धा म्हणजे टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धा.         15 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी नेदरलँड (याला हाँलड असेही म्हणतात. मात्र नेदरलँड सरकारने हाँलड हे नाव अनधिकृत ठरवले आहे.) या देशातील Wijk aan zee या   शहरात आँफलाईन पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली. स्पर्धेचे हे  83 वर्ष होते. सन  1943, 44 पासून दरवर्षी ही बुद्धीबळ स्पर्धा जानेवारी महिन्यात होते. या 2021 व्या वर्षी झालेली स्पर्धा नेदरलँडच्या जाँर्दन वे फाँरेस्ट या खेळाडून जिंकली. भारतातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनीष गिरी या खेळाडूचा या स्पर्धेतील प्रवास आनंदाकडून निराशेकडे जाणारा होता. पहिल्या 12 डावात 8 डाव जिंकून, त्यावेळेपर्यत   स्पर्धेत सर्वाधिक गुण 8 गुण प्राप्त करणाऱ्या या खेळाडुचे नशीब 13 व्या डावात बदलले आणि तो पर्यत 7.5 गुण प्राप्त करणारा नेदरलँडचा जाँर्दन वे फाँरेस्ट  हा खेळाडू विजयी झाला ....

पुन्हा पोलादी पडद्यात !

इमेज
             आपल्या हिंदी चित्रपटश्रुष्टीत एक नावाजलेले गाणे आहे " ओजी मेरे पिया गये हे रंगून , किया हे वहा से टेलिफोन ,की याद तूम्हारी आती हे! " मात्र या पुढे किमान एक वर्ष आपणास असे म्हणता येईल का ?  असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याला कारणीभूत आहे. काल सोमवारी अर्थात 1 फेब्रुवारी रोजी  झालेला सत्ताबदल.         1 फेब्रुवारी रोजी तेथील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पदच्युत करुन तेथील लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे.नोव्हेंबर2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत  प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत. आणि आम्ही ते मान्य करणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाची पुनर्स्थापना करण्यासाठी सत्तेत येत आहोत .असा लष्कराचा दावा  आहे. नोव्हेंबरच्या  निवडणूकीत म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या अँग स्यँन स्युकी यांच्या नँशनल लीग फाँर डेमोक्रसी (जो एन एल डी नावाने प्रसिद्ध आहे) या पक्षाला सर्वाधिक  म्हणजे 83% जागा  मिळाल्या होत्या. मात्र निवडणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत  लष्करातर्फे 2008 स...

आर्थिक सर्वेक्षण 2020-2021

इमेज
अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडला जाणारा अर्थसंकल्पाएव्हढाच महत्तवाचा मात्र काहीसा दुर्लक्षीला जाणारा भाग म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल. जो अर्थसंकल्पाचा एक दिवस आधी संसदेसमोर मांडला जातो. यावर्षी तो शुक्रवार 29 जानेवारी रोजी मांडला गेला. हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . शुक्रवारी मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष 2020 -21 साठी होता तर सोमवारी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प 2021-22 या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा गेल्या आर्थिक वर्षातील प्रवाश्याचा आढावा घेतलेला असतो. ज्यामध्ये मागील वर्षी आर्थिक वाढीचा वेग किती होता,पुढील वर्षी तो किती असण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने काय आहेत. अर्थव्यवस्थेचा जमेच्या बाजू काय आहेत. याविषयी माहिती असते. हा अहवाल गेल्या काही वर्षापासून 2 भागात विभागला असतो. याचा पहिला भाग हा जास्त महत्तवाचा मानला जातो. ज्यामध्ये विविध स्वरुपाची विश्लेषणात्मक  माहिती असते अर्थव्यवस्थेचे समग्र चित्र यातून स्प...

एका हुकुमशहाचा अस्त ?

इमेज
                 ही गोष्ट आहे, एका सत्ताधिकाऱ्याची . एक अस्या सत्ताधिकाऱ्याची जो गेली 20 वर्षे सत्तेत आहे. सध्याचा त्याचा कालावधी जर विचारात घेतला तर हा कालावधी होतो तब्बल 24 वर्षे.बर हा सत्ताधिकारी देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याचा आधी त्या देशातील महत्तवाचा शहराचा महापौर असतो. तत्कालीन  सत्ता प्रमुख जो अट्टल मद्यपी असतो. देशातील वाढता असंतोष बघून तो तत्कालीन सत्ताधीश टिव्हीवर जाहिर करतो, मी राजीनामा देत असून माझा उत्तराधिकारी हा असेल. आणि या सत्ताधिकाऱ्याचा जन्म होतो, या सत्ताधिकाऱ्याने याचा आधी त्या देशाच्या गुप्तहेर म्हणून कामही केले असते. देशाच्या संविधानात सलग तीनदा सत्तेच्या मुख्य स्थानी राहण्याची अनुमती नसल्याने तो दोन टर्म झाल्यावर एक टर्म आपल्याच चेल्याला उभा करतो. त्याची टर्म संपल्यावर पुन्हा सत्तेचा मुख्यस्थानी विराजमान होतो. मी बोलत आहे, रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्याविषयी              सध्या त्यांच्या विरोधात उणे पन्नास अंश सेल्यीयस तापमान असताना रशियाचा सुमारे 70 शहरात निदर्शने चा...