पोस्ट्स

मराठी पाउल पडते पुढे !

इमेज
आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे . जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .       मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असणे. ग्राहकांना विविध प्रकारची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांचा सेवा मराठी भाषेत न मिळणे. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिवसोंदिवस रोडावणे. इंग्रजी परवडेल पण मराठी भाषा नको, अश्या प्रकारच्या मराठी भाषेतील सरकारी कागदपत...

बदलती शेजारची गणिते (भाग2)

इमेज
भारताच्या शेजारील देशात विविध घडामोडी घडत आहे. हे आपणास माहिती आहेच. मागच्या वेळी आपण श्रीलंकेबाबतच्या घडामोडी बघीतल्या , यावेळी आपण बघूया नेपाळविषयक घडामोडी. तर मित्रांनो, भारताच्या पाच राज्यांना सीमा लागून असणाऱ्या नेपाळमध्ये सध्या राजनैतिक उलथापथींना वेग आला आहे. तेथील पंतप्रधान के पी ओली शर्मा यांच्या समंतीने राष्ट्रपतीं देवीप्रसाद यांनी भंग केलेली संसद ही लोकशाहीविरोधी कृती असून येत्या 13 दिवसात तेथील संसदेची पुनर्स्थापना करण्यात यावी, असा आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानाच्या कृतीविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात तेथील लोकशाही वादी लोकांनी दाखल केलेल्या याचीकेचा निर्णय देताना दिला. तेथील पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी तेथील संसद विसर्जीत करुन एप्रिल आणि मे महिन्यात नव्या संसदेच्या निवडीसाठी निवडणूका घेण्याचे जाहिर केले होते. नेपाळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संसदेची पुनर्स्थापना करण्याचे आदेश दिल्याने आता त्यांना ससंदेत बहुमत सिद्ध करावे लागेल.      नेपाळच्या विविध संसदीय समित्यांचे प्रमुखपद स्वतःकडे घेण्याचा एप्रिल 2020मधील  निर्णय आपल्या अं...

वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !

इमेज
स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या भारतमातेचे असे एक सुपुञ होते कि ज्यांना स्वत:हून लोक स्वातंञ्यवीर म्हणत मला तरी जगात स्वातंञ्यवीर सावरकरांखरीच असा एकही व्यक्ती माहीती नाही की ज्याला लोक Liberty warrior or Independent warrior /Freedom warrior अश्या नावाने ओळखले जाते  हिंदू धर्मात पहिल्या पूजेचा  मान मिळालेल्या गणपती चे नाव घेऊन आलेल्या नाशिकजवळच्या भगुरचा या वीराची महती इथेच संपत नाही सावरकरांनी काय केले याच्या ऐवजी काय केले नाही असे विचारणे जास्त संयुक्तीक ठरेल त्यांनी भाषेबाबत कार्य केले त्यांनी सयमसुचकता म्हणजे काय ? ती कशी वापरतात याचा वस्तुपाठच घालून दिला सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजशृंगीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुनर्लेखन  केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे ...

बदलती शेजारची गणिते (भाग 1)

इमेज
आपल्या भारतात करोनाविषयक बातम्यांनी, आणि महाराष्ट्रात पुजा  चव्हाण च्या मृत्यूविषयी माध्यमे बातम्यांचा रतिब घालत असताना, आपल्या भारताच्या शेजारील देशांमध्ये अनेक घडामोडी घडत आहे. ज्यामध्ये श्रीलंका, नेपाळ, आणि म्यानमार मधील घडामोडींचा उल्लेख अपरीहार्य आहे.  माझे आजचे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी . पहिल्यांंदा श्रीलंका या देशाविषयी बघूया  तर मित्रांनो आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात दोन समांतर घडामोडीनी मोठी उलथापथ होत आहे. या दोन्ही घडामोडींशी भारताचा जवळचा सबंध आहे.त्यामुळे त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे. पहिले जूना संदर्भ असलेली घटना बघूया तर, सन 2018 मध्ये ख्रिस्ती धर्मिय बांधवांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या इस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत चर्चमध्ये स्फोट झाले होते,ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेविषयी चौकशी करणाऱ्या आयोगाने नुकताच अहवाल सादर केला आहे. ज्यात त्यावेळचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसेना  यांना या हल्ल्यासाठी दोषी धरुन त्यांना शिक्षा करावी ,असी सुचना करण्यात आली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याची माहिती देवूनही आवश्यक ती का...

भारत माँरीसियस व्यापार नव्या वळणावर !

इमेज
        आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी नूकताच आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला. आफ्रिका खंडात वाढत जाणाऱ्या चीनच्या वर्चस्व्याला शह देण्यासाठी ही रणनिती उपयोगी पडू शकते, असे परराष्ट्र धोरणाविषयीचे तज्ज्ञांचे मत आहे.या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा  विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.   भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे. मात्र आफ्रिका खंडातील देशांबरोबरचा हा  या प्रकारचा पहिलाच करार आहे. चीनने याच प्रकारचा करार माँरीसियस बरोबर जानेवारी 2021 रोजी केला आहे....

भारताचा शेजारी देशातील डंका

इमेज
आपल्या भारतात इंधनाच्या किमतीने मागील कित्येक वर्षातील किमतीचे रेकाँर्ड मोडले असताना, भारताच्या सभोवताली  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  2  घटना नुकत्याच घडल्या. त्यातील एक घटना भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्व वाढवणारी आहे.तर दुसरी साधरण घटना आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले साधरण घटना बघूया. तर मित्रांनो, आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंकेने संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकाराच्या बाबतीत आपली बाजू भारताने उचलावी, यासाठी साकडे घातले आहे . तसेच श्रीलंकेने त्यांचा दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांचा केंद्रीय विधीमंडळात भाषण करण्यास आधी परवानगी दिली असता नंतर मनाई केली . श्रीलंकेने यासाठी करोना संसर्ग पसरु शकतो, हे कारण पुढे केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार इम्रान खान त्यांचा काश्मीरविषयक राग तिथे आवळलू शकतात, जे श्रीलंकेला अडचणीचे ठरु शकते असे वाटल्याने श्रीलंकन सरकारने त्यांना मनाई केली,असो  त्याचप्रमाणे श्रीलंकेने त्यांचा देशात सिंहली आणि तामिळी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना संघर्ष मिटवण्यासाठी उपाययो...

बदलत्या हवामानाचा फटका !

इमेज
आपल्या भारतात इंधनाच्या वाढत्या किमतीने लोकांचे जगणे अवघड केले असताना, पृथ्वी गोलाचा विचार करता आपल्या भारताच्या जवळपास दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अमेरीकेतील आकाराने आणि अर्थव्यवस्थेचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असणाऱ्या टेक्सासमध्ये हवामानाने तेथील जनतेचे जगणे नरकप्राय केले आहे. तिथे अत्यंत हाडे गोठवणाऱ्या थंडीत घरे गरम करणाऱ्या हिटरसाठी आवश्यक असणाऱ्या वीजेचा अभूतपुर्व तूटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिण्याचे पाणी देणाऱ्या पाइपलाईनला तडे गेल्याने काही भाग पाण्यापासून वंचित आहे. अचानक वीजेची मागणी प्रचंड वाढल्याने तेथील वीज वाहण्याची यंत्रणा मोडून पडली आहे. त्यामुळे काही भागातील वीज गेली आहे. परीणामी काही रुग्णालयातील रुग्णांना उपचाराविना घरी सोडण्यात येत आहे.  आणि हे घडतेयं जगातील महत्त्वाची महासत्ता असलेल्या अमेरीकेत . आणि याला कारणीभूत आहे, गेल्या कित्येक वर्षात पडली नाही असी थंडी. ही तीच अमेरीका आहे, जी दरदोइचा विचार करता जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करते.मात्र देशपातळीचा विचार करता चीन आणि भारत हे आमच्या इतकेच कार्बन उत्सर्जन करतात, त्यांनी स्वतःवर बंधने लादून घेत...