पोस्ट्स

बातमीतील चीन (भाग 4)

इमेज
चीन, आपल्या इतिहासाचा दाखल देत आपल्या शेजारील राष्ट्रांचा भुभागावर दावा करणारा देश, जगातील  सर्वात कठीण भाषेंचा यादीत ज्या देशातील प्रमुख भाषेचा वरचा क्रमांक लागतो, तो देश, जगात आजमितीस 2021साली मोजक्या देशात साम्यवादी राजवटी सुरु आहे त्यातील एक देश म्हणजे चीन, सन 1978 पासून साम्यवादी राज्यव्यवस्थेत भांंडवलशाहीला पुरक अर्थव्यवस्था उभारणारा देश म्हणजे चीन (रशियात याचा विरुद्ध म्हणजे स्वातंत्र्यात साम्यवादी अर्थव्यवस्था अमंलात आणली गेली परीणामी तो देश फुटला)1949ला अस्तिवात येवून सुद्धा 1971 पर्यत सयुंक्त राष्ट्र संघात ज्या देशाला प्रवेश नव्हता तो देश म्हणजे चीन .हा चीन देश  दोन दिवसापुर्वी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि याला कारणीभूत आहे. त्या देशाने भुभागावरुन फिलीपाइन्स या देशाबरोबर सुरु केलेला वाद. तर मित्रांनो, चीनने आमच्या स्पेशल इकाँमाँनिकल झोनमध्ये त्यांची 200 लष्करी जहाजे आणली असल्याचा आरोप फिलीपाइन्सने केला आहे.समुद्रकिनाऱ्यापासून 12 ते 200 नाँटिकल मैलापर्यतचा प्रदेश त्या देशाचा स्पेशल इकाँनाँमिक्ल समजला जातो.या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्या देशाचा अधिकार असतो.(एक नाँ...

भट्टी तापत आहे! सावधान!

इमेज
काल 30 मार्च रोजी नाग विदर्भातील ( विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभागाला नाग विदर्भ ,तर अमरावती प्रशासकीय विभागाला वऱ्हाड म्हणतात विदर्भात शेतकऱ्यांचा ज्या  आत्महत्या होतात, त्यातील 95 ते 96% आत्महत्या या वऱ्हाड भागात असतात ) चंद्रपूर जिल्ह्यात मार्च महिना संपायला 1 दिवस शिल्लक असताना तापमानाने 43.4 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद केली. नाग विदर्भातील नागपूर वर्धा,चंद्रपूर या जिल्ह्याचा काही भागात जंगले आहेत तर गडचिरोली, भंडारा गोंदीया या तिन जिल्ह्यात जवळपास 100% क्षेत्र वनाच्छादीत आहे. मात्र खनिज उत्खनन कार्य तसेच काही औद्योगिक वसाहतींमुळे गेल्या काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने विक्रमी तापमान नोंदवले जात आहे            दर वर्षी  मागच्या वर्षीचा उच्चांक मोडून नविन तापमान नोंदवले जाते.काही दिवसापूर्वी मुंबईतील पाऱ्याच्या उंचीने 40अंशाची मर्यादा ओलांडली होतीच.तर काही महिन्यापुर्वी द्राक्षाचे नुकसान व्हावे इतकी थंडी नाशिकच्या निफाड तालूक्यात पडल्याचे आपणास स्मरत असेलच. ज्या प्रमाणे मार्च महिन्यापासून तापमानाचे उच्चांकच्या बातम्या येतात, त्या...

मराठीतील वास्तवदर्शी चित्रपट

इमेज
काही दिवसापुर्वी मी हिंदीतील वास्तवदर्शी चित्रपटाविषयी लिहले होते. त्यावेळेस माझ्या एका वाचकाने हिंदीपेक्षा मराठीत वास्तवदर्शी चित्रपट अधिक असल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. आणि ते खरेही आहे ना ! मराठीत दहावी फ, सामना, सिंहासन ,सरकारनामा, झेंडा, कायद्याचे बोला, गोष्ट छोटी डोंगराएव्हढी, देवराई, सैराट अस्या एकाहून एक सरस वास्तवदर्शी चित्रपटांनी मराठी चित्रपटश्रुष्टी सजल्याचे आपणास वरवर बघीतले तरी सहजतेने लक्षात येते. स्किझोफेनिया सारखा गंभीर मानसिक आजार, शेतकरी आत्महत्या, राजकारणी आणि बिल्डर यांचे सबंध, सहकारी क्षेत्र , तसेच विधीमंडळातील राजकारण , शैक्षणिक समस्या, जातीय वातावरण, न्यायव्यवस्था  मानवी जीवनातील सर्वच.क्षेत्रांवर मराठीत वास्तवदर्शी  चित्रपट निघाले आहेत. मी वर  उल्लेखलेले चित्रपट हे मुख्य धारेतील चित्रपट आहेत. प्रयोगशील, समांतर धारेतील चित्रपट, तसेच विविध महोत्सवात प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा विचार करता , ही संख्या याहून कितीतरी मोठी होइल, हे नक्की. नूकत्याच जाहिर झालेल्या चित्रपट पुरस्काराने यावर सोनेरी मोहरच उमटवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरायला नको. मी पु...

बातम्यांमधील चीन (भाग 3)

इमेज
चीन, आपल्या भारताबरोबर जी77, BRICS, सयुंक्त राष्ट्रे, शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन, आसीयान +4, आशियाई डेव्हलपमेंट बँक, जागतीक व्यापार संघटना, जागतिक बँक, जागतिक नाणेनिधी आदी विविध संघटनांमध्ये भारताबरोबर काम करणारा देश . ज्या देशातील खाद्य पदार्थ आहेत असे सांगून आपल्याकडे विविध नेपाळी, इशान्य भारतातील नागरीक आपल्याला सुप, आणि शेवयांचे, भाताचे विविध प्रकार खाउ घालत असतात .तो देश म्हणजे चीन  सध्याचा जागतिक राजकारणाचा विचार करता सध्या हा देश विविध कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात चीन -इराण करार, तैवानने चीनबाबत केलेली घोषणा, आणि पासपोर्टच्या मुद्यावरुन युनाटेड किंग्डम तसेच चीन यामध्ये ताणल्या गेलेल्या मुद्यांवरुन चर्चेत आला होता. आता हे मुद्दे विस्ताराने बघूया  प्रथमतः चीन इराण करार . तर मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या मात्र दोन्ही पक्षांकडून ज्या बाबत अधिकृत घोषणा होत नसलेल्या चीन इराण कराराबाबत चीनने आपले मौन सोडले आहे. चीनने इराण बरोबर 25 वर्षासाठीचा मैत्री करार केल्याचे जाहिर केले आहे. या करारान्वये चीन इराणमध्ये विविध पायाभूत सोयी सवलती उभारण्यात येण...

समुद्री साधनसंपत्ती दिन विशेष

इमेज
सध्या अलाहाबाद या ठिकाणी  कुंभमेळा सुरु आहे. या कुंभ मेळ्याची अशी गोष्ट सांगितली जाते की , समुद्रातील संपत्ती काढण्यासाठी एकदा देव- दानव यांनी एकत्रितरित्या सहकार्य करत कार्य केले.  त्यातून पडलेल्या अमृताच्या कालशासाठी देव आणि दानव यांच्यात युध्द झाले  .त्यात या अमृताचे चार थेंब जिथे पडले तिथे आता  कुंभमेळा भरतो . आता ही  गोष्ट खरी की खोटी ते देव दानवच जाणो . पण ही गोष्ट खरी  मानली तर आपणास एक गोष्ट मान्य करावीच लागते, ती म्हणजे आपल्या पुर्वजांना समुद्रातील संपत्तीची ओळख होती ( पुढे कुठे माशी शिंकली आणि आपण समुद्र ओलांडणे अपवित्र वगैरे मानू लागलो कोणास ठाऊक?) जी लौकिक अर्थाने जगाला फार उशिरा समजली तिचे संवर्धन आणि त्याबाबत  जागृतीसाठी प्रयत्न सुरु झाले. ज्यामध्ये 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा जागतिक समुद्री साधनसंपत्ती दिनाचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो .        सागरी किनाऱ्यापासून 12 नाॉटीकल मैल (समुद्रातील अंतरे नॉटीकल मैल या एककात मोजतात . एक नॉटीकल मैल म्हणजे सूमारे  दिड किलोमीटर ) पर्यतची साधनसंपत्ती फक्त  त्...

प्यासा, एक उत्कृष्ट चित्रपट !

इमेज
कालच्या माझ्या "कागज के फुल " या चित्रपटावर मला तूझ्या आवडत्या चित्रपटावर लिही ना ? आम्हाला तूझा आवडत्या चित्रपटाविषयी वाचायला आवडेल असा अभिप्राय आल्याने माझ्या आवडत्या चित्रपटाविषयी  सांगण्यासाठी आजचे लेखन  तर माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे,  ज्येष्ठ सिने निर्माते, सिनेदिग्दर्शक ,अभिनेते, नृत्य दिग्दर्शक वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरुदत्त यांची प्रमुख भुमिका असणारा चित्रपट ज्याला टाइम्स मँगझीनतर्फे वीसव्या शतकातील सर्वात उत्तम 50 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे, असा कृष्णधवल चित्रपट "प्यासा". अत्यंत जवळचे लोकसुद्धा आपल्याला आपल्याकडे किती पैसा आहे, यावरुनच आपले मुल्यमापन करतात. गुणांकडे दुर्लक्ष करतात  मात्र आपल्या गुणांमुळे आपल्याला जर भविष्यात पैसा मिळाला ,आपला गौरव झाला तर आपल्या कष्टाच्या, धडपडीच्या वेळी  आपल्याला त्रास, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्ती, आम्हीच त्याला त्याचा धडपडीच्या काळात कसी मदत केली, याविषयी खोटे का असेना जगाला सांगतात. हा संदेश या चित्रपटातून सहजतेने देण्यात आला आहे. " सुखके साथी सब , दुखमे मे ना कोई" हा हे संतवचन आपण...

चित्रपटश्रुष्टीचे काळे सत्य मांडणारा चित्रपट ,कागज के फुल!

इमेज
कालचीच गोष्ट आहे,सध्याचा महाराष्ट्राचा राजकारणाविषयी मित्राशी बोलताना जब्बार पटेल यांनी निर्मिती केलेल्या आणि मात्तबर अभिनेत्यांचा अभियननाने सजलेल्या  सिंहासनाचा विषय निघाला .आमचे बोलणे नंंतर थांबले, माझे मन मात्र वास्तवदर्शी चित्रपटाचा विषयी विचार करण्यात गढून गेले . आपल्या चित्रपटश्रुष्टीत वास्तवदर्शी चित्रपटांची मोठी संख्या आहे. सध्या अस्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत असली, तरी वास्तवदर्शी चित्रपटांचा यादीत  कृष्णधवल काळातील चित्रपट असलेल्या "कागज के फुल" या चित्रपटाचा समावेश करावाच लागेल. किंबहूना गुरुदत्त  फिल्म प्राडक्शनची निर्मिती असलेल्या "कागज के  फुल " या चित्रपटाचा समावेश केल्याशिवाय ही यादी पुर्ण होवूच शकत नाही. एखादा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक सातत्याने यशस्वी चित्रपट देत असताना चित्रपटश्रुष्टी त्याचाशी किती अबदीने वागते, मात्र एखादा अयशस्वी चित्रपट त्याचा हातातून घडल्यावर एकेकाळी डोक्यावर घेणारी चित्रपट श्रुष्टी त्याचाशी किती तूसडेपणाने वागते. एकेकाळचा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील छोट्याशा भुमिकेसाठी कसा नागावला जातो. त्याने स्वतःच्या अनुभवात...