पोस्ट्स

नाँट आउट 168 !

इमेज
      येत्या 16 एप्रिलला आपली भारतीय रेल्वे नाबाद 168 वर्षे पुर्ण करुन 169 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या बद्दल समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपली भारतीय रेल्वे आशिया खंडातील पहिली रेल्वे आहे. आजमितीस रेल्वेच्या 17 उपकंपन्या (RVNL, IRCTC, Railtel ,RECON वगैरे) { मनमाड -इंदोर, नाशिक पुणे रेल्वेमार्गाची  उभारणी करण्यासाठी उभारलेल्या कंपन्या आदी प्रादेशिक कंपन्या वेगळ्या त्या या 17 मध्ये येत नाहीत} उभारण्यात आलेल्या आहेत.  17 प्रकारच्या विविध रेल्वे (राजधानी, दुरंतो, राज्यराणी, गरीबरथ वगैरे) तसेच 9 प्रकारच्या डब्यातून (एस टु टायर, एसी चेअर कार, स्पिलर, जनरल वगैरे)  आँस्ट्रोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढ्या (सध्याचा कोरोना कालखंड वगळू या ) प्रवाश्यांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे  जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. लवकरत संपुर्णतः विद्युतीकरण झालेली जगातील पहिली रेल्वे म्हणून आपली भारतीय रेल्वे ओळखली जाणार आहे. रेल्वे रूळांच्या बाबतीत आपली भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. अशी भारतीय रेल्वे 169  व्या वर्षात पदार्पण ...

पाक रशिया संरक्षण करार

इमेज
   पाकिस्तान, भारताच्या पश्चिमेकडील सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारा देश.(त्यामुळेच शिया पंथीय बहुसंख्य असणाऱ्या गिलगीट बाल्टिस्तान मध्ये पाकिस्तान स्थानिक जनतेवर अत्याचार करत असल्याचा बातम्या येतात) भारताबरोबर 3हजार 323 किमीची सीमा असणारा भारताचा सर्वात जास्त चर्चित शत्रूत्व असणारा देश. युके या देशाकडून भारताबरोबरच  स्वातंत्र्य मिळूनदेखील लोकशाही न रुजलेला देश . 1971 पर्यत आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मात्र आता अर्थव्यवस्था खुपच नाजूक असणारा देश. सातत्याने सर्वच क्षेत्रात भारताबरोबर किंबहूना भारताच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणारा देश. ज्या देशाची राष्ट्रीय भाषा त्या देशातील कोणत्याही समुहाची भाषा नाही, असा देश म्हणजे पाकिस्तान.तर या पाकिस्तानबरोबर नुकताच रशिया या एकेकाळच्या भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राने( आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी  मित्र अथवा शत्रू नसतो, हे 100% खरे आहे पूर्वी भारत रशिया आणि पाकिस्तान अमेरीका मित्र होते. आता भारत अमेरीका मित्र आहे तर पाकिस्तान रशिया यांच्यात मैत्री होत आहे. )  संरक्षणविषयक...

माझे आवडते गाणे !

इमेज
आनंद या चित्रपटातील गाण्याविषयीच्या माझा पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने मला तूझ्या आवडत्या गाण्याविषयी वाचायला आवडेल. असी प्रतिक्रिया दिल्याने माझ्या आवडत्या गाण्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. तर माझे आवडते गाणे आहे, जब वी मेट या चित्रपटातील " तूमसे ही" हे गाणे.  मोहित चौहान यांच्या आवाजात रेकाँर्ड केलेले , आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले गाणे. ज्या गीताची रचना इर्शाद कामील यांनी केली होती. युवा उद्योजक आदित्य कश्यप यांनी नैराश्यातून बाहेर पडत उद्योगाची घडी पुन्हा नव्याने बसवताना गायलेले हे गाणे. सर्व प्रकारच्या व्यस्ततेतून मोकळा वेळ काढत आपल्या छंदाला मोकळा वेळ देत गायलेले गाणे. म्हणजे हे गीत . या गीतानंतर चित्रपट संपुर्ण 180% फिरतो. आतापर्यत नैराश्यामुळे सर्वकाही सोडून विनम्सक अवस्थेत फिरत, प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न केलेला युवा उद्योजक स्वतःच्या आयुष्यात नव्याने रंग भरतो, आपल्या अडचणी सोडवण्याचा नव्याने पुर्णतः उत्साहात प्रयत्न करायला लागतो. ज्यात त्याला यशही मिळायला लागते आधीच्या स्थितीपेक्षा त्याची स्थिती खुपच सुधारते.आतापर्यत अपयशी समजला जाणारा युवा उद्योजक आदित्य...

जिंदगी है पहेली !

इमेज
      कालचीच गोष्ट आहे. युट्यूबवर विरंगुळ्यासाठी हिंदी गाणी ऐकत असताना एका हिंदी गाण्याचा पर्याय समोर दिसला. आनंद चित्रपटातील  " ये जिंदगी है पहेली,  कभी ये रुलाइ, कभी ये हसाइ," हे ते गाणे. सध्याचा परीस्थितीला चपलाख बसणारे. सध्या परीस्थिती ही आपणाला रडवणारी असली तरी ही स्थिती कायम राहणार नाही, हा आशावाद जागवणारी. एका कँन्सरच्या रुग्णाचा दुर्दम्य इच्छा शक्तीवर कथानक असलेल्या या चित्रपटात सांगितलेल्या संदेशाची सध्या नितांत आवश्यकता आहे.       सध्याच्या काळात वर्तमानपत्राकडे नजर टाकल्यास किमान दोन ते तीन आत्महत्येचा बातम्या दररोज दिसतात. कोरोनामुळे घटलेले उत्पन, उद्भवलेली अस्थिरतेची परीस्थिती यामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती यातून या आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या मृत्यू समोर दिसत असताना देखील त्यांचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता , उलट इतरांना आनंद देणारा खऱ्या अर्थाने रोल माँडेल ठरतो, असे मला वाटते. तसेच बाबू मोशाँय हम सब रंगमंच की कतपुलीया है, हमारी दोर उपर वाले की हात मैं है, कोन कैसे उठेगा, ये कोइ नही जानता...

बातमीतील खगोलशास्त्र

इमेज
आपल्या भारतात 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधी मंडळाच्या निवडणूकीमुळे  भारत आणि महाराष्ट्र कोरोना रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्र  ढवळून निघत असताना खगोलशास्त्रामध्ये दोन मोठे शोध लागल्यामुळे ते सुद्धा ढयावळून निघत आहे. मात्र आपली मराठी माध्यमांमध्ये या विषयी खुपच कमी माहिती मला दिसल्याने त्याविषयी माहिती सांगण्यासाठी आजचे लेखन         तर मित्रांनो, नुकतेच अमेरीकन संशोधन संस्था अर्थात नासाने  अँफोफेस नावाचा लघूग्रह पुढील किमान 100 वर्षे तरी पृथ्वीवर आदळणार नसल्याचे जाहिर केले आहे. सन 2004पासून पृथ्वीला धडकू शकणाऱ्या लघूग्रहांचा यादीत सातत्याने चर्चेत राहणाऱ्या या लघूग्रहाचे नाव प्राचीन इजिप्तच्या  संस्कृतीतील अराज्यकतेचा देवावरुन अँफोफेस असे ठेवले आहे. (याला god of ghose अर्थात अराज्यकतेचा देव असे टोपणनाव देखील आहे.) हा पृथ्वीवर आदळल्यास अराज्यकता पसरु शकते (प्रचंड विध्वंस होवू शकतो) असे समजून याचे नामकरण असे करण्यात आले आहे. याचा आकार 340 मीटर इतका आहे. खगोलशास्त्रज्ञांचा मते डायनाँसोर यांच्या विध्वंस झाला तसा विध्वंस होण्यासाठी ...

बातम्यांमधील चीन (भाग 5)

इमेज
  मी आपणासी बोलत असताना, आजमितीस आपल्या भारताचा अशांत प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या , ज्या भागासाठी आपल्या संविधानात 6वे परीशिष्ठ अंतर्भुत करण्यात आले त्या इशान्य भारतातील मणीपुर, मिझोराम, नागालँड या राज्यांबरोबर सीमा शेअर करणाऱ्या म्यानमार या देशात सध्या राजकीय अस्थिरतेने , आंदोलकांनी कळस गाठला आहे. ज्यामुळे या देशाची फाळणी होते की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अराजकतेची सुरवात ज्या लष्करी उठावापासून झाली, त्याला चीनचा पाठिंबा आहे, असी तेथील जनसामन्याची भावना आहे. त्यामुळे चीनविरोधी भावना तीव्र आहे. चीनने हा म्यानमारचा अंतर्गत प्नश्न आहे, आमच्या या बाबीसी काहीसी सबंध नाही, असे जाहिर केले आहे. चीनला इंधनपुरवठा करण्यासाठी इंधनवाहक पाइपलाइन  या देशातून जातात. या देशातील आंदोलकांनी या पाइपलाइन तोडून चीनचा इंधन पुरवठा तोडून टाकण्याची भाषा केली आहे. जर आमच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणारा लष्करी उठाव आमच्या देशातील अंतर्गत गोष्ट असेल तर आम्ही तोडलेल्या पाइपलाइनसुद्धा आमचा अंतर्गत मुद्दा म्हणायला हवा, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या देशाला इंधनपुरवठा  करणाऱ्या पाइप...

हार्ट ऑफ आशिया आणि भारत

इमेज
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानचे भवितव्य ठरवण्यासाठी तूर्कमेनिस्तान या मध्य आशियातील देशात एक परिषद झाली. ही परीषद 2011 पासून दर वर्षी भरत असते. अफगाणिस्तान या परीषदेचा  कायमस्वरुपी अध्यक्ष असतो.सर्व प्रथम या परीषदेसाठी तूर्कस्थानने पुढाकार घेतल्याने या परीषदेला जरी आशिया  इस्तंबूल समिट असे म्हणत असले तरी या परीषदेचे अधिकृत नाव हार्ट आँफ एशिया समिट असे असते. दरवर्षी एक उद्देश घेवून ही परीषद होत असते. या 2021 चा विषय आहे. अफगाणिस्तानमधील शांतता. ही विविध स्तरावरची परीषद असते. कधी राजदूतांची परीषद होते. कधी सरकारच्या प्रमुखांची परीषद होते, कधी परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होते. गेल्या आठवड्यात झालेली परीषद ही परराष्ट्र मंत्र्यांची परीषद होती.या परीषदेसाठी भारतातर्फे एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले.       अफगाणिस्तान आजपासून 42 वर्षापूर्वी सन 1979 मध्ये युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया (USSR)ने आक्रमण केल्यापासून विविध प्रकारची अस्थिरता अनुभवणारा देश. दहा वर्षे चाललेल्या या युद्धात  अमेरीकेने केलेल्या काही गोष्टींमुळे अफगाणिस्तान धार्मिक कट्टर पंथीयांचा ताब्यात ...