पोस्ट्स

बातमीमधील पाकिस्तान (भाग2)

इमेज
पाकिस्तान,  भारताचे 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारा देश. राजकारणी लोकांकडून सातत्याने आपल्या विरोधकांना ज्या देशात जा, असे सांगितले जाते, तो देश म्हणजे पाकिस्तान. असा पाकिस्तान हा देश गेल्या महिन्याभरात 6 वेळा चर्चेत आला. त्यातील 3गोष्टींचा उहापोह मी कालच्या लेखात केला. आज उरलेल्या तीन गोष्टींविषयी बोलूया .  तर  तूर्कस्थान या देशाला पाकिस्तानच्या   जाँइट चीफ आँफ स्टाफ कमिशन प्रमुख {आपल्याकडील चिफ आँफ आर्मी स्टाफ समकक्ष हे पद आहे}  नदीम राझा यांनी खुप दिवसासाठी भेट दिली युरोप आणि आशिया खंडात असणारा घटनेनूसार धर्मनिरपेक्ष मात्र मुस्लिम बांधवांची जवळपास 100% वस्ती असणारा देश म्हणून तूर्कस्थान ओळखला जातो. या देशाची इच्छा मुस्लीम जगताचे नवे नेर्तृत्व म्हणून तूर्कस्थानला ओळखावे असी  आहे.(सध्या मुस्लिम जगताचे नेर्तृत्व सौदी अरेबिया करत आहे.  जे स्थान मिळवण्यासाठी इंडोनेशिया आणि तूर्कस्थान स्वतंत्र्यपणे प्रयत्न करत आहेत) या भेटीत पाकिस्तान आणि तूर्कस्थानात घट्ट मैत्री व्हावी, मे यासाठी भरीव कार्य केल्याचा प्रित्यर्थ सम्मान करण्यास...

बातमीतील पाकिस्तान (भाग1)

इमेज
   पाकिस्तान, शांघाय काँपरेशन, सार्क आदी संघटनेतील भारताचा सहकारी देश. जगभरात  पोलिओ अजून ज्या देशात धूमाकुळ घालतोय,अस्या हाताच्या बोटावर मोजता येइल अस्या देशांपैकी एक देश.ज्या देशातील सात प्रमुख नद्यांपैकी सहा नद्या भारतातून वहात जात त्या देशात प्रवेश करतात असा देश. शांततेच्या काळात ज्या देशासी  दोन रेल्वेमार्गाने (मुनाबाओ-कराची, आणि दिल्ली लाहोर हे रेल्वेमार्ग ) तसेच दोन बससेवेमार्फत(श्रीनगर मुज्जफराबाद, आणि नवी दिल्ली  लाहोर हे बसमार्ग औ)संपर्क ठेवला जातो, तो देश म्हणजे पाकिस्तान     तर मित्रांनो पाकिस्तान  आपण भारत देशातील विविध राज्यातील निवडणूका आणि कोरोनाचा उद्रेकाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचताना, आणि वृत्तवाहिन्यांवर बघत असताना तीन  वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला.त्यातील दोन गोष्टी प्रत्यक्षपणे भारताशी सबंधित आहे. ते सांगण्यासाठी आजचे लेखन. ज्या दोन घटनांशी आपला प्रत्यक्ष सबंध आहे, त्यातील एक घटना भविष्यातील आहे, तर दूसरी घटना सध्या घडत आहे.तर प्रथम सध्या घडत असणारी घटना बघूया . तर सन 1974 साली भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या करार...

बातमीतील चीन (भाग 6)

इमेज
सध्या आपला महाराष्ट्र कोरोनाचा संकटाशी निकराचा लढा देत असताना आपल्या भारताच्या शेजारील चीन देशाबाबत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडत आहे.  ज्यामध्ये तूर्कस्थानच्या राजधानीत  अर्थात अंकारा शहरात असणाऱ्या चीनच्या दुतावासाच्या पाण्याचा पुरवठा अंकाराच्या महापौरांनी तोडणे, तसेच चीनने भूटान बरोबरच्या सीमाविवादात आंतीम तोडगा काढण्यासाठी बोलणी सुरु करण्याची तयारी करणे या घडामोडी महत्तवाचा आहेत.     तर मित्रांनो, चीनच्या अतिपश्चिमेकडे लडाखच्या उत्तरेला गिलगीट बाल्टीस्तानला लागून चीनचा सिंकीयांग (काही ठिकाणी याला झिंकीयांग असेही म्हणतात)हा प्रांत आहे. पुर्व तूर्कस्थान या नावाने सुद्धा प्रसिद्ध असलेल्या या प्रांतात मुस्लीम समाजबांधवांची संख्या प्रचंड आहे. वंशाचा, आणि भाषेचा  विचार करता येथील स्थानिक चीनपेक्षा तूर्कस्थानला अधिक जवळचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन येथील मुस्लिम बांधवांवर अत्याचार करत असल्याचा बातम्या सातत्याने येत आहे. ज्यामुळे तूर्कस्थानात या मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असणाऱ्या देशामध्ये जनमत चीन विरोधी आहे. सध्याचे सरकार चीनविरोधी उघड भूमिका घेत नसले तरी ...

वंदन अभ्यासू व्यक्तिमत्वाला

इमेज
   ती व्यक्ती अर्थशास्त्रातील तज्ज्ञ होती, ती व्यक्ती राजशास्त्र, कायद्यांच्या बाबतीत तज्ज्ञ होती, ती व्यक्ती इतिहास आणि कृषिशास्त्र , समाजशास्त्र या एकमेकांशी सबंध नसणाऱ्या विषयातील तज्ज्ञ होती. त्या व्यक्तीचे नाव आहे. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर .2021 एप्रिल 14 रोजी त्यांची 130वी जयंती , त्यानिऐमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.        वर्षोनवर्षे शिक्षण आणि पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकरलेल्या समाजातील या महामानवाने स्वकष्टातून समस्त भारतीयांच्या कल्याणाचा वसा घेतला. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनानिर्मितीतील योगदान अतूलनीय आहे. मसुदा समितीतील अन्य सदस्य, देश सोडल्यामूळे , आजारी असल्यामुळे किंवा निधन पावल्यामुळे कार्यरत नसल्याने घटना निर्मितीची सर्व जबाबदारी त्यांनी एकट्याने लिलया पेलली. आणि जगातील एक सर्वोत्तम संविधान त्यांनी तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली.       डाँक्टर बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान सर्वश्रूत आहेच. मात्र त्यांचे भारतीयांसाठी एव्हढेच योगदान नव्हे,  ते कामगार मंत्री असतांना त्यांचा प्रयत्नामुळे ...

मांगल्याचे प्रतिक गुढीपाडवा

इमेज
          गुढीपाडवा, हिंदू धर्मियांचे नविन वर्ष सुरु होण्याचा दिवस,  हिंदू धर्मियांचा साडेतीन शुभमुहुर्तांपैकी पहिला मुहुर्त . राशीचक्रातील पहिली रास असणाऱ्या मेष राशीत सुर्याचे भासमान भ्रमण ज्या महिन्यात होते, त्या महिन्याचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने समस्त वाचकांना नववर्षाभिनंदन .नुतन वर्ष आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करणारे ठरो, ही मनोकामना. मागचे वर्ष कोरोनामुळे अवघड गेले, मात्र नुतन वर्ष ते अपयश मागे सरणारे ठरो, ही इश्वरचरणी प्रार्थना          आजच्या दिवसापासून मराठी भाषिकांचे शालीवाहन शक तर उत्तर भारतीयांचे विक्रमसवंत सुरू होते. सध्या सुरु असलेल्या इसवी सनातून 78 वजा केले की, शालीवाहन शकाचा क्रमांक मिळतो . सध्या इसवी सन 2021 सुरु असल्याने या गुढीपाडव्यापासून शालीवाहन शक 1943  सुरु होईल. या दिवशी कडुलिंबाचे सेवन करुन घराबाहेर गुढी उभारण्याची प्रथा आहे. आजच्या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. वसंत ऋतूमध्ये पानगळीच्या  झाडांना नवी पालवी फुटते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते, ज्याचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी व्याखानमाल...

गैरप्रकाराची किड ठेचायलाच हवी!

इमेज
कोणताही खेळ हा खरेतर खिलाडू वृत्तीने खेळायला हवा. मैदानी खेळांमध्ये संघाच्या खेळांडूसमोर सहभागी देशांचे राष्ट्रगीत वाजवत असताना समोर लहान मुले, मुली याचसाठी असतात. बालसुलभ, मनात कोणतीही वैर भावना खेळाडूंनी खेळताना जोपासू नये, ही या मागची भावना असते. बहुसंख्य खेळाडू याच भावनेने खेळतात.मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच . काही खेळाडू जिंकण्यासाठी गैरप्रकाराचा अवलंब देखील करतात. जगात प्रत्येकजण प्रत्येकाला सदा सर्वकाळ फसवू शकत नाही. या गैरप्रकार करणाऱ्या खेळाडूंचे बिंग कधीना कधी फुटतेच. असेच एका बुद्वीबळपटूचे बिंग इंडोनेशियात आँनलाइन स्पर्धै दरम्यान फुटले.आणि एकच गहजब झाला. बुद्धीबळ सारख्या बुद्धीच्या खेळात खेळात अधिकाधीक प्रगती होण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे यात गैर काहीच नाही. काँम्प्युटर, अँप , पुस्तके, व्हिडीओ यांची मदत घेतल्यास आपले कच्चे दुवे सहजतेने समजतात, नव्या चाली समजतात.ज्याचा प्रत्यक्ष खेळात प्रतीस्पर्ध्यावर मात करायला उपयोग होतो. मी स्वतः युट्युबवर बुद्धीबळाविषयी अनेक व्हिडीओ बघतो..तसेच चेस डाँट काँम, लीचेस डाँट काँम सारख्या वेबसाइटवर आणि त्यांचा अँपवर तसेच चेसवि...

नाशिकमध्ये काय चाललंय!

इमेज
नाशिक. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर . समस्त भारताला ज्या शहरातून पासपोर्ट, स्टँम्प पेपराचा  दिले  जातात ते शहर . द्राक्ष निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते ते शहर म्हणजे नाशिक .  भारताच्या हवाइ दलाला मिग विमाने ज्या शहरातून तयार करुन पुरवली जातात ते शहर म्हणजे नाशिक. आपल्या धार्मिक कार्यामुळे जगभरात ओळखले जाणारे शहर म्हणजे नाशिक . आख्या भारताला स्कापिर्यो ज्या शहरात तयार होवून पुरवले जातात ते शहर म्हणजे नाशिक .   आजमितीस मात्र संपुर्ण शहर मरणासंपन्न झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने अन्य वेळी गर्दीने ओथंबून वाहणाऱ्या शहरात स्मशान शांतता पसरली आहे. आहे ती फक्त भांबावलेली आणि आपल्या आतेष्ठांवर कुठे कोरोनाचे उपचार होवू शकतात का? यासाठी एका रुग्णालयातून दूसऱ्या रुग्णालयात जाणारी जनता.या ठिकाणी खरेतर ज्यांनी शहराची जवाबदारी घेयला हवे असे आमदार खासदार कुठेच दिसत नाही. फक्त पालकमंत्री थोडेसे चित्रात दिसत आहे, ते फक्त बैठकांमध्ये .मात्र बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे परीस्थिती सुधारते आहे,असे म्हणा...