पोस्ट्स

स्मरण एका जग बदलवणाऱ्या घटनेचे

इमेज
     आज सोमवार 19 एप्रिल 2021, आजच्याच दिवशी 46 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 46 व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा . मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.       आज आपण टिव्हीवर विविध वाहिन्या बघतो, तसेच हवामानाचा अंदाज व्यक्त करतो.  इग्नू वाय.सी.एम. ओ.यू. सारख्या विद्यापीठांतून खेडोपाडी शिक...

बातमीतील पाकिस्तान भाग 3

इमेज
सध्या आपल्या भारतात जरी कोरोनाचा उद्रेक हा विषय सर्व माध्यमांमध्ये दिसत असला तरी चँनेल न्युज एशिया, बिबिसी, आणि यासारख्या अन्य माध्यमांमध्ये कोणत्या विषयावर वार्तांकन केले जात आहे. याचा मागोवा घेतल्यास आपणास उत्तर मिळते पाकिस्तान . गेल्या तीन ते चार दिवसात घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे बघीतल्यास 3गोष्टींमुळे पाकिस्तान चर्चेत आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या अमेरिका देशातील राजदूताने भारत पाकिस्तान विषयी केलेले विधान, दुसरी गोष्ट म्हणजे अमेरीकेने रशियाला अमेरिकेच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोपावरुन एक कंपनी,आणि सहा नागरीकांवर लादलेले निर्बंध आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्रान्स विरूद्ध होणारे दंगे. आता बघूया एक एक गोष्ट सविस्तरपणे. तर अनेक आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ज्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्या बाबीवर अर्थात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा गोष्टीला युनाटेड अरब अमीरात या देशाच्या अमेरिकेतील राजदूताने पुष्टी दिली आहे. युनाटेड अरब अमिरात जगभरात स्वतःची प्रतिमा साँफ्ट पाँवर करण्यासाठी गेल्या काह...

हे पण घडतयं आपल्या सभोवताली !

इमेज
        मित्रांनो, सध्या आपल्या सभोवताली कोरोना आणि लाँकडाउनविषयक चर्चा अधिक प्रमाणात घडत असल्या तरी जगात  आपल्यावर परीणाम अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी प्रामुख्याने हवामान बदलाविषयी घडत आहेत. त्याविषयी आपणास माहिती देण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो, येत्या 22 एप्रिलला अमेरीकेच्या नेर्तृत्वाखाली जगातील 40 देशांची हवामान बदलाविषयी काय कृती कार्यक्रम असावा,हे ठरवण्यासाठी आँनलाईन पद्धतीने एक परीषद होणार आहे. पँरीस करारानूसार  हवामानाची स्थिती 18 व्या शतकात जसी होती, त्या स्थितीत आणण्यासाठी करावयाचा कामांमध्ये यशस्वीतेसाठी गुणांकन करायचे झाल्यास ज्या देशाचा क्रम 7 वा लागेल,(सगळ्यात उत्तमास पहिला क्रमाक नंतर दुसरा या क्रमाने) तो भारत यात सहभागी होणार आहे. या यादीत भारताच्या पुढे स्विडन, नार्वे फिनलंड, डेन्मार्क, चिली, युनाटेड किग्डम आँफ ग्रेट ब्रिटन अँड नाँदर्न आयलंड (आपल्या बोली भाषेत इंग्लड) हे देश आहेत.{ मी ही यादी ते ज्या नंबरवर आहेत, त्यानुसार बनवलेली नाही.फक्त पुढे असणाऱ्या देशांची यादी बनवलेली आहे} भारताने या करारानूसार 2030पर्यत आपल्या एकूण उर्जैपैं...

तंत्रज्ञानाचे बळी !

इमेज
शूक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी नाशिकजवळील वालदेवी धरणात एक मुलगा आणि 5 मुली बुडाल्या . फोटो काढण्यासाठी पाण्याचा जवळ जात असताना पाय घसरुन एक जण पडल्यावर त्यास वाचवायला गेलेले अन्य लोक सुद्धा बुडाले. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गृपमध्ये त्यामुळे शोककळा पसरली.(मुळात शहरात संचारबंदी लागू असताना ते नउ जावूच कसे शकले? त्यांची बुडण्याची जी वेळ सांगितली जात आहे, ती बघता ते सायंकाळी सातपर्यत नाशिकला पोहचू शकतात का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत, मात्र ते सोडून  देवूया ) मी या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमवलेल्या  व्यक्तींचा प्रती संवेदना व्यक्त करतो.इश्वर त्यांना हे दुःख पचवण्याची ताकद.देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना   स्व कर्तुत्व ,जगाला सांगण्याची मानवास फार पुर्वीपासून सवय आहे. कोणालाही आपली स्तुती हवी हवीच असते. त्यामुळे मनाला आनंद मिळतो. त्यामुळे त्यांनी फोटो काढाला घेतला , यात गैर काहीच नाही. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर करत फोटो काढण्याचा प्रकार केल्यास अस्या प्रकारचा दुर्घटना घडतात. पुर्वीसारखे एकदा फोटो काढल्यावर आठवड्याभराने फोटो...

धूम्रपान बंदी !

इमेज
   टिव्हीवर wion नावाची वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक जागतिक घडामोडी सहजसोप्या ,भारतीय  उच्चाराच्या इंग्रजी भाषेत सांगितल्या असतात. Wion या वृत्तवाहिनीवर ग्रँव्हटाझ् नावाचा एक उत्तम कार्यक्रम बघाच. शांतपणे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता जागतिक घडामोड यात सांगितली असते, असो.      मी बघीतलेल्या कार्यक्रमात न्यूझीलंड 2025 पर्यत धूम्रपान विरहीत देश करण्यासाठी उपाययोजत असल्याचे सांगितले होते.(हाच तोच न्यझीलंड आहे, ज्याने कोव्हिड 19 कोरोना या रोगावर जगात पहिल्यांदा यशस्वी नियंत्रण मिळवले. एकदा नियंत्रण मिळाल्यावर आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाहीये) यासाठी 2004 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेट न देणे. सिगारेट विकण्यासाठी आवश्यक  परवानगी किचकट करणे, ज्यामुळे कमी दुकानात सिगारेट विकली जाइल. धूम्रपानासाठीची वयोमर्यादा वाढवणे आदी उपाय योजले जात आहेत. देशातील वाढती कर्करोगाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मरणासंपन्न व्यक्तींना इच्छामरणाचा अधिकार देणे. यासारखे जगाला आदर्श ठरणारे कित्येक कायदे न्युझीलंडमध्ये करण्यात आले आहे. मह...

बातमीमधील पाकिस्तान (भाग2)

इमेज
पाकिस्तान,  भारताचे 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारा देश. राजकारणी लोकांकडून सातत्याने आपल्या विरोधकांना ज्या देशात जा, असे सांगितले जाते, तो देश म्हणजे पाकिस्तान. असा पाकिस्तान हा देश गेल्या महिन्याभरात 6 वेळा चर्चेत आला. त्यातील 3गोष्टींचा उहापोह मी कालच्या लेखात केला. आज उरलेल्या तीन गोष्टींविषयी बोलूया .  तर  तूर्कस्थान या देशाला पाकिस्तानच्या   जाँइट चीफ आँफ स्टाफ कमिशन प्रमुख {आपल्याकडील चिफ आँफ आर्मी स्टाफ समकक्ष हे पद आहे}  नदीम राझा यांनी खुप दिवसासाठी भेट दिली युरोप आणि आशिया खंडात असणारा घटनेनूसार धर्मनिरपेक्ष मात्र मुस्लिम बांधवांची जवळपास 100% वस्ती असणारा देश म्हणून तूर्कस्थान ओळखला जातो. या देशाची इच्छा मुस्लीम जगताचे नवे नेर्तृत्व म्हणून तूर्कस्थानला ओळखावे असी  आहे.(सध्या मुस्लिम जगताचे नेर्तृत्व सौदी अरेबिया करत आहे.  जे स्थान मिळवण्यासाठी इंडोनेशिया आणि तूर्कस्थान स्वतंत्र्यपणे प्रयत्न करत आहेत) या भेटीत पाकिस्तान आणि तूर्कस्थानात घट्ट मैत्री व्हावी, मे यासाठी भरीव कार्य केल्याचा प्रित्यर्थ सम्मान करण्यास...

बातमीतील पाकिस्तान (भाग1)

इमेज
   पाकिस्तान, शांघाय काँपरेशन, सार्क आदी संघटनेतील भारताचा सहकारी देश. जगभरात  पोलिओ अजून ज्या देशात धूमाकुळ घालतोय,अस्या हाताच्या बोटावर मोजता येइल अस्या देशांपैकी एक देश.ज्या देशातील सात प्रमुख नद्यांपैकी सहा नद्या भारतातून वहात जात त्या देशात प्रवेश करतात असा देश. शांततेच्या काळात ज्या देशासी  दोन रेल्वेमार्गाने (मुनाबाओ-कराची, आणि दिल्ली लाहोर हे रेल्वेमार्ग ) तसेच दोन बससेवेमार्फत(श्रीनगर मुज्जफराबाद, आणि नवी दिल्ली  लाहोर हे बसमार्ग औ)संपर्क ठेवला जातो, तो देश म्हणजे पाकिस्तान     तर मित्रांनो पाकिस्तान  आपण भारत देशातील विविध राज्यातील निवडणूका आणि कोरोनाचा उद्रेकाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचताना, आणि वृत्तवाहिन्यांवर बघत असताना तीन  वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला.त्यातील दोन गोष्टी प्रत्यक्षपणे भारताशी सबंधित आहे. ते सांगण्यासाठी आजचे लेखन. ज्या दोन घटनांशी आपला प्रत्यक्ष सबंध आहे, त्यातील एक घटना भविष्यातील आहे, तर दूसरी घटना सध्या घडत आहे.तर प्रथम सध्या घडत असणारी घटना बघूया . तर सन 1974 साली भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या करार...