पोस्ट्स

अंताकडे वेगाने वाटचाल!

इमेज
                 आपल्याकडे कोरोना, कोरोनापश्चात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणारा बुरशीजन्य आजार, तेक्तो चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीचे वार्तांकन करताना, माध्यमे थकत नसताना, समस्त जगाच्या छातीचे ठोके वाढवणारी घटना  घडली आहे. अंटार्टिका या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावरील खंडावरील  विस्तृत अस्या  हिमनगापैकी 175 किमी लांबी आणि 25 किमी रुंदीचा हिमनग तूटला आहे. आपल्या भारताची राजधानी नवी दिल्लीपेक्षा हे क्षेत्रफळ तिपट्टीने जास्त आहे. अटार्टिका खंडाच्या पश्चिमेस असलेल्या रोम हिमखंडानजीक weddle समुद्रात हा हिमनग तूटला आहे   हा हिमनग जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक क्रमांकाचा हिमनग आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण A76 असे केले आहे.. काही दिवसापुर्वीच अंटार्टिकामध्ये त्या वेळच्या सर्वात मोठा हिमनग तूटला होता.(ज्याचे नामकरण शास्त्रज्ञांनी a68a असे केले होते) आताचा हिमनग त्याहीपेक्षा मोठा आहे. युनाटेड किंग्डमच्या अटार्टिका खंडाचे अध्ययन करणाऱ्या शास्त्रज्ञांना तो पहिल्यांदा आढळला होता. पुढे युरोपीय स्पेस एजन्...

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

इमेज
      1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 20 वर्षे अर्थात एका पिढीचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली.          राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड असलेल्या धाकट्या भावाचे अपघाती निधन झाल्यामुळे, एक कुटुंबवच्छल,  घराण्याची परंपरा चालवण्यासाठी राजकारणात उतरलेला राजकारणी. ज्यांनी काळाची पाउले ओळखून भारतात तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवली. आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा, आयटीच्या युगात राहातो, त्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी जनमताचा विरोध पत्कारुन केली.         त्यांचे काही निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरले. ज्यामध्ये शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करावाच लागेल. भोपाळच्या मुस्लिम  बांधव परीवारातील शहाबानो या घटोस्फोटीत महिलेला पोटगी देण्याबाबात सर्वोच्च न्यायालय सुरु असलेल्या खटल्याचा निर्णयासं...

बातमीमधील यस्टी

इमेज
     सध्या माध्यमांतून कोरोना आणि ताक्तो चक्रिवादळाविषयी बातम्यांचा महापूर आलेला असताना  एक वेगळी बातमी माध्यमांत चमकून गेल्याचे मला दिसले या बातमीविषयी अन्य बातम्यांचा कोलाहलात फारसे काही बोलले गेले नाही. या बातमीचा परीणाम आपल्या सर्वांचा आयुष्यावर होणार आहे. त्यामुळे त्या विषयी आपणास सांगण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो आपली महाराष्ट्राची एसटी जी लवकरच 73 वर्षे पुर्ण करुन 74 व्या वर्षात पदार्पण करणार आहे, तीच्या मार्फत 500 साध्या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. यापुर्वी शिवशाही, शिवनेरी सारख्या आरामदायी गाड्या आपल्या एसटीने भाड्याने घेतल्या आहेत. मात्र ढासळत्या आर्थिक डोलाऱ्यास सावरण्यासाठी आता साध्या गाड्या भाड्याने घेण्याची वेळ महामंडळावर आली आहे. प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या गाड्यांमधून सेवा देता यावी यासाठी यासाठी या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहे. एकेकाळी आपल्या कार्यशाळेद्वारे भारतातील सर्वाधिक बस निर्मित करणाऱ्या आपल्या महामंडळावर बस स्वतः निर्मित करुन घेण्याऐवजी भाड्याने घेवून चालवण्याची वेळ आली आहे. यावेळी 700 बसेस स्वतः  एसटी आपल्या कार्यशा...

चोराच्या उलट्या बोंबा !

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत कोरोना संसर्गामुळे आणि लसीकरणामुळे वातावरण तप्त असताना, जगाचा विचार करता इस्राइल आणि पँलेस्टाइन यातील संघर्षाने  जगाची झोप उडवली आहे. या संघर्षाचे तात्कालीन कारण आपणास आतापर्यत माहिती झालेच असेल. माझा या लेखाद्वारे याचा इतिहास आपणापर्यत पोहोचवण्याचा उद्देश आहे. तर 19 व्या शतकाच्या उतरार्धात युरोपात राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. या राष्ट्रवादाच्या प्रबळ विचारधारेत तो पर्यत स्वतंत्र्य असलेली जर्मन भाषिक राज्ये एकत्र येवून जर्मन हा देश तयार होणे फ्रेंच भाषिक प्रदेश एकत्र फ्रान्स हा देश उदयास येण्यासारख्या घटना घडल्या. त्याच मालिकेत ज्यू धर्मियांची मूळ भूमी ज्यातून त्यांना काही हजारो वर्षापूर्वी निर्वासीत केले होते, त्या पँलेस्टाइनच्या भूमीत ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य इस्राइलची स्वप्ने काही ज्यू धर्मियांना पडू लागली. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. याला मोठ्या प्रमाणात धूमारे फुटले ते पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस 1917 साली स्वतःच्या ताब्यात असणाऱ्या या प्रदेशात युनाटेड किंग्डम या देशाने या ठिकाणी लवकरात लवकर ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य राष्ट्र उभारण्य...

हे पण घडतयं जगामंदी!

इमेज
    आपल्या भारतात कोरोनाने उच्छाद मांडला असताना अमेरीकेत एका वेगळ्याच कारणाने लोक यमसदनास जात आहे. ते कारण म्हणजे बंदूकीतून होणारा बेछूट गोळीबार. गेल्या आठवड्यात अमेरीकेत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन दिवसात 15 जणांनी पृथ्वीवरून  निरोप घेतला . एका जागतिक अहवालानूसार जगात वर्षभरात जेव्हढ्या बेछूट गोळीबाराचा घटना घडतात, त्यापैकी 50% एकट्या अमेरीकेत घडत असतात .सन.2019 मध्ये 465 आणि सन 2020 मध्ये 628 घटना घडल्याची अमेरीकन पोलीसांकडे नोंद आहे.     अमेरिकन केंद्रीय संविधानाच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीनूसार तेथील नागरीकांना शस्त्रात्रे बाळगणे हा मुलभूत अधिकार आहे. अमेरीकेच्या काही राज्यात वाँलमाँट सारख्या सुपर स्टोअरमध्ये शस्त्रात्रे मिळतात. यामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे तेथील पोलीसांचे म्हणणे आहे. पुर्वी अमेरीकेत गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना स्वसंरक्षणार्थ अमेरीकन नागरीकांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. आजमितीस ही परीस्थिती पुर्णतः बदलली असून त्यावेळी स्वरक्षणार्थ दिलेली सवलतीने आज अमेरीकेतील सगळ्यात मोठ्या समस्येचे...

नव्या राष्ट्राचा प्रसवकळा !

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येने अत्यंत तणावाची स्थिती असताना, आपल्या भारतापासून साता समुद्रपार असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे बोली भाषेत इंग्लड म्हणतात) त्या देशातील एक भाग स्काँटलंड याला स्वतंत्र सार्वोभौम देश म्हणून मान्यता देण्यासाठी सार्वमत घ्यावे का ? या चर्चेने तेथील जनमत पुर्णतः ढवळून निघत आहे. स्काँटलंड या भागासाठी झालेल्या संसदीय निवडणूकीत ( विधानसभेच्या नव्हे संसदेच्या) स्काँटलंडच्या संसदेत   स्काँटलंड नँशनालिस्ट पार्टी (SNP)ने बहुमतापेक्षा 6 जागा कमी मिळवल्या आहेत. मात्र सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत {युनाटेड किंग्डम मध्ये बहुपक्षीय लोकशाही आहे. मात्र काँझरेटिव्ह पार्टी (मराठीत हुजूर पक्ष) आणि लेबर पार्टी (मराठीत मजूर पक्ष ) हे दोन पक्ष   एकुण संसदेत 97% पेक्षा थोडी जास्त मते मिळवत असल्याने आपला तिथे हे दोनच पक्ष असल्याचा समज होतो. मात्र तिथे लिबरल डेमोक्रेटीक (LD),ग्रीन पार्टी (GNP) असे पक्ष देखील आहेत} स्काँटलंड नँशनलिस्ट पार्टीचे निवडणूकीतील आश्वासनच आम्ही आमच्या पाच...

मानवतेला काळीमा !

इमेज
  शनिवार, 8 मे 2021 अफगाणिस्तानातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी काळरात्र ठरली. अफगाणिस्तानची राजधानी काबूल पासून जवळच असणाऱ्या पश्चिम काबूल जिल्ह्यातील दशत् इबारची  या ठिकाणी  असणाऱ्या syed Al Shahda   या शाळेजवळ तीन बाँम्बस्फोट झाले. या स्फोटात 150 जण जखमी झाले .तर 58 जण मृत्युमुखी पडले.मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 11ते15 वर्षाच्या विद्यार्थींनीचा सर्वाधिक समावेश आहे. या स्फोटात पुरुषांचा तूलनेत महिलांचे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रमाण अधिक आहे.  शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहा मिनिटाच्या अंतरात  झालेल्या या बाँम्बस्फोटाने मानवतेलाच काळीमा फासली आहे.   स्फोट झाला, त्याचा आसपास अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या शिया हजारा या लोकांची वस्ती आहे.  तीन सत्रात भरत असणाऱ्या  syed Al Shahda    या शाळेत दुसऱ्या सत्राची फक्त मुलींसाठी असणारी शाळा सुटताना हा स्फोट झाला. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. अफगाणिस्तानातील प्रशासनामार्फत हा स्फोट तालीबानने केल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्...