पोस्ट्स

माझा आवडता नेता...

इमेज
      कोणी त्यांना पप्पु म्हणून हिनवतं, कोणी त्यांना युवराज म्हणून हिनवतं . घराण्याची किर्ती धुळीस मिळवणारा , घराण्यामुळे मोठेपणा मिळणारा मात्र अंगी काहीच कर्तृत्व नसलेला म्हणून त्यांच्याकडे बघावे, असी प्रतिमा माध्यमांकडून उभी करण्यात येते.अपरीपक्तव व्यक्तीमत्व म्हणून त्यांचाकडे बघीतले जाते.अनेकदा त्यांचा आईचा अत्यंत खालचा दर्जाचा उल्लेख करण्यात येतो. तरी ते काहीही अनुचित प्रतिक्रिया देत नाहीत. स्थितप्रज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्वाप्रमाणे या सर्व दर्जाहिन टिकेकडे दुर्लक्ष करुन आपले कार्य अधिकाधीक उत्तम करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो.सातत्याने नविन गोष्ट शिकण्याकडे त्यांचा कल असतो. एखादी गोष्ट जर त्यांना आवडली नाही. तर कोणाचीही भीड न बाळगता ते स्पष्टपणे सांगतात. जर एखादी गोष्ट आवडली तर कसलाही बडेजाव न बाळगता त्याचे कौतूक करतात. उगीचच अन्य व्यक्तिंना शक्तीप्रदर्शन करत नाहीत. मात्र वेळ पडल्यावर त्यांची शाररीक ताकद भल्या भल्याची छाती दडपून टाकते. आपण भोगलेल्या कष्टांचे विनाकारण ते भांडवल करत नाही. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात शिक्षीत व्यक्तींमध्ये त्यांची ...

जी 7 आणि भारत

इमेज
              नुकतेच 12 ते 15  जून दरम्यान युनाटेड किंग्डम या देशात जी 7 या परिषदेचे प्रशासन प्रमुखांचे  अधिवेशन झाले जी 7 ही जगातील सर्वात शक्तिमान असणाऱ्या सात देशांची संघटना आहे . ज्यामध्ये युनाटेड स्टेटस ऑफ अमेरिका, फ्रांस जपान , इटली कॅनडा , जर्मनी आणि युनाटेड किंग्डम या देशांचा समावेश  होतो . या  संघटनेचे हे 47  वे अधिवेशन होते . सन  2014  पर्यंत या संघटनेत रशियाचा देखील सहभाग होता मात्र सन  2014  रशियाने क्रिमियावर आक्रमणक केल्यावर रशियाला या संघटनेतून नारळ देण्यात आले   भारत जी 7 चा सदस्य देश नसला तरी  भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याचा विचार करून आयोजक असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशाकडून परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले .  भारताहोता जगात अनेक ठिकाणी होऊ शकेल सह या परिषदेत मुळात परिषदेचे सदस्य देश नसणारे दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका , ऑस्ट्रोलीया हे देश सहभागी झाले होते . ही परिषद ऑफलाईन पध्द्तीने  झाली भारताचा अपवाद करून बाकी...

भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग7)

इमेज
              आपल्या भारतीय रेल्वेत रोज 12 ते 13 हजार प्रवाशी गाड्या चालवल्या जातात. (सध्याची अपवादात्मक स्थिती सोडून देवूया ) आँस्टोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढे लोक दररोज प्रवास करतात. तसेच अनेक मालगाड्या चालवल्या जातात. या सर्व गाड्यांना इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वे इंजिनाचे जग खुपच रंजक आहे. भारतीय रेल्वेच्या इतर घटकांविषयी खुप लिहले जाते बोलले जाते . मात्र यामागील खरा कर्ता असलेल्या इंजिनाविषयी फारच कमी बोलले.जाते..चला तर मग जाणून घेवूया त्यांचा या अज्ञात जगाविषयी              मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेत रेल्वे इंजिनांची ओळख होण्यासाठी जे नाव दिले जाते त्याचे दोन भाग असतात .डाव्या बाजूच्या भागात तीन अक्षरे असतात. तर उजव्या बाजूला आकडा असतो. अक्षरे सबंधीत रेल्वे इंजिन कोणत्या गेजचे आहे? ते कोणत्या इंधनावर चालते?  ते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहे? याविषयी सांगणारी असतात. तर अंकाद्वारे इंजिन.किती हजार अश्वशक्तीचे आहे, याचा उलगडा होतो.          आपल्या भारतात चार प्रक...

बातमीतील चीन (भाग 11)

इमेज
सध्याचा काळात खचितच एखाद दुसरा दिवस जात असेल. ज्या दिवशी चीनचा संदर्भात काहीतरी बातमी चर्चेस आली नाही. गेल्या तीन चार दिवसाचा विचार करता चीनविषयक तीन घडामोडी घडल्या. चीन भारताच्या सुरक्षेला किती मोठा धोका आहे?, चीनमुळे आपल्या प्रगतीला कसी खिळ बसते ?,हे आपण जाणतातच. त्यामुळे चीनविषयक घडामोडी माहिती असणे आपणास अत्यावश्यक आहे. तर सुरु करुया चीनविषयक या घडामोडींची माहिती करुन घेण्यासाठी .      तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या 7 अर्थव्यवस्था ज्या देशांचा आहे, त्यांचा एक गृप आहे, जी 7 नावाचा .ज्यामध्ये युएस, कँनडा, युके, जर्मनी, फ्रान्स इटली जपान या देशांचा समावेश होतो. त्या देशांची आँफलाइन परीषद नुकतीच युकेमध्ये झाली. त्यामध्ये सर्व दळणवळणाची संसाधने तोडत चीनविषयक एक चर्चा झाली. यामध्ये चीन, तैवान आदी मुद्द्यांची चर्चा झाली.किंबहूना या परीषदेचा सर्व रोख चीनविषयकच होता , असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या चर्चेदरम्यान अँग्लो सँक्शीयन गटातील देश आणि ईतर देश यांच्यात चीन विषयक मुद्दयांवरुन मतभेत झाल्याचे वृत्त द हिंदूकडून देण्यात आले आहे.. ज्या देशातील प्रमुख धर्म ख्रिचन आहे.तसेच ...

असी आहे आपली एसटी .....!

इमेज
      मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 10 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात. या 10 प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात.  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते. चला तर जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा. साधी बस  1) परीवर्तन सेवा: एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे. या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते.  या सेवेचे विठाई, हरीत कुंभ,  विद्यार्थी सेवा, एम एस बाँडी, साधी बस असे उपप्रकार पडतात. आता जाणून घेवूया याचे उपप्रकार  अ)हरीत कुंभ :नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015ला एसटी महामंडळामार्फत ही सेवा सुरु करण्यात आली. या बसेसचा रंग हिरवा असतो. पर्यावरणपुरक कुंभमेळ्याचा संदेश जनसामन्यापर्यत पोहोचवण्यासाठी या बसेसची निर्मिती करण्यात आली होती. ब)विद्यार्थी सेवा: खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे, सोयीचे व्हावे यासाठी  महामंडळातर्फे ही सेवा सुरु करण्...

शतकोत्तर रौप्य महोत्सवाची दुर्देवी अखेर !

इमेज
        महिलांनी जाकिटे घातली पाहिजे. स्त्री शिक्षणानेच आपल्या समाजाची प्रगती होवू शकते.आपल्या समाज्याचे अधःपतन होण्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष! सरकारने शिक्षणाकडे लक्ष देयल हवे! ही मते कोण्या आजच्या समाजसुधारकांची नाहीत. ही आहेत आज पासून 126 वर्षापूर्वी आपल्यातून अनंताच्या प्रवास्याला निघून गेलेल्या एका थोर समाजसुधारकाची अर्थात गोपाळ गणेश आगरकर  यांची .  2021 या वर्षी जून 17 रोजी त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी वर्षाची अखेर आहे.(मृत्यू 1895 जून 17) त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली           आपल्या 39 वर्षाच्या उणापुऱ्या आयुष्यात त्यांनी सातत्याने महिलांची स्थिती सुधारणे, यासाठी जीवाचे रान केले. प्रसंगी लोकमान्य टिळकांसारख्या  त्यावेळच्या समाजमान्य व्यक्तीमत्तवाशी वैचारीक युद्ध देखील पत्कारले. अन्य कर्तृत्ववान व्यक्तींना असणारा अल्पायुशी ठरण्याचा शाप (.पहिल्या महिला डाँक्टर आनंदी जोशी, थोर गणितज्ज्ञ रामानुजम ही असीच अल्पायुशी व्यक्तीमत्वे) त्यांना देखील मिळाला. आणि जेमतेम 39 वर्षाचा ...

जाने क्यू .....

इमेज
   कालचीच गोष्ट आहे. सहज विरंगुळा म्हणून युट्युब वर सर्फिंग करत असताना एक गाणे समोर आले. प्रीती झिंटा आणि अमीर खान यांच्यावर चित्रीत झालेले. बाँलीवूडच्या आतापर्यतचा इतिहासातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक असणारे हे गाणे  प्रेम का करतात ? या अतिगहन प्रश्नाचे उत्तर शोधणारे.      गाण्याचा सुरवातीला नायक प्रेमामध्ये काय काय तडजोडी कराव्या लागतात? प्रेमामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? याचा पाढा नायीकेसमोर वाचतो. नायक प्रेमाच्या अडचणी सांगत असताना नायिका तिच्या कामात व्यस्त असते. नायकाकडे सातत्याने दुर्लक्ष करते. सरतेशेवटी नायकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते, आणि गाणे संपते. एक छोटीसी संकल्पना कस्या पद्धतीने खुलवता येते याचे उत्कट उदाहरण म्हणजे हे गाणे, दिल चाहता है या.चित्रपटातील आहे. मुळच्या चित्रपटाविषयी काहींच्या नकारात्मक भावना ,  अभिप्राय असू शकतील , मात्र या गाण्याविषयी नकारात्मक भावना ठेवणारा खचितच एखाद दुसरा असेल.   जावेद अख्तर यांची रचना असलेल्या या  गाण्याला  उदीत नारायण ,अलका याग्निक यांनी स्वरसाथ दिली आहे. तर संगीत रचना...