पोस्ट्स

फितूरीची 264वर्षे!

इमेज
   आज 23 जून 2021अर्थात भारताच्या इतिहासातील एका काळकुट्ट्या फितूरीच्या अध्यायाला 264 वर्षेज्यामुळे  पुर्ण होण्याचा दिवस . आजच्याच दिवशी 264 वर्षापुर्वी, अर्थात 23 जून 1757 साली बंगालमध्ये फितूरीच्या मार्गाने ब्रिटीशांनी बंगाल प्रांत घश्यात घातला, आणि ब्रिटीशांची सत्ता भारतावर सुरु झाली. जी 1947आँगस्ट 15 अर्थात पुढील 190 वर्षे होती. या फितूरीच्या मार्गाने बंगाल इंग्रजांनी ताब्यात घेण्याचा घटनेस आपण प्लासीची लढाई म्हणतो. आज 2021 जून 23 रोजी या प्लासीच्या लढाईला 264 वर्षे पुर्ण झाली .         ब्रिटीशांनी त्यावेळच्या कलकत्याचा वखारीभोवती भिंत बांधली. जी तत्कालीन बंगालचा सत्ताधिश सिराज उद्देला यांनी पाडण्याचा आदेश दिला. जो ब्रिटिशांनी धुडकावला. त्यातून उद्भवलेले युद्ध म्हणजे प्लासीची लढाई. या लढाईत सिराज उद्देला यांनी फ्रेंच इस्ट इंडियाची मदत घेतली. या लढाईत ब्रिटिशांपेक्षा सिराज उद्देलाचे सैन्य संख्येने जास्त होते. मात्र सिराज उद्देला यांच्या माजी सेनापती मीर कासीम  याने फितूरी करत आपले सैन्यच प्रत्यक्ष लढाईत उतरवले नाही. परीणामी सिराज ऊद्देला यांचा ...

बातमीतील चीन (भाग 13)

इमेज
      मित्रांनो , मी माझा या ब्लॉग मधून कालच चीनविषयी लिहले होते. मात्र ते लिहून एक दिवस होत नाही तोच द हिंदूच्या न्युजलेटर्स मधून तीन चीनविषयक बातम्या माझ्या इनबाँक्स येवून धडकलेल्या मला दिसल्या. चीन आपला क्रमांक एकचा शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तर जाणून घेवूया या बातम्यांविषयी. तर चीनच्या तैशान नावाच्या एका न्युक्लियर पाँवर प्लँटमध्ये नूकताच एक अपघात झाला आहे. ज्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा आहे. चीननुसार  या न्युक्लिअर पाँवर पाँइटमध्ये जरी अपघात झाला असला तरी किरणोत्सर्ग झालेला नाही. हा न्युक्यीलीअर पाँवर प्लँट हा फ्रान्समधील कंपनीच्या मदतीने सन2018मध्येच उभारण्यात आला होता. चीनच्या मते काही विशेष अपायकारक नसणारे वायूचा उत्सर्ग येथून झाला आहे. चीन जरी फार काही झाले नाही,असे म्हणत असला तरी चीनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना येथे प्रवेश निषिध्द केला आहे. चीनच्या या न्युक्यिलर प्लँटचा जवळपास मोठी शहरे नाहीत. काही खेडी आहेत .त्यामुळे येथे जास्त लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता कमी आहे.  मात्र तो ...

बातमीतील चीन (भाग12)

इमेज
  सध्या आपल्या  महाराष्ट्रात आरक्षण विषयक चर्चांवर, माध्यमे चर्चांचा खल करत असताना जागतिक स्तरावर कोणता मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे? याचा विचार केला असता, एकच मुद्दा सध्या जागतिक स्तरावर विविध स्तरावर आणि विविध भौगोलीक स्तरावर चर्चीला जातोय , तो म्हणजे चीन. सध्या एक दिवसाआड चीनविषयी काहीतरी ऐकायला मिळते.जर एखाद्या दिवशी चीन विषयक ऐकायला मिळाले नाही.. तर भयंकर काहीतर घडल्यासारखे वाटावे, इतक्या मोठ्या प्रमाणात चीन चर्चेला जातोय. चीन हा आपला प्रमुख शत्रू आहे. पाकिस्तान आपल्याविरोधात जी गरळ ओकतोय त्याचा पाया चीनच असतो.त्यामुळे त्या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवूया गेल्या तीन चार दिवसात चीन संदर्भात घडलेल्या गोष्टी. तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसात चीन प्रमुख 3 घडामोडींमुळे चर्चेत आला.एक घडामोड चीन नेपाळ सबंधावर आधारित आहे.एक घडामोड चीन पाकिस्तान सबंधावर आधारित आहे. तर एक घडामोड चीन आँस्टोलीया या सबंधावर आधारित आहे. आता बघूया या घडामोड.      तर सध्या जगात सर्वत्र कोरोना लशीकरण चालू आहे. तसे ते नेपाळमध्ये देखील चालू आहे. भारताकडून काह...

ऐताहासिक महत्व असलेला दुर्ग ...त्रिंगलगड

इमेज
      सध्या कोरानाच्या संसर्ग कमी होत असल्याने, आणि लसीकरणास देखील वेग येत असल्याने अनेक दुर्ग मोहिमा सध्या आयोजित केल्या जात आहेत. अस्याच एका दुर्ग मोहिमेत सहभागी होण्याची मला नुकतीच संधी मिळाली. आजचे लेखन त्यात आलेल्या अनुभवांविषयी. तर मित्रांनो, वाहतूक सुरक्षा अभियानासह नदी स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव या सह विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि वाहतूक सुरक्षा अभियानाचे कित्येक जागतीक विक्रम करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गभ्रमती गृपच्या माध्यमातून मी नूकतीच मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी या छोट्या शहरापासून.हाकेच्या अंतरावर असणाऊ त्रिंगलगड या गडावर दूर्गभ्रमती केली. खुपच छान अनुभव होता तो.        त्रिंगल गडावर एक जैन लेणी आहे. मात्र समाजकंटकांनी लेण्याची प्रचंड दुर्दशा केली आहे. लेणी आणि किल्याची निर्मिती.दहाव्या शतकात झाल्याचे मानन्यात येते .मध्य युगात नाशिक आणि कोकणाचा व्यापार मार्गावरील मोक्याचा ठिकाणी हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी मोघलांकडून हा किल्ला जिंकला .पुढे सन 1688 मध्ये किल्ला पुन्हा मोघलांच्या ताब्यात गेला. सन...

माझा आवडता नेता...

इमेज
      कोणी त्यांना पप्पु म्हणून हिनवतं, कोणी त्यांना युवराज म्हणून हिनवतं . घराण्याची किर्ती धुळीस मिळवणारा , घराण्यामुळे मोठेपणा मिळणारा मात्र अंगी काहीच कर्तृत्व नसलेला म्हणून त्यांच्याकडे बघावे, असी प्रतिमा माध्यमांकडून उभी करण्यात येते.अपरीपक्तव व्यक्तीमत्व म्हणून त्यांचाकडे बघीतले जाते.अनेकदा त्यांचा आईचा अत्यंत खालचा दर्जाचा उल्लेख करण्यात येतो. तरी ते काहीही अनुचित प्रतिक्रिया देत नाहीत. स्थितप्रज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्वाप्रमाणे या सर्व दर्जाहिन टिकेकडे दुर्लक्ष करुन आपले कार्य अधिकाधीक उत्तम करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो.सातत्याने नविन गोष्ट शिकण्याकडे त्यांचा कल असतो. एखादी गोष्ट जर त्यांना आवडली नाही. तर कोणाचीही भीड न बाळगता ते स्पष्टपणे सांगतात. जर एखादी गोष्ट आवडली तर कसलाही बडेजाव न बाळगता त्याचे कौतूक करतात. उगीचच अन्य व्यक्तिंना शक्तीप्रदर्शन करत नाहीत. मात्र वेळ पडल्यावर त्यांची शाररीक ताकद भल्या भल्याची छाती दडपून टाकते. आपण भोगलेल्या कष्टांचे विनाकारण ते भांडवल करत नाही. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात शिक्षीत व्यक्तींमध्ये त्यांची ...

जी 7 आणि भारत

इमेज
              नुकतेच 12 ते 15  जून दरम्यान युनाटेड किंग्डम या देशात जी 7 या परिषदेचे प्रशासन प्रमुखांचे  अधिवेशन झाले जी 7 ही जगातील सर्वात शक्तिमान असणाऱ्या सात देशांची संघटना आहे . ज्यामध्ये युनाटेड स्टेटस ऑफ अमेरिका, फ्रांस जपान , इटली कॅनडा , जर्मनी आणि युनाटेड किंग्डम या देशांचा समावेश  होतो . या  संघटनेचे हे 47  वे अधिवेशन होते . सन  2014  पर्यंत या संघटनेत रशियाचा देखील सहभाग होता मात्र सन  2014  रशियाने क्रिमियावर आक्रमणक केल्यावर रशियाला या संघटनेतून नारळ देण्यात आले   भारत जी 7 चा सदस्य देश नसला तरी  भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याचा विचार करून आयोजक असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशाकडून परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले .  भारताहोता जगात अनेक ठिकाणी होऊ शकेल सह या परिषदेत मुळात परिषदेचे सदस्य देश नसणारे दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका , ऑस्ट्रोलीया हे देश सहभागी झाले होते . ही परिषद ऑफलाईन पध्द्तीने  झाली भारताचा अपवाद करून बाकी...

भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग7)

इमेज
              आपल्या भारतीय रेल्वेत रोज 12 ते 13 हजार प्रवाशी गाड्या चालवल्या जातात. (सध्याची अपवादात्मक स्थिती सोडून देवूया ) आँस्टोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढे लोक दररोज प्रवास करतात. तसेच अनेक मालगाड्या चालवल्या जातात. या सर्व गाड्यांना इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वे इंजिनाचे जग खुपच रंजक आहे. भारतीय रेल्वेच्या इतर घटकांविषयी खुप लिहले जाते बोलले जाते . मात्र यामागील खरा कर्ता असलेल्या इंजिनाविषयी फारच कमी बोलले.जाते..चला तर मग जाणून घेवूया त्यांचा या अज्ञात जगाविषयी              मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेत रेल्वे इंजिनांची ओळख होण्यासाठी जे नाव दिले जाते त्याचे दोन भाग असतात .डाव्या बाजूच्या भागात तीन अक्षरे असतात. तर उजव्या बाजूला आकडा असतो. अक्षरे सबंधीत रेल्वे इंजिन कोणत्या गेजचे आहे? ते कोणत्या इंधनावर चालते?  ते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहे? याविषयी सांगणारी असतात. तर अंकाद्वारे इंजिन.किती हजार अश्वशक्तीचे आहे, याचा उलगडा होतो.          आपल्या भारतात चार प्रक...