पोस्ट्स

सन 2021 मधील सहाव्या मन की बातच्या निमित्याने

इमेज
            27 जून 2021  रोजी पंतप्रधान यांनी त्यांच्या महिन्याचा शेवटचा रविवारी होणाऱ्या  मासिक संबोधनात अर्थात मन की बात मध्ये संबोधित केले .नेहमीप्रमाणे व्यवस्थापनाच्या तिसऱ्या प्रकारातील अर्थात महत्वाच्या  मात्र तात्काळ केली नाही तरी चालू शकेल  अश्या गोष्टींचा त्यात समावेश होता . व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहिल्या प्रकारात येणाऱ्या अर्थात महत्वाच्या आणि तात्कळ करावयाच्या कामांविषयी याविषयी देखील इतर मन की बातप्रमाणे याही मन की बात मध्ये मौन बाळगले गेले .  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या संबोध नाची सुरवात ऑलम्पिक स्पर्धीविषयी बोलून केली . काही दिवसात भारताचा ओलम्पिकचा संघ  ऑलम्पिक स्पर्धेसाठी टोकियोला जाणार आहे. त्या अनुषंगाने काही खेळाडूंचा परिचय त्यांनी आपल्या संबोधनात केला . तसेचखेळाविषयी तसेच ऑलम्पिक विषयी इच्छुकता निर्माण व्हावी या हेतूने ऑलम्पिक मध्ये भारताला  सर्वाधिक  पदके कोणत्या खेळात मिळाले आहेत तसेचसर्वाधिक  वैयक्तिक पदके कोणी मिळवले आहेत याविषयी प्रश्न विचारले . या प्रश्नाचे उत्...

बातमीतील पाकिस्तान (भाग8)

इमेज
    मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयक 9 घडामोडी घडल्या. त्यातील 5 घडामोडींंविषयी मी कालच लिहले होते.आज बघूया उरलेल्या 4घडामोडी.      तर काल न लिहलेल्या 4 घडामोडी , पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये कायम राहणे, CPEC च्या कामांविषयी नकारात्मक बातम्या माध्यमात प्रसिद्ध होणे, पाकिस्तानाच्या लष्करप्रमुखांच्या हत्येचा कट उधळून लावल्याची बातमी माध्यमांमध्ये येणे आणि भारताला मुंबई हल्ल्या प्रकरणी हवा असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता मिळालेई हफिस सय्यद याचा घराजवळ बाँम्बस्फोट होणे, या आहेत.आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे . तर सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या FATF अर्थात फायनासियल अँक्शन टास्क फोर्सच्या ग्रे देशांच्या यादीत पाकिस्तान कायम राहिला आहे. पाकिस्तान सध्या तिसऱ्यांंदा FATF च्या ग्रे  यादीत आहे. या आधी पाकिस्तान 2008 मध्ये  पहिल्यांदा ग्रे यादीत सहभागी झाला होता.जो 2009 मध्ये बाहेर पडला . त्यानंतर 2013ला परत पाकिस्तान या यादीत आला जो 2015 मध्ये बाहेर पडला. नंतर 2018 ला पुन्हा यादीत समाविष्ट झाला जो आजपर्यत आहे. मागच्या वर्षी...

बातमीतील पाकिस्तान( भाग7)

इमेज
            पाकिस्तान, आपल्या भारतातील दहशतवादी कारवायांना जवाबदार असणारा देश. पाकिस्तानातील जवळपास सर्वच राजकीय सामाजिक घटनांचा  आपल्या भारतावर काहीना काही परीणाम होतोच. त्यामुळे त्यांच्या विषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. तरी चला तर मग        गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयी मात्र भारतावर परीणाम करणाऱ्या 5 घटनांचा परामर्श घेवूया . तर मित्रांनो, पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात झालेले बदल, पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरचा पंतप्रधानाने केलेले वक्तव्य, पाकिस्तानच्या पंतप्रधानाने त्यांच्या संसदचेच्या नँशनल अस्मेंलीमध्ये मध्ये केलेले एक वादगस्त वक्तव्य आणि शांघाय काँपरेशन आँरगायनाझेशनच्या राष्ट्रिय सुरक्षा सल्लागारांचा परीषदेत भारताचे  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला उद्देश्यून केलेले वक्तव्य,  पाकिस्तानला युनाटेड किंग्डम या देशांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक या 5घटनांमुळे पाकिस्तान गेल्या जागतिक पातळीवर  आठवड्यात चर्चेत आला होता. आता बघ...

काळ्या पर्वानंतरची 46 वर्षे

इमेज
    आजपासून 46 वर्षापुर्वीची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एका काळ्या पर्वाची सुरवात होती ती. ज्यामध्ये तत्कालीन माध्यमांचा स्वातंत्र्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात संकोच करण्यात आला होता. वृत्तपत्रात काय छापायचे?काय छापायचे नाही. याचा निर्णय वृत्तपत्रातील संपादकीय मंडळ न घेता ते वर्तमानपत्राचे कार्यालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे, त्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत असत. सत्ताधिकाऱ्यांचे सर्व विरोधक बंदीवासात बंदी होते. उत्तर भारतात मोठे पुरुष सोडा, लहान मुलांच्या देखील नसबंदी शस्त्रक्रिया जोरात सुरु होत्या.नागरीकांचे मुलभूत हक्क मोठ्या प्रमाणात गोठवण्यात आले होते. गुन्हेगारांचे निर्दलन करण्यासाठी अनेक कडक कायदे करण्यात आले होते.ज्याचा काहीसा गैर वापर देखील होत होता. विरोधक नसल्याने संविधानातील महत्तवाचे बदल या काळात करण्यात आले.आज या कालखंडास आपण आणिबाणी म्हणून ओळखतो. आणिबाणीची सुरवात होवून आज 25जून 2021रोजी  46 वर्षे झाली. सन 1975 जून 25 रोजी सुरू झालेली आणिबाणी पुढे  तेवीस महिने सुरु होती.          आणिबाणी उठल्यावर झालेल्...

फितूरीची 264वर्षे!

इमेज
   आज 23 जून 2021अर्थात भारताच्या इतिहासातील एका काळकुट्ट्या फितूरीच्या अध्यायाला 264 वर्षेज्यामुळे  पुर्ण होण्याचा दिवस . आजच्याच दिवशी 264 वर्षापुर्वी, अर्थात 23 जून 1757 साली बंगालमध्ये फितूरीच्या मार्गाने ब्रिटीशांनी बंगाल प्रांत घश्यात घातला, आणि ब्रिटीशांची सत्ता भारतावर सुरु झाली. जी 1947आँगस्ट 15 अर्थात पुढील 190 वर्षे होती. या फितूरीच्या मार्गाने बंगाल इंग्रजांनी ताब्यात घेण्याचा घटनेस आपण प्लासीची लढाई म्हणतो. आज 2021 जून 23 रोजी या प्लासीच्या लढाईला 264 वर्षे पुर्ण झाली .         ब्रिटीशांनी त्यावेळच्या कलकत्याचा वखारीभोवती भिंत बांधली. जी तत्कालीन बंगालचा सत्ताधिश सिराज उद्देला यांनी पाडण्याचा आदेश दिला. जो ब्रिटिशांनी धुडकावला. त्यातून उद्भवलेले युद्ध म्हणजे प्लासीची लढाई. या लढाईत सिराज उद्देला यांनी फ्रेंच इस्ट इंडियाची मदत घेतली. या लढाईत ब्रिटिशांपेक्षा सिराज उद्देलाचे सैन्य संख्येने जास्त होते. मात्र सिराज उद्देला यांच्या माजी सेनापती मीर कासीम  याने फितूरी करत आपले सैन्यच प्रत्यक्ष लढाईत उतरवले नाही. परीणामी सिराज ऊद्देला यांचा ...

बातमीतील चीन (भाग 13)

इमेज
      मित्रांनो , मी माझा या ब्लॉग मधून कालच चीनविषयी लिहले होते. मात्र ते लिहून एक दिवस होत नाही तोच द हिंदूच्या न्युजलेटर्स मधून तीन चीनविषयक बातम्या माझ्या इनबाँक्स येवून धडकलेल्या मला दिसल्या. चीन आपला क्रमांक एकचा शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तर जाणून घेवूया या बातम्यांविषयी. तर चीनच्या तैशान नावाच्या एका न्युक्लियर पाँवर प्लँटमध्ये नूकताच एक अपघात झाला आहे. ज्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा आहे. चीननुसार  या न्युक्लिअर पाँवर पाँइटमध्ये जरी अपघात झाला असला तरी किरणोत्सर्ग झालेला नाही. हा न्युक्यीलीअर पाँवर प्लँट हा फ्रान्समधील कंपनीच्या मदतीने सन2018मध्येच उभारण्यात आला होता. चीनच्या मते काही विशेष अपायकारक नसणारे वायूचा उत्सर्ग येथून झाला आहे. चीन जरी फार काही झाले नाही,असे म्हणत असला तरी चीनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना येथे प्रवेश निषिध्द केला आहे. चीनच्या या न्युक्यिलर प्लँटचा जवळपास मोठी शहरे नाहीत. काही खेडी आहेत .त्यामुळे येथे जास्त लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता कमी आहे.  मात्र तो ...

बातमीतील चीन (भाग12)

इमेज
  सध्या आपल्या  महाराष्ट्रात आरक्षण विषयक चर्चांवर, माध्यमे चर्चांचा खल करत असताना जागतिक स्तरावर कोणता मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे? याचा विचार केला असता, एकच मुद्दा सध्या जागतिक स्तरावर विविध स्तरावर आणि विविध भौगोलीक स्तरावर चर्चीला जातोय , तो म्हणजे चीन. सध्या एक दिवसाआड चीनविषयी काहीतरी ऐकायला मिळते.जर एखाद्या दिवशी चीन विषयक ऐकायला मिळाले नाही.. तर भयंकर काहीतर घडल्यासारखे वाटावे, इतक्या मोठ्या प्रमाणात चीन चर्चेला जातोय. चीन हा आपला प्रमुख शत्रू आहे. पाकिस्तान आपल्याविरोधात जी गरळ ओकतोय त्याचा पाया चीनच असतो.त्यामुळे त्या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवूया गेल्या तीन चार दिवसात चीन संदर्भात घडलेल्या गोष्टी. तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसात चीन प्रमुख 3 घडामोडींमुळे चर्चेत आला.एक घडामोड चीन नेपाळ सबंधावर आधारित आहे.एक घडामोड चीन पाकिस्तान सबंधावर आधारित आहे. तर एक घडामोड चीन आँस्टोलीया या सबंधावर आधारित आहे. आता बघूया या घडामोड.      तर सध्या जगात सर्वत्र कोरोना लशीकरण चालू आहे. तसे ते नेपाळमध्ये देखील चालू आहे. भारताकडून काह...