पोस्ट्स

स्वामी विवेकानंद भगव्या कपड्यांना नवा अर्थ देणारे व्यक्तीमत्व

इमेज
       स्वामी विवेकानंद यांचे नाव ऐकलेले नाही, असा खचितच कोणी भारतात असेल.येत्या रविवारी अर्थात 4 जूलै त्यांची 119वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.                 स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला. संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन, इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून, संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली. मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे. अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या कार्यामुळे  युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात. मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे.( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर रविवारचा उपक्रम बंद करण्यात आल...

मानवा तूझे दिवस भरत आले आहेत!

इमेज
      आपल्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरीवर्ग  चिंतेत सापडला असताना जगभरात विविध ठिकाणी हवामानाने मानवाचे दिवस भरल्याचे स्पष्ट संकेत दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे . .  कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसात  नोंदवण्यात आलेले तापमान हे याचीच साक्ष देतात  कँनडा सारख्या अन्यवेळी उन्हाळ्यात देखील 25 ते 30 अंश सेल्यीयस तापमान असणाऱ्या देशाच्या पश्चिम भागात 49.5 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद झाली आहे. कँनडा या देशाच्या एक तृतीयांश भाग हा जगात सर्वात थंड भाग म्हणून परीचीत असलेल्या ध्रुवीय प्रदेशात मोडतो,हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.  कँनडा या देशाच्या ब्रिटीश कोलंबिया या राज्यात हा मजकूर लिहीत असताना तब्बल 145 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर संपुर्ण कँनडा देशात हा आकडा 300 च्या आसपास आहे. कँनडा सारख्या जगातील सर्वात मोठ्या 7अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचा समुहातील अर्थात   जी 7 मध्ये मोडणाऱ्या देशात असी स्थिती आहे. हे विशेष. जगात राहण्यास उत्तम देशांचा निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ...

बातमीतील पाकिस्तान [भाग 9]

इमेज
      आपल्या भारतात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना जगात अनेक घडामोडी घडल्या ज्याचा केंद्रबिंदू हा भारताचा उघड शत्रू असणारा पाकिस्तान  हा होता . पाकिस्तान संधीं मिळेल त्या जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारताची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये युनाटेड नेशनसह  ऑर्गनाझेशन ऑफइस्लामिक कट्रीज अर्थात ओ आय सी च्या प्लॅटफॉर्मचा देखील समावेश होतो . त्यामुळे या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे चला तर मित्रानो जाणून घेउया या घडामोडीविषयी  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी  सरकारी मध्यमसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमेरिका चीनला खूपच घाबरलेली असून तिने भारत आणि अन्य एका देशाबरोबर [इम्रान खान यांनी नाव बी घेतलेल्या देशाचे नाव जपान आहे ] क्वॉड हा एक गृप स्थापन केला आहे तसेच चीन त्यांच्या सिनिकियांग या प्रातांतील मुस्लिम बांधवाना नव्याने काही गोष्टी शिकवत आहे  अत्याचार करत नाहीये . आम्ही या बाबत चीनच्या बरोबर आहोत पाश्चात्य माध्यमे या बाबत चुकीचे सांगत आहे असे विधान केले आहे अशी बातमी नुकतीच हि...

बातमीतील नेपाळ (भाग 1)

इमेज
        आपल्या भारतात ट्टीटर या समाजमाध्याच्या काही कृतीमुळे हे समाजमाध्यम चर्चेत आले असताना आपल्या शेजारील नेपाळ या देशात भारताच्या संदर्भात तीन घडामोडी घडल्या. त्यातील दोन पुर्णतः आपल्याशी संबधीत आहे, तर एक घडामोड आपले शत्रूराष्ट्र असणाऱ्या चीनविषयक आहे. नेपाळ आपले मित्र राष्ट्र असल्याने या घडामोडीस विशेष महत्व आहे. चला तर मग बघूया या घडामोड       तर मित्रांनो, चीनमार्फत करण्यात येणाऱ्या, सिंधूपालचौक या जिल्ह्यातील  एका विकासकामामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे, नेपाळमध्ये चीन विरोधी वातावरण तयार होणे, पंतजंलीच्या कोरोनाविषयक औषधाला नेपाळने बंदी घालणे, आणि  नेपाळच्या पंतप्रधानाने योगाविषयी वादगस्त विधान करणे, यामुळे नेपाळ चर्चेत आला होता.आता बघूया. हे  मुद्दे  सविस्तरपणे.  पहिल्यांदा बोलूया  नेपाळमध्ये तयार झालेल्या चीनविरोधी मुद्याविषयी.        तर  नेपाळच्या उत्तरेला असणाऱ्या तिबेटशी नेपाळचा संपर्क भौगोलिक दुर्गमतेमुळे आता आता पर्यंत फारशा नव्हता . मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनमार्फ...

107 वर्षानंतर

इमेज
      28 जून 1914 साली एका सर्बियन नागरीकाने आस्ट्रियन राज्यपुञाची हत्या केली आणी पहिल्या महायुध्दाची सुरवात झाली त्याला 2021 साली 107 वर्षे पुर्ण होतील या 107 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे पहिल्या महायुध्दानंतर युरोपीय राष्टांनी ज्या जर्मनीवर अपमानास्पद अटी घातल्या त्याच जर्मनीचा अशा विश्वास त्याना वाटत आहे. जर्मनी सध्या आपल्या आर्थिक ताकदीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा परीषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे. काही वर्षापुर्वी युरोपात आलेल्या पोर्तुगाल, आयर्लंड, ग्रीस स्पेन या देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्यावर जर्मनीनेच त्यांना मदतीचा हात दिला होता. वाहन निर्मिती क्षेत्रात आज जर्मन कंपन्या आघाडीच्या समजल्या जातात . जगातील सात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा समावेश होतो जगात कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते याचेच हे द्योतक समजता येईल असो युरोपीय राष्टे अश्या प्रकारे युध्द करतील अशी शंका शका19शतकाच्या अखेरीस आणी 20व्या शतकाच्या सुरवातीस स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केली होती. येत्या रविवारी (4 ज...

सन 2021 मधील सहाव्या मन की बातच्या निमित्याने

इमेज
            27 जून 2021  रोजी पंतप्रधान यांनी त्यांच्या महिन्याचा शेवटचा रविवारी होणाऱ्या  मासिक संबोधनात अर्थात मन की बात मध्ये संबोधित केले .नेहमीप्रमाणे व्यवस्थापनाच्या तिसऱ्या प्रकारातील अर्थात महत्वाच्या  मात्र तात्काळ केली नाही तरी चालू शकेल  अश्या गोष्टींचा त्यात समावेश होता . व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहिल्या प्रकारात येणाऱ्या अर्थात महत्वाच्या आणि तात्कळ करावयाच्या कामांविषयी याविषयी देखील इतर मन की बातप्रमाणे याही मन की बात मध्ये मौन बाळगले गेले .  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या संबोध नाची सुरवात ऑलम्पिक स्पर्धीविषयी बोलून केली . काही दिवसात भारताचा ओलम्पिकचा संघ  ऑलम्पिक स्पर्धेसाठी टोकियोला जाणार आहे. त्या अनुषंगाने काही खेळाडूंचा परिचय त्यांनी आपल्या संबोधनात केला . तसेचखेळाविषयी तसेच ऑलम्पिक विषयी इच्छुकता निर्माण व्हावी या हेतूने ऑलम्पिक मध्ये भारताला  सर्वाधिक  पदके कोणत्या खेळात मिळाले आहेत तसेचसर्वाधिक  वैयक्तिक पदके कोणी मिळवले आहेत याविषयी प्रश्न विचारले . या प्रश्नाचे उत्...

बातमीतील पाकिस्तान (भाग8)

इमेज
    मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयक 9 घडामोडी घडल्या. त्यातील 5 घडामोडींंविषयी मी कालच लिहले होते.आज बघूया उरलेल्या 4घडामोडी.      तर काल न लिहलेल्या 4 घडामोडी , पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये कायम राहणे, CPEC च्या कामांविषयी नकारात्मक बातम्या माध्यमात प्रसिद्ध होणे, पाकिस्तानाच्या लष्करप्रमुखांच्या हत्येचा कट उधळून लावल्याची बातमी माध्यमांमध्ये येणे आणि भारताला मुंबई हल्ल्या प्रकरणी हवा असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता मिळालेई हफिस सय्यद याचा घराजवळ बाँम्बस्फोट होणे, या आहेत.आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे . तर सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या FATF अर्थात फायनासियल अँक्शन टास्क फोर्सच्या ग्रे देशांच्या यादीत पाकिस्तान कायम राहिला आहे. पाकिस्तान सध्या तिसऱ्यांंदा FATF च्या ग्रे  यादीत आहे. या आधी पाकिस्तान 2008 मध्ये  पहिल्यांदा ग्रे यादीत सहभागी झाला होता.जो 2009 मध्ये बाहेर पडला . त्यानंतर 2013ला परत पाकिस्तान या यादीत आला जो 2015 मध्ये बाहेर पडला. नंतर 2018 ला पुन्हा यादीत समाविष्ट झाला जो आजपर्यत आहे. मागच्या वर्षी...