पोस्ट्स

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त  यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.     कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त     सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसत...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने (भाग2)

इमेज
       माझ्या कालच्या स्पर्धा परीक्षेच्या लेखावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी या परीक्षार्थींवर ज्या गोष्टीने ताण येतो, ते म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी राहणे खरेच गरजेचे असते का ? याबाबत विचारणा केली, तर त्या प्रश्नांविषयी सांगण्यासाठी ही पोस्ट.                 या परीक्षार्थींना पुण्यात राहणे खरेच आवश्यक असते का? याचे एका शद्बात किंवा वाक्यात उत्तर देणे अशक्य आहे. यासाठी या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासाची पद्धत आवश्यक असते. हे माहिती करुन घेणे आवश्यक असते.  या परीक्षेचा अभ्यासक्रम खुपच विस्तृत असतो,  त्यामुळे याचा अभ्यास करताना कदाचित अवांतर गोष्टींंचांच अभ्यास केला जावू शकतो. जसे  मराठी, इंग्रजी  सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी वाचन करताना  जी पुस्तके वाचून काहीच मराठी, इंग्रजी सुधारणार नाही, असी पुस्तके , दैनिके वाचणे वगैरे.या परीक्षांचा अभ्यास विस्तृत असला तरी एका विशिष्ट दिशेने करावा लागतो. मार्ग चूकला तर खुप अभ्यास करुनही काहीच उपयोग नाही. तसेच या प्रकारच्या अभ्यासात सातत्याने परीक्षण आव...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने .....

इमेज
      मुख्य परीक्षा होवून दोन वर्षे झाली तरी, परीक्षेचा अंतीम टप्पा असलेल्या मुलाखतीचा टप्पा होत नाही, यामुळे निराश होत रविवारी पुण्यात भावी अधिकारी होवू शकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315आणि316 मध्ये राज्य प्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी पर्यतचे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची परीक्षा सदर तरुण देवू इच्छित होता.या आत्महत्येने यापुर्वी अनेकदा चर्चिले गेलेले मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.        घटनेत स्पष्ट उल्लेख असून देखील आयोगाची कार्यक्षमता फारशी उत्तम नसणे. वेळोवेळी प्रश्नपत्रीकेत काही चुका असणे. परीक्षा वेळेवर न घेणे,निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे न देणे आदी गोष्टी आयोग आणि शासनाकडून फार पुर्वीपासून होत आहे. सध्याच्या कोरोनाकाळात यात थोडी वाढ झाली इतकेच. यामुळे खेडोगावातील सर्वसामान्य गोरगरीब भरडला जातो..आज जाहिरात निघेल उद्या जाहिरात निघेल या आशेवर...

बातमीतील पाकिस्तान [ भाग 10]

इमेज
       मित्रानो आपल्या भारतात वाढत्या इंधनदारामुळे आणि संथ कोरोना प्रतिबंधात्मक लशींच्या संथ वेगामुळे समस्त भारत चिंतेत असताना आपल्या शेकजारील देश पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आपला प्रमुख शत्रू आहे तसेच तो आपल्या भारतात सातत्याने अशांतता पसरवत असल्याने त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या बदलांविषयी        तर मित्रांनो पाकिस्तानने चीनकडून आयात केलेल्या लोमाड या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून येणे, पाकिस्तान आणि तूर्कस्थान या दोन देशांना अमेरीकेकडून लहान बालकांचा सैन्यासी सबंधित कारवाईत वापर केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले जाणे, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घ्यालण्याचे पाकिस्तानचे उदिष्ट जाहिर केलेल्या कालावधीत पुर्ण न होणे, या गोष्टींमुळे पाकिस्तान सध्या चर्चेत आला होता.चला तर मग जाणून घेवूया ची घडामोडी विस्ताराने. तर पाकिस्तानने चीनकडून सन 2014साली लोमाड  हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतली. चीनने अन्य 17ते 18 देशांनी ही प्रणाली विकत घेण्यासाठी प्रयत्न...

स्वामी विवेकानंद, भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने ओळख करुन देणारे व्यक्तीमत्व

इमेज
   समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते ,असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 119 वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.  स्वामी विवेकानंद यांचे  भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे. विविध प्रकारची समाजसेवा करणारे रामकृष्ण मठ हे त्यापैकीच एक. ज्याविषयी   मी  काल लिहले होते.. आज मी आपणासी  बोलणार आहे, स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांना भारतीय तत्वज्ञानाची नव्याने कसी ओळख करुन दिली याबाबत.    मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते. त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता. भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे. जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे, आवश्यक आहे असा अनेकांचा समज होता. त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला. पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता, त्यासाठी त्य...

स्वामी विवेकानंद भगव्या कपड्यांना नवा अर्थ देणारे व्यक्तीमत्व

इमेज
       स्वामी विवेकानंद यांचे नाव ऐकलेले नाही, असा खचितच कोणी भारतात असेल.येत्या रविवारी अर्थात 4 जूलै त्यांची 119वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.                 स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला. संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन, इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून, संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली. मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे. अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या कार्यामुळे  युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात. मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे.( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर रविवारचा उपक्रम बंद करण्यात आल...

मानवा तूझे दिवस भरत आले आहेत!

इमेज
      आपल्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरीवर्ग  चिंतेत सापडला असताना जगभरात विविध ठिकाणी हवामानाने मानवाचे दिवस भरल्याचे स्पष्ट संकेत दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे . .  कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसात  नोंदवण्यात आलेले तापमान हे याचीच साक्ष देतात  कँनडा सारख्या अन्यवेळी उन्हाळ्यात देखील 25 ते 30 अंश सेल्यीयस तापमान असणाऱ्या देशाच्या पश्चिम भागात 49.5 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद झाली आहे. कँनडा या देशाच्या एक तृतीयांश भाग हा जगात सर्वात थंड भाग म्हणून परीचीत असलेल्या ध्रुवीय प्रदेशात मोडतो,हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.  कँनडा या देशाच्या ब्रिटीश कोलंबिया या राज्यात हा मजकूर लिहीत असताना तब्बल 145 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर संपुर्ण कँनडा देशात हा आकडा 300 च्या आसपास आहे. कँनडा सारख्या जगातील सर्वात मोठ्या 7अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचा समुहातील अर्थात   जी 7 मध्ये मोडणाऱ्या देशात असी स्थिती आहे. हे विशेष. जगात राहण्यास उत्तम देशांचा निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ...