पोस्ट्स

भयानक वास्तवाकडे वाटचाल

इमेज
आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रात अनेक राजकीय लाथ्या उथाळ्यांनी वातावरण भंडावून सोडले असताना भारताच्या पश्चिमेकडील एका देशात फार तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील जनता वेगाने मध्ययुगाकडे वाटचाल करत आहे. जर मध्ययुगात हा देश पुर्णतः पोहोचला तर त्याचे विपरीत परीणाम काश्मीर सह समस्त भारताला भोगावे लागतील. सध्या विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात येणाऱ्या बातम्यांचा विचार करता ही स्थिती येत्या काही आठवड्यात फार उशीराचा विचार केला तर महिन्यात येवू शकते.मात्र  टायटँनिक या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे जहाज बुडत असताना देखील शांतपणे संगीत वाजवण्यात दंग असलेल्या लोकांप्रमाणे भारतीयांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याने याबाबत आपणाकडे विचारमंथन करण्यात येत नाहीये.(तसा तो आपला राष्ट्रीय स्वाभाव आहे. भारताच्या इतिहासात आपणास अनेकदा त्याचे प्रत्यंतर दिसत) मी बोलत आहे अफगाणिस्तानविषयी. तिथे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या तालीबानी प्रभावाविषयी.  या वर्षी 1मे पासून अमेरीकन.सैन्य अफगाणिस्तानमधून टप्याटप्याने माघारी जात असताना तालीबानच्या ताब्यातील प्रदेश वाढत आहे. जूलै च्या पहिल्या आठवड्यापर्यत एक तृतीयांश अफगाणिस...

आयुष्यातील दुःखे सिनेमात सहजतेने दाखवणारा सिनेनिर्माता,दिग्दर्शक.....गुरुदत्त

इमेज
           आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात. आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात.  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके, सिने निर्माते, सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात. या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. 9जूलै ही त्यांची जयंती या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.         मानवी दुःखाना नाट्यमय कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर साकरणे, आणि त्यातून मनोरंजन करणे यामध्ये त्यांचा हात त्यांचा समकालीन दुसरा कोणीच धरु शकणार नाही. गुरुदत्त यांचे सर्व सिनेमे मुख्य धारेतील होते. आर्ट फिल्म प्रकारातील नव्हते, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या काहीसे मागे पडलेल्या मधूर भांडरकर यांची याबाबत काही प्रमाणात तूलना होवू शकते. कारण मधूर भांडरकर यांचे चित्रपट वास्तवदर्शी असले तरी  फारसे हृदयद्रावक नाहीत....

स्मरण ऐताहासिक उड्डीचे

इमेज
      जूलै महिना सुरु झाला की अनेक गोष्टींची आठवण होते,काही जणांना स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीची आठवण होते. काही जणांना लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांची आठवण होते.या अनेक महत्तवाचा घटनांपैकीच एक गोष्ट म्हणजे 8 जूलै ची स्वातंञ्यवीर सावरकरांची ती जगप्रसिध्द समुद्रातील उड्डी.   फ्रान्सचा किनारा जवळ आलेला आहे आपण पोहत फ्रान्स गाठले तर हे ब्रिटीश सरकार आपल्याया परदेशी भूमीवर अटक करू शकणार नाही काय म्हणावे?, या नियोजनाला माझ्याकडे शब्दच नाही या गोष्टीचे वर्णन करायला. मार्सेलीस या  ठिकाणी आर्यलंड मध्ये होमरुल चळवळ चालवणाऱ्या अँनी बेझंट यांचा मदतीने स्वातंञ्यवीर सावरकर  भुमीगत होऊन भारताच्या स्वातंञ्याची चळवळ पुढे नेणार होते. माञ दुर्दैवाने त्या सावरकरांना भेटू शकल्या नाहीत आणि फ्रान्सच्या भुमीवर असूनही ब्रिटीशांनी स्वातंञ्यवीर सावरकरांना अटक केली पुढचा ईतिहास सर्वाना माहीती आहेच.  माञ मला राहून राहून वाटते जर सर्व ठरवल्याप्रमाणेच घडले असते तर ? तर इतिहास फार वेगळ्या पध्दतीने लिहला गेला असता यात तिळमाञ शंका नाही असो इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात या जर तर...

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त  यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.     कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त     सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसत...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने (भाग2)

इमेज
       माझ्या कालच्या स्पर्धा परीक्षेच्या लेखावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी या परीक्षार्थींवर ज्या गोष्टीने ताण येतो, ते म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी राहणे खरेच गरजेचे असते का ? याबाबत विचारणा केली, तर त्या प्रश्नांविषयी सांगण्यासाठी ही पोस्ट.                 या परीक्षार्थींना पुण्यात राहणे खरेच आवश्यक असते का? याचे एका शद्बात किंवा वाक्यात उत्तर देणे अशक्य आहे. यासाठी या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासाची पद्धत आवश्यक असते. हे माहिती करुन घेणे आवश्यक असते.  या परीक्षेचा अभ्यासक्रम खुपच विस्तृत असतो,  त्यामुळे याचा अभ्यास करताना कदाचित अवांतर गोष्टींंचांच अभ्यास केला जावू शकतो. जसे  मराठी, इंग्रजी  सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी वाचन करताना  जी पुस्तके वाचून काहीच मराठी, इंग्रजी सुधारणार नाही, असी पुस्तके , दैनिके वाचणे वगैरे.या परीक्षांचा अभ्यास विस्तृत असला तरी एका विशिष्ट दिशेने करावा लागतो. मार्ग चूकला तर खुप अभ्यास करुनही काहीच उपयोग नाही. तसेच या प्रकारच्या अभ्यासात सातत्याने परीक्षण आव...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने .....

इमेज
      मुख्य परीक्षा होवून दोन वर्षे झाली तरी, परीक्षेचा अंतीम टप्पा असलेल्या मुलाखतीचा टप्पा होत नाही, यामुळे निराश होत रविवारी पुण्यात भावी अधिकारी होवू शकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315आणि316 मध्ये राज्य प्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी पर्यतचे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची परीक्षा सदर तरुण देवू इच्छित होता.या आत्महत्येने यापुर्वी अनेकदा चर्चिले गेलेले मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.        घटनेत स्पष्ट उल्लेख असून देखील आयोगाची कार्यक्षमता फारशी उत्तम नसणे. वेळोवेळी प्रश्नपत्रीकेत काही चुका असणे. परीक्षा वेळेवर न घेणे,निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे न देणे आदी गोष्टी आयोग आणि शासनाकडून फार पुर्वीपासून होत आहे. सध्याच्या कोरोनाकाळात यात थोडी वाढ झाली इतकेच. यामुळे खेडोगावातील सर्वसामान्य गोरगरीब भरडला जातो..आज जाहिरात निघेल उद्या जाहिरात निघेल या आशेवर...

बातमीतील पाकिस्तान [ भाग 10]

इमेज
       मित्रानो आपल्या भारतात वाढत्या इंधनदारामुळे आणि संथ कोरोना प्रतिबंधात्मक लशींच्या संथ वेगामुळे समस्त भारत चिंतेत असताना आपल्या शेकजारील देश पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आपला प्रमुख शत्रू आहे तसेच तो आपल्या भारतात सातत्याने अशांतता पसरवत असल्याने त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या बदलांविषयी        तर मित्रांनो पाकिस्तानने चीनकडून आयात केलेल्या लोमाड या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून येणे, पाकिस्तान आणि तूर्कस्थान या दोन देशांना अमेरीकेकडून लहान बालकांचा सैन्यासी सबंधित कारवाईत वापर केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले जाणे, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घ्यालण्याचे पाकिस्तानचे उदिष्ट जाहिर केलेल्या कालावधीत पुर्ण न होणे, या गोष्टींमुळे पाकिस्तान सध्या चर्चेत आला होता.चला तर मग जाणून घेवूया ची घडामोडी विस्ताराने. तर पाकिस्तानने चीनकडून सन 2014साली लोमाड  हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतली. चीनने अन्य 17ते 18 देशांनी ही प्रणाली विकत घेण्यासाठी प्रयत्न...