पोस्ट्स

बातमीतील पाकिस्तान [भाग 11 ]

इमेज
      आपल्या भारतात  केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल , इंधनाचे वाढते दर  आणि या दरांमुळे वाढलेली महागाई , पावसाशी संबंधित  तसेच कोरोना लसीकरणाबाबत येणारी विविध आकडेवारी याच्या बातम्या माध्यमांमध्ये येताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 3 घडामोडी घडल्या . यातील दोन गोष्टी प्रत्यक्ष आपल्या भारताशी संबंधित आहेत तर एका गोष्टीशी त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहेत . त्यामुळे त्या गोष्टी  माहिती  अत्यावश्यक आहे .चला तर मग जाणून घेउया या त्या गोष्टींविषयी .    आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सुद्धा FATFच्या ग्रे यादीत टाकावे असी मागणी पाकिस्तानकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतात सुद्धा त्याचा पैसा दहशतवादासाठी वापरतो, असी सबब त्यासाठी पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानने सयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीतील कायमस्वरुपी सदस्यांकडे【P5】याबाबत मागणी केली आहे. लवकरच तो FATFकडे याबाबत तक्रार करेल.असी आशा आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञ करत ...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग2)

इमेज
     दोन दिवसापुर्वी माझ्या अफगाणिस्तानमधील तालीबानच्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना, काही जणांनी तालीबानच्या उदयाची पार्श्वभूमी माहिती करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी तालीबान मागची पुर्वपिठीका सांगणारी ही ब्लॉग पोस्ट . तर ज्या राजकीय अस्थिरतेमुळे अफगाणिस्तानात तालीबानचा उदय झाला, ती राजकीय अस्थिरता अफगाणिस्तानात तालीबानच्या उदय होण्याचा कितीतरी आधीच म्हणजे 1973 साली सुरू झाली. ज्यामध्ये अनेक घडामोडी घडत 1992च्या सुमारास तालीबानचा उदय झाला. गृहयुद्धानंतर 1996सप्टेंबर 26 या तारखेला काबूल तालीबानच्या हातात आले आणि अफगाणिस्तानचे सत्ताधीश तालीबान बनले, चला तर मग  जाणूया घेवूया हा घटनाक्रम.    1973 साली तत्कालीन राजा झाहीर शहा यांच्या सत्तेविरूद्ध त्यांचाच पंतप्रधान मोहमद्द दाऊद खान यांनी उठाव केला. (त्यावेळचे राजा झाहिर शहा हे नादीर शहा यांचे वंशज आहे. नादिर शहा यांनी 1771साली भारतावर आक्रमण केले होते. ज्या विरोधात मराठी भाषिक सैन्य भारतासाठी लढले होते.ज्याला आपण पानीपतचे तिसरे युद्ध म्हणतो) मोहमद्द दाउद खान यांनी राज्येशाही संपवून अफगाणी प्रजासत्त...

विलक्षण प्रतिभेचा, बहु आयामी , हळव्या मनाचा सिने दिग्दर्शक, सिने निर्माता..... गुरूदत्त

इमेज
    आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक, सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता, काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते. दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो. अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत्त .   अत्यंत हळव्या मनाचे, प्रतिभाशाली बहू आयामी सातत्याने नाविन्याचा ध्यास असणारे बाँलीवूडमधील सिने निर्माते सिने दिग्दर्शक म्हणून तै सुविख्यात आहेत.9जूलै ही त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. आज गुरुदत्त यांना आपल्यामधून जावून 50 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटला आहे. मात्र त्यांचे चित्रपट आज देखील काळजाला भिडतात, आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाच...

भयानक वास्तवाकडे वाटचाल

इमेज
आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रात अनेक राजकीय लाथ्या उथाळ्यांनी वातावरण भंडावून सोडले असताना भारताच्या पश्चिमेकडील एका देशात फार तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील जनता वेगाने मध्ययुगाकडे वाटचाल करत आहे. जर मध्ययुगात हा देश पुर्णतः पोहोचला तर त्याचे विपरीत परीणाम काश्मीर सह समस्त भारताला भोगावे लागतील. सध्या विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात येणाऱ्या बातम्यांचा विचार करता ही स्थिती येत्या काही आठवड्यात फार उशीराचा विचार केला तर महिन्यात येवू शकते.मात्र  टायटँनिक या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे जहाज बुडत असताना देखील शांतपणे संगीत वाजवण्यात दंग असलेल्या लोकांप्रमाणे भारतीयांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याने याबाबत आपणाकडे विचारमंथन करण्यात येत नाहीये.(तसा तो आपला राष्ट्रीय स्वाभाव आहे. भारताच्या इतिहासात आपणास अनेकदा त्याचे प्रत्यंतर दिसत) मी बोलत आहे अफगाणिस्तानविषयी. तिथे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या तालीबानी प्रभावाविषयी.  या वर्षी 1मे पासून अमेरीकन.सैन्य अफगाणिस्तानमधून टप्याटप्याने माघारी जात असताना तालीबानच्या ताब्यातील प्रदेश वाढत आहे. जूलै च्या पहिल्या आठवड्यापर्यत एक तृतीयांश अफगाणिस...

आयुष्यातील दुःखे सिनेमात सहजतेने दाखवणारा सिनेनिर्माता,दिग्दर्शक.....गुरुदत्त

इमेज
           आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात. आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात.  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके, सिने निर्माते, सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात. या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. 9जूलै ही त्यांची जयंती या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.         मानवी दुःखाना नाट्यमय कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर साकरणे, आणि त्यातून मनोरंजन करणे यामध्ये त्यांचा हात त्यांचा समकालीन दुसरा कोणीच धरु शकणार नाही. गुरुदत्त यांचे सर्व सिनेमे मुख्य धारेतील होते. आर्ट फिल्म प्रकारातील नव्हते, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या काहीसे मागे पडलेल्या मधूर भांडरकर यांची याबाबत काही प्रमाणात तूलना होवू शकते. कारण मधूर भांडरकर यांचे चित्रपट वास्तवदर्शी असले तरी  फारसे हृदयद्रावक नाहीत....

स्मरण ऐताहासिक उड्डीचे

इमेज
      जूलै महिना सुरु झाला की अनेक गोष्टींची आठवण होते,काही जणांना स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीची आठवण होते. काही जणांना लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांची आठवण होते.या अनेक महत्तवाचा घटनांपैकीच एक गोष्ट म्हणजे 8 जूलै ची स्वातंञ्यवीर सावरकरांची ती जगप्रसिध्द समुद्रातील उड्डी.   फ्रान्सचा किनारा जवळ आलेला आहे आपण पोहत फ्रान्स गाठले तर हे ब्रिटीश सरकार आपल्याया परदेशी भूमीवर अटक करू शकणार नाही काय म्हणावे?, या नियोजनाला माझ्याकडे शब्दच नाही या गोष्टीचे वर्णन करायला. मार्सेलीस या  ठिकाणी आर्यलंड मध्ये होमरुल चळवळ चालवणाऱ्या अँनी बेझंट यांचा मदतीने स्वातंञ्यवीर सावरकर  भुमीगत होऊन भारताच्या स्वातंञ्याची चळवळ पुढे नेणार होते. माञ दुर्दैवाने त्या सावरकरांना भेटू शकल्या नाहीत आणि फ्रान्सच्या भुमीवर असूनही ब्रिटीशांनी स्वातंञ्यवीर सावरकरांना अटक केली पुढचा ईतिहास सर्वाना माहीती आहेच.  माञ मला राहून राहून वाटते जर सर्व ठरवल्याप्रमाणेच घडले असते तर ? तर इतिहास फार वेगळ्या पध्दतीने लिहला गेला असता यात तिळमाञ शंका नाही असो इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात या जर तर...

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त  यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.     कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त     सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसत...