पोस्ट्स

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग8)

इमेज
   नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिककरांच्या तोंडाचे पाणी पळाले असताना, जगाचे पाणी मात्र अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तालीबानच्या प्रभावामुळे पळाले आहे.अफगाणिस्तानचे भवितव्य काय असू शकेल ? यावर विविध परीषदा सध्या होत आहे. दुष्यंते या शहरात झालेली शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन ची परराष्ट्र मंत्र्यांंची परीषद असो, अथवा उझबेकिस्तान ची राजधानी तास्कंद या ठिकाणी सध्या सुरु असलेली दक्षिण आणि मध्य आशियातील देशांची परीषद, सर्वत्र अफगाणिस्तानचाच विचार केला जात आहे.     तास्कंद येथील दक्षिण आणि मध्य आशियातील देशांच्या शिखर परीषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी जाहिरपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानात दहा हजार प्रशिक्षीत दहशतवादी सोडले असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्या सभागृहात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांचा जवळच बसले होते. आपला क्रमांक आल्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी पडला आहे. गेल्या 15 वर्षात पाकिस्तानात एक हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले आहेत, असे...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग7)

इमेज
         सध्या जगभरात एकच मुद्दा चर्चिला जात आहे  , तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान . जगातील विविध देश याबाबत आप आपली भूमिका जाहीर करत आहेत अफगाणिस्तानची तालिबान करत असलेल्या उभारणीत आपली भूमिका असावी या हेतूने विविध आघाडी उभारत आहे . यामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत . नुकतीच रशियाकडून नॉर्दन अलायन्स उभारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे.  तर अमेरिकेकडून,  अमेरिका उझबेकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची आघाडी उभारण्यात आली आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणशी ठाव ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रांनो 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रभाव फारशा वाढू नये या हेतूने रशिया अमेरीका , चीन भारत, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा एक गट कार्यरत होता .ज्यास नाँर्दन अलायन्स असे म्हणतात..हा गट त्यावेळी सक्रीय असल्याने तालीबानच्या सक्रिय कालावधीत सुद्धा अफगाणिस्तानचा उत्तरेकडील भागात तालीबानच...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग6)

इमेज
             सध्या जगात सर्वत्र मुद्यांवर विचारमंथन होत आहे तो मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानचे काय होणार  अफगाणीस्तानमध्ये तालिबान येणार हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले असताना त्याचे आपल्यावर काय परिणाम होणार याबाबत प्रत्येक देश विचार करत आहे . आपणदेखील लंकेत सूर्याचा विटा या प्रमाणे आपण या पासून अलिप्त राहू शकत नाही या घडामोडींचा आपल्या भारतावर देखील मोठा परिणाम होणार आहे   माझे आजचे तालिबानविषयक लेखन भारताला होणारे परिणाम सांगण्यासाठी .      मित्रानो भारतावर होणाऱ्या परिणामाचे आपण आर्थिक परिणाम आणि सरंक्षण विषयक असे दोन मुख्य प्रकारात विभाजन करू शकतो . पहिल्यांदा आर्थिक परिणाम बघूया . तर  भारताचे अफगाणिस्तानमध्ये विविध असे जवळपास 400 विकासकामे सुरु आहेत  ज्यामध्ये अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या  काबुल शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काबुल नदीवर धरण बांधणे अफगाणिस्तानमध्ये हैरात प्रातांत हिरा नदीवर समरकंद हे धरण बांधणे .  तसेच .अफगाणिस्तानला समुद्री मार्गाचा फायदा घेण्यात यावा म्हणून इराणच्या...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग5)

इमेज
सध्या आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन विविध मतमतांतरे मांडली जात असताना जगाचे लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रीत झाले आहे. ते म्हणजे अफगाणिस्तान आणि त्यातील तालीबान.       नुकतेच तालीबानचे प्रवक्ते सोहेल सलीन यांनी चीन तालीबानचा मित्र आहे. तालीबान कोणत्याच प्रकारे सिंकीयांग राज्यातील फुटीरतावाद्यांना मदत करणार नाही. आमचा अफगाणिस्तानवर संपुर्ण नियंत्रण आल्यावर अफगाणिस्तानचा विकास करण्यासाठी आम्हाला चीनची मदतच होईल, असा विश्वास वाटतो, असे  जाहिर केले आहे. अर्थात या मागे तालीबानला आर्थिक मदत तसेच जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळण्यात  चीनचे साह्य होवू शकते.हा स्पष्ट हेतू आहे. अफगाणिस्तानची 35किलोमीटर रुंद आणि 110किमी लांब असणाऱ्या वाखान काँरीडाँर मार्फत चीन आणि भारताबरोबर सीमा लागते. अफगाणिस्तान बरोबर चीनची सीमा सिकीयांग (काही ठिकाणी उच्चार झिकियांग म्हणून केला जातो) या मुस्लिम बांधवांची संख्या बहुसंख्येने असलेल्या प्रांताला लागून आहे. या प्रांतातील मुस्लिम बांधवांवर चीन अत्याचार करतो, असा पाश्चिमात्य देशांचा दावा आहे.सुमारे 72वर्षापुर्वी हा भाग चीनच्या अधिपत्याखाली आला. य...

भयानक वास्तवाकडे वाटचाल [भाग 4]

इमेज
        आजमितीस जगाचा विचार केला असता एकच  मुदा चर्चेत आहे तो म्हणजे अफगाणिस्तान .  दररोज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरशी आणि अफगाणिस्तानच्या सरकारची पीछेहाट या बाबतच्या  बातम्या अतंराष्ट्रीय माध्यमे सातत्याने  देत असतात .  समर्थ रामदास स्वामी यांच्या ''जे जे आपणशी ठाव ते ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण'' या उक्तीनुसार ते आपणापर्यत पोहोचवण्यासाठी  आजचे लेखन .  तर मित्रानो , अफगाणिस्तानच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर ताबा आलेल्या आणि दिवसोंदिवस तो मोठ्या प्रमाणात वाढत  असलेल्या तालिबानकडून तुर्की या देशाला कडक इशारा देत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे जर तुर्की अफगाणिस्तान हा देश सोडून न गेल्यास आम्ही त्यांच्यावर परदेशी लोकांचे स्वदेशावर आक्रमण असे समजून  हल्ला करू . यामध्ये होणाऱ्या नुकसानीस तुर्की लोकच  जवाबदार असतील असे तालिबानकडून जाहीर करण्यात येत आहे . शीतयुद्धाच्या वेळी त्यावेळेच्या कम्युनिष्ट प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने उभारलेली लषकरी संघटना म्हणजे नाटो. अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑ...

नैसर्गिक आपत्ती आणि आपण

इमेज
    सोमवार 12जूलै रोजी उत्तर भारतासाठी काळा दिवस ठरला. राजस्थानमध्ये  विविध ठिकाणी वीज कोसळून अनेक निष्पाप जीव प्राणास मुकले. तर हिमाचल प्रदेशातील धरमशाला परीसरात ढगफुटी होवून निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणास मुकलेल्या जीवांना प्रथमतः भावपुर्ण आदरांजली. तसेच या दुर्घटनांमध्ये आपले आप्तेष्ठ मित्रपरीवार तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या व्यक्तींना आपापले दुःख पचवण्याची ताकद इश्वर त्यांना देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना . सध्या आपल्या महाराष्ट्रात काही मान्सुमचा पाउस काही भागात मंदावला असला तरी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात त्याने बऱ्यांपैकी जोर धरला आहे.  सोमवारी घडलेल्या घटना त्याचेच प्रत्यंतर आहे.    प्रामुख्याने पावसाचा सुरवातीच्या काळात किंवा शेवटी वीज पडण्याचा घटना घडताना दिसतात. या काळात तप्त हवा आणि थंड हवा आकाशात एकमेकांना धडकतात. तप्त हवेचा दाब कमी  झाल्याने वर वर जाण्याचा प्रयत्न करतो तर थंड हवा दाब जास्त झाल्याने खाली येण्याचा प्रयत्न करते. यासर्व घडामोडीत ढगांमध्ये विद्युतप्रवाह निर्माण होतो. तो कसा होतो, याबाब...

भयानक वास्तवाकडे वाटचाल(भाग3)

इमेज
   सध्या आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कमी पावसामुळे चिंता निर्माण केली असताना जगात सुद्धा एक मोठी चिंता निर्माण होत आहे. ती चिंता आहे अफगाणिस्तानातील तालीबानचा वाढता प्रभाव. गेल्या आठवड्यापासून याबाबत 3 प्रमुख घडामोडी घडल्या. ज्यातील दोन भारताशी प्रत्यक्ष संबधीत आहेत, तर एक अप्रत्यक्ष संबधीत आहे. या सर्व घडामोडी एक जागरुक नागरीक आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या घडामोडी . तर अफगाणिस्तानातील भारताचा कान्सुलेट बंद करणार नाहीत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर होवून तीन ते चार दिवस होत नाही तोच रविवार11 जूलै रोजी सायंकाळी अफगाणिस्तानमधील भारताच्या कंदहार कान्सुलेटमधून 50 भारतीयांना माघारी बोलवल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आले.【 एखाद्या दूसऱ्या देशात आपल्या देशाचे पुर्ण अधिकार असलेले  राजनैतिक कार्यालय  असल्यास त्यास एँबसी म्हणतात. त्या ठिकाणी अँबेसिडर  हा अधिकारी असतो. याठिकाणी आपल्या देशात जाण्यासाठी लोकांना व्हिसा देणे ,आपल्या देशातील नागरीकांना मदत केंद्रे उभारणे तसेच अन्य परराष्ट्र संदर्भात कार्ये होतात. ...