पोस्ट्स

बातमीतील चीन (भाग 14 )

इमेज
             सध्या जगात अनेक घडामोडी घडत आहेत .ज्यामध्ये अफगाणिस्तानआणि तालिबान,  हवामान बदल आणि चीनविषयक घडामोड या प्रमुख बाबी आहेत . त्यातील अफगाणिस्तान आणि तालिबान , हवामान बदल याविषयी मी याआधीच बोललो आहे. मी आज बोलणार आहे ते चीनविषयी         तर मित्रानो चीनबरोबर तालिबानने केलेली चर्चा, चिनी राष्ट्रप्रमुखांनी  भारतीय सीमेजनिकच्या तिबेटला अनपेक्षितरित्या दिलेली भेट, आणि अफगाणिस्तानच्या प्रश्नावर रशियाने पहिल्यांदा चीन आणि अमेरिकेबरोबर उभारलेल्या  या समूहाचा विस्तार करताना कतार इराण पाकिस्तानबरोबर भारताचा केलेला  समावेश, तसेच अमेरिकी नौदलाबरोबर युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे इंग्लड या नावाने ओळखतात . मुळात युनाटेड किंग्डम या देशातील एक भाग म्हणजे इंग्लंड ) या देशाचा नौदलाने  आरमार चीनचा विरोध डावलून चीन आपला भूभाग म्हणणाऱ्या मात्र वादग्रस्त असणाऱ्या साऊथ चायना समुद्रात आपली विमानवाहू नौका तैनात करणे  यामुळे चीन प्रामुख्याने गेल्या काही दिवसात चर्चेत होता . आता बघूया एक एक घडा...

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि आपण! (भाग2)

इमेज
         नुकत्याच पाकिस्तान अनधिकृतपणे आपल्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या दक्षीणेचा भागात ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात तेथील विधानसभेच्या निवडणूका झाल्या. ज्यामध्ये पाकिस्तानात सध्या केंद्रीय सत्तेसह सिंध वगळता सर्व विधानसभेत सत्तेत असणाऱ्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला बहुमत मिळाले.  निवडून येणाऱ्या 45 सदस्यांमध्ये पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला 25 जागा मिळाल्या .(या विधानसभेची रचना मी आधीच्या भागात सांगितली आहेच) पाकिस्तान पिपल्स पार्टीला 11 तर सत्ताधिकारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नूर) ला 6 जागा मिळाल्या.       या निवडणूकांमध्ये लष्कराच्या मदतीने केंद्रीय सत्तेने गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यावर केंंद्रीय सत्तेपेक्षा प्रांतिक सत्ता अधिक मोठ्या प्रमाणात गैर प्रकार करु शकते.मात्र त्यांनी काहीच विकास त्यांचा कार्यकाळात न केल्याने लोकांनी आम्हाला सत्तेत बसवले असे उत्तर पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाने दिले आहे.               पाकिस्तानच्या सध्याचा सविधानानुसार...

अशांत पूर्वांचल

इमेज
आपल्या महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला असताना भारताच्या एका टोकाला असणाऱ्या दोन राज्यात अर्थात आसाम आणि मिझोराम  राज्यात  सीमेवरून वाद उफाळला आहे . सन 1972  साली आसाम राज्याचे  राज्याचे पुनर्गठन झाल्यापासून तीव्रता या प्रश्नातील दाहकता वाढली होती ,जिने गेल्या काही वर्षापसूम  गंभीर स्वरूप धारण केले आहे . मी या आधी याच ब्लॉग  मधून  समस्येविषयी लिहले होते . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या लिंकवर क्लिक करावे .  सध्या या समस्येने अत्यंत हिंसक स्वरूप दाखल केले आहे  आसाम राज्यात . 10 जुलैपासून सुरु असलेल्या या ताज्या संघर्षात  सर्वप्रथम  10  जुलै रोजी आसाम मिझोराम यांच्या सीमावर्ती  भागात मात्र आसाम राज्यात  एक छोटासा बॉम्ब ब्लास्ट झाला दुसऱ्याच दिवशी अर्थात11   जुलै रोजी सीमावर्ती भागाच्या मिझोराम  राज्यात बॉम्बब्लास्ट झाला याबाबत दोन्ही राज्यांनी विरोधी राज्याला जवाबदार धरले 24 जुलैच्या मध्यरात्री आसाम राज्य पोलिसांनी मिझोरामच्या प्रदेशात घुसून तेथील नागरिकांवर अत्या...

नाशिकरांची मान उंचावणारे बुद्धिबळपटू

इमेज
           आज हा मजकूर लिहीत असताना (26जुलै ) स्मार्ट सिटीच्या कामामुळे,  लांबलेल्या पावसामुळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या अनुपलब्धतेमुळे सर्वसामान्य नाशिककर  पिचला गेलेला असताना दोन नाशिकर खेळाडू बुद्धिबळाच्या क्षेत्रात जगभरात नाशिकचे नाव उंचावत आहेत ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  महिला इंटरनॅशनल  मास्टर प्रचिती चंद्रात्रे हे दोन ते हिरे .त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात नाशिकचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन . एक नाशिकर म्हणून मला त्यांचा  सार्थ अभिमान वाटतो .        प्रचिती चंद्रात्रे  यांनी नुकतीच 17  वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी असणारी अशियन चेस चॅम्पियनशिप  रौप्य  पदक मिळवत जिंकलेली आहे .  सर्वप्रथम जिल्हा पातळीवर स्पर्धा जिंकत  त्यानंतर राज्य पातळीवरील स्पर्धा आणि  देशपातळीवरील विजयाचा रथ तसाच ठेवत भारताचे  शालेय स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले . आणि आशियाई स्पर्धेत ही विजयश्री खेचून आणली         ग्रँडम...

नाशिकच्या आदिवासी भागातील दुर्लक्षित गड वाघेरे

इमेज
       आपल्या महाराष्ट्राला डोंगरी किल्यांची मोठी परंपरा आहे  अनेक डोंगरी किल्ले सह्याद्रीच्या कुशीत आहे .काही किल्ले त्याच्यावर मोठ्या घडामोडी झाल्याने विशेष प्रसिद्ध आहेत जसे नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेला रामशेज किल्ला . जो त्यावर झालेल्या युद्धासाठी विशेष प्रसिद्ध आहेत  तर काही डोंगरी किल्ले काहीसे दुर्लक्षित आहेत .अशाच नाशिकपासून जवळच असलेला मात्र फारशा प्रसिद्ध किल्ला म्हणजे वाघरे किल्ला . मी जुलै महिन्यातील अखेरच्या रविवारी या किल्ल्याला  नाशिकमधील वाहतूक सुरक्षा, सह्याद्री बचाव आदी विविध सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणाऱ्या गरुडझेपेच्या दुर्गप्रेमींच्या सहकार्याने भेट दिली . पावसाच्या साथीने झालेल्या या दुर्गस्वारीचा अनुभव मनप्रसन्न करणारा होता .      नाशिकमधील आदिवासी भागातील त्रंबकेश्वर पेठ तालुक्याचा सीमेवरील मात्र प्रशासनाच्या दृष्टीने त्रंबकेश्वर तालुक्यतात असणाऱ्या या किल्यावर नाशिकहून दोन वेगवेगळ्या मार्गाने जाता येते . नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे गावातून हरसूलला जाणाऱ्या रस्त्यामार्गे आणि ना...

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि भारत

इमेज
    येत्या रविवारी अर्थात 25 जूलै रोजी पाकिस्तानने अनधिकृतरीत्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधील दक्षीण भाग ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात ( पाकव्यात काश्मीरच्या उत्तरेच्या भागाला आतापर्यत पाकिस्तान आतापर्यत फेडरली अँडमिस्टर्ड नाँर्दन एरीया अर्थात फाना म्हणत असे आता गिलगीट बाल्टीस्तान असे म्हणतो.) या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. भारताने या निवडणूका जाहिर झाल्या त्या वेळीच सदर भुभाग आमचा असल्याने पाकिस्तानकडून या प्रदेशात घेण्यात आलेल्या निवडणूका बेकायदेशीर आहे.असे जाहिर केले आहे【गेल्या वर्षीच गिलगीट बाल्टीस्तान भागात विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या . ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंन्साफ या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या    याही निवडणूका भारताने बेकायदेशीर ठरवल्या होत्या   】पाकव्याप्त काश्मीरच्या भाग असलेल्या आझाद काश्मीर च्या विधानसभेच्या एकुण 53 जागा आहेत . त्यातील 45 जागांवर मतदान होणार आहेत. या 45 जागांपैकी 33 जागा या आझाद काश्मीरमधील आहेत. 12 जागा या आपल्या जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात विविध  ...

हे निसर्गा तूला झाले तरी काय ?

इमेज
    सध्या जगभरात निसर्गाने आपल्याला रौद्रस्वरुप दाखवून देण्याचा चंग बांधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी स्थिती आहे. आतापर्यतचे दक्षीण आशियातील सर्वाधिक अर्थात 52अंश सेल्यीयस तापमान पाकिस्तानातील जाकोदाबाद येथे नोंदवण्यात आल्यानंतर निसर्गानै रौद्ररुप दाखवण्यास सुरवात केली. ज्या देशातील एक तूर्तीयांश भाग ध्रुवीय प्रदेशात मोडतो त्या.कँनडातील.ब्रिटिश कोलंबिया या राज्यात 49.5 अंश सेल्यीयस तापमान नोंदवले गेले. उष्माघाताच्या या नाट्यानंतर निसर्गाच्या रौद्ररुपाचा पावसाचा अंक सुरू झाला आहे. आजमितीस पावसामुळे आपल्या महाराष्ट्रासह, पश्चिम युरोप आणि चीनमध्ये जनजीवन पुर्णतः उद्धवस्त केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि पश्चिम युरोपातील पावसाविषयी मी या आधीच सांगितले आहे. आता बघूया चीनमधील पावसाविषयी.      तर मित्रांनो, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम मध्य चीनमधील हेनास या प्रांतात पावसाने अक्षरशः नंगा नाच सुरु करण्यासारखी परीस्थिती आहे. वर्षभरातील एकुण पाउसाइतके पर्जन्य फक्त 3दिवसात झाल्याने हेनास  या प्रांतातील या झिंगझावू शहरात  भयानक स्थिती निर्माण झ...