पोस्ट्स

ऑस्ट्रोलीया भारताचा नवा साथीदार

इमेज
                    भारताचा सध्या जागतिक राजकारणात दबदबा वाढत आहे , याची साक्ष देणाऱ्या दोन घडामोडी नुकत्याच घडल्या .दोन्ही घडामोडीत भारताचा साथीदार ऑस्ट्रोलीया हा देश होता . ऑस्ट्रोलीया  भारताबरोबर कॉमनवेल्थ नेशनचा सदस्य ,तसेच सध्या अमेरिका देशाच्या नेतृत्वात चीनविरोधी उदयास आलेल्या क्याड या आघाडीचा भारतासह सदस्य असणारा सदस्य देश , आणि  क्षेत्रफळानुसार जगात  पाचव्या क्रमांकाचा मोठा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात असणारा मात्र भारताने सीटीबीटी आणि एनपीटी या करारावर सही ना केल्याने भारताला युरेनियम देण्यास नकार देणारा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया.  त्या ऑस्ट्रलिया देशाने भारताला महत्व देत असल्याचे दोन घडामोडीतून दिसले . त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन त्यातील एक घडामोड भारताच्या सांस्कृतिक वारस्याविषयी आहे . तर दुसरी घडामोड लष्करी सामर्थ्याविषयी आहे . पहिल्यांदा सांस्कृतिक वारस्याविषयीची घडामोड बघूया ,        तर भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वा...

कवितेची पंचवीसी !

इमेज
     काही दिवसात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु होईल. त्यानिमित्ताने विविध उपक्रम सध्या देशभरात सुरु आहेत. या सर्व धुमाळीत एका कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज यांनी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरु असताना एका दैनिकाचा दिवाळी अंकासाठी लिहलेली कविता जी पुढे शिधापत्रीकेवर सुद्धा झळकली आणि घराघरात पोहोचली. फटका या काव्यप्रकारातील ही कविता स्वातंत्र्यदेवता आपणास संबोधित करत आहे, असे समजून लिहली होती. आज या कवीतेस सुमारे 25 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मी बोलत आहे  'स्वातंत्रदेवतेची विनवणी' असी नाव असलेली " पन्नासीची उमर गाठली, अभिवादन मज करु नका , मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका" या कवितेबाबत.                   या कवितेत काही धोके सांगण्यात आले होते . भष्ट्राचार, महिलांविषयीचा  नकारात्मक दृष्टिकोन,  हुंड्याची लोकांना असलेली आवड, मराठीची दयणीय स्थिती,  चांगल्या कामासाठी लोकांनी एकत्र न येणे, करमणूकीच्या सबबीखाली तरुणाईची शक्ती नष्ट होणे, विविध स्मारके, ...

गिलगीट बाल्टीस्तान, भारत पाक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू

इमेज
        आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथ्याळ्यांचा बातम्यांमुळे माध्यमांचे मथळे आणि हेडलाईन्स सजलेल्या असताना भारत आणि पाकिस्तानात यांच्या सबंधावर परीणाम करणारी एक मोठी घडामोड सध्या वेगाने घडत आहे ,जी पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागासी सबंधित आहे.  ज्यामुळे काश्मीर बरोबर भारत पाक संघर्षाचा नवा बिंदू उदयास येवू शकतो.       तर 2020 नोव्हेंबर 1 रोजी पाकव्याप्त काश्मीर मधील  गिलगीट बाल्टीस्तान हा भाग आपला तथाकथीत स्वातंत्र्यदिन (?) साजरा करत असताना पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने मुझ्झफराबाद येथे जाहिर केल्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान या भागास पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनवण्यासाठी आवश्यक असणारा मसुदा तयार करण्यात आला आहे.  जो आता तेथील केंद्रीय विधीमंडळापुढे मांडण्यात येईल. तिथे मंजूर झाल्यावर पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान अस्तित्वात येईल, असे वृत्त द हिंदूने आणि बिबिसीने दिले आहे.       भारताने या बातमीवर अद्याप अधिकृत म...

73 वर्षाची यशस्वी परंपरा!

इमेज
    भारताच्या 74वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. त्यानिमित्ताने आतापर्यत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा माध्यमांकडून घेण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय अणूउर्जा आयोगाचे नाव घ्यावेच लागेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष पुर्ण होण्याचा आत अर्थात 1948 आँगस्ट 10 रोजी भारतीय अणूउर्जा आयोगाची उभारणी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहारलाल नेहरु यांच्या नेर्तृत्वाखाली, डाँक्टर होमी भाभा यांंनी केली होती. त्यानंतर शस्त्रात्र निर्मिती साठी अणू उर्जेचा वापर न करता शांततेसाठी अणू उर्जा या तत्वाचा अवलंब करत भारतीय  अणू उर्जा विभागाची घौडदौड सुरू झाली. जी आजपण सुरु आहे.कँन्सर सारख्या व्याधींचे निदान करणे, धातूच्या जोडकामातील दोष शोधणे, उर्जानिर्मितीसाठी, तसेच औद्योगिक कामासाठी अणू तंत्रज्ञानाचा वापर करणे ही उदिष्टे भारतीय अणूउर्जा आयोगाची आहे.      आजमितीस भारताने NPT आणि CTBT या करारांवर सही केलेली नाही. मात्र तरी देखील भारताला अणू उर्जा क्षेत्रात जवाबदार धरलं जात.पाकिस्तानच्या अणूशास्त्रज्ञ सारख बेजावबदारपणा भारतातील कोणीही करणार नाही (पाकिस्तानच्या अण...

वंदन त्यांचा बलीदानास !

इमेज
                         आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.खलीस्तान आंदोलनानंतर पंजाब शांत होत होता . तो आँगस्ट मधील रविवार होता. तारीख होती 10 आँगस्ट 1986 .पुणे शहरातील कँम्प भागात अचानक गोळीबार होतो.दुचाकीवरुन आलेल्या  दोन व्यक्ती घरासाठी भाजी घेवून  जाणाऱ्या   कारमधील दोन जणांना गोळ्या घालून पसार होतात. गोळीबारामुळे दोघांचाही मृत्यू होतो . आणि इतिहासात नोंद होते. दोन वर्षापुर्वी 1984 जून 3 रोजी झालेल्या आँपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची खलीस्तानवादी अतिरेक्यांनी हत्या केली. या गोळीबारात माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मानेत आणि पाठीत एकुण 8 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू होतो. तर त्यांचा अंगरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .                     आज 2021 साली त्यांच्या हौताम्यास 35 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांनी भारताच्या एकात्मेतेसाठी आपल...

वंदन लोकशाहीराला

इमेज
    त्या व्यक्तीने फक्त दीड दिवस शाळा शिकली मात्र मराठीतील एक वास्तवदर्शी तळागाळातील लोकांचे लोकांच्या व्यथा योग्य प्रकारे मांडणारे लेखक म्हणून ते परिचित आहे . त्यांनी त्यांच्या 49 वर्षाच्या आयुष्यात तब्बल 35 कादंबरी लिहल्या . त्यांनी लिहलेल्या लोकनाट्य आणि कथा संग्रहाचा तसेच काव्यसंग्रहाचा  विचार केला त्यांनी लिहलेल्या पुस्तकांची संख्या 45 पर्यंत पोहोचते . त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवर 7 चित्रपट आलेले आहेत त्यांना जी राजकीय  विचारधारा मान्य होती त्या कम्युनिष्ट विचारधारेच्या प्रेमापोटी त्यांनी रशियाला भेट दिली . त्या प्रवासावर आधारित त्यांनी लिहलेले प्रवासवर्णन प्रसिद्ध...

बातमीतील चीन( भाग15)

इमेज
        काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चीनने पुन्हा आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकण्यास सुरवात झाली आहे. त्यातील 4 घडामोडी आपण काल बघीतल्या . आज बघूया तीन घडामोडी       तर मित्रांनो, चीनी बंदर प्राधिकरणाने भारतीय नागरीकत्व असणाऱ्या खलाश्यांवर बंधने घातली असल्याबाबतचे वृत्त, चीनने आँल्मपिकचे प्रक्षेपण करत आसताना अमेरीकेच्या कंपनीने केलेल्या खोडसाळपणावर घेतलेला आक्षेप,  आणि भारताच्या चीफ आँफ डिफेन्स स्टाफ  बिपिन रावल यांनी म्यानमारचा संदर्भात चीनबाबत केलेले विधान यामुळे चीन सध्या चर्चेच्या प्रथमस्थानी आला होता. आता बघूया या  घडामोडी विस्ताराने.  पहिल्यांदा चीन बंदर प्राधिकरणासंदर्भातील बघूया. तर जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात जवळपास 95% व्यापार होतो तो समुद्रमार्गाने. यामालाची ने आण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत【त्यातील प्रसिद्ध कंपनी म्हणजे मर्स्क होय. जीचे कंटेनेर आपण रस्त्यावर अनेकदा बघतो,( मर्स्क ही कंपनी कोणतेही उत्पादन तयार करत नाही तर स्वतःच्या मालकीच्या कंटेनेर मधून इतरांच्या मालाची ने आण करते)] या कंपन्या समुद्रातू...