पोस्ट्स

आपल्या एसटीमध्ये हे बदल कधी दिसतील ?

इमेज
    सध्या जग मोठ्या प्रचंड गतीने बदलत आहे .ज्याला आपल्या भारतातील विविध राज्य परिवहन महामंडळे देखील अपवाद नाहीत . नुकतेच गोवा  राज्याचा परीवहन महामंडळाकडून ( जे कदंब नावाने प्रसिद्ध आहे)  आणि गुजरात राज्याचा परीवहन महामंडळ  राज्याच्या परिवहन महामंडळाकडून दोन मोठे बदल करण्यात आले. त्यातील गोवा सरकारकडून त्यांचा परीवहन महामंडळात करण्यात येणारा बदल आपल्या महाराष्ट्राचा परीवहन सेवेत करावा, यासाठी खुप आधीपासून आपल्या एसटीमध्ये सुरु आहेत. मात्र आपल्या नंतर येवून गोव्याने यामध्ये बाजी मारली आहे         तर गोवा राज्य परीवहन महामंडळाकडून इलेट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. गोवा राज्यातील म्हापसे या बस स्थानकावर त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे . या बस स्थानकातून गोव्यात आणि शेजारील कर्नाटक राज्यात बेळगाव निपाणी भागात बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा एसटी प्रशासनाची महाराष्ट्रात सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुद्धा  इलेक्ट्रीक एसटी बस सेवा सुरु करण्याची तयारी होती. मात्र महाराष्ट्राने त्यास नकार दर्शवला असे प्रतिपादन गोव्याचे परीवहन मंत्र...

दर 65 मिनिटात एक ........

इमेज
                राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे नुकतीच सन 2017 ते 2019या तीन वर्षात किती तरुणांनी आत्महत्या केली याची आकडेवारी जाहीर करण्यात आली  ती अत्यंत भयानक आहे या तीन वर्षात  24हजार तरुणांनी आत्महत्या केल्याची नोंद   राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे . ही आकडेवारी देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या  आत्महत्येच्या गुन्ह्यांची आहे . आपल्या भारतात होणाऱ्या सर्व आत्महत्येची नोंद पोलीस ठाण्यात होत असेल असे मला तरी वाटत नाही . अनेकदा घरातून पळून गेल्याने हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात होण्याची मात्र संबंधित त व्यक्तीने आत्महत्या केले असण्याची आणि काही कारणाने ते प्रेत न सापडल्याची किंवा त्या मृत्यूची नोंद अपघाताने अज्ञाताचा मृत्यू म्हणून होण्याची शक्यता सुद्धा आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे आपण राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागाची आकडेवारी योग्य  मानली तरी ही आकडेवारी मोठी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही तीन वर्षात 24हजार म्हणजे वर्षाला 8 हजार . दिवसाला 22 क...

ऑस्ट्रोलीया भारताचा नवा साथीदार

इमेज
                    भारताचा सध्या जागतिक राजकारणात दबदबा वाढत आहे , याची साक्ष देणाऱ्या दोन घडामोडी नुकत्याच घडल्या .दोन्ही घडामोडीत भारताचा साथीदार ऑस्ट्रोलीया हा देश होता . ऑस्ट्रोलीया  भारताबरोबर कॉमनवेल्थ नेशनचा सदस्य ,तसेच सध्या अमेरिका देशाच्या नेतृत्वात चीनविरोधी उदयास आलेल्या क्याड या आघाडीचा भारतासह सदस्य असणारा सदस्य देश , आणि  क्षेत्रफळानुसार जगात  पाचव्या क्रमांकाचा मोठा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात असणारा मात्र भारताने सीटीबीटी आणि एनपीटी या करारावर सही ना केल्याने भारताला युरेनियम देण्यास नकार देणारा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया.  त्या ऑस्ट्रलिया देशाने भारताला महत्व देत असल्याचे दोन घडामोडीतून दिसले . त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन त्यातील एक घडामोड भारताच्या सांस्कृतिक वारस्याविषयी आहे . तर दुसरी घडामोड लष्करी सामर्थ्याविषयी आहे . पहिल्यांदा सांस्कृतिक वारस्याविषयीची घडामोड बघूया ,        तर भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वा...

कवितेची पंचवीसी !

इमेज
     काही दिवसात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु होईल. त्यानिमित्ताने विविध उपक्रम सध्या देशभरात सुरु आहेत. या सर्व धुमाळीत एका कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज यांनी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरु असताना एका दैनिकाचा दिवाळी अंकासाठी लिहलेली कविता जी पुढे शिधापत्रीकेवर सुद्धा झळकली आणि घराघरात पोहोचली. फटका या काव्यप्रकारातील ही कविता स्वातंत्र्यदेवता आपणास संबोधित करत आहे, असे समजून लिहली होती. आज या कवीतेस सुमारे 25 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मी बोलत आहे  'स्वातंत्रदेवतेची विनवणी' असी नाव असलेली " पन्नासीची उमर गाठली, अभिवादन मज करु नका , मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका" या कवितेबाबत.                   या कवितेत काही धोके सांगण्यात आले होते . भष्ट्राचार, महिलांविषयीचा  नकारात्मक दृष्टिकोन,  हुंड्याची लोकांना असलेली आवड, मराठीची दयणीय स्थिती,  चांगल्या कामासाठी लोकांनी एकत्र न येणे, करमणूकीच्या सबबीखाली तरुणाईची शक्ती नष्ट होणे, विविध स्मारके, ...

गिलगीट बाल्टीस्तान, भारत पाक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू

इमेज
        आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथ्याळ्यांचा बातम्यांमुळे माध्यमांचे मथळे आणि हेडलाईन्स सजलेल्या असताना भारत आणि पाकिस्तानात यांच्या सबंधावर परीणाम करणारी एक मोठी घडामोड सध्या वेगाने घडत आहे ,जी पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागासी सबंधित आहे.  ज्यामुळे काश्मीर बरोबर भारत पाक संघर्षाचा नवा बिंदू उदयास येवू शकतो.       तर 2020 नोव्हेंबर 1 रोजी पाकव्याप्त काश्मीर मधील  गिलगीट बाल्टीस्तान हा भाग आपला तथाकथीत स्वातंत्र्यदिन (?) साजरा करत असताना पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने मुझ्झफराबाद येथे जाहिर केल्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान या भागास पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनवण्यासाठी आवश्यक असणारा मसुदा तयार करण्यात आला आहे.  जो आता तेथील केंद्रीय विधीमंडळापुढे मांडण्यात येईल. तिथे मंजूर झाल्यावर पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान अस्तित्वात येईल, असे वृत्त द हिंदूने आणि बिबिसीने दिले आहे.       भारताने या बातमीवर अद्याप अधिकृत म...

73 वर्षाची यशस्वी परंपरा!

इमेज
    भारताच्या 74वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. त्यानिमित्ताने आतापर्यत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा माध्यमांकडून घेण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय अणूउर्जा आयोगाचे नाव घ्यावेच लागेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष पुर्ण होण्याचा आत अर्थात 1948 आँगस्ट 10 रोजी भारतीय अणूउर्जा आयोगाची उभारणी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहारलाल नेहरु यांच्या नेर्तृत्वाखाली, डाँक्टर होमी भाभा यांंनी केली होती. त्यानंतर शस्त्रात्र निर्मिती साठी अणू उर्जेचा वापर न करता शांततेसाठी अणू उर्जा या तत्वाचा अवलंब करत भारतीय  अणू उर्जा विभागाची घौडदौड सुरू झाली. जी आजपण सुरु आहे.कँन्सर सारख्या व्याधींचे निदान करणे, धातूच्या जोडकामातील दोष शोधणे, उर्जानिर्मितीसाठी, तसेच औद्योगिक कामासाठी अणू तंत्रज्ञानाचा वापर करणे ही उदिष्टे भारतीय अणूउर्जा आयोगाची आहे.      आजमितीस भारताने NPT आणि CTBT या करारांवर सही केलेली नाही. मात्र तरी देखील भारताला अणू उर्जा क्षेत्रात जवाबदार धरलं जात.पाकिस्तानच्या अणूशास्त्रज्ञ सारख बेजावबदारपणा भारतातील कोणीही करणार नाही (पाकिस्तानच्या अण...

वंदन त्यांचा बलीदानास !

इमेज
                         आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.खलीस्तान आंदोलनानंतर पंजाब शांत होत होता . तो आँगस्ट मधील रविवार होता. तारीख होती 10 आँगस्ट 1986 .पुणे शहरातील कँम्प भागात अचानक गोळीबार होतो.दुचाकीवरुन आलेल्या  दोन व्यक्ती घरासाठी भाजी घेवून  जाणाऱ्या   कारमधील दोन जणांना गोळ्या घालून पसार होतात. गोळीबारामुळे दोघांचाही मृत्यू होतो . आणि इतिहासात नोंद होते. दोन वर्षापुर्वी 1984 जून 3 रोजी झालेल्या आँपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची खलीस्तानवादी अतिरेक्यांनी हत्या केली. या गोळीबारात माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मानेत आणि पाठीत एकुण 8 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू होतो. तर त्यांचा अंगरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .                     आज 2021 साली त्यांच्या हौताम्यास 35 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांनी भारताच्या एकात्मेतेसाठी आपल...