पोस्ट्स

जरी एसटी वाल्यांचा अश्रू पुसायास आले!

इमेज
      हे लिहीत असताना आज (25आँगस्ट) महाराष्ट्रात राजकीय बातम्यांचा महापूर माध्यमातून वहात असताना महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग उद्याची चूल कशी पेटवायची? या विवंचनेत आहे.आपल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे कर्मचारी अधिकारी हाच तो वर्ग. आँगस्ट महिना संपायला आला आहे. मात्र तरीही त्यांचे जूलै महिन्यांचे पगार झालेले नाहीत.कारण आपल्या एसटीकडे पगार करायला पैसेच नाहीत, आणि ही पहिल्यांदाच येत आहे, असे नाही, आपल्या एसटीवर ही सातत्याने येत आहे. काही डेपोच्या सेवा डिझेल नसल्याने बंद कराव्या लागत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते जरी एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसायास आले, तरी जन्म काही कामास आला!      आपल्या एसटी महामंडळावर ईतकी विपन्नावस्था येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जे मी सातत्याने मांडतोय ते म्हणजे इतर राज्यांच्या एसटी आपल्या महाराष्ट्रातील एसटीचे करत असलेले शोषण. पुर्वी अनेक गावातील भिंतीवर अमूक रोगाचा रुग्ण दाखवा हजार रुपये मिळवा अस्या जाहिराती असत त्याच प्रमाणे महाराष्टातील असा तालूका दाखवा जिथे इतर राज्यातील एसटी येत नाही, दहा हजार रुपये मिळवा असी य...

भारत युके संबंध नव्या वळणावर !

इमेज
             सध्या आपल्या भारताचे अन्य राष्ट्रांबरोबरचे असणारे संबंध नव्या वळणावर आहेत याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत आणि युनाटेड किंग्डम या देशांमध्ये घडली . युके  असे संक्षिप्त नाव असणाऱ्या या देशाला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लड असे म्हणतात वास्तविक युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड असे पूर्ण नाव असणाऱ्या या देशातील  चार भागांपैकी एक भाग म्हणजे इंग्लंड होय असो              तर मित्रानो सन 2004 पासून नित्यनियमाने भारतीय नौदल दल आणि युकेची रॉयल नेव्ही यांच्यामध्ये होणारी  कोकण एक्सरसाईज नुकतीच इंग्लिश चॅनेल या भागात झाली,  युके आणि फ्रांस या दोन देशांमध्ये असणाऱ्या खाडीला इंगलीश चॅनेल म्हणतात (दोन भूभागाच्या मध्ये आणणाऱ्या  अरुंद पाण्याचा पाण्याला किंवा  म्हणतात ) या वर्षी झालेल्या कोकण एक्सरसाईजमध्ये भारताकडून आयएनएस तब्बर आणि युनिटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड या देशाकडून एचएमएस  वेस्टमिनिस्टर या दोन युद्धदनौकानदाम्यान झाली य...

अमेरिकेत वादळाचा प्रकोप !

इमेज
                    एकदा संकटे येण्यास सुरवात झाली की , एकामागून एक येतच राहतात त्यांची एकप्रकारची मालिकाच तयार होते  आपल्याकडे म्हणतात . याचाच अनुभव सध्या अमेरिकन घेत आहेत . आधी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रचंड असे  तापमान आणि वणवे  लागल्यावर आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर निसर्ग त्याचा रुद्रावतार दाखवत आहे . हा मजकूर लिहीत असताना ( 23 ऑगस्ट सायंकाळ ) रोजी हेन्री या हरिकेने अमेरिकेच्या मुख्य भूमीवरील ईशान्य दिशेच्या सात राज्यातील प्रशासनाची झोप उडवली आहे एबीसी या ऑस्ट्रोलिअन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या हरिकेनमुळे तब्बल एक लाख लोक विद्युत पुरवठ्यापासून दूर आहेत हरिकेन जमिनीवर आदळायच्या आधीच तासात 5 सेमी इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . तर ताशी  60 मैल वेगाने वारे वाहत आहे , बऱ्याच ठिकाणी झाडे  उन्मळून पडली आहेत अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागत आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे त्यामुळे अनेक कार रस्त्यातच बंद पडत आहे. काही राज्यात राज्यस्तरीय आणीबाणी जा...

( बातमीतील चीन भाग 16)

इमेज
              काही  विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चीन बातम्यांचा अग्रभागी येण्यास सुरवात झाली आहे  गेल्या आठवड्याभरत चीन विषयी तीन मोठ्या घडामोडी घडल्या . चीन आपला  शत्रू आहे . पाकिस्तान चीनच्याच मदतीने आपल्या भारतविरोधी कारवाया करत असतो .त्यामुळे आर्य चाणक्य नीतीनुसार तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे  समर्थ रामदास स्वामी यांच्या  आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे  उक्तीनुसार त्याविषयी पंस अवगत करण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रानो तैवानच्या मुद्यावरून चीन आणि युरोप खंडातील एक देश असणाऱ्या लिथिनवेनिया या देशाबरोबरचे आर्थिक संबंध अडचणीत येणे चीनने युनाटेड अरब अमिरात (UAE ) या देशात एक ब्लॅक साईट  तयार केल्याचे  ठिकाणी उघर मुस्लिम बांधवाना ठेवल्याचे स्पष्ट होणे आणि सिपेक च्या कामासाठी पाकिस्तानातील ग्वादार या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ला होणे या त्या घटना आहेत आता बघूया या घडामोडी विस्ताराने             पहिल्यांदा  लिथिनवे...

महाराष्ट्राची एसटी बदलताना .........

इमेज
               कोणी तिला लालडब्बा म्हणून हिणवते कोणी तिला यस्टी म्हणते,  कोणी तिला एसटी म्हणते तर कोणी तिला लालपरी म्हणते तर कोणी  सरकारी बस म्हणते मात्र ती सर्वांना सारखीच सेवा देते ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस . अर्थात आपली एसटी . हवामान काहीही असो , बाहेरची स्थिती शांततामय असो किंवा तणावपूर्ण असो प्रवाशी संख्येचा विचार ना करता विहिरवेल्स ती प्रवाश्याना आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाते , या करोनकाळात सुद्धा ती  काळ विश्रांती घेऊन अविरत धावतच होती करोना काळात आपल्या सर्वांच्या आर्थिक उत्पनावर जसा परिणाम झाला तसा  एसटीवर देखील झाला एसटीच्या उत्पनाचे प्रमुख साधन असलेली प्रवाशी संख्या रोडवल्यावर एसटीने आपल्या उत्पनाचे  नवीन मार्ग शोधले त्या नवीन मार्गाची माहिती देण्यासाठी आजचे लेखन  या उपायांपैकी काही उपाय यशस्वी ठरले तर काही तितकेसे प्रभावी ठरले नाहीत उत्पन्नवाढीबरोबरच एसटीने प्रवाश्याना चांगली सेवा देण्यासाठी काही बदल पण केले चला तर जाणून घेउया या बदलाविषयी        उत्पन्न वाढीस...

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

इमेज
 20 ऑगस्ट 1944 हि निव्वळ तारीख नाहीये . ही तारीख आहे आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या  देशाला कित्येक वर्ष पुढे घेऊन जाणाऱ्या  एका कणखर पंतप्रधानाची.   राजीव गांधी  हे त्या पंतप्रधानाचे नाव . आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की  दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस मी असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडणे यात काही वावगे असे काही नाही . जगभरात असेच झाले आहे . भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या आफ्रिकी आणि आशियाई देशांच्या लोकशाहीची वाटचाल आपल्या भारताच्या लोकशाही सारखीच झाली आहे . असो  राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड...

सावधान वणवा पसरतोय ....... !

इमेज
               आपल्या भारतातील जवळपास सर्वच माध्यमे अफगाणिस्तान तालिबानविषयक बातम्या दाखवण्यात मग्न असताना हे संकट कमी वाटावे असे एक संकट पश्चिम युरोप आणि उत्तर आफ्रिका, आशिया खंडाचा अति ईशान्येकडील भाग  या भूभागात घोंगावत आहे . ते आहे प्रयत्नांची शर्थ करून देखील विझता न  विझणारी वणव्याची मालिका . मी आपणास तुर्की आणि ग्रीस मधील वणव्याविषयी पंधरा दिवसापूर्वी सांगितले होतेच.  ती आग अजूनही पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही.  उलट भूमध्य समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ती अजून वेगाने पश्चिमेकडे पसरत आहे हा लेख लिहीत असताना ( 18 ऑगस्ट सायंकाळ ) ही  आग भूमध्य समुद्राला लागून असणाऱ्या अल्जेरिया (आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाने पहिल्या क्रमांकावरचा देश ) मोरोक्को , या आफ्रिका खंडातील देशांबरोंबर युरोप खंडातील इटली , फ्रांस स्पेन पोर्तुगाल या देशात पसरलेली  आहे जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या DW या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार आतापर्यंत या वणव्याने सुमारे 4000 हेक्टर जमिनीवरील जंगले राखेच्या डोंगरात परिवर्तित केल...