पोस्ट्स

28 वर्षापूर्वीची ती काळरात्र

इमेज
.          दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी केली  .या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 28 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच.   लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे       मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 28वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असले...

छोटे टूमदार शहर संगमनेर

इमेज
                आपण अनेकदा आपला प्रदेश सोडून अन्य क्षेत्रात पर्यटनास जातो जसे भारतातील लोक युरोप आणि अमेरिकेत पर्यटनास जातात . आपलाच प्रदेश आहे आपण कधीही जाऊ शकतो या गैरसमाजातून खूप लोक जगात अन्य प्रदेश मोठ्या प्रदेशात बघतात , मात्र  त्यांचा ते रहात असणाऱ्या प्रदेशाचा  जवळचा प्रदेश बघण्याचे राहून जाते . हे टाळण्यासाठी मी पुण्यात असताना दर रविवारी फिरायला जात असे.  तेव्हा मी पुणे परिसरातील  सर्व\किल्ले , धार्मिक स्थळे  बघून झाल्यावर अन्य ठिकणी भेट दिली ज्यामध्ये इस्लामपूर,  विटा,करमाळा,  शिरूर , मलकापूर   मोहोळ, टेंभुर्णी कोकरूड सोलापूर , सांगली, सांगोला  कोल्हापूर आदी अनेक ठिकाणांचा समावेश करावा लागेल .  मी  साप्ताहिक सुट्टीचा  दिवसात ही स्थळे बघितली आहेत सध्या मी नाशिकला आहे .सध्या  करोनामुले बिघडलेली स्थिती पूर्वपदावर येत आहे . त्याचा विचार करून मी माझा  हा उपक्रम  पुन्हा सुरु करत आहे . पुण्यामध्ये असताना माझी दर साप्तहिक सुट्टी पुण्याबाहेर असे इतक्या ...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 8)

इमेज
                     भारतीय क्रीडाविश्व भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील पराभवामुळे काहीसे निराशजनक स्थितीत  भारताला सुखावणारी एक बातमी शनिवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी येऊन धडकली ती सुद्धा बुद्धिबळ क्षेत्रातून . हैद्राबाद येथील रुथ्वीक राजा हा भारताचा 70  वा  ग्रँडमास्टर बनल्याची ती बातमी होती . गेल्याच महिन्यात भारताला 69 वा ग्रँडमास्टर मिळाला होता त्या नंतर महिन्याभराचा भारताला पुढचा ग्रँडमास्टर मिळाल्याने नव्या 21 व्या शतकात जगाचे नेर्तृत्व करण्यास भारत पूर्णतः सज्ज झाल्याचे दिसून येत आहे . हंगेरी या देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्ट मध्ये सुरु असलेल्या वेझरकेप्झो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत भारताला हा नवा हिरा गवसला आहे . सतरा वर्षीय रुथ्वीक राजा  यांनी या स्पर्धेत ग्रँडमास्टरसाठी   आवश्यक असणारा 2500  रेटिंगचा टप्पा ओलांडला आणि भारताला हा सुखद धक्का मिळाला .हैदराबादचे उपनगर असलेल्या सैनकपुरी येथील  श्री रामकृष्ण विद्यालय येथे 12 वीत शिकत असणाऱ्या रुथ्वीक रजा यां...

16 वर्षांच्या पर्वाची अखेर !

इमेज
            येत्या 26 सप्टेंबरला जर्मनीत तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुका होणार आहेत . {जर्मनीच्या केंद्रीय विधिमंडळाला बुडस्टॅग  म्हणतात }  यामध्ये बहुमत मिळणाऱ्या पक्षाचा नेता जर्मनीचा पुढील चॅन्सलर होईल . चॅन्सलर याचे राज्यशात्रानुसार स्थान राष्टपतींपेक्षा दुय्यम मात्र पंतप्रधानपदापेक्षा वरिष्ठ असते . चॅन्सलरला पंतप्रधानपेक्षा जास्त मात्र राष्ट्रपतीपेक्षा कमी  अधिकार असतात . चॅन्सलर हा तेथील केंद्रीय  मंत्रिपरिषदेचा प्रमुख समजला  जातो .चॅन्सलरची मुदत चार वर्षे असते {तर जर्मनीच्या राष्ष्ट्रपतीची मुदत पाच वर्षे असते }  सन 2005 पासून जर्मनीच्या  चॅन्सलरपदी अँजेला मर्केल या होत्या . मात्र सन 2018 साली  त्यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे त्या 2021 च्या चॅन्सलरच्या शर्यतीपासून दूर आहेत त्यांनी 2018 मध्ये त्यांचा पक्ष ख्रिश्चन डेमोक्रेट्रीक पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे .  17 जुलै 1954 साली जमलेल्या अँजेला मर्केल यांनी लोकांना हळहळ वाटेल अश्या स्थितीतच राजकारणातून निवृत्ती घेऊन जगातील स...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 7)

इमेज
                  भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या  उपांत्य फ़ेरीत पराभव अमेरिकेकडून पराभव झाल्यावर आता त्या मागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे . महाराष्ट्रातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मते दोन कारणामुळे भारतीय बुद्धिबळ संघास बुद्धिबळ ऑल्मियाडमध्ये पराभवास सामोरे जावे लागले एक म्हणजे अमेरिकेविरुद्धचा पहिल्या डावातील विजयानंतर भारतीय बुद्धिबळपटू गाफील राहिले त्यांनी दुसऱ्या डावात आवश्यक  तेव्हढी सावधगिरी  दाखवली नाही  आपण खेळात सातत्याने सावध असायलाच हवे नाहीतर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही याची झलक भारतीय बुद्धिबळपटूंनी उपउपांत्य फेरीत युक्रेनविरुद्धचा दुसऱ्या डावात अनुभवली होती.  मात्र यातून योग्य तो धडा घेत आपल्या कार्यप्रणालीत योग्य ते बदल करण्यास भारतीय बुद्धिबळपटू कमी पडले ज्याची किंमत त्यांना अमेरिकेकडून पराभूत होऊन चुकवावी लागली . खेळाडूंसाठी मनाची एकाग्रता समतोल किती आवश्यक आहे याविषयी मीमाजी पोलीस अधिकरी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम सरांचे एक व्याख्यान ऐकले होते...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 6)

इमेज
                    भारताचे सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ आँल्मपियाड जिकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच झाले. उपात्य फेरीत ब्लिटीश प्रकारात खेळताना भारताला अमेरीकेडून 1.5विरुद्ध 4.5 अस्या मोठ्या फरकाला सामोरे जावे लागले आणि भारताचा बुद्धीबळ आँल्मपियाडमधील प्रवास थांबला. भारताला नमवून अमेरीकेने बुद्धीबळ आँल्मपियाडच्या आंतीम फेरीत प्रवेश केला.आंतीम फेरीत त्यांचा सामना रशियाबरोबर होईल. रशियाने चीनला पहिल्या डावात 3.5 विरुद्ध 2.5 आणि दुसऱ्या डावात 4 विरूद्ध 2असे नमवून आंतीम फेरीत प्रवेश केला आहे.             भारताची उपांत्य फेरीची सुरवात उत्तम झाली.अमेरीकेविरूद्धचा पहिल्या डावात भारताने अमेरीकेवर 5 विरुद्ध एक असे दिमाखदार हरवले. मात्र दुसऱ्या डावात अमेरीकेने भारतावर बाजी उलटवत  भारताला 4विरुद्ध 2 असे हरवले.परीणामी विजेता ठरवण्यासाठी ट्राय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये अमेरीकेने भारताला 5विरुद्ध एक असे हरवले.आणि आंतीम सामन्याचे तिकीट बुक केले. पहिल्या डावात भारताचे कप्तान विश्वनाथन आनंद  यांनी  जेफ...

कँनडाची सुत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे?

इमेज
                   आज हे लिहीत असताना (14 सप्टेंबर सायंकाळ) रोजी कँनडातील केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूकीच्या प्रचार आंतीम टप्यात आला आहे. येत्या सोमवारी अर्थात 20 सप्टेंबर रोजी कँनडातील नागरीक तेथील खासदार निवडण्यासाठी मतदान करतील. आपले अल्पमतातील सरकारला पुर्ण बहुमत मिळण्यासाठी, कोरोनाचा चौथ्या लाटेचा धोका कायम असताना तसेच विद्यमान सरकारचे 17महिने बाकी असताना कँनडाच्या पंतप्रधानांनी तेथील संसद भंग करत मुदतपुर्व निवडणूका जाहिर केल्या. ज्यासाठी येत्या 20 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.कोरोना साथीच्या काळात तेथील विरोधक सरकारला पुर्ण समर्थन देत असताना, या निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत, हे विशेष. या निवडणूकीत ज्या पक्षाला अधिक मते मिळतील , त्या पक्षाचा कँनडाचा पंतप्रधान होईल. ग्लोबल न्युज , आणि सि एन एन या वृत्तवाहिनीच्या   (आपल्या प्रकारे अजेंडा सेटर वृत्तवाहिन्या या आहेत का ?, ते माहिती नाही) बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक्सिट पोल समोर येत आहे ,त्यानुसार  न्यु डेमोक्रेटीक पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार...