पोस्ट्स

50 वर्षाचा सुवर्णकाळ

इमेज
    1972 आँक्टोबर 2 ही फक्त एक तारीख नाहीये. महाराष्ट्राचा एका नव्या युगात प्रवेश झाल्याची ती तारीख आहे. याच दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्राचा जन्म झाला.आज 2021 साली या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50वे वर्ष सुरु होईल. थोडक्यात मुंबईच्या वरळी या उपनगरात असणारे दुरदर्शन केद्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. त्यानिमित्ताने सर्व दुरदर्शन प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.       या 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनासाठी एक  प्रयोग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वाहिनीने पुढे अनेक वर्ष टिव्हीवर मराठी भाषेतील एकमेव वाहिनी म्हणून अधिराज्य गाजवले.1994साली या केंद्राने सह्याद्री हे नाव धारण केले. त्यानंतर ही वाहिनी सह्याद्री या नावाने ओळखायला लागली.आजमितीस मराठीत अनेक 24 तास चालणाऱ्या वाहिन्या आहेत. मात्र त्या कोणाचीही सर दुरदर्शन सह्याद्रीस येणार नाही. आता आतापर्यत अनेकांच्या दिवसाची अखेर सातच्या बातम्यांनी होत असे ( माझी अजून देखील होते)  बातमी कितीही महत्तवाची असली, इतर वाहिन्यांपेक्षा आधी दाखवत असलो तरी काहीही आवेश न दाखवता...

ब बुद्धिबळाचा (भाग 10)

इमेज
      सध्या आपल्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना,  भारतीय महिला बुद्धिबळपटू अत्यंत आश्वासक खेळ करत महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद स्पर्धेत विजयाचा आशा टिकवून ठेवत आहे या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघ पाच साखळी फेरीचे  फेरीचे डाव खेळणार आहे .यावेळी जिंकल्यास दोन गुण आणि  डाव बरोबरीत सुटल्यास एक गुण  संघाला मिळणार आहे .या पाच डावांनंतर उप उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे .जे या साखळी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ संघामध्ये होणार आहे  साखळी स्पर्धांमध्ये पाचव्या डावाच्या अखेरीस  भारताने आपल्या गटात सात  गूण प्राप्त करत आपले उप उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे . आजमितीस पाच फेऱ्यांमध्ये भारताचे सात गूण झाले आहेत दहा गुणसह रशिया भारताच्या गटात अव्वल स्थानी आहे. भारताच्या गटात आर्मेनिया रशिया आणि अझरबैजान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे . भारताचा समावेश A गटात केला आहे . दुसऱ्या B गटात जार्जिया अव्वल स्थानी आहे या गटात फिडे अमेरिकन,  युक्रेन काझकिस्तान यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे तर A...

पाउस बदलला आहे का ?

इमेज
              पाउस बदलला आहे का ? असा प्रश्न सध्या  महाराष्ट्रात तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या सर्वांकडून विचारला जात आहे. आमच्या लहानपणी इतका मुसळधार पाउस पडत नव्हता, असेच वाक्य जो तो बोलत आहे आधी कोकणात धुमाकूळ घातल्यावर आता मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाने नाकात दम आणला आहे . पूर्वी साधारतः उत्तर भारतात आणि ईशान्य भारतात दिसणारे पुराचे चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे . त्यामुळे या  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात खरोखरीच अर्थ आहे हे स्पष्ट होत आहे            पाऊस बदलला आहे का ? या प्रश्नाचे ऊत्तर एका वाक्यात देयचे झाल्यास,  पूर्णतः नाही मात्र काही प्रमाणात पाऊस  बदलला आहे असे म्हणावे लागेल . आपल्याकडे जून ते सप्टेंबर या चार  महिन्यात जर सरासरीचा  विचार करता क्ष मिलिलिटर पाऊस पडत असेल तर आज 2021 मध्ये सुद्धा क्ष मिलीमीटर पाऊसच पडतोय तो कमी किंवा जास्त झालेला नाहीये . बदलली आहे ती त्याची कोसळल्याची पद्धत . पूर्वी हा क्ष मिलीमीटर पाऊस जर चार टप्यात विभागून पडत असेल,  तर सध्या मात्र या च...

पर्यावरणप्रेमींचा हाती जर्मनीचे सुकाणू

इमेज
             गेल्या रविवारी 26 सप्टेंबर रोजी जर्मनीच्या केंद्रीय विधीमंडळाच्या (सोप्या भाषेत लोकसभेच्या) निवडणूका झाला. त्या निवडणूकीमध्ये सत्तारुढ खिश्चन डेमोक्रेटिक युनियन (  CDU), आणि खिश्चन सोशालिस्ट युनियन ( CSU ) या पक्षांचा युतीचा  पराभव झाला. मागील 2017 साली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या मतांपेक्षा  त्यांना यावेळी 8.7टक्के मते कमी मिळाली. ते 24.1टक्के मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सोशल डेमोक्रेटीक युनियन (SDP) या पक्षाला 25.6 टक्के मते मिळाली आहेत.   तर पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या ग्रीन पार्टीस आतापर्यतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यांना 14.8टक्के मते मिळाली आहे. सत्तारुढ  पक्षांनी आपली हार स्विकारली आहे. तेथील कोणत्याच पक्षाला पुरेसे मत्ताधिक्य नसल्याने, सोशल डेमोक्रेटीक पक्षाच्या नेर्तृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात येत आहे.ज्यामध्ये ग्रीन पार्टी मोठी भुमिका बजावणार असल्याचे डि डब्ल्यु , या जर्मन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीसह फ्र...

गुलाब चक्रीवादळाच्या निमित्याने ...... थोडेसे

इमेज
             मित्रानो , हा लेख तुम्ही जेव्हा वाचत असाल तेव्हा गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिसा  राज्याचा दक्षिणेच्या आणि आंध्र प्रदेशाच्या सीमांध या भागातील उत्तरेच्या काही जिल्ह्यामध्ये जमिनीला येऊन धडकले असेल  विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची धुवाधार बंटिंग सुरु असेल . आणि टीव्हीवरील बातम्यांमध्ये तेथील विस्कळीत जनजीवन,  प्रशासनाचे लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न या विषयीच्या बातम्या चालू असतील . गेल्या काही वर्षात मागच्या अनुभवांवरून शहाणे होत प्रशासनामार्फत अत्यंत उत्तम नियोजन केले जाते. त्या बद्दल प्रशासनाचे कौतुक करायलाच हवे . माझे आजचे लेखन मुळात चक्रीवादळे निर्माण कशी होतात ?  कुठे कुठे निर्माण होताता ? या घडामोडींची माहिती देण्यासाठी          तर मित्रानो आपण ज्यास चक्रीवादळे म्हणतो ती मुळात समशीतोष्ण कटिबंधातील वादळे आहेयास पृथीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखक्ले जाते अमेरिकेच्या पूर्व भागात (अटलांटिक किनारा ) यास हरिकेन तर अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि जपान फिलिपाइन्स या भागात यास ...

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
      24  सप्टेंबरला मागच्या सन 2020 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाले .सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च च्या दरम्यान होणारा मुलाखतीचा   टप्पा यावेळी कोरोना संसर्गामुळे बराच लांबला मुलाखतीचा टप्पा 22 २सप्टेंबररोजी संपला अन्य वेळी मुलाखतीचा टप्पा संपल्यावर पंधरा दिवस ते महिन्याचा अवधीत जाहीर होणार अंतिम निकाल यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने अवघ्या दोन दिवसात जाहीर केला   गेल्या काही वर्षांपासून कमीत कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात केंद्रीय लोकसेवा आयोगाने याही वर्षी सुरूच ठेवला या वर्षी फक्त 762 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली   मागील 2019 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.. सन 2015साली .1129,    ,2016 साली   1079, 2017साली 980   , 2018   साली 792 , 2018 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.   पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यांची भरतीसंख्या कमी होतानाच दिसते .गेल्या सहा वर्षीचा आढावा घेतल्यास 20...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 9)

इमेज
                             भारतीय क्रीडाविश्व बुद्धिबळ ऑल्मियाडमधील  उपांत्य फेरीतील (सेमी फायनल ) पराभवाचे दुःख विसरून पुन्हा एकदा एका नव्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ही स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने खेळवली जाणार असून स्पर्धा स्पेनमधील एका निसर्गाची लयलूट असणाऱ्या शहरात अर्थात स्ट्रिंग्स शहरात 26 सप्टेंबर ते 2  ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे . ही स्पर्धा आहे वूमन चेस टीम चॅम्पियनशिप 2021  26 सप्टेंबर रोजी स्पर्धक खेळ आयोजित केलेल्या शहरात येणार असून प्रत्यक्ष खेळाला 27 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे ही स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.   आणि 3ऑक्टोबर रोजी   स्पर्धक मूळगावी जातील या स्पर्धेमध्ये जगातील सर्वोत्तम अश्या 48 महिला बुद्धिबळपटू आपले कसब अजमावणार आहेत            बुद्धिबळ तसा वैयक्तिक खेळ मात्र ही स्पर्धा विविध संघांमध्ये होणार आहे . आशिया  ( ऑस्ट्रोलिया,   न्यझीलँड फिलिपाइन्स आदी देशांचा समावेश करून ) , आफ्रिका , अम...