पोस्ट्स

जळता पाकिस्तान

इमेज
         आखाती देशात सुरु  असणाऱ्या क्रिकेटच्या टी २० विश्व चषकात पाकिस्तान एकामागून एक सामने जिंकत असले तरी,  पाकिस्तानमधील अंतर्गत स्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . पाकिस्तानी सरकारने बंदी घातलेल्या मात्र झालेल्या स्थानिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या "तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या पक्षातर्फे पाकिस्तानच्या पंजाबची  राजधानी असलेल्या लाहोरपासून पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत  लॉन्ग मार्च काढण्यात येत आहे . हा मजकूर लिहीत असताना (३० ऑक्टोबर ) हे  आंदोलक वझीराबाद या शहरात आलेले आहेत . शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी हे  आंदोलक गुजरानवाला या शहरातून वझीराबाद या शहरात पोहोचले  यापुढील वाटचाल पक्षाच्या शीर्ष नेत्यांच्या सांगण्यावरून होईल , अशी आंदोलनकांची भूमिका आहे "          तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या संघटनेने केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ते सौदी अरेबियाच्या दौऱयावरून परत येताच तातडीची पाकिस्तनच्या नॅशनल सिक्युरिट...

हवामान बदलाच्या नावाने ...... !

इमेज
                सध्या  शाहरुख खान याच्या मुलास अमली पदार्थाच्या  पुरवठ्याविषयी संबंधितांना विचारणा केल्याप्रकरणी नॅशनल क्राईम ब्युरो (NCB ) तर्फे  दाखल गुन्ह्याच्या संदर्भात विविध दावे प्रतिदावे आणि दिवाळी निमित्य होणाऱ्या गर्दीच्या बातम्या दाखवल्या जात असताना  जगभरात मात्र हवामानबदलाविषयी मोठ्या प्रमाणवर तसेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनाच्या बाबत  चर्चा सुरु आहे . विविध देशांचे प्रमुख  हवामान बदलाविषयी काय कार्यक्रम असावा या बाबत मतप्रदर्शन करत आहे.   या विविध देशांच्या प्रमुखांमध्ये व्हॅटिकन सिटी या ख्रिस्ती बांधवांच्या साठी अत्यंत पुज्यनीय  असणाऱ्या देशाचे प्रमुख पोप फ्रॅंसिस यांच्या देखील समावेश आहे , बीबीसी रेडिओला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी जागतिक नेत्याना पर्यावरणाच्या या आणीबाणीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आणि भावी पिढीला चांगले पर्यावरण राखण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला आहे . तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनासाठी...

शेतीच्या उत्पादनात घट ?

इमेज
                        येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी जी २० संघटनेची वार्षिक बैठक इटलीतील रोम या शहरात होणार आहे या बैठीकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य राष्टांकडून जगातील सर्वात मोठे संकट असणाऱ्या हवामान बदलाविषयी काय करता येईल ? यावर विचारमंथन करणे सोपे व्हावे,  यासाठी  जी २० संघटनेच्या हवामानबदल विषयक कार्य करणाऱ्या विभागामार्फत एक अहवाल २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये येत्या भविष्यकाळात हवामान बदलामुळे भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्नात १५ टक्के घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे . हवामानबदलामुळे गहू आणि तांदुळाच्या उत्पनात घट होऊ शकत शकते ज्यामुळे शेतकऱ्यांचे ८१ अब्ज रुपयांचे नुकसान होईल  जे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पनाच्या १५ % असल्याचे wion  या वृत्त वाहिनीच्या बातमीत सांगण्यात येत  आहे हवामान बदलामुळे तापमान वाढ तसेच उष्णतेच्या लाटांची संख्या वाढून दुष्काळाची संख्या वाढेल ज्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज या  अहवालामध्ये व्...

आशियान आणि आपण

इमेज
   आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑक्टोबरला  "इंडिया आशियान समिट"मध्ये संबोधन करणार आहेत .    पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी २७ ऑक्टोबर या बाबत माहिती देण्यात आली  ब्रुनेईच्या सुलतानाच्या आग्रहावरून पंतप्रधान या समिट ला संबोधित करणार आहे दरवर्षी ही समिट होत असते ही समिती विविध स्तरावर वर्षातून अनेकदा होत असते पंतप्रधान संबोधित करत असलेली ही परिषद सरकारच्या प्रमुखांची समिट आहे                                                     आशियान     भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना .  जिची स्थापना ८ ऑगस्ट १९६८ ला झाली सुरवातीला तिच्यात मोजके देश होते . कालांतराने त्यातील सहभागी देशांची संख्या वाढत गेली आज हा मजकूर लिहीत असताना या संघटनेचे ब्रुनाई , मलेशिया , इंडोनेशिया , लाओस , कंबोडिया, म्यानमार फिलिपाइन्स सिंगापूर थायलंड हे  १...

एसटीचे खरे शत्रू !

इमेज
        आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या साठी एसटीने  आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना   अनुक्रमे  जेमतेम अडीच आणि पाच हजाराचा बोनस दिला.  मी जेमतेम हा शब्द वापरतोय कारण पुरेसे करसंकलन न झाल्याने  आर्थिक स्थिती दोलायमान असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने आपल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १५ हजार बोनस दिला आहे . एसटीच्या सध्याच्या या आर्थिक स्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत ज्यामध्ये राज्य सरकारकडून विविध सवलतींचे अनुदान वेळेत न मिळण्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला इतर राज्यातील एसटीकडून देण्यात येणारे आव्हान हे प्रमुख धोके आहेत             आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यात इतर राज्याचा एसटी आपली सेवा देतात . त्यासाठी ते आपल्या एसटीच्या जागांचा वापर करतात  आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना बसस्थानकापासून काही अंतरावरच व्यवसाय करावा असे बंधन घालू शकतो. मात्र या इतर राज्यातील परीवहन सेवांना असे बंधन घालणे निव्वळ अशक्य आहे नाशिकहून वायव्य कर्नाटक ...

चिंताजनक भविष्य सामोरी

इमेज
                 जगाचे तापमान वाढवणाऱ्या हरितवायूंचे प्रमाण मागच्या २०२० या वर्षी जग काहीसे बंदिस्त असताना जगाचे  व्यवहार मंदावले असताना देखील विक्रमी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे जागतिक हवामानशास्त्र  संघटनेमार्फत केल्लेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे             जागतिक हवामनशास्त्र संघटनेच्या अभ्यासानुसार कार्बनडाय ऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड या वायूंचे प्रमाण वाढण्याची गेल्या दहा वर्षातील जी सरासरी होती त्यापेक्षा गेल्या २०२० या वर्षी अधिक प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन झाले ज्यामुळे पॅरिस करारात सांगितलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .  दुर्दैवाने हे पारंपरिक कोळस्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होत आहे . मानवाकडून करण्यात हरितवायूच्या उत्सर्जनपैकी सुमारे ५०% उत्सर्जन हे महासागरातील [आणि आणि वनांच्या मार्फत शोषले जाते मात्र या घटकांमुळे किती हरितवायू शोषले जाणार ? याचे प्रमाण तापमान पर्जन्य आणि इतर भौगोलिक घटकांमुळ...

नेपाळ आजचा उद्याचा

इमेज
      सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा  अंमली पदार्थाचा सेवन केल्याचा आरोपामुळे  कारागृहात बंदी असल्यामुळे त्याच्या विषयीचा बातम्या आणि सध्या  असलेल्या क्रिकेट विश्वचषकासंबंधी बातम्या देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळविषयी दोन घडामोडी घडल्या  घडामोडींपैकी एक घडामोड आपला शत्रू असणाऱ्या चीनविषयक आहे तर दुसरी आपल्या भारताविषयक आहे .      नेपाळ आपले मित्र राष्ट्र आहे .आपल्या भारतीय लष्करात नेपाळी सैन्याची एक पलटण आहे . भारतीय प्रशासन सेवेत भारताने भूतान बरोबर  देशाचे नागरिक येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ तसेच नेपाळ आणि भारत यातील सीमा खुली असल्याने एकमेकांच्या देशातील नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय एकमेकांच्या हद्दीत जाऊ शकत असल्याने त्याचा विषयीच्या घडामोडी आपणास एक जागरूक नागरिक म्हणून माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्यासाठीच       तर मित्रानो , नेपाळच्या गृह मंत्रालयामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणात नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या बऱ्याच भागात घुसखोरी केल्याचे...