पोस्ट्स

साहित्य संमेलन!

इमेज
    डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे त्यासाठी नाशिकला जोरदार तयारी सुरु आहे . नुकतेच हे संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ,त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला . त्यावेळी या ठिकाणी कोण कोण विशेष मान्यवर उपस्थित रहाणार आहेत ?याची कार्यक्रम पत्रिका  देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि काहिस्या शांत झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले .राजकीय विचारसरणीबाबत   काहीसे वादग्रस्त  मत प्रदर्शन करणाऱ्या एक व्यक्तीला आमंत्रण देण्यावरून एका जातीच्या संघटनेने प्रचंड विरोध केला आहे . त्यांचे मराठी साहित्यातील योगदान काय ? सदर व्यक्ती परभाषिक असून त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळी सदर व्यक्ती कोणत्याच मराठी साहित्यिकाला बोलवत नाही तरी आपण का बोलवायचे ? असा युक्तिवाद त्यांना विरोध करण्यासाठी केला जात आहे .  माझ्या मते जे पूर्णतः अयोग्य आहे . साहित्यिकाला आमंत्रित करण्यासाठी भाषेचे बंधन असायला नको . कोणत्याही भाषेचा असला तरी साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे दरवाजे बंद असायला नको . सध्या ते आपणस त्यांच्या...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग3)

इमेज
      आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती करुन घेतली. या  भागात आपण बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ,हे बघूया .                चिकाटी अथवा जिद्द हा गुण अनन्यसाधरण आहे. कोणत्याही खेळाडूस जिंकण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते.पी  सि ए चँम्पियनशीपमध्ये  काँस्पराव विरुद्ध आनंद हे समोरासमोर विश्वविजेतेपदासाठी  एकमेकांच्या समोरसमोर उभे ठाकले असताना, शेवटच्याः डावात जो जिंकेल तो विश्वविजेता बनणार असी स्थिती उत्पन झाली. त्यावेळेस त्या सामन्यादरम्यान काँस्पाराव खेळी केल्यावर भिंतीवर बुक्के आणि दरवाज्याला लाथा मारत असे, शेवटी तो जिंकला. विश्वविजेते झाल्यावर आयोजीत पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्याचा आंतीम सामन्यातील वर्तणूकीविषयी विचारणा केल्यावर त्याने सांगितले,"मी माझ्यातील विजूगुषीवृत्ती दरवाज्यावर लाथा आणि भिंतीवर बुक्के मारुन जिवंत ठेवत होतो, विजूगुषीवृत्ती जिवंत ठेवल्यामुळे मी जिंक...

एसटी संपामुळे होरपळणारे दुर्लक्षित घटक

इमेज
          सध्या सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा  संप चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे ९०च्या दशकांत ज्याप्रमाणे मुबईतील गिरणी कामगारांचा संप गिरणीविश्व ज्या प्रमाणे उद्धवस्त करून गेला त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप एसटीला पूर्णतः संपवून टाकेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . माध्यमांमध्ये या संपविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्यामध्ये या संपामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास,  एसटीचे बस बंद असल्यामुळे होणारे आर्थिक  नुकसान या विषयी भरभरून बोलले गेले , अजूनही बोलले जात आहे . मात्र या सर्व गदारोळात एक घटक मात्र काहीश्या दुर्लक्षिला गेला, ज्या घटकावर फारच थोडे बोलले गेले , तो घटक म्हणजे  बस स्थानकाच्या परिसरात  विक्री करणारे विक्रेते तसेच परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांचे होणारे नुकसान .        कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आधीच लोकांचे पर्यटन  बंद झाले असताना , जे थोडेफार लोक बसचा वापर करत होते ते सुद्धा या संपामुळे एसटीपासून दुरावले . परिणामी आजमितीस या बस्थानकांच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्य...

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग २ )

इमेज
            यशस्वी होणाऱ्या खेळाडूंमध्ये असाधारण गुणवत्ता असते. बुद्धिबळातील गुणवत्ता प्राप्त करताना असाधारण खेळाडू चटकन अथवा कमी वेळेत आणि सहजनतेने कौशल्य प्राप्त करतो . खेळाडू घडवताना प्रशिक्षकाने नकारात्मक विचार ठेवल्यास, खेळाडू घडवता येत नाही खेळाडूला नियमितपणे सकारत्मक विचारांशी जोडीनं घ्यावे लागते . येत नाही, जमत नाही, समजत नाही या गोष्टींना हद्दपार करावे लागते. कुठलाही खेळाडू सुरवातीलाच योग्य निर्यय घेऊ शकत नाही . टप्या टप्याने परिस्थितीचा ( Position) चा अभ्यास करवून घ्यावा लागतो .    या प्रक्रियेत मोठी  महत्वपूर्ण आणि महत्तपूर्ण जवाबदरी प्रशिक्षक पार पडतो . खेळाडू आणि पालकांशी नियमित संवाद साधने खेळाडूंच्या कमतरता शोधून त्यावर काम करणे , खेळाडूंची जिज्ञासावृत्ती वाढवणे त्यास नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देणे ही जवाबदारी प्रशिक्षकाची असते. कोचेबीलिरी हा एक महत्त्वपूर्ण गुण खेळाडूंमध्ये असावयास हवा ,            योग्य तसेच जाणकार प्रक्षिक्षकाकडून खेळाडूने प्रक्षिशण घेतल्यास खेळाडू पुढे जाऊ शकतो . प्रक्षिशकावर व...

आभाळच फाटलंय !

इमेज
           आपल्या मराठीत एखाद्यावर प्रचंड प्रमाणात संख्येने अनेक संकटे आल्यावर त्याच्यावर आभाळ फाटलंय असे म्हणतात . आभाळ फाटलंय हा वाक्यप्रचार खरा असल्यासारखी स्थिती सध्या भारताच्या दक्षिणेच्या राज्यातील आहे तामिळनाडू पाँडिचेरी आणिआंध्र प्रदेशात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . आंध्र प्रदेशाच्या तिरुपती या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या शहरात कधीही नव्हती अशी स्थिती निर्माण झाली आहे अत्यंत मुसळधार पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून होणारे लँडसाईड यामुळे तेथील प्रशासन आभाळ फाटलंय ही स्थिती अनुभवत आहे शनिवार २० नोव्हेंबर पर्यंत या पावसामुळे विविध घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक बस वाहून गेल्याने ५०जण बेपत्ता आहेत हवाई दल आणि राज्य आपत्ती मदत दलाच्या (state disaster relief force) तुकड्यांमार्फत मोठ्याप्रमाणात बचाव कार्य सुरु आहे हवाई दल मिग १७ या हेलिकॅप्टर चा मदतीने पुरात अडकलेल्या व्यक्तींची मदत करत आहे आंध्रप्रदेशच्या रायलसीमा या भागातील ३ आणि किनारी प्रदेशातील एका जिल्ह्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सेवांवर ...

अखेर नमले !

इमेज
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर   चर्चेत असणारे कृषी कायदे  असल्याचे जाहीर केले . चालू महिन्यचा अखेरीस होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी टीव्हीवरील आपल्या संबोधांत जाहीर केले.  संसदेत  पारित केलेल्या कायद्याना मागे घेण्यासाठी संविधानातील २४५ कलमाचा आधार घेऊन रद्द करता येते . त्याच तरतूनुसार हे कायदे रद्द होतील . ज्या प्रमाणे कायदे पारित करण्यासाठी संसदेत कार्यवाही झाली त्याच प्रकारची कार्यवाही हे रद्द करण्यासाठी होईल, म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहात या बाबत चर्चा आणि मतदान होऊन हे कायदे रद्द होतील.          गेल्या पावणेदोन वर्षापासून पंजाब राज्यातील शेतकरी पंजाब राज्य आणि देशाच्या राजधानीत दिल्लीच्या सीमेवर हे कायदे रद्द करण्यासाठी  आंदोलने करत होते.  त्यांच्या हा विजय मानला जात आहे .आंदोलकांनी हे कायदे पूर्णतः रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे जाहीर केले आहे .               या काय...

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग १ )

इमेज
     मागील काही दिवसांपासून , बुद्धिबळविश्वात अनेक महत्वाच्या मैलाच्या दगड ठरतील , अश्या घटना घडत आहे . नागपूरची "दिव्या देशमुख' वूमन ग्रँडमास्टर झाली . ग्रँडमास्टर 'अभिजित कुंटे'  याला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाला . "'"'संकल्प गुप्ता आणि मित्रभ गुहा ग्रँडमास्टर झाले,  ज्यामुळे भारतीय ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली, तर महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरची संख्या १० झाली,. या घडामोंडीबरोबर रौनक साधवानी हा गुणी खेळाडू १६ वर्षाखालील स्पर्धेत जागतिक जगजेत्ता झाला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे यश निश्चित वाखण्याजोगे आहे . प्रतिकूल परिस्थितीतून कुंटे कुटूंबियांनी आपल्या मुलाला बुद्धिबळात पुढे आणले. अभिजित कुंटे आणि मृणाली कुंटे नाशिकला बुद्धिबळ स्पर्धा खेळायला येत असतं. अभिजीतची यशोगाथा  " बिशप व नाईट " या मासिकाची कव्हर स्टोरी (मुखपृष्ठावर छायाचित्र देऊन अंकाचा मुख्य विषय  करणे ) त्याची माहिती देऊन करण्यात आली होती . रौनक साधवानी नाशिक येथे ग्रँडमास्टर विदित गुजराथीकडे प्रशिक्षण घेत होता, तेव्हा मलाही दोन दिवस विदितमुळे त्याला प्रशिक्षण देता आल...