पोस्ट्स

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग5)

इमेज
      मागील भागात पालकांची भूमिका आपण बघितली . आता प्रथमावस्थेतील प्रशिक्षकाची भूमिका बघूया . पहिल्या प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते . खेळाडूच्या खेळाला आकार देण्याचे काम या प्रशिक्षकाला करावे लागते . ज्यामध्ये खेळाडूंची सकारात्मकता , खेळाचे कौशल्य वाढविणे , खेळाची शिस्त निर्माण करणे , खेळाविषयीची भीती घालवणे . हॉल मधील भीती तसेच त्याच्या वर्तनावर लक्ष देण्याचे कार्य या  गोष्टींचा  अंतर्भाव होतो .  सतत तक्रार करणे , सामना हरल्यावर कारणे सांगणे , हॉलमध्ये इकडे तिकडे अथवा इतरांचे डाव बघणे , काही कारणामुळे मानसिक तोल जाणे तसेच हरल्यानंतर चिडचिड करणे , खेळताना निराश होणे , अश्या  खेळाडूंच्या अनेक सवयीचा  स्वभावाचा  तसेच या सारख्या मनोशारीरिक घटकांचा अभ्यास करत खेळाडूला घडवण्याचे  प्रशिक्षकाला करावे लागते  बुद्धिबळ येणं आणि बुद्धिबळ समजणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत . बुद्धिबळ प्रशिक्षकाला आपल्या खेळाडूला बुद्धिबळ समजावतात आले पाहिजे . तर आणि तरच चांगला खेळाडू घडवता येतो . वेळोवेळी चांगली खेळी केल्यावर किं...

नवे संकट सामोरी !

इमेज
          महाराष्ट्राचा अनेक भागात बेमोसमी पावसाने आकांडतांडव सुरू केले आहे.  आपणच तयार केलेले  भाषा , धर्म , जाती, राज्य, देश , श्रीमंत, गरीब हे भेद विसरुन हवामान बदलाविषयी ठोस काहीतरी करण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. गेल्या दिड वर्षाच्या आढावा घेतल्यास जगभरात आपणास लहरी हवामानाचा फटका बसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच दुसऱ्याचा अनुभवातून शहाणे न होता स्वतःला फटका बसल्याशिवाय शहाणपण न येण्याची वृत्ती देखील दिसून येत आहे. जे वाईट आहे. जगात काय चाललंय ?याचा कानोसा न घेता स्वतःच्याच विश्वात रममाण होण्याची किंमत भारताने इतिहासात अनेकदा भोगली आहे. मात्र त्या इतिहासातुन बोध घेत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यात आपण कमी पडतोय. गेल्या दिड वर्षात जगभरात विविध प्रदेशात लहरी हवामानाच्या अनेक घटना घडल्या,मात्र त्यातून बोध घेत आपल्याकडे असे काही झाले तर ? काय करायचे याबाबत आपण काहीच कार्यवाही केली नाही. परीणामी आज शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरणं स्वस्त झालंय।      गेल्या काही वर्षापासून आपणास ...

ब बुद्धिबळाचा (भाग १६ वा )

इमेज
   सध्या आपल्या भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या नव्या म्युटनला यशस्वीपणे तोंड कसे देयचे? याचे नियोजन केले जात असताना,  दुबई मध्ये एक वेगळेच युद्ध रंगले आहे. दोन एकतीस वर्षीय तरुण योद्धे यात आपले सर्वस्व झोकुन जिंकण्यासाठी जिवाचे रान कत आहे. या दोनमधील एक जण आपले सिंहासन वाचवण्यासाठी तर दुसरा त्या सिंहासनावर आरुढ होण्यासाठी आपले बुद्धीचातूर्य दाखवत त्याच्याशी लढाई करत आहे. हे योद्धे आहेत बुद्धिबळाचा आजमितीस असणारा विश्वविजेता नेदरलँडचा नागरीक  मँग्नस कार्लसन. जो गेल्या 4 वर्षापासून बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट आहे. आणि रशियाचा बुद्धिबळपटू असणारा अँन नोपोमनिची जो युरोपिय स्पर्धेचा दोन वेळेचा विजेता विजेता आहे.    26 नोव्हेंबर पासून ते एकमेकांना विश्वविजेतेपदासाठी आव्हान देत आहेत.  आतापर्यंत(30 नोव्हेंबर सायंकाळ) 4 खेळ झाले आहेत. या स्पर्धेआधी मँग्नस कार्लसन यांनाच संभाव्य विजेता मानण्यात येत होते,मात्र आव्हानवीर अँन नोपोमनिची यांनी विश्वविजेत्याला चांगली झुंज दिली आहे. हा लेख लिहण्यापर्यत झालेल्या 4 डावामध्ये चारही डाव बरोबरीत सुटल्याने यातील ...

म्युटेशन म्हणजे काय रे भाउ!

इमेज
                 सध्या जगभरात दक्षीण आफ्रिकेत तयार झालेल्या कोरोनाचा विषाणूच्या म्युटेशनची धास्ती आहे. आपल्या माध्यमांमध्ये त्याविषयीचा विविध बातम्या येत आहे. ज्यामध्ये हा नविन म्युटेन किती गंभीर आहे. याविषयी सांगण्यात येत आहे. या सर्वांचा मुळाशी असलेल्या म्युटेशनविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                   तर कोणताही विषाणू म्हणजे  डिएनए किंवा आर एन ए असतो. , ज्याला एकच बाजुला लांब काठी आहे म्हणजे आर एन ए .कोरोनाचा विषाणू आर एन ए आहे. असी  शिडी दोन्ही बाजूला असल्यास त्यास डिएन ए म्हणतात. जिवशास्त्रानूसार आर एन ए मध्ये डि एन ए पेक्षा अधिक सहजतेने बदल करता येतात कोरोनाचा विषाणू हा आर एन ए आहे .हेही आपण लक्षात घेयला हवे.   आता प्रत्येक शिडीला असतात तस्या आर एनए च्या शिडीला देखील पायऱ्या आहेत. ज्याला क्रोमोझोन म्हणतात.                   कोणत्याही विषाणू जैविक साधनाचा आधार घेत आपल्या सारखाच दुसरा विषाणू तयार करत असतो.या विषाणूंची...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग4)

इमेज
       आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती तसेच बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ?  यावेळी आपण एखाद्या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी पालकांची भूमिका किती महत्वाची असते ? हे बघूया   यशस्वी खेळाडूंच्या इतिहास बघितला तर,  खेळाडूंच्या पालकांच्या सहभाग महत्त्वपूर्ण असतो. मुळात महत्त्वाचे ,मोठे निर्णय घेण्याची क्षमता नसते . आर्थिक नियोजन,वेळेचे नियोजन या सारख्या बाबीबाबतचे निर्णय पालकालाच घ्यावे लागतात . आज अनेक पालक खेळाविषयी जागृत झालेले आहेत /त्यातही बुद्धिबळाकडे बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेच पहिले जात आहे . त्यामुळे खेळाडूंची संख्या वाढत आहे . मात्र ज्या प्रमाणात खेळाडू घडले पाहिजे त्या प्रमाणाच्या तुलनेत आजही संख्या कमी आहे             पालकांची मनोभूमिका काय असते ?ते बघू . ज्यांना बुद्धिबळ येते असे पालक आपल्या पाल्यावर जिंकण्यासाठी दबाव आणतात ,  प्रसंगी एखादा सामना गमावला तर...

भारताची जगाला साद

इमेज
      आपल्या मराठीतील माध्यमे एसटीच्या संपविषयी बातम्या देण्यात मग्न असताना , भारत जगातील स्वरावर विविध विषयावर जगाला साद घालत आहे ज्यामध्ये हवामान बदलविषयी ठोस कृतिकार्यक्र्म करण्याचा आवाहनाबरोबर  जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्टसंघ आदी अनेक संघटनेत बदल करून या संघटनांमध्ये अधिकाधिक देशांना सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याची गरज जगाला पटवून देत आहे . त्यासाठी एस सी ओ या नावाने प्रसिद्ध  शांघाय कॉपरेशन ऑरगेनझेशन या संस्थेच्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचा वापर करत आहे . सध्या काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत हा या बैठकीचे हे २०वे वर्ष आहे .कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होत आहे . भारतातर्फे या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रतिनिधीत्व करत आहे याच वर्षी सप्टेंबर   महिन्यात एस सी ओची देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती ज्यामध्ये राष्ट्रपती आणि अध्यक्ष प्रामुख्याने ...

ब बुद्धिबळाचा (भाग १५ वा )

इमेज
                क्रिकेटच्या टी २० प्रकारातील विश्वविजेता ठरवण्याची स्पर्धा नुकतीच युनाटेड अरब अमिरात या देशात पार पडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांतर पुन्हा एकदा हा देश दुसऱ्या एका खेळाच्या विश्वविजेता शोधण्यासाठीचा स्पर्धेचे आयोजनासाठी सज्ज झाला  आहे . ज्या खेळाच्या आयोजनासाठी हा देश सज्ज झाला तो खेळ आहे बुद्धिबळ . २४ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान दुबईत बुद्धिबळाच्या २०२० आणि २०२१ या दोन वर्षासाठी विश्वविजेता शोधण्यासाठी स्पर्धा होत आहे . २४ नोव्हेंबरला स्पर्धेचे उदघाटन होणार असून स्पर्धेचे सामने २५ नोव्हेंबर पासून सुरु होतील  मागच्या वर्षी २०२० ला  विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी आव्हानवीर शोधण्यासाठी खेळवण्यात येणारी कॅन्डीडेट स्पर्धा झाली मात्र कोरोना संसर्गगमुळे विश्वविजेते स्पर्धा झाली नव्हती त्या वर्षाची स्पर्धा  आता दुबईत होत आहे . या स्पर्धेमध्ये अधिकृत समालोचक म्हणून फिडे या बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेकडून भारताच्या विश्वनाथन आंनद यांची नियुक्ती करण्यात आली आहे  ऑन नेपोम्नियाची      ...