पोस्ट्स

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)

इमेज
बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक  स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ?  हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो .  यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याच...

गोव्याची भरारी !

इमेज
गोवा , महाराष्ट्राचा दक्षीणेकडील छोटेसे राज्य, भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झाल्यावर 14वर्षांनी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेले, ज्याचा स्वातंत्र्य लढ्याविषयी महाराष्ट्र एस.स.सी. अभ्यासक्रमामध्ये भारतातीलच स्वातंत्र्य लढा असून देखील फारच कमी उल्लेख आहे (तसे त्या अभ्यासक्रमात  ब्रिटीशाविरोधातील स्वातंत्र्य लढ्याविषयी असणाऱ्या माहितीचा तूलनेत फक्त गोवाच नाही तर दमण-दिव पाँडेचरी, दादरा नगरहवेली यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी  फारसे  शिकल्याचे मला आठवत नाही.) ख्रिस्ती समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असून देखील कोणत्याही धार्मिक वादाच्या केंद्र नसणारे , (या उलट इशान्य भारत) एक शांतताप्रिय ,पर्यटनस्नेही राज्य म्हणजे गोवा.      तर असे हे गोवा राज्य वेगाने इलेक्ट्रॉनिक बसेसकडे जात आहे. गोव्याचा वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांनी ही गोष्ट सिद्ध होत आहे. नुकतीच गोवा राज्याची एसटी बस असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट मध्ये 100इलेक्ट्रॉनिक बसेस घेण्यास मंजूरी देण्यात आली.ocraa या कंपनीच्या या बसेस आहेत. या शिवाय 500बसेस कंदबमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली सुरु झाल्याचे गो...

4मिनिटे 37सेंकदाला एक

इमेज
    सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना 1डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने एक आकडेवारी सादर केली.जी अत्यंत मन विष्षण करणारी आहे. 1 जानेवारी 2016 ते 10 सप्टेंबर 2021या कालावधीत 6लाख व्यक्तींनी भारतीय नागरीकत्वाचा त्याग केल्याचे या आकडेवारीत सांगण्यात आले आहे. सुमारे 4मिनिट 37सेंकदात एक इतके हे प्रमाण भयावह आहे. देशाला लागलेल्या ब्रेन ड्रेनच्या शापातून अजूनही भारताची सुटका न झाल्याचेच हे निर्देशक आहे.         नुकतेच ट्टीटर या समाजमाध्यमांचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले पराग अग्रवाल हे या ब्रेनड्रेनचेच एक उदाहरण.भारतात कर्तुत्वाला बुद्धीमतेला पुरेसा न्याय न मिळेल, याची श्वास्वती मिळत नसल्याने, भारतातील अनेक तरुण सन 2000च्या आसपास भारतातून बाहेर पडत,  इतर देशात मुख्यतः अमेरीकेत स्थाईक झाले. भारतातील बुद्धीमता अस्या प्रकारे बाहेर पडण्यास ब्रेनड्रेन असे संबोधले गेले. जी व्यक्ती भारताच्या प्रगतीसाठी कार्य करु शकत होती, अस्या व्यक्तीने भारतातील व्यवस्थेमुळे कंटाळून आपले बौद्धिक सामर्थ्य दुसऱ्या देशाच्या प्रगती...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग5)

इमेज
      मागील भागात पालकांची भूमिका आपण बघितली . आता प्रथमावस्थेतील प्रशिक्षकाची भूमिका बघूया . पहिल्या प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते . खेळाडूच्या खेळाला आकार देण्याचे काम या प्रशिक्षकाला करावे लागते . ज्यामध्ये खेळाडूंची सकारात्मकता , खेळाचे कौशल्य वाढविणे , खेळाची शिस्त निर्माण करणे , खेळाविषयीची भीती घालवणे . हॉल मधील भीती तसेच त्याच्या वर्तनावर लक्ष देण्याचे कार्य या  गोष्टींचा  अंतर्भाव होतो .  सतत तक्रार करणे , सामना हरल्यावर कारणे सांगणे , हॉलमध्ये इकडे तिकडे अथवा इतरांचे डाव बघणे , काही कारणामुळे मानसिक तोल जाणे तसेच हरल्यानंतर चिडचिड करणे , खेळताना निराश होणे , अश्या  खेळाडूंच्या अनेक सवयीचा  स्वभावाचा  तसेच या सारख्या मनोशारीरिक घटकांचा अभ्यास करत खेळाडूला घडवण्याचे  प्रशिक्षकाला करावे लागते  बुद्धिबळ येणं आणि बुद्धिबळ समजणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत . बुद्धिबळ प्रशिक्षकाला आपल्या खेळाडूला बुद्धिबळ समजावतात आले पाहिजे . तर आणि तरच चांगला खेळाडू घडवता येतो . वेळोवेळी चांगली खेळी केल्यावर किं...

नवे संकट सामोरी !

इमेज
          महाराष्ट्राचा अनेक भागात बेमोसमी पावसाने आकांडतांडव सुरू केले आहे.  आपणच तयार केलेले  भाषा , धर्म , जाती, राज्य, देश , श्रीमंत, गरीब हे भेद विसरुन हवामान बदलाविषयी ठोस काहीतरी करण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. गेल्या दिड वर्षाच्या आढावा घेतल्यास जगभरात आपणास लहरी हवामानाचा फटका बसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच दुसऱ्याचा अनुभवातून शहाणे न होता स्वतःला फटका बसल्याशिवाय शहाणपण न येण्याची वृत्ती देखील दिसून येत आहे. जे वाईट आहे. जगात काय चाललंय ?याचा कानोसा न घेता स्वतःच्याच विश्वात रममाण होण्याची किंमत भारताने इतिहासात अनेकदा भोगली आहे. मात्र त्या इतिहासातुन बोध घेत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यात आपण कमी पडतोय. गेल्या दिड वर्षात जगभरात विविध प्रदेशात लहरी हवामानाच्या अनेक घटना घडल्या,मात्र त्यातून बोध घेत आपल्याकडे असे काही झाले तर ? काय करायचे याबाबत आपण काहीच कार्यवाही केली नाही. परीणामी आज शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरणं स्वस्त झालंय।      गेल्या काही वर्षापासून आपणास ...

ब बुद्धिबळाचा (भाग १६ वा )

इमेज
   सध्या आपल्या भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या नव्या म्युटनला यशस्वीपणे तोंड कसे देयचे? याचे नियोजन केले जात असताना,  दुबई मध्ये एक वेगळेच युद्ध रंगले आहे. दोन एकतीस वर्षीय तरुण योद्धे यात आपले सर्वस्व झोकुन जिंकण्यासाठी जिवाचे रान कत आहे. या दोनमधील एक जण आपले सिंहासन वाचवण्यासाठी तर दुसरा त्या सिंहासनावर आरुढ होण्यासाठी आपले बुद्धीचातूर्य दाखवत त्याच्याशी लढाई करत आहे. हे योद्धे आहेत बुद्धिबळाचा आजमितीस असणारा विश्वविजेता नेदरलँडचा नागरीक  मँग्नस कार्लसन. जो गेल्या 4 वर्षापासून बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट आहे. आणि रशियाचा बुद्धिबळपटू असणारा अँन नोपोमनिची जो युरोपिय स्पर्धेचा दोन वेळेचा विजेता विजेता आहे.    26 नोव्हेंबर पासून ते एकमेकांना विश्वविजेतेपदासाठी आव्हान देत आहेत.  आतापर्यंत(30 नोव्हेंबर सायंकाळ) 4 खेळ झाले आहेत. या स्पर्धेआधी मँग्नस कार्लसन यांनाच संभाव्य विजेता मानण्यात येत होते,मात्र आव्हानवीर अँन नोपोमनिची यांनी विश्वविजेत्याला चांगली झुंज दिली आहे. हा लेख लिहण्यापर्यत झालेल्या 4 डावामध्ये चारही डाव बरोबरीत सुटल्याने यातील ...

म्युटेशन म्हणजे काय रे भाउ!

इमेज
                 सध्या जगभरात दक्षीण आफ्रिकेत तयार झालेल्या कोरोनाचा विषाणूच्या म्युटेशनची धास्ती आहे. आपल्या माध्यमांमध्ये त्याविषयीचा विविध बातम्या येत आहे. ज्यामध्ये हा नविन म्युटेन किती गंभीर आहे. याविषयी सांगण्यात येत आहे. या सर्वांचा मुळाशी असलेल्या म्युटेशनविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                   तर कोणताही विषाणू म्हणजे  डिएनए किंवा आर एन ए असतो. , ज्याला एकच बाजुला लांब काठी आहे म्हणजे आर एन ए .कोरोनाचा विषाणू आर एन ए आहे. असी  शिडी दोन्ही बाजूला असल्यास त्यास डिएन ए म्हणतात. जिवशास्त्रानूसार आर एन ए मध्ये डि एन ए पेक्षा अधिक सहजतेने बदल करता येतात कोरोनाचा विषाणू हा आर एन ए आहे .हेही आपण लक्षात घेयला हवे.   आता प्रत्येक शिडीला असतात तस्या आर एनए च्या शिडीला देखील पायऱ्या आहेत. ज्याला क्रोमोझोन म्हणतात.                   कोणत्याही विषाणू जैविक साधनाचा आधार घेत आपल्या सारखाच दुसरा विषाणू तयार करत असतो.या विषाणूंची...