पोस्ट्स

अशांत ,अस्वस्थ इशान्य भारत

इमेज
 आपल्या भारताचा एका टोकाला , दुर्लक्षीत असणाऱ्या इशान्य भारत सध्या प्रचंड खदखदतोय. नव्या राज्याचा मागण्या, लष्कराच्या कारवाया, राज्यांचे आपसातील सीमावाद  यामुळे इशान्य भारत सध्या एका तापलेल्या तव्याप्रमाने झाला आहे. ज्यावर इतर विनाकारण ताणलेले अस्मितेचे केलेले प्रश्न बाजूला ठेवून विचार करण्याची नितांत गरज आहे.           त्रिपूरा राज्यातील त्रिपरा या जनजातीने त्याच्यासाठी स्वतंत्र त्रिपरालँड या राज्याची मागणी केली आहे.त्याच्यासाठी त्यांनी राज्यात आंदोलने केल्यावर नवी दिल्लीत देखील आंदोलने केली आहेत. सध्या त्रिपूरा राज्यात भाजपाचे सरकार आहे.प्रस्तावित नव्या राज्याला काँग्रेस, आप आदी सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेशबरोबर 820 किमीची सीमा शेअर करणारा इशान्य वगळता अन्य सातही दिशांना बांगलादेश हा देश असलेला, स्वतःच्या भौगौलिक स्थानामुळे भारताला बांगलादेशामध्ये अंतर्गत भागात काय चालू आहे? याची माहिती घेण्यास साह्य करणारे राज्य म्हणजे त्रिपूरा. म्यानमारबरोबर सिमा असणाऱ्या मिझोराम या छोट्या राज्याबरोबर सीमा असणारे, राज्य म्हणजे त्रिपूरा 19 जनज...

सांघिकता आणि बुद्धिबळातील यश (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग८ )

इमेज
      मागील भागात आपण वैयक्तिक मानसिकतेचा बुद्धिबळातील यशापयशावर काय परिणाम होतो ? हे बघितले या भागात आपण सांघिकता आणि बुद्धिबळ यातील सहसंबध बघणारा आहोत सांघिक खेळातूनही बुद्धिबळात भरपूर काही शिकता येते . जुलै २०१८ मध्ये फिफा वर्ल्ड कप मध्ये इतिहास घडला ५ वेळा विश्वविजेता असणाऱ्या ब्राझीलला हरवून तब्ब्ल ३२ वर्षांनी बेल्जीयमने उपांत्य फेरी गाठली याच्या आधी १९८६ मध्ये बेल्जीयमचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला होता युरोकप २०००मध्ये बेल्जीयम पहिल्या फेरीतच बाद झाला होता. त्याची बोज बेल्जीयम संघाला लागून राहिली माजी फुटबालपटू मायकल सेबलोन यांच्यावर संघ तयार करण्याची जवाबदारी देण्यात आली त्यांनी तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन एक उत्तम आरखडा (ब्लु प्रिंट ) तयार केला प्रथम त्यांनी खेळण्याची पद्धत बदलली .  विजयावरच लक्ष केंद्रित केले प्रक्षिक्षकांची संख्या वाढवली नॅशनल फुटबॉल सेंटर उभारले अश्या बऱ्याच गोष्टीमुळे बेल्जीयम उपांत्य फेरीत पोहोचला  मागच्या लेखात आपण बघितल्याप्रमाणे वैयक्तिक मानसिकता आणि वर उल्लेख केलेल्या संघ भावनेचा विचार केला असता आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात ...

इथे सिगारेट नाय!

इमेज
 जगाला आपल्या आचरणातून नेहमी चांगला संदेश देणाऱ्या न्युझीलंडने, नुकताच एक धाडसी निर्णय घेतला आहे.  सिगारेटमुळे होणाऱ्या मृत्यूला विचारत घेवून सिगारेट विकणाऱ्या दुकांनाची संख्या निम्यावर आणण्यचा तसेच  . या निर्णय या आधी न्युझीलंड देशात सिगारेट विक्रीची 1हजार दुकाने होती जी आता फक्त 500असणार आहेत. तसेच 2025 पर्यत संपुर्ण देश सिगारेट मुक्त करण्यासाठी धडक पाउले उचलण्याची तयारी करण्याचा. त्यासाठी 2008च्या नंतर जन्मलेल्या व्यक्तींना  कोणत्याही स्थितीत सिगारेट न देण्याचा आणि 18वर्षाखालील व्यक्तींना सिगारेट ओढण्यास मनाई करण्याचा कायद्यातील वयोमर्यादा टप्याटप्याने  वाढवत नेवून संपूर्ण देश सिगारेट मुक्त करण्याचा निर्धार तेथील संसदेत व्यक्त करण्यात आला. तेथील आरोग्य मंत्र्यांनी या साबत तेथील जनतेला माहिती दिली  काही जण आपल्याकडेही  असी बंदी असल्याचे सांगतील, मात्र ते विसरतात ही बंदी न्युझीलंड देशाने घातली आहे. जिथे सर्वसामान्य लोकांचा कायदे पाळण्याचा स्वाभाविक कल असतो, आपल्या सारखी समोर पोलीस असला तरच वाहतूक नियम पाळा, अन्यथा बिनधास्त नियम मोडा असी स्थिती तिथे नस...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग 7)

इमेज
              या  लेखात आपण ऑलम्पिक खेळाडू आणि सांघिक खेळाडूची तयारी कशी होते ? त्याची मानसशास्त्रीय घडणीविषयी बघूया . यासाठी आपणस कॅरोली टकास  यांचे  उदाहरण उपयुक्त ठरेल   कॅरोली टकास यांच्या जन्म २१ जानेवारी १९१० रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये झाला . त्यांनी १९४८ आणि १९५२ साली उन्हाळी ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला . हंगेरीच्या लष्करात ते कार्यरत होते जिथे वयाच्या २६व्य वर्षीच त्यांचे नाव सर्वश्रेष्ठ शूटर्समध्ये गणले जाऊ लागले शूटिंगच्या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद त्यांच्या नावावर होते १९३६ च्या बुद्धिबळ ऑलम्पियाकमध्ये सुवर्णपदकासाठी त्यांनी ध्येय निश्चित करून तयारी सुरु केली कॅरोली टकास सर्जन असलयाने आणि त्यावेळच्या हंगेरीच्या लष्करातील नियमानुसार फक्त कमिशन्ड ऑफिसर व्यक्तींनाच स्पर्धेत भाग घेण्यास अनुमती असल्याने त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली .या मनाई हुकुमामुळे  त्यांच्या ध्येयामध्ये पहिलाच अडथळा निर्माण झाला सुदैवाने बर्लिन ऑलम्पिकनंतर हा निर्ण...

औपचारिकता बाकी (ब बुद्धिबळाचा भाग १८ वा )

इमेज
       बुद्धिबळाचा २०२१ चा विश्वविजेता हा विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन हाच होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे ८ डिसेंबर रोजी झालेल्या १० व्या डावानंतर मँग्नस कार्लसन याचे साडेसहा गुण झाले आहेत . तर विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या रशियाच्या इमाँन नोपाव्हची यांचे साडेपाच गुण झाले आहेत या स्पर्धेतील ४ सामने अद्याप बाकी आहेत . विश्वविजेत्यापदाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साडेसात गुणांची कमाई करण्यासाठी मँग्नस कार्लसन यांना एक डाव जिंकणे किंवा दोन डावात बरोबरी साधणे आवश्यक आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या इमाँन नोपाव्हची यांना पुढील सर्व डाव जिंकणे अत्यावश्यक आहे त्यांनी यातली कोणताही डाव  गमावला तर  गेल्या चार वर्षांपासून विश्वविजेते असणारे मँग्नस कार्लसन हेच पाचव्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेते होतील  जर पुढील एखादा डाव बरोबरीत सुटला आणि बाकीचे  तीन डाव  इमाँन नोपाव्हची यांनी जिकंले तर दोघांचे सात गुण होतील अश्या वेळेस दोघांत रॅपिड सामने खेळवण्यात येऊन त्यातील विजेता विश्वविजेता बनेल मात...

भारत रशिया मैत्रीचा नवा सेतू

इमेज
       सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते करोना संसर्गाचा धोका अद्याप टाळलेला नसल्याने त्यांनी इतका छोटा दौरा केला मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी मात्र भारतातच बऱ्याच आधी येऊन भारताबरोबर विविध मुद्यावर चर्चा केली ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली . हे सर्व करार लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या २१व्या भारत रशिया समीटमध्ये करण्यात आले या कराराबरोबर चीनचा जगाला असणारा धोका आणि अफगाणिस्तानमधील अंतर्गत शांताता प्रक्रिया यावर देखील या समिटमध्ये चर्चा करण्यात आली  नवी दिल्लीयेथील हैद्राबाद हाऊस येथे हे करार करण्यात आले ज्यावेळी सन  २०१९ मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS अधिवेशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पहिल्यादाच ऑफलाईन पद्धतीने  समोर...

संमेलनाध्यक्षांचे कवित्व !

इमेज
            ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँक्टर जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. वयोमानामुळे, करोना संसर्गाच्या भितीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे संमेलनाध्यक्ष  कार्यक्रमास प्रत्यक्ष  उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांनी आँनलाईन पद्धतीने यात सहभाग नोंदवला. यावरुन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव  ठाले पाटिल यांनी एक  विधान केले.आणि महामंडळाची घटना बदलण्याची भाषा सुरु केली. तरुण साहित्यिक अध्यक्ष असावा असी चर्चा यामुळे सुरु झाली.      मुळात प्रत्येक निवड प्रक्रीयेत काहीतरी उणीवा असतातच. कमीत कमी उणीवा असलेली निवड प्रक्रीया उत्तम समजली जाते. एखादी निवड प्रक्रिया स्विकारली तर त्यातील दोषपण विनातक्रार स्विकारणे आवश्यक आहे. चांगल्या बरोबर वाइट देखील येणारच ना ? त्याचाही विनासंकोच स्विकार करायला नको का?        या आधी संमेलनाध्यक्ष महामंडळाच्या सदस्यांकडून निवडणूकीद्वारे निवडला जात असे. संमेलनाध्यक्ष पदासाठीचे उत्सुक मतदारांना आपली भुमिका घेवून मतदार...