पोस्ट्स

महारष्ट्रातील रेल्वे बदलतीये .....

इमेज
          सध्या भारतातील रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे . त्याचाच परिणामस्वरूप महारष्ट्रातील रेल्वेसुद्धा विद्युतवेगाने बदलत आहे रेल्वे संदर्भात विविध प्रलंबित प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे यासाठी रेल्वेत प्रशासनिक बदल तसेच पायाभूत सोयीसुविधा उभारणे याचा समावेश होत आहे गेल्या पंधरवड्यात अहमदनगर - परळी रेल्वेमार्ग , कुर्डुवाडी लातुर रेल्वेमार्ग या मार्गाबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच अंकाई औरंगाबाबाद , मनमाड औरंगाबाद आणि औरंगाबाद परभणी या रेल्वेमार्गाबाबत विविध प्रस्तावास मंजुरी तसेच मध्य रेल्वेचा सोलापूर विभागातील सुमारे २५० किमीचा मार्ग मध्य रेल्वेचा पुणे विभागांतर्गत वर्ग करण्याबाबतचा हालचालीस वेग देणे आदी घडामोडी महाराष्ट्राचा रेल्वेबाबत घडल्या .      आजपासून सुमारे  २५ वर्षांपूर्वी अर्थात १९९५-९६सालच्या रेल्वेअर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या मात्र निधीची अपुरी  तरतूद आणि इतर काही  बाबींमुळे फारसे काम न झालेल्या या सुमारे २८५ किमीच्या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६४ किमी मा...

संसदेचे हिवाळी अधिवेशन २०२१

इमेज
         नुकतेच संसदेचे हिवाळी अधिवेशन झाले .  ब्रिटिश भारतात  लागू करण्यात आलेल्या १९३५ च्या भारतीय प्रशासन कायद्यानुसार अमलात आलेली तरतूद जी भारतीय संविधानाच्या ८५ व्य कलमात अंर्तभूत  आहे,  या तरतुदीनुसार एका वर्षात किमान दोन संसद अधिवेशने होणे अत्यावश्यक आहे तसेच प्रत्येक अधिवेशनामध्ये ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी असू नये अशी तरतूद आहे मूळ १९३५ च्या कायद्यामध्ये संसदेचे प्रत्येक वर्षी एक अधिवेशन घेणे अत्यावश्यक होते पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर तयार करण्यात आलेल्या संविधानानुसार एका वर्षात किमान २  अधिवेशने घेणे आवश्यक आहे संविधानातील तरतूद २ अधिवेशनाची असली तरी  प्रत्यक्षात ३ अधिवेशने होतात फेब्रुवारीत होणाऱ्या अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधीवेशन म्हणतात तर पाऊस पडण्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला मानसुम  अधिवेशन म्हणतात तर हिवाळ्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला हिवाळी अधिवेशन म्हणतात  . त्यानुसार हे अधिवेशन झाले हे अधिवेशन मुळात २४ दिवस होणार होते जे संसदेत होणाऱ्या गोंधळाचे कारण देत सरकारकून एक द...

लडाख वासियांच्या आक्रोश

इमेज
            लडाख ,भारताचं नवनिर्मित सर्वात तरुण अश्या दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी पैकी एक .ज्याची निर्मिती जम्मू काश्मीर या राज्याचे  पुर्नघटन झाल्यावर त्यावेळच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून झाली . चीनच्या सिंकीयांग या (याला काही ठिकाणी झिंकियांग असा उल्लेख केलेला आढळतो ) मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असणाऱ्या  स्वायत्त प्रांताशेजारील हा प्रदेश त्याच्या दुर्गमतेमुळे आणि चीनविषयक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असतो १९६२ साली याच भागाचा एका लचका तोडून चीनने त्यांच्या सिकियांग प्रांतात  अनधिकृतपणे समाविष्ट केला  तर अशा लडाख गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याला कारण आहे तेथील एकमेव असणाऱ्या खासदाराने लोकसभेत केलेली मागणी  तर मित्रानो १३ डिसेंबर रोजी  जमयांग सेरिंग नामग्याल यांनी संसदेत काही मागण्या केल्या ज्यामध्ये संसदेतील लडाखचे  प्रतिनिधित्व वाढवणे ,लडाखला स्वतंत्र विधिमंडळाची स्थापना करणे तसेच संविधानाच्या ६ व्या परिशिष्टात लडाखच्या समावेश करणे या प्रमुख मागण्या आहेत हा मजकूर लिहीत असताना लडा...

ग्यानामिड एक अजब उपग्रह

इमेज
       सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात जेव्हा दुर्बिणीचा नुकतंच अवकाश संशोधनासाठी वापर होऊ लागला होता त्यावेळेस महान खगोलशास्त्रज्ञ ग्यलिलिओ यांनी  गुरूच्या चार उपग्रहांच्या शोध लावला.  ज्यास ग्यलिलिओचे उपग्रह असे म्हणतात आयो युरोपा ग्यानामिड कॅलीस्ट्रो हे ते चार उपग्रह . यातील ग्यानामिड या उपग्रहाबाबत २ मोठ्या  आश्चर्यकारक माहित्या समोर आल्या आहेत नासाच्या जुनो या मोहिमेद्वारे या  माहित्या  समोर आल्या  आहेत       ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे जो बुध ग्रहांपेक्षा मोठा आहे . ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील ज्यांच्या पृष्ठभागाखाली मोठा महासागर असावा अशी खगोल शास्त्रज्ञांना शक्यता वाटते अश्या पाच उपग्रंहापैकी एक आहे उरलेल्या चार पैकी युरोपा आणि कॅलीस्ट्रो हे गुरुचे तर टायटन आणि एन्सेलाडस हे शनीचे उपग्रह आहेत ग्यानामिड  या उपग्रहावर या उपग्रहाचा व्यास ५३०० किमी आहे पृथीच्या महासागरमध्ये असणाऱ्या पाण्यापेक्षा २५ पॅट पाणी या उपग्रहावर असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आह...

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी

इमेज
            आपल्या मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण म्हणजे "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी". एखादी समस्या सोडवण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सोडून इतरच उपाययोजना करणे, यासाठी ही म्हण वापरली जाते. बंगळुरु येथील  इंडियन इनस्टिट्युट आँफ सायन्स मधील वसतिगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याचा प्रकार बघितला, तर सध्या प्रशासनाकडून याच म्हणीसारखे वर्तन घडत आहे, असे म्हणावे लागेल.  विद्यार्थी छतावरील पंख्यांचा वापर करत आत्महत्या करत असल्याने त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याऐवजी ते छतावरील पंख्याचा वापर करतात. म्हणून छतावरील पंखे काढण्याचा प्रताप इंडियन इनस्टट्युट आँफ सायन्स प्रशासन करत आहे.पंखे काढल्यानंतर आत्महत्या थांबतील असे या प्रशासनास वाटते.मात्र सध्या असणारे छतावरील पंखे काढून टाकल्यास विद्यार्थी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत आत्महत्या करतील. मग ते पण तोडणार का? आणि पहिले साधन तोडल्यामुळे दुसऱ्या साधनाद्वारे आत्महत्या  करण्यास सुरवात केल्यामुळे ते तोडणार असी साखळी किती दिवस चालणार ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे .म...

स्वागत उत्तरायणचे –

इमेज
 आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच की, या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात तर मित्रानो, आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ बुधवारी  २२ डिसेंबरला होत आहे. त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया         पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान. सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो. मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो. अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात.  या भासमान भ्रमणात सूर्य जेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो. ज्या बिंदूपासून तो परत उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिव...

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग २ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग १०)

इमेज
    बुद्धिबळाविषयक लिहलेली पुस्तके आपण बघत आहोत या आधी युरोपात बुद्धिबळ कसा  पसरला  त्यामुळे बुद्धिबळात विविध पुस्तके निर्माण करण्याची सुरवात कशी झाली या विषयी प्राथमिक माहिती बघितली आता याविषयी सविस्तर माहिती बघूया  १८०० साली दुसऱ्या बाजीराव यांनी  त्याचा पदरी असलेल्या त्रीवेगडाचार्य यांना बुद्धिबळावर पुस्तक लिहण्यास सांगितले  त्रीवेगडाचार्य  यांनी विलासमनीमंजिरी या नावाने संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत पुस्तक लिहले पुढे १८१४ साली या पुस्तकाचे डॉ एम दि क्रूझ यांनी एजेस ऑफ चेस या नावाने त्यांचा इंग्रजीत अनुवाद केला १६ व्य आणि १७ व्य शतकात इटली आणि स्पेन दे दोन देश बुद्धिबळात अग्रेसर होते त्याच वेळी फ्रांस इंग्लड तसेच रशिया या देशात बुद्धिबळ पोहोचले  बुद्धिबळाची व्याप्ती बघितली तर १३२७ विविध प्रकारे डावाची सुरवात करता येते १४ व्य शतकात कॅसलिंगचा शोध लागला आणि त्यास बुद्धिबळात समाविष्ट करण्यात आले १ जानेवारी १९८१ साली बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडेने बुद्धिबळ डाव बीजगणितीय पद्धतीने लिहण्याचे स्वीकारले ओपनिंग लक्षात ठेवण्यासाठी...