पोस्ट्स

एकाग्रता कशी वाढवायची ? (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग ११ )

इमेज
       बुद्धिबळाच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता किती महत्वाची असते ? हे आपण गेल्या काही भागात बघितले या भागात आपण एकाग्रता कशी वाढवायची ? हे आपण बघूया एकाग्रता बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे दुसरा गुण शिस्त आहे या शिस्तीविषयी आपण पुढच्या भागात बघूया .   एकाग्रत्तेबाबाबत सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत एकाग्रतेबाबत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे ते म्हणतात, " एकाग्रता हा जन्मजात गुण  आहे मात्र आपण त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो . डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानवर . वकिलाने  लढायला घेतलेल्या खटल्याववर आणि खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले तर तर खूप काही साधता येईल , किंबहुना यशाची गुरुकिल्ली एकाग्रचित्रात आहे असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही            क्रिकेटच्या खेळातील एकाग्रचित्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉट घेता येईल फलंदाजी करताना त्याची एकाग्रचित्रता मुळीच ढळत नसे समोरच्या संघाने शेरे मारून डिवचवावे . किंवा गर्दीने हुल्लतबाजी करावी , बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम हो...

काझकिस्तान अशांततेच्या वळणावर

इमेज
           इंधनाचे दर अचानक दुप्पट केले तर ? काय  होऊ शकते याचा अनुभव जग काझकिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांद्वारा सध्या घेत आहे . कझाकिस्तान देशातील सरकाने आपल्याकडील  महसुली आणि इतर जमा कमी आहे ,  लक्षात आल्याने लिक्विफाईड पेट्रलियम गॅस (  एल पी जी)  वरील सबसिडी कमी करत त्याचे भाव तब्बल दुप्पट केले .सरकारच्या या निर्णयामुळे तेथील जनमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले .त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यांवर हिंसक आंदोलने केली देशाच्या राजधानीच्या शहराच्या महापौरांच्या कार्यालयाची तोडाफेड केली परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे बघून तेथील प्रास्तवित दरवाढ रद्द केली मात्र तेथील आंदोलक शांत झाले नाहीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आंही हे बघून आपल्या  मंत्रिमंडळासह तेथील पंतप्रधांनी आपला राजीनामा दिला आणि देशात आणीबाणी जाहीर केली अन्य देशांना मदतीची याचना केली ज्याला रशियाने सकरात्मक प्रतिसाद देत आपले संरक्षण दल त्या देशात मदतीसाठी पाठवले आहे .  देशातील पश्चिम आणि उत्तरेकडील भाग फुटीच्या उंबरठयावर उभा आहे.  या...

या बदलांना सामोरे जाण्यास आपण तयार आहोत का ?

इमेज
            जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात जगभरात काय चालू आहे ? याचा आढावा घेतल्यास कोव्हीड १९ पेक्षा अधिक लोक हवमानाच्या लहरीपणामुळे  त्रस्त झाल्याचे आपणास दिसून येईल .  आग्नेय आशिया,  युएसए  ऊत्तर भारत आदी जगभरातील विविध प्रदेश या लहरी हवामानाचा प्रकोप सध्या झेलत आहेत आपल्या महाराष्ट्रात एव्हढे लहरी हवामान अद्यापतरी दिसत नसले तरी,  कधीना कधी आपणास आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा याचा सामना करायला लागणारच आहे त्यासाठी आपण आतापासून तयारी करायला हवी त्याठिकाणी मात्र आनंदी आनंदच सध्या दिसतोय.             यूएसएच्या आग्नेय दिशेतील राज्य, अटलांटिक किनाऱ्याच्या विचार करता मध्यातील राज्य सध्या प्रचंड कडक अश्या थंडीच्या सामना करत आहे . याथंडीमुळे तेथील प्रशासनने शाळा महाविद्यलये बंद ठेवली आहेत  अमेरिकेसारखी जगातील महासत्ता असून देखील अनेक नागरिक विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहेत जागोजागी हिमवर्षावामुळे मोठ्या प्रमाणत बर्फ साठले आहे अमेरिकेत जागोजागी हिमवादळे होत आहेत त्यामुळे तेथील जनजीवन म...

भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्ट

इमेज
              सध्या भारताच्या पश्चिमेला असणारऱ्या पाकिस्तान आणि दक्षिणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात एका वाईट गोष्टीवरून तीव्र स्पर्धा सुरु आहे.  ज्या वाईट गोष्टीवरून ही स्पर्धा सुरु आहे ती म्हणजे कोणता देश पहिल्यांदा दिवाळखोर होतो . दोन्ही देशांच्या आर्थिक स्थैर्याबाबत येणाऱ्या बातम्या दिवसोंदिवस अधिकाधिक वाईट होत चालल्या आहेत दोन्ही देशात महागाईने या आधीचे सर्वांच्या सर्व विक्रम केव्हाच मोडीत काढले आहेत दोन्ही देशात दोन आकडी  महागाई आहे . जेव्हा वस्तूची  किंमत  अत्यंत कमी वेळात   किमान १०% ने वाढते तेव्हा महागाई दोन आकडी झाली असे म्हणतात . आज हा मजकूर लिहीत असताना दोन्ही देशातील महागाई १३ ते १५ % टक्याच्या आसपास आहे ही महागाई रोखणे त्या देशातील केंद्रीय सरकारच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत           आजमितीस जानेवारीच्या पहिल्याआठवड्यात या मध्ये श्रीलंका हा देश दुर्दैवाने पुढे आहे . अपुऱ्या परकीय चलनाच्या साठ्य...

भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार ?

इमेज
       भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार  का ? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे ?आणि याला कारणीभूत ठरली आहे, पडुचेरी  या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी एन रंगास्वामी यांनी केंद्राकडे पडुचेरी ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी केलेली मागणी.  जर ही मागणी पूर्ण झाल्यास पडुचेरी  देशातील सर्वात छोटे राज्य होईल हा मजकूर लिहीत असतानां गोवा हे देशातील सर्वात छोटे राज्य आहे ते क्षेत्रफळाच्या विचार करता दुसरे छोटे राज्य होईल ध्या पडुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत आहे       पडुचेरी  देशातील दोन फ्रेंच वसाहतीपैकी एक ,. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात फ्रान्सच्या अधिपत्याखाली पडुचेरी आणि चंद्रनगर या दोन वसाहती होत्या.  त्यातील चंद्रनगर या वसाहतीला पश्चिम बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आले  तर दुसऱ्या वसाहतीला अर्थात पडुचेरीला केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जा देण्यात आला होता . जो आता पूर्ण राज्य करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे  ...

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले

इमेज
              आपल्या भारतात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत .त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र होय, महाराष्ट्र्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे,  हे सांगायचे कारण म्हणजे,  १ जानेवारी रोजी  केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ या महिन्यातील जीएसटीच्या संकलनाचेजाहीर केलेले आकडे . गेल्या महिन्यात पूर्ण देशभरातून १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले तर ज्या मध्ये  महाराष्ट्राचा वाटा आहे १९ हजार ५२९ कोटींचा . देशाच्या जीएसटी संकलनास जर १०० टक्के समजले तर महाराष्ट्राच्या वाटा जवळपास १६% होतो.  १६ च्या सव्वासहा पट म्हणजे १०० होते.  थोडक्यात पूर्ण देशाच्या एकष्ठांश वाटा हा महाराष्ट्राकडून देशाच्या तिजोरीत गेला  महाराष्ट्राचे अर्थकारण कोव्हिड १९ च्या धक्यातून पूर्णपणे बाहेर आलेले असून वेगाने पुढे जात आहे हेच यातून दिसत आहे    गेल्या काही महिन्याचा विचार करता, महाराष्ट्र सातत्याने जीएसटी संकलनात सातत्याने क्रमांक एकाचाच राहिला आहे ज्याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून आपणास अभि...

सन २०२२ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
           शुक्रवारी रात्री आपण नववर्ष स्वागत केले  कॊव्हिड १९ चे विविध नियम पाळत.  मागच्या वर्षातील कटू त्रासदायक आठवणी प्रसंगाला विसरत आपण नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले नव्या वर्षाबाबत आपल्या सर्वांना खूप उत्सुकता आहे पुढे येणारे वर्ष  कसे  असेल ? बाबत अनेकांना खूप उत्सुकता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की , येणाऱ्या सन २०२२ मध्ये अनेक अनेक खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहे   खगोलीय चमत्काराची सुरवात वर्षातील तिसऱ्या  दिवशी अर्थात ३ जानेवारीपासून सुरु होत आहे या दिवशी आणि याच्या पुढच्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव आपली वाट बघत आहे या दिवशी तासाला सुमारे १२० उल्का या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे ४ फेब्रुवारी रोजी पृथ्वी  आणि शनी यांच्यामध्ये सूर्य येणार आहे ज्यामुळे शनी ग्रह सूर्याच्या प्रकाश्यात लुप्त झाल्याने  आकाश्यात पुढील काही दिवस शनी हा ग्रह दिसणारा नाही {जोतिषीय भाषेत शनीचा अस्त होणार आहे ] ९ फेब्रुवारी रोजी शुक्र वर्षातील सर्वाधिक प्रखर दिसणार आहे ...