पोस्ट्स

मेमू म्हणजे काय रे भाउ!

इमेज
    जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 10 तारखेला भुसावळ इगतपूरी दरम्यान रेल्वेची मेमू सेवा सुरु झाली. आणि नाशिकमध्ये सर्वत्र मेमू म्हणजे काय रे भाउ असी चर्चा सुरु झाली. आपली सर्वसाधरण रेल्वे आणि मेमूमध्ये काय फरक आहे? याबाबत विविध चर्चांना नाशिकमध्ये उधाण आले.त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. अनेकांना हा निर्णय केंद्र  सरकारने आताच घेतला आहे असे  वाटू शकते त्यांना मी सांगू इच्छितो की देशातील पँसेजरचे मेमूमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने सन2018मध्येच घेतला होता . सुरवातीला पुरेसे मेमू नसल्याने आणि नंतर कोव्हीड 19चा उद्रेक झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला ,इतकेच.मोदी सरकारने  त्यासाठी देशातील चार प्रमुख शहरे दिल्ली , मुंबई, कोलकत्ता ,चेन्नई या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर सर्वप्रथम हा बदल अमंलात आणण्याचे ठरवले आहे. पँसेजरच्या ऐवजी मेमू चालवल्यास यामार्गावरील इतर रेल्वे गाड्यांचा वेग वाढवता येईल असा रेल्वेचा कयास आहे. भुसावळ इगतपुरी हा रेल्वेमार्ग मुंबई दिल्ली आणि मुंबई कोलकत्ता या मार्गावरचा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा रेल्वेम...

आंनद सांगू सख्यारे किती ! (ब बुद्धिबळाचा भाग १९ )

इमेज
         सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत्या कोव्हीड १९ च्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनची  प्रशासनाने कोव्हीड १९ आटोक्यात आणण्यासाठी लादलेल्या निर्बंधनात आपला व्यवसाय कशा करावा  चिंतेत व्यावसायिक असताना वाळवंळामध्ये दूरवर कुठेही पाण्याच्या अंश नसताना अचानक एखादा पाण्याच्या मोठा स्रोत दिसावा आणि अतिशय आंनद व्हावा अशी एक आनंदाची बातमी ९ जानेवारी रोजी येऊन धडकली आणि सर्वांना एकच आंनद झाला झाला  नव्या वर्षाच्या प्रारंभ होऊन जेमतेम आठवडा होत नाही तोच भारताला बुद्धिबळात नवा ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता होती .         तर मित्रानो, चेन्नई येथील रहिवाशी असलेल्या १४ वर्षीय भारथ  सुब्रह्मण्यम  भारताचा ७३वा ग्रँडमास्टर झाले  आहेत  इटली या देशात सुरु असणाऱ्या Vergani Cup opem या स्पर्धेत ९ डावात ६ विजय एक बरोबरी तर दोन डावात पराभव स्वीकारून साडेसहा गुण प्राप्त करत ग्रँडमास्तरपदाचा तिसरा आणि अंतिम निकष २५०० इलो रेटिंगसह प्राप्त करत त्यांनी ग्रँडमास्टर पदाला गवसणी घालत सध्याचा काहीश्या नैराश्यच्या...

बुद्धिबळात शिस्तीचे महत्व (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ २)

इमेज
             बुद्धिबळामध्ये एकाग्रता का आवश्यक असते ? ती कशी वाढवावी ? हे आपण मागच्या भागात बघितले या भागात आपण बुद्धिबपटूला यशस्वी होण्यासाठी बुद्धिबळपटूला शिस्त का आवश्यक असते ? ते बघूया . तसे बघता सर्वच यशस्वी लोकांच्या जीवनात एकाग्रतेबरोबर शिस्तही महत्त्वाची असते / शिस्तीबद्दल ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्रज्ञ निवृत्त अय पी एस अधिकारी कै.  भीष्मराज बाम सरांनी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले की , मोठेमोठे खेळाडू , कलाकार नेते या सर्व यशस्वी व्यक्तींना अंगात शिस्त मुरवली तरच यश आणि कीर्ती मिळवता येते . जर आपण कंटाळा केला तर प्रतिकूल परिस्थती आली की , आपण कमी पडू . आणि यश लांबेल अथवा मिळणार नाही हे माहिती असते .            बुद्धिबळाचा विचार करता बुद्धिबळाचा नियमित अभ्यास ना केल्याने अनेक अडचणी येतात अभ्य्साला देखील शिस्त असणे हे महत्त्वाचे आहे . बुद्धिबळाचा अभ्यास करताना काय अडचणी येतात आणि त्यावर अभ्यासाचा शिस्तीद्वारे कोणते उपाय योजता येतात हे बघूया  १) ज्या वेळेस पर्याय असतील त्यावेळीस निर्णय घेता येत नाही . वेळ ...

काळे गोरे सर्वत्र

इमेज
          शाहरुख खान यांच्या एक चित्रपट आहे "माय नेम इज खान ....' . या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये दोन समाज घटकांमध्ये दंगल होते छोटा रिझवान(चित्रपटातील शाहरुख खानच्या पत्राचे नाव ) घाबरत घाबरत बाल्कनीतून बाहेर येतो तेव्हा तो  खाली उभा असणाऱ्या मोठ्या वयाच्या लोकांचे बोलणे ऐकतो " वो गंदे लोग है उनको काट देना चाहिये ! " वाक्याचा अर्थ न समजलेला रिझवान ते गुणगुणत आतमध्ये येतो तेव्हा रिझवानची आई त्याला तू हे काय बोलत आहेस ? असं काही नसत असे म्हणत त्याला कागदावर दोन मनुष्याची चित्रे काढायला सांगून त्याला यातील चांगला मनुष्य कोणता ? आणि वाईट मनुष्य कोणता ? असे विचारते .रिझवान गांगरून जातो . मग ती त्याला सांगते ते ज्याप्रमाणे आपल्या समाजात जशी काही माणसे तुझी चेष्टा करतात टर उडवतात तर काही जण तुझी काळजी घेतात तसेच त्यांच्यामध्येही आहेत ती वाईट माणसे आहेत हा गैरसमज डोक्यातून काढून टाकं , असं काही नसत रिझवानच्या आईने त्याला दिलेला हा सल्ला अत्यंत महत्त्वाच्या आहे सध्याच्या काळात याचे महत्व तर अजूनच वाढलेय आणि त्यास कारणीभूत ठरलंय . एका विशिष्ट समुदायाच्या ...

एकाग्रता कशी वाढवायची ? (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग ११ )

इमेज
       बुद्धिबळाच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता किती महत्वाची असते ? हे आपण गेल्या काही भागात बघितले या भागात आपण एकाग्रता कशी वाढवायची ? हे आपण बघूया एकाग्रता बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे दुसरा गुण शिस्त आहे या शिस्तीविषयी आपण पुढच्या भागात बघूया .   एकाग्रत्तेबाबाबत सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत एकाग्रतेबाबत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे ते म्हणतात, " एकाग्रता हा जन्मजात गुण  आहे मात्र आपण त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो . डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानवर . वकिलाने  लढायला घेतलेल्या खटल्याववर आणि खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले तर तर खूप काही साधता येईल , किंबहुना यशाची गुरुकिल्ली एकाग्रचित्रात आहे असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही            क्रिकेटच्या खेळातील एकाग्रचित्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉट घेता येईल फलंदाजी करताना त्याची एकाग्रचित्रता मुळीच ढळत नसे समोरच्या संघाने शेरे मारून डिवचवावे . किंवा गर्दीने हुल्लतबाजी करावी , बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम हो...

काझकिस्तान अशांततेच्या वळणावर

इमेज
           इंधनाचे दर अचानक दुप्पट केले तर ? काय  होऊ शकते याचा अनुभव जग काझकिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांद्वारा सध्या घेत आहे . कझाकिस्तान देशातील सरकाने आपल्याकडील  महसुली आणि इतर जमा कमी आहे ,  लक्षात आल्याने लिक्विफाईड पेट्रलियम गॅस (  एल पी जी)  वरील सबसिडी कमी करत त्याचे भाव तब्बल दुप्पट केले .सरकारच्या या निर्णयामुळे तेथील जनमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले .त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यांवर हिंसक आंदोलने केली देशाच्या राजधानीच्या शहराच्या महापौरांच्या कार्यालयाची तोडाफेड केली परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे बघून तेथील प्रास्तवित दरवाढ रद्द केली मात्र तेथील आंदोलक शांत झाले नाहीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आंही हे बघून आपल्या  मंत्रिमंडळासह तेथील पंतप्रधांनी आपला राजीनामा दिला आणि देशात आणीबाणी जाहीर केली अन्य देशांना मदतीची याचना केली ज्याला रशियाने सकरात्मक प्रतिसाद देत आपले संरक्षण दल त्या देशात मदतीसाठी पाठवले आहे .  देशातील पश्चिम आणि उत्तरेकडील भाग फुटीच्या उंबरठयावर उभा आहे.  या...

या बदलांना सामोरे जाण्यास आपण तयार आहोत का ?

इमेज
            जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात जगभरात काय चालू आहे ? याचा आढावा घेतल्यास कोव्हीड १९ पेक्षा अधिक लोक हवमानाच्या लहरीपणामुळे  त्रस्त झाल्याचे आपणास दिसून येईल .  आग्नेय आशिया,  युएसए  ऊत्तर भारत आदी जगभरातील विविध प्रदेश या लहरी हवामानाचा प्रकोप सध्या झेलत आहेत आपल्या महाराष्ट्रात एव्हढे लहरी हवामान अद्यापतरी दिसत नसले तरी,  कधीना कधी आपणास आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा याचा सामना करायला लागणारच आहे त्यासाठी आपण आतापासून तयारी करायला हवी त्याठिकाणी मात्र आनंदी आनंदच सध्या दिसतोय.             यूएसएच्या आग्नेय दिशेतील राज्य, अटलांटिक किनाऱ्याच्या विचार करता मध्यातील राज्य सध्या प्रचंड कडक अश्या थंडीच्या सामना करत आहे . याथंडीमुळे तेथील प्रशासनने शाळा महाविद्यलये बंद ठेवली आहेत  अमेरिकेसारखी जगातील महासत्ता असून देखील अनेक नागरिक विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहेत जागोजागी हिमवर्षावामुळे मोठ्या प्रमाणत बर्फ साठले आहे अमेरिकेत जागोजागी हिमवादळे होत आहेत त्यामुळे तेथील जनजीवन म...