पोस्ट्स

केंद्र राज्य संबंध पुन्हा एकदा तणावाचे!

इमेज
     केंद्र सरकार आणि देशातील राज्य सरकारे यांचे परस्पर सबंध गेल्या काही महिन्यात अनेकदा तणावाचे झाले आहेत. तसेच ते 13 जानेवारीला, केंद्र सरकारच्या  Departtment Of Persnonal Traning ने   विविध राज्यात आपली सेवा देणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची केंद्र शासनात प्रतीनियुक्तीवर नियुक्ती करण्यावरुन घेतलेल्या निर्णयावरून झाले आहेत. या निर्णयानुसार केंद्र सरकार त्यांना हवे तितके अधिकारी एखाद्या राज्यातून प्रतिनियुक्तीवर घेवू शकते, तसेच केंद्राने मागितलेल्या संख्येएव्हढे अधिकारी पुरवणे राज्यांना बंधनकारक ठरणार आहे. तसेच केंद्र सरकारला एखाद्या अधिकाऱ्याला त्याचा विषय तज्ज्ञतेमुळे केंद्र सरकारच्या सेवेत घ्यावेसे वाटले, तर घेता येणार आहे..इंडियन अँडमिस्टेशन सर्व्हिस, इंडियन  पोलीस सर्व्हिस, आणि इंडियन फाँरेस्ट सर्व्हिस मधील अधिकाऱ्यांंबाबत ही बंधने असणार आहेत.         या प्रस्तावाला भाजपाशासित राज्यांसह अनेक राज्यांनी विरोध केला आहे .राज्यातील प्रशासन यामुळे पुर्णतः कोलमडून पडू शकते. संघराज्य पद्धतीवर हा मोठा आघात आहे, अस्या प्रकार...

भारत अमेरिका संबंधात कटुता ?

इमेज
भारत आणि अमेरिका या  देशांमध्ये संबंधात कटुता तर   निर्माण होणार नाहीना ? अशी शंका उपस्थित करणारी एक घडामोड नुकतीच घडली. त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन तर जगात मुक्तपणे व्यापार व्हावा, यासाठी कार्यरत असणाऱ्या, जागतिक व्यापार संघटनेने(WTO) जागतिक व्यापारात सर्वांना समान संधी मिळाव्यात,  या हेतूने सबसिडीबाबत काही बंधने घातली आहेत. त्यातील गहु उत्पादनाविषयीच्या तरतूदींचे भारताच्या सरकारकडून उल्लंधन होत आहे, ज्यामुळे भारतीय गहु उत्पादन आणि अमेरीकी गहु उत्पादक यांच्यात निकोप स्पर्धा होत नाहीये, तरी जागतिक व्यापारी संघटनेने आवश्यक ती पाउले उचलण्यासाठी अमेरीकेने जागतिक व्यापार संघटनेवर दबाब टाकावा ,असी मागणी काही अमेरीकी क्राँग्रेसच्या सदस्यांनी बायडन प्रशासनाकडे केली आहे. त्यांचा मते भारतासारख्या विकसनशील देशांना उत्पादन खर्च्याचा जास्तीत जास्त 10% सबसिडी देण्यास मान्यता असताना ,भारत आपल्या गहु उत्पादकांना तब्बल 50% थोडी अधिक सबसिडी देत आहे. जे जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वाचा विरोधात असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. ही मागणी प्राथमिक  स्तरावरची आहे . ही मागण...

पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललीये ?

इमेज
       पाकिस्तानची  वाटचाल कुठे चाललीये ?  अश्या घटना सध्या पाकिस्तानात घडत आहेत.ग्वादर या बंदरावर चीनी दादागिरीबाबत महिन्याहुन अधिक काळ आंदोलन सुरु होते.ते शांत होते ना होतेच तोच, 20 जानेवारी 2022 या दिवशी पाकिस्तानमधील दुसरे मोठे शहर, जे पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली प्रांत असणाऱ्या पंजाब प्रांताची राजधानी आहे, आणि पाकिस्तानातील एकमेव मेट्रो सर्व्हिस ज्या शहरात सुरु आहे, जे शहर भगवान श्रीराम यांच्या मुलगा लव यांनी वसवले असी मान्यता आहे, त्या लाहोरमध्ये  बाँम्बस्फोट झाला.ज्याची जवाबदारी बलूचिस्तान नँशलिस्ट आर्मी या संघटनेने त्यांचा टेलीग्राम अकाउंटद्वारे घेतली आहे. ही संघटना बलूचीस्थानचा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या चार प्रमुख  संघटनांपैकी असणाऱ्या युनाटेड बलूच आर्मी, आणि बलूच रिपब्लिकन आर्मी या दोन संघटनांचा एकत्रीकरणातून जन्माला आलेली संघटना आहे. या दोन संघटनांमध्ये बलूच रिपब्लिकन आर्मी ही संघटना तीच्या हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध आहे.  या दोन संघटनांनंतर बलूच  लिबरेशन फ्रंट आणि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटना बलुचीस्तानच्या स्वातंत...

अखेर मराठवावाडा रेल्वेच्या विकासाच्या नकाश्यावर

इमेज
                  मराठवाडा देशाच्या साधारण मध्यभागी असणारा एक अविकसीत मात्र धार्मिक विचार करता अत्यंत समृद्ध भाग.(देशभरात असणाऱ्या 12पैकी ज्योर्तिलिंगापैकी 3 ज्योर्तिलिंग आणि देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी दोन पुर्ण शक्तीपीठ  तसेच  महाराष्ट्रातील संतांपैकी अनेकाचा काहीना सबंध हा मराठवाड्याशी असतोच) हे मराठवाड्याचे अविकसीत अनेक बाबतीत दिसते ,राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेची स्थिती वगैरे  आता मात्र या चित्रात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. संपुर्णतः डिझेलवर चालणाऱ्या मराठवाड्याचा रेल्वेचे आता झपाट्याने विद्यूतीकरण होत आहे. परभणी ते परळी वैजनाथ ते विकाराबाद, मनमाड ते औरंगाबाद, कुर्दुवाडी ते लातूर तसेच अकोला ते पुर्णा या सर्वच मार्गावर रेल्वे झपाट्याने विद्यूतीकरण करताना आपणास दिसत आहे       परभणी जंक्शन  ते परळी वैजनाथ या सुमारे 64 किमीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम मागील वर्षी अर्थात 2021 साली सुरु झाले. आजमितीस त्यातील 31किमीचे म्हणजेच सुमारे 50% काम पुर्ण झाले आहे. पोखरणी ते वडगाव निळा या दरम्यान काम अत...

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते.

इमेज
            सध्या नाशिककर कोव्हिड 19 च्या वाढत्या संख्येमुळे धास्तावले असताना,  एक नाशिककर जगभरात नाशिकचेच नव्हे, भारताचे नाव उंचावत आहे. सुपर ग्रँडमास्टर विदीत गुजराथी हे त्या नाशिककराचे नाव.De  Moriaan येथे सुरू असणाऱ्या टाटा स्टिल चेस चँम्पियन स्पर्धेत  तिसऱ्या डावा अखेर अडीच गुण प्राप्त करत स्पर्धेत अभिनंदनास्पद बढत घेतली आहे. त्यांनी पहिल्या आणि तिसऱ्या डावात विजय तर दुसऱ्या  बरोबरी साधली.  टाटा स्टिल चेस चँम्पियन चे 84 वे वर्ष आहे. ही स्पर्धा फिडे या बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. टाटा स्टिल या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्यामुळे त्यांचा नावे ही स्पर्धा ओळखली जाते.  जसे व्हिवो आयपिएल,डिएलएफ आयपिएल वगैरे.        बुद्धिबळाच्या कॅलेंडरमधील वर्षातील सर्वात  महत्वाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते.बुद्धिबळाच्या स्पर्धा तीन प्रकारात होतात ,क्लासिकल, रँपिड आणि ब्लिटस .त्यातील क्लासिकल या प्रकारात 13 फेऱ्यामध्ये होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्ताची आहे.टा...

महाविनाश !

इमेज
निसर्गाची ताकद किती भयानक आहे ,याचे प्रत्यंतर शनिवारी पॅसिफिक  महासागरातील किंग्डम ऑफ टोंगा  छोट्याच्या देशात  झालेल्या  ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जगाने अनुभवले.  उपग्रहाने ही घटना चित्रीत केली आहे. त्यावरुन ही घटना किती भीषण होती हे समजते.आपण बिबिसी, आँस्टोलिया प्लस आदी वृत्तवाहिन्यांचा युट्यूब चँनेलवलर हे चित्रण बघू शकतात.ही घटना  होवून तीन दिवस झाले, मात्र त्या देशापर्यत मदत पोहचवण्यास अत्यंत अडचणी येत आहेत. त्या देशाला जगाला जोडणाऱ्या समुद्रातील इंटरनेटच्या केबल पुर्णतः तूटलेल्या आहेत.(जगातील सर्व नेट केबलच्या मार्फत चालते यास अपवाद  फक्त आपला मोबाईल ते नजीकचा टाँवर) ज्यामुळे हा देश पुर्णतः जगापासून तूटलेला आहे. या देशापासून भौगोलिक अंतराच्या विचार करता अत्यंत जवळचे देश असणाऱ्या आँस्टोलिया आणि न्युझीलंड या देशातुन त्या देशात मदत पोहचवण्यासाठी हेलीकाँप्टरची मदत पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेल्या राखेमुळे ते पोहचवण्यात अडचणी येत आहे. सँटेलाईट फोनमार्फत त्यांच्याशी तूटक संवाद सुरु आहे. मी भौगोलिक नजीकचे म्हणून ज्...

पाकिस्तान मोठ्या बदलाच्या वाटेवर

इमेज
       शुक्रवारी 14 जानेवारी रोजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे  गेल्या 75 वर्षातील पहिले सुरक्षा धोरण जाहिर केले. हे सुरक्षा धोरण 2022 ते 2026 पर्यत पाकिस्तानची आर्थिक आणि अंतर्गत वाटचाल कशी असेल ? यावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकते. या धोरणाचे दोन अहवाल आहेत. त्यातील एक भाग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसरा भाग देशासाठी महत्तवाचा आहे, असे सांगून जनतेसाठी  प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. Wion Newsने दिलेल्या बातमीनुसार देशातील विरोधी पक्षांनी भारताशी गुप्त करार केला असल्याने तो भाग गुप्त ठेवला असल्याचा आरोप केला आहे. जो सरकारने पुर्णतः फेटाळला आहे. पाकिस्तानी सरकारने असा कोणताही करार करण्यात आलेला नाही. प्रत्येक देश त्यांचा प्रत्येक बाबी उघड करत नाही, तसेच याबाबत असल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगण्यात आले आहे.      या धोरणानुसार येत्या 100 वर्षात पाकिस्तान भारताशी युद्ध करणार नाही. या धोरणात काश्मीरविषयी अत्यंत त्रोटक उल्लेख असल्याने इंम्रान खान विरोधात तेथील जनमत मोठ्या प्रमाणात असल्याचे wion news  या वृत्तवाहिनी...