पोस्ट्स

आर्थिक पाहणी अहवाल २०२१- २२

इमेज
अर्थ संकल्पाचा एक दिवस प्रकाशित होणारा आर्थिक पाहणी या वर्षी अहवाल ३१ जानेवारी रोजी  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला  . आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था कशी होती ? पुढील वर्षात तिला कोणते धोके उदभवू शकतात याची माहिती असते अनेकांना अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालहे सारखेच वाटू शकतात त्यांना मी सांगू इच्छितो की . आर्थिक पाहणी अहवाल मागील वर्षाचा असतो तर अर्थसंकलपात पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन असते संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सन १९५० -५१ या आर्थिक वर्षापसून सुरु झाली सन १९६४ पर्यंत हा अहवाल अर्थसंकल्पाच्या दिवशीच सादर होत असे मात्र सन १९६४ पासून अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यास सुरवात झाली सर्वसाधानपणे आर्थिक पाहणी अहवाल चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या  इकोमोमिक्स डिव्हिजन मार्फत तयार केला जातो मात्र या वर्षी  चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ  डिसेंबर २०२१ मध्ये संपल्या...

आणि नाशिककरांची मान ताठ होते.

इमेज
                 दिनांक 28जानेवारी 2022ही तारीख नाशिककरांसाठी सुर्वणाक्षरात लिहीली जाईल, असी होती. नाशिकचे सुपुत्र जगातील 19वे आणि भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांनी बुद्धीबळातील विद्यमान विश्वविजेते कार्लस मँग्नस यांच्या बरोबर टाटा स्टील चेस चँम्पियनमध्ये कठीण स्थितीतील डाव बरोबरीत सोडून आपण भविष्यातील मोठे दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे.                या डावात विदीत गुजराथी यांनी काळ्या मोहऱ्या घेवून खेळताना कठीण स्थितीत त्यांनी डाव बरोबरीत सोडवला आहे, हे विशेष . बुद्धिबळात चढाई करण्याचा विचार करता पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळणाऱ्या खेळाडूला, तो पहिला खेळत असल्याने अधिक संधी असते.काळ्याला पांढऱ्याचे आक्रमण परतवून लावत, पांढऱ्यावर आक्रमण करावे  लागते. हे आव्हान विदीत गुजराथी यांनी यशस्वी पेलल्याचे त्यांचा या डावातून दिसते.दोन्ही खेळाडूंनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली. त्यानंतर काही प्यादाच्या चाली खेळल्यानंतर दोन्ही खेळाडुंनी स्वतःच्या रंगातील उंट स्वत...

पाकिस्तानचा पाय खोलात!

इमेज
          एखाद्याचा पाय खड्ड्यात जायला लागला तर एका पायाबरोबर दुसराही पाय खड्ड्यात जायला लागतो, असे म्हणतात.आपल्या भारताचा पश्चिमेकडील शत्रू अर्थात पाकिस्तानला ही स्थिती तंतोतत लागू होण्याची स्थिती निर्माण झाली तर नाहीना? अस्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . या घडामोडींचा परीणाम भारतावर देखील होणार असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .      तर मित्रांनो, ट्रान्सफरन्सी इंटरनँशनल या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या करपसन परस्पेशन इंडेक्स द्वारा पाकिस्तानात मागील काही वर्षांत भष्ट्राचार प्रचंड वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामुळे समाजमाध्यमांमध्ये पाकिस्तानाचा पंतप्रधान इम्रान खान याचा विरोधात टिकेचा सुर उमटत आहे. याच संस्थेचा  याच इंडेक्सचा विचार करता इम्रान खान सत्तेत येण्या आधी स्थान 116 होते जे आता 140 पर्यत घसरले आहे. सर्वात कमी भष्ट्राचारी देशास एक क्रमांक तर सर्वात भष्ट्राचारी देशास शेवटचा क्रमांक या पद्धतीने आपण याकडे बघायला हवे.इम्रान खान पाकिस्तानातील भष्ट्राचार कमी करण्याचे आमिष दाखवत सत्तेत आले होते.जे फोल गेलेले दिस...

चीनचे शेपुट वाकडेच

इमेज
   भारताचा शत्रू असणारा चीन गेल्या आठवड्यात दोनदा चर्चेत आला होता. दोन्ही वेळेस त्याचा सबंध भारताशी होता.चीन आपला शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तरी समर्थ रामदास स्वामी यांच्या "जे जे आपणास ठाव ते सकलांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकल जन" या उक्तीनुसार सांगण्यासाठी आजचे लेखन.       तर मित्रांनो चीन पाकिस्तानला अत्यंत अत्याधुनिक अस्या आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने खुप जास्त अंतर जावू शकेल ,असे क्षेपणास्त्र देवू शकण्याची अमेरीकन थिंक टँंक असणाऱ्या "इंटरनँशनल असायमेंट अँड स्ट्रेटेजी सेंटर कडून व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या एस 400 या क्षेपणास्त्राला तोंड देवू शकतो .या संस्थेत रिचर्ड डि फिशर हे चीनविषयक मोठे तज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांचा मते या आधीच चीनने हे क्षेपणास्त्र उत्तर कोरीयाला दिले आहे. पाकिस्तानबाबत चीन तीच गोष्ट करु शकतो.जर पाकिस्तानला अधिकृतपणे देता आले नाही तर उत्तर कोरीयाच्या मार्फत चीन पाकिस्तानला हे तंत्रज्ञान देवू शकतो. त्य...

मध्य आशिया आणि भारत सहकाऱ्यांचा नवा सेतू

इमेज
                      मध्य आशिया  भागातील किरिगिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान तझकिस्तान किर्गिस्तान या पाच मुस्लिम बांधांवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या देशांशी भारताचे पूर्वापार संबंध आहेत  युरोपाशी जमिनीच्या मार्गावरून व्यापार करण्याच्या मार्गातील अत्यंत मोक्याच्या स्थानी हे देश वसले आहेत सिल्क रूट या नावाने हा मार्ग परिचित होता या मार्गाने आपल्या भारतावर अनेक आक्रमक सुद्धा आले भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक बाबर या  देशातील उझबेकिस्तान या देशातील समरकंद या भागातील मुळचा  रहिवाशी होता स्वतंत्र भारताचे भारताचे दुसरेपूर्णवेळ पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर  याच भागातील उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीच्या तास्कंद या शहरात करारासाठी गेला असता संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाला  १९१ साली युनाटेड सेव्हियात सोशालिस्ट रशिया विसर्जीत झाल्यावर मधल्या काही काळात मात्र आपला त्यांच्याशी असणारा संपर्क तुटला         पंतप्रधानपदी...

भारतीय रेल्वे बदलतीये !...

इमेज
        आपली भारतीय रेल्वे झपाट्याने बदलत आहे. येत्या काही वर्षात आपण बघीतलेली भारतीय रेल्वे ती हीच का? असा प्रश्न पडावा असे बदल भारतीय रेल्वेत होत आहेत. सगळ्या भारताच्या परीवहन व्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रेल्वे ओळखली जाते .आज 2022मध्ये देखील विमान प्रवास सर्वसामान्य भारतीयांंचा पुर्णतः अंगवळणी पडलेला नाही. तर अस्या भारतीय रेल्वेत येत्या वर्ष दीड वर्षात होणारे बदल बघूया  1)100% विद्यूतीकरण : भारतीय रेल्वेतून कर्बवायूचे उत्सर्जन शुन्य व्हावे.भारतीय रेल्वे पुर्णतः प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे प्रकाश्याला लाजवेल या वेगाने आपल्या डिझेल इंजिनावर चालणाऱ्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे रेल्वेच्या अंदाजानुसार डिसेंबर 23 पर्यत रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण होईल. आजमितीस 75%पेक्षा अधिक रेल्वे विद्युत इंजिनावर धावत आहे विद्यूतीकरण व्हावे यासाठी इशान्य भारतात रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्याची प्रगती बघू शकतो. 2) डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर : भारतीय रेल्वेच्या महसुलातील खुप मोठा हिस्सा माल वाहतूकीचा आहे. मात्र रेल्वेचा जाळ्...

आत्महत्या: एक सामाजिक समस्या

इमेज
  आपले निर्माण करण्यात आलेले खोटे प्रतिष्ठेचे प्रश्न बाजूला ठेवून, आत्महत्या या गंभीर समस्येवर  आपण एकदिलाने काम करायची गरज असल्याचे, नाशिकमध्ये गेल्या वर्षभर झालेल्या आत्महत्येच्य संख्येने दाखवून दिले आहे. नाशिकसारख्या मध्यम आकाराच्या शहरात गेल्या वर्षी तब्बल ४१९  आत्महत्या झाल्या आहेत. सध्या कोव्हिड १९ च्या उद्रेकामुळे ताणतणावात वाढ झाली आहे, येत्या वर्षभरात जीवन पुर्वपदावर आल्यावर, या वाढलेल्या आत्महत्या देखील कमी होतील, असे मानने भाबडेपणाचे ठरेल. .  एखाद्याला वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या साठी खुप मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे आत्महत्या या वरकरणी शुल्लक कारणासाठी होत आहेत, असे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. किंबहुना क्षुल्लक कारण एखाद्याला मोठे वाटते , हे आपले मानसिक आरोग्य किती धोकादायक स्थितीत आले आहेत, याचा वस्तस्थितीदर्शक पुरावाच मानावा लागेल.ज्याला यातील गांभीर्य समजेल त्याला यातील दाहकता समजेल  रस्त्यावर विचित्र पद्धतीने पुटपुटत, हातवारे करत फिरताना दिसणारे लोक म्हणजेच मानसिक रोगी, ही मानसिक रोगाची संकल्पना आपल्या समाजात मोठ्या प्...