पोस्ट्स

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची गगन भरारी ऑनलाईन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

इमेज
              खेळामुळे मन ताजेतवाने होते , मनावरचा ताण सहजतेने निघून जातो . मेंदू नवनवीन आव्हाने स्विकारण्यास नव्याने तयार होतो . कोव्हीड १९ मुळे आपल्या सर्वांवर प्रचंड   प्रमाणात अतिरिक्त ताण आलेला आहे . ज्यामुळे आपण सर्वांनी खेळणे अत्यावश्यक आहे सध्याचा कोव्हिडचा पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष समोरासमोर खेळाची स्पर्धा घेणे अवघड आहे . मात्र बुद्धीबळ , सुडोकू , सारख्या बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यास काहीच अडचण नाही . तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक   ग्रँडमास्टरला अभिजीत कुंटे यांना मेजर ध्यानचंद   पुरस्कार जाहिर झाला आहे .  जी समस्त बुद्धीबळ प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे . गेल्या ७५ वर्षात कोणत्याही बुद्धिबळपटुला केंद्र सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता . हा आनंद साजरा करण्यासाठी आणि खेळाचे सध्याचा काळातील महत्व लक्षात घेवून नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून ...

बुडत्याला काडीचा तर पाकिस्तानला चीनचा आधार

इमेज
             आपल्याकडे बुडत्याला काडीचा आधार अशी म्हण आहे,  एखादा मोठा संकटात असताना त्यास केलेली छोटीसी मदत देखील खूप महत्वाची ठरते . असा या म्हणीचा अर्थ आहे .  सध्याचा काळात या म्हणीचा अनुभव पाकिस्तान घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पाकिस्तानच्या बाबतीत ही काडीची भूमिका बजवात आहे आपले शत्रू राष्ट्र चीन . चीनने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दोन गोष्टींबाबत मदत केली एक गोष्ट शास्त्रांबाबत होती तर दुसरी होती आर्थिक विषयक पाकिस्तानचे सौदी अरेबिया सारखे मित्र पाकिस्तानमधील गुंतवणुकीबाबत नकारात्मक विचार करताना तसेच दुसरा मित्र तुर्कीये ( तुर्की ) स्वतःच्या देशांतर्गत समस्येत व्यस्त असताना चीनची मदत पाकिस्तानला खूप मोठी साह्य करणारी ठरत आहे स्वामी समर्थांच्या जे जे आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन           तर पाकिस्तानाने चीनकडून ३ अब्ज अमेरिकी डॉलर कर्जाची मागणी केली आहे . चीनमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी  ऑलम्पिक नांतर  पाकिस्तानचे...

पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात वाढ

इमेज
                 पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात दिवसोंदिवस  वाढच होताना दिसत आहे .  पाकिस्तानचे परकीय चलनमुळात कमी असताना ते मोठ्या झपाट्याने कमी होत आहे परकीय चलन मिळवण्याचे मार्ग सुद्धा दिवसोंदिवस कमी होत चालले आहे  पाकिस्तानच्या डोक्यावरचे परदेशी कर्ज बघून सुद्धा आय एम एफ सुद्धा बेलआऊट पॅकेज देण्यास फारशी इच्छुक नाही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे  अनेक मिनतवाऱ्या करून सुद्धा परदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानात गुंतवणूक करायला तयार नाहीत या आधी ज्यांनी गुंतवणूक करू असे,  सांगितले होते ते देश सुद्धा आत हात आखडता घेत आहे या हात आखडता घेण्यात नुकताच पाकिस्तानचा मित्र देश सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे आजपासून सुमरे तीन वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानात तब्बल २० अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवूणक करण्याचे ठरवले होते.  ही गुंतवणूक सौदी अरेबिया पाकिस्तानातील विविध विकास कामामध्ये करणार होता  त्यातील बलुचिस्तानमधील तेल विहिरींबाबत सौदी अरेबियाने या आधी...

वाहतूक सुरक्षा रामभरोसे ,हे दुर्देवच

इमेज
         देशातील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे, हे शुक्रवार 5फेब्रुवारी रोजी नाशिककरांनी अनुभवले. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुली येथे एक मालट्रक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या बसचा मोठा अपघात झाला.यावेळी बस पलटी झाली आणि  रक्ताचा थारोळ्याने सर्व परीसर लालेलाल झाला.बसमधील काही विद्यार्थी रुग्णालयात जीवन मरणाची झुंज देत आहेत. काही दिवसापुर्वीच भाजपाच्या एका आमदाराच्या मुलाचा त्याचा सहा मित्रांसह अपघाती मृत्यू झाल्याचे आपणास माहिती असेलच. या घटना देशातील वाहतूक व्यवस्था राम भरोसेच असल्याचे स्षष्ट करत आहे.                चांगले झालेले रस्ते हे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आहे, हे रस्ते अतिवेगात चालवण्यासाठी नाहीत, याचा विसर पडल्याने प्रचंड वेगात वाहने चालवण्याची स्पर्धाच सध्या भारतात सुरु आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वेगात वाहने चालवण्याबरोबर दुभाजकामुळे समोरच्या रस्त्यावर जाण्यास, लांबच्या मार्ग अवलंबावा लागत असल्यास, ऐकरी मार्ग सोडून विरुद्ध दिशेने वाहन ...

पाकिस्तान अस्थिरतेच्या विळख्यात !

इमेज
     पाकिस्तान सध्या अस्थिरतेचा विळख्यात सापडला असल्याचे सध्या तेथील घडामोडी बघता दिसून येत आहे. तेथील बलूचिस्तानमधील  फुटीरतावाद्यांनी काही दिवसापूर्वीच लाहोरचा अनारकली बाजारात स्फोट केला होता. पुण्याचा तूळशीबाग समकक्ष असणाऱ्या या  बाजारात झालेल्या स्फोटामुळे फारशी जिवित हानी झाली नव्हती. मात्र या स्फोटातून स्फुर्ती घेत, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीतर्फे 2 फेब्रुवारी रोजी रात्री  बलूचीस्थानमधील पांजगुर आणि नुशकी   या दोन शहरामध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला करण्यात आला .या हल्यानंतर बलूचीस्थान लिबरेशन आर्मीच्या टेलीग्राम अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार या मध्ये 100 पाकिस्तानी लष्करी जवान प्राणास मुकले आहेत. तर बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचे 4 जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने ट्टिट करत, पाकिस्तानी लष्कराने फार मोठा दहशतवादी हल्ला झाल्या परतवून लावल्याबद्दल त्याचे  अभिनंदन केले आहे. आजमितीस या क्षेत्रात  पाकिस्तानी  माध्यमांसह सर्व माध्यमांना प्रवेश बंद करण्यात आला आहे...

पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?

इमेज
                      पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?अशा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानबाबत जागतिक पातळीवर घडत आहेत .पाकिस्तानच्या   अमेरिकेतील वर्तमान राजदूत असद मसिद खान हा पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतून सेवा निवृत्त होत असल्याने  मुदत पूर्ण झाल्याने पाकिस्तानने अमेरिकेला हा असेल आमचा तुमच्या देशातील नवीन  राजदूत म्हणून ज्या पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याचे नाव सुचवले त्या अधिकाऱ्यास अर्थात मसूद खान यास  अमेरिकेने त्यांचा देशातील पाकिस्तानचा राजनॆतिक अधिकारी म्हणून मानण्यास नकार दिला आहे . सदर अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी जवळचे संबंध आहेत असे कारण त्यांनी या साठी दिले आहे .  एखादा  देश दुसऱ्या देशात आपला राजनीतिक अधिकारी नेमतो  तेव्हा त्या अधिकाऱ्यास दुसऱ्या देशाचा संवैधानिक प्रमुखास भेटून मी तुमच्या देशात राजनैतिक प्रमुख म्हणून आलेलो आहे तरी मला तुम्ही काम करण्यास मान्यता असे सांगावे लागते त्यावेळी त्या देशाचे संवैधानिक प्रमुख त्या अधिकाऱ्याचे कर्तृत्व ब...

नव्या जिल्ह्यांचा प्रसवकळा

इमेज
       महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांचा मागण्या नव्या नाहीत. नांदेड जिल्ह्यातुन किनवट, पुणे जिल्ह्यातून बारामती, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर आदी अनेक जिल्ह्याचा मागण्या होत आहेत. काही मागण्यांना मोठा इतिहास देखील आहे, जसे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव , अहमदनगर जिल्ह्यातून नविन जिल्हा तयार करणे, वगैरे. फेब्रुवारी 2022 मध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि यास कारणीभुत ठरला आहे, आंध्र प्रदेश सरकारचा एक निर्णय. आंध्र प्रदेश सरकारने उत्तम प्रशासनासाठी आवश्यक आहे, असे कारण देत आंध्र प्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या दुप्पट करण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेश सरकारने याबाबत जनमत जाणून घेण्यासाठी अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. ज्यावर येणाऱ्या हरकती सुचनांवर विचार करत एप्रिल महिन्यात सुरु होणाऱ्या त्यांचा सांस्कृतिक नव्या वर्षात (महाराष्ट्रातील गुढी पाडवा, गुजरातमधील बलीप्रतीपदा समकक्ष) हे जिल्हे अस्तिवात येतील असी शक्यता आहे. जर हे विना अडथळा पार पाडले तर सध्या (फेब्रुवारी 2022)असणारी आंध्र प्रदेश मधील असणारी 13 जिल्ह्यांची संख्या 13 ने वाढून 26...