पोस्ट्स

महाराष्ट्र एसटीची वाटचाल मध्यप्रदेशाच्या एसटीच्या मार्गवर ?

इमेज
                  सुमारे गेल्या चार महिण्यापासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आपले राज्य शासनात पूर्णतः विलीनीकरण करावे या मागणीसाठी संप करत आहेत सध्या हा मुद्दा न्यायालयात विचाराधीन आहे एसटी प्रशासनाने निवृत्त कर्मचारी , खाजगी कंत्राट करून सेवेत रुजू करून घेतलेले कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने गाड्या चालवण्याचा प्रयत्न करत आहे . मात्र मूळ सेवेच्या तुलनेत तो अत्यंत  तोकडा आहे. नाशिक पुणे , कोल्हापूर पुणे अश्या मोठंत शहरांना जोडणाऱ्या मार्गावरच्या काही बसेस सुरु झाल्या आहेत . मात्र अनेक मार्गावरच्या बसेस अद्याप आगारातच उभ्या आहेत ग्रामीण महाराष्ट्रात जवळपास शून्य टक्क्याच्या  आसपास  बस सेवा सुरु आहे . माझ्या ,मते एसटीचा मोठा प्रवाशीवर्ग हा ग्रामीण भागातच आहे शहरी भागात ब्ला ब्ला कार , ओला,  उबेर आदी अनेक पर्याय उपलब्ध आहेत .सबब एक फार मोठा वर्ग सध्या एसटीपासून दूर जात आहे .बुंदसे गइ,  वो हौदसे नही आती या हिंदी वाक्यप्रचारानुसार वेळेवर एसटीची बस सेवा न मिळाल्याने एसटी बाबत जो आकस ग्रामीण महाराष्ट्रात निर्माण झाला आहे...

शिवधनुष्याचे यशस्वी पेलणे.

इमेज
  आपल्याकडे अशक्यप्राय वाटणाऱी गोष्ट करणे यासाठी शिवधनुष्य पेलण्याची उपमा दिली जाते. भगवान शिव यांचे सारेच अलोकिक त्यामुळे त्यांचे सारचे प्रतीप्रचंड मोठे ,विशाल, त्यामुळे त्यांच्या गोष्टी हाताळणे खुपच अवघड .ते हातळणे  खुपच कौशल्याचे काम असा या मागचा भावार्थ आहे.      नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने असेच एक शिवधनुष्य नुकतेच लिलया हाताळले. फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीला बुद्धिबळ खेळाचे भारतातील व्यवस्थापन करणाऱ्या, शिखर संस्थेमार्फत अर्थात आँल इंडीया चेस फेडरेशनतर्फे येत्या 25 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. त्यासाठी राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यात यावा असे सांगण्यात आले. वेळ  अत्यंत कमी असल्याने राज्याचा संघ निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यास मात्तबर ज्यांना अस्या स्पर्धा आयोजनाचा अनुभव आहे, अस्या जिल्हा बुद्धिबळ संघटना कचरु लागल्या. अश्या वेळी जो आव्हान शिंगावर घेतो, तोच खरा योध्दा या न्यायाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे...

आपली गोदावरी वाचावा ...

इमेज
              नाशिकचे भूषण असणारी  गोदावरी नदी  वाचवण्याची गरज असल्याचे बुधवार १६ फेब्रुवारी रोजी हरित लवादाने दिलेल्या निकालामुळे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आपल्या निवाड्यात हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यास आणि अंघोळ करण्यास लायक नसल्याचे स्पष्ट केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पंच्या दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण हरित लवादाने आपल्या निकालात  नोंदवले आहे  राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने या बाबत भाष्य करताना सांगितले की नाशिक आणि त्रंबकेश्वर या शहरात  दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते.जे अत्यंत चिंताजनक  असून या सांडपाण्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यास सोडा अंघोळीस देखील लायक नाही मात्र तरी देखील लोक ते वापरत आहेत जे वाईट आहे या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने राज्य आणि स्थानिक प्...

नाशिकमध्ये रंगणार राज्य बुद्धिबळ स्पर्धेचा थरार

इमेज
     नाशिकला क्रीडापटूंची मोठी परंपरा आहे नाशिकने ग्रँडमास्टर विदित गुजराथी, आशियाई शालेय बुद्धिबळ विजेती प्रचिती चंदात्रे सावरपाडा एक्सप्रेस  कविता राऊत, दत्तू भोकनळ यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटू आणि  क्रिकेटवीर दिले आहेत मात्र स्पर्धा आयोजनात नाशिक काहीसे मागे पडले आहे गेल्या कित्येक वर्षात कोणत्याही खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये रंगलेली नाही मात्र हा कलंक आता पुसला जाणार आहे कारण    येत्या शनिवारी रविवार अर्थात १९ आणि २० फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना महाराष्ट्राचा  राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठीचा संघ निवडण्यासाठी स्पर्धा घेणार आहेत ज्या ठिकाणी  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न अश्या ३२ जिल्हा बुद्धिबळ संघटनांकडून निवडण्यात आलेले ४ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आपले बौद्धिक चातुर्य दाखवत महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी एकमेकांशी बुद्धिबळाचा पटावर झुंज देतील           नाशिकमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजराथी,  आशियाई  शालेय बुद्धिबळ विजेती...

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

इमेज
                   आपण रस्त्यावरून जाताना एक पाटी अनेकदा बघतो , मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक . खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे हे ! रस्त्यावरून जाताना मनाला यावर घातला की त्यामुळे आपसूकच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते परिणामी वाहन अनियंत्रित होत नाही जर दुर्दवाने  काही कारणाने वाहन अनियंत्रित झालेच  तर वाहन लगेचच नियंत्रणात येते त्यामुळे मोठा अपघात  टाळून त्यांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व किंवा काही प्रसंगी येणार मृत्यूही टाळला जातो हे सर्व मोजक्या शब्दात सांगण्यासाठी हि वाक्यरचना वापरली जाते . माझ्यामते फक्त रस्त्यावर नाही तर रोजच्या आयुष्यात देखील उपयोगी पडणारी ही वाक्यरचना आहे आपण नुकताच नाशिक जिल्ह्यतील - देवळा तालुक्यात घडलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबियांकडून सामूहिकरीत्या घडलेला खून हे हेच सुचवत आहे . लग्नाला मोडता घालत असेल तर पोलिसी कारवाई करता आली असती मात्र रागाच्या भरात प्रियकरला पेटवून त्या कुटूंबियाला काय मिळाले ? आता ते बराच काळ तुरुंगात राहतील त्या अर्थी ते कुटूंबीय संपलेच आणि ज्या प्रियकराच्या खून करण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर

इमेज
                 जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर नाहीना असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या रशिया आणि युक्रेनबाबत घडत आहेत सध्याचा रशिया आणि भूतपूर्व युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणाऱ्या मात्र १९९१ पासून स्वतंत्र देश असलेल्या युक्रेन यांच्या सीमेवर रशियाने मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे युक्रेनला कोणत्याही स्थितीत अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन चा सदस्य होऊ देणार नाही प्रसंगी वेळ पडल्यास युक्रेनवर आक्रमण देखील करू अशी रशियाची भूमिका आहे नाटो या संक्षिप्त नावाने परिचित असणारी  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी हितसंबंध जपणारी संघटना शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या पुढाकाराने  युनाटेड  सेव्हियत सोशालिस्ट रशियाची लष्करी सहयोग संघटना सीटोचा प्रभाव कमी करण्यासाठी झाली होती  काही दिवसापूर्वीच रशियाचे काहीसे  हुकूमशहा पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी  युनाटेड  सेव्हियत सो...

विदित यांचे नष्टचर्य कधी संपणार ?

इमेज
                   नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार ? असा सवाल सध्या बुद्धिबळप्रेमींकडून  करण्यात येत आहे . टाटा स्टील चेस  टूर्नामेंटमध्ये नवव्या फेरीपर्यंत अत्यंत उत्तम प्रदर्शन करत  विजयाचा दावेदर समजल्या जाणाऱ्या  विदित यांचा  पराभव दहाव्या फेरीत भारताच्याच आर प्रगण्यानंद  यांनी केला त्यानंतर ११ फेरीत बुद्धिबळाच्या विद्यमान विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कलर्सन यांच्या बरोबर झालेला डाव वगळता त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन काहिसे निराशाजनकच ठरले.  अर्थात कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे नैराश्याचे ढग येतच असतात मात्र विदित यांच्यासारखे खेळाडू त्यांच्यावर मात करत पुन्हा नव्याने उभारी घेतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील असा कालखंड येऊन गेला जो नर्व्हस नाईन्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्यावर ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी मात  केली तसे विदित पण करतील यात एक बुद्धिबळप्रेम...